14 September 2012

हिंदू - जगण्याची सम्रुद्ध अडगळ

              मराठी साहित्य प्रकाशना दिवशीच रेकॉर्डब्रेक करणारी भालचंद्र नेमाडे यांची "हिंदू - जगण्याची सम्रुद्ध अडगळ" हि प्रदिर्घ प्रतिक्षा असणारी कादंबरी प्रकाशीत झाली तेंव्हा साहित्य विश्वात एकच खळबळ उडाली. कादंबरीवरती अनेक अंगाने चर्चा सुरु झाली.कादंबरीवरती अनेक अंगाने लिहिता येईल, नेमाडेंचा देशी वाद, ब्राह्मणी जोखडातून नेमाडेंनी अस्सल कष्टकर्यांची सुटका केलेली आहे."हिंदू" मध्ये कारुण्य आहे,रंजकता आहे, ग्रामीण जीवणाचे यथार्थ दर्शन आहे, विनोद आहे.गावगाड्यातील समाजजीवनाचे जिवंत असे चित्रण  केले आहे.पारावरच्या, पाराखालच्या, शेतातील. आडोशाचे,खाजगीतील बोली भाषा आहे त्यामुळे कदंबरी अधिकच अक्रुतीम झाली आहे.हिंदू वरती अनेक अंगाने लिहिता येईल भाषाशास्त्राचे, मराठी भाषेचे तज्ञ ते काम करतीलच पण इथे नेमाडेंनी ब्राह्मणी छावणीला दिलेला धक्का याबाबत विवेचन करणार आहे.वैदिक उर्फ़ ब्राह्मणी परंपरेने भारतात विषमता , अंधश्रद्धा, स्त्रीबंधन लादली याविरुद्ध अनेक महापुरुषांनी काम केले, महिलांवर तर ब्राह्मणी परंपरेने अनेक अमानुष नियम लादले.
            ब्राह्मणांची कटकारस्थानं उघड करताना नेमाडे लिहितात "साले हे ब्राह्मण लोकच  गावोगावी अशी जातीभेदाची लफ़डी सुरु करतात....कशावरून  ? .. एवढा मोठा जातिभेद मोडणारा आपला वारकरी पंथ ह्या ब्राह्मणांनी नासवला.पुन्हा ब्राह्मणी धर्मच वारकरी पंथावाटे लादला हो आपल्यावर पेशवाईपासून स्वराज्य तर बुडवलंच, आता चालले एकेक इंग्रजी शिकून नोकर्या धरायला शहराइत, शहरी होत चालले ब्राह्मण ..(प्रुष्ठ क्र.१५७)" जातीभेदाची निर्मिती ब्राह्मणांनीच केली असे नेमाडे सांगतात.तसेच वारकरी पंथ हा जातिभेद मोडणारा होता.पण अलीकडे वारकरी पंथातच जातीभेद पाळला जातो.जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या आरतीला विरोध करणारी प्रव्रुत्ती ब्राह्मणांचीच, वारकरी पंथ हा अंधश्र्द्धा विरोधी आहे पण अलीकडे वारकरी पंथातील लोक अंधश्रद्धाळू,देवभाळे,विषमतावादी झाले आहेत, कारण ब्राह्मण त्यामध्ये घुसले आणि वारकरी पंथ नासवला. वारकरी पंथ हा ब्राह्मण विरोधी पण ब्राह्मणी धर्मच वारकरी पंथाद्वारे लादला आणि हे काम ब्राह्मणांनी पेशवाईच्या काळात केले.छत्रपती शिवरायांनी निर्मान केलेले रयतेचे स्वराज्य ब्राह्मणांनी बुडविले मराठी अस्मितेच्या गप्पा मारणार्या ब्राह्मणांनीच इंग्रजी शिकून शहरे गाठली , हेही नेमाडे यांनी निसंदिग्धपणे लिहिले आहे.भारतातील बौद्ध धर्म का संपला आणि ब्राह्मणांचा हिंदू धर्म खेड्यापाड्यात का गेला ते सांगताना नेमाडे लिहितात "खेडोपाडी कानाकोपर्यात मिलिटरीसारखे ब्राह्मण जाऊन राहिवल्यानं हिंदूधर्म  खेडोपाडी रुजला.बौद्धधर्म शहरीच होता , शहरीच राहिला त्यामुळे संपला" (प्रुष्ठ क्र. १५८,५८७)
          शेतकर्यांची मुलं शिकून डॉक्टर,वकील,इंजिनीअर, प्राध्यापक , कलेक्टर झाली पण परोपकार, प्रेम, समता,विज्ञानवाद विसरत चालली.या बाबत नेमाडे लिहितात "वारकरी हिंदू  धर्माचा नैतिक पाया किती भुसभुशीत झाला आहे.याचा पुरावा म्हणजे ही तळागाळातील गरीब शेतकर्यांची मुलं.शिकून वर गेली आणि शेतकर्यांचा फ़ाळ गोतास काळ बी निसूक निघाल हो हंगाम निष्टुक वाया गेला हो !"(प्रुष्ठ क्र.३०२) ब्राह्मणी धर्म वारकरी पंथात घुसल्यानेच तो नासला आणि पर्यायाने त्यांचे अनुयायी देखील नासले.ब्राह्मण जिथं घुसतो ते नासवुनच टाकतो, असेच नेमाडेंनी सुचित केलेले आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काय चालते ? बहुजन मुलांच्या मनावर मुस्लिमद्वेष आणि ब्राह्मणी श्रेष्ठ्त्व कसे बिंबवले जाते याबाबतचे अत्यंत धक्कादायक वर्णन नेमाडे यांनी  प्रुष्ठ क्र.३१८ ते ३२४ वर केलेले आहे.यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही विक्रुतांची टोळधार आहे हे स्पष्टपणे लक्षात येते.
            महात्मा गांधी यांची हत्या ब्राह्मणांने केली असताना देखिल ती मुसलमानानेच केलेली असावी असा संशय होता.पण ती ब्राह्मणाने केली आणि त्यानंतर काय झाले याचे सविस्तर वर्णन नेमाडे यांनी प्रुष्ठ क्र.३२४ ते प्रुष्ठ ३२७ वर केलेले आहे.त्यातील काही भाग पुढील प्रमाने ".. हे असं (गांधी हत्येचं) राक्षसी क्रुत्य फ़क्त ब्राह्मणच  ह्या देशात करु शकतो. ते खरच ठरलं.रात्री दिल्लीहुन इकडे तिकडे केलेल्या ट्रंक फ़ोनवरून खुनी माणूस गोडसे होता, अशा बातम्या मोरगावांत ("हिंदू " कादंबरीचा नायक खंडेराव पाटलांचे गांव) आल्या आणि सकाळी तर ठेंगू जोशीबुवांना दिल्लीहुन मुलाची तारच आली.-- काळजी घ्या ----राजाभाऊ अग्निहोत्री यांनी रात्री ब्राह्मणवाड्यात साखर वाटली. अशी कुजबुज होती." ब्राह्मण आळीत एकाने बायकोला हर्षभरात , अहो, पुरणपोळ्या करा , असंच काहीतरी ओरडून सांगितल्याचही काहिंना ऐकल्याचं स्पष्ट आठवत होतं " ( प्रुष्ठ क्र.३२५) सावरकर देशभक्त वगैरे नसून मुसलमानांचा द्वेष करणारा आणि देशाची फ़ाळणी करणारा असा द्वेषी माणुस होता असे नेमाडे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. "याचं(सावरकराचं) देश कार्य म्हणजे द्वेषकार्य" आपल्या देशात खालच्या जातीच्या लोकांना वैदिक,ब्राह्मणी धर्माने फ़ार छळले त्यामुळेच मुसलमान धर्म लोकांनी जवळ केला, याबाबत उद्वेगाने नेमाडे लिहितात " आपला हिंदूधर्म खालच्यांसाठी काय शेटं करतो ? " (प्रुष्ठ क्र.३२९) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गुप्त अजेंडा काय होता, याबाबत निळुभाऊच्या डायरीतील नोंदिवरून नेमाडे यांनी पुढील विवेचन केले आहे पहिल्याच पानावर.
      " स्वत:च्या रक्तानं रंगवलेला भगवा झेंडा. नंतर एका पानावर एका खाली एक लिहिलं होतं
१७५७
१८५७
१९५७
          काय याचा अर्थ ? याचा अर्थ तुमच्या सारख्यांना सांगुन काय उपयोग ? १७५७ पलाशीची लढाई, १८५७ तात्यांचं बंड, आणि आता १०० वर्षांनी - रक्तरंजित  आसे तु हिमाचल, अखंड हिंदूस्तान, एकुण एक इंग्रज कापून काढला जाणार होता.राजधानी पुणे ठरली होती.राष्ट्रध्वज भगवा, राष्ट्रगीत - नमस्ते सदावत्सले - स्वतंत्रते भगवते एकत्रित घटना वगैरेचा व्यय आणि घोळ कशाला ? मनुस्म्रुती आहेच."(प्रुष्ठ क्र.३३०)मनुस्म्रुतीने बहुजनांच्या हजार पिढ्यांना नरक यातना दिल्या.त्या मनुस्म्रुतीचे राज्य ब्राह्मणांना अपेक्षीत होतं. हे नेमाडेंनी मांडले आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करणार्या बहुजन समाजातील तरुनांचा ब्राह्मण वापरून कसा चोथा करतात हे नेमाडेंनी रेखाटलेल्या "निळुकाकाच्या " पात्रावरून लक्षात येतं.ब्राह्मण पत्रकार ,संपादक बहुजनांच्या ग्रामिण भागातील बातम्या वस्तुस्थितीला धरून देत नाहीत.याबाबत ग्रामीण भागातील शेतकर्यांची संपादकाबाबतची प्रतिक्रिया नेमाडे यांनी पुढीलप्रमाणे नोंदवलेली आहे."खरंच आहे हो, तो मायझवाड्या संपादक श्रमाची काय प्रथिष्ठा मानतो ? " (प्रुष्ठ क्र.४०८)
       आजच्या वारकरी पंथात जातीभेद आहे.नुसते देवळात नाचुन अध्यात्मिक सुख मिळवण्याच्या बाता मारतात.मुसलमान तर सोडाच पण महारमांगाना देखील यांनी सामावून घेतले आहे, मुसलमान द्वेष शिकवणार्या तथाकथित हिंदुत्ववाद्यांना नेमाडे सवाल विचारतात."एकादशीला मिरची,रताळ,पेरू,पपया, शेंगदाणे,खजुर, बटाटा, साबूदाणा असले म्लेंच्छ यावणी पदार्थ कसे काय चालतात ? हे तर अलीकडे बोटींनी समुद्रावरून आयात केलेले पदार्थ."(प्रुष्ठ क्र.४४१) रामदास हा शिवरायांचा गुरु नसताना , तो तसा ब्राह्मणांनी रेखाटला याउलट तो एका मुलीचे जीवण उद्ध्वस्त करून लग्न मंडपातून पळाला, याबाबत खंडेरावांचे मित्र मछिंदर , वाणखेडे , अनंतराव यांचा संवाद नेमाडे पुढील प्रमाणे रेखाटलेला आहे."(मछिंदर अनंतरावला म्हणतो ) रामदास स्वामींच्या  मंडपात राहुन गेलेल्या बायकोच्या दु:खावर फ़ार सुंदर कविता होईल नाही ? वानखेडे म्हणाला , सुंदर ?  तिकडे कोवळी पोरगी का बोडकी ठवली जन्मभर का मारली - आणि तुला सुंदर कविता लिहायचीय ?  त्यापेक्षा ती उद्ध्वस्त बाई हातात वहान घेऊन याला(रामदासाला) शोधत शिवरथकडे चाललीय अशी कविता - पेक्षा श्लोकच का नाही लिहित- 
         जनाचे श्लोक मनाची नको लाज ठेवू तू जरी ।
     जनाची तरी ठेवी पळपुट्या नागड्या तू ॥
इथे मराठी कवींना तर रामदासाच्या ह्या बिचारीचं नाव सुद्धा माहीत नाही नै.॥" (प्रुष्ठ क्र.४५०)
          ब्राह्मण पत्रकार हा अक्षरज्ञान, धुर्तपणा, कावेबाजपणा याच्या बळावर काय-काय उचापती करतो हे अनंतराव या पत्राद्वारे नेमाडेंनी अत्यंत रसभरीत वर्णन केलेले आहे, आणि हाच अनंतराव काय करायचा हे नेमाडे लिहितात. "मराठे आणि महारांमध्ये कलागती लावून त्याबद्दल कलात्मक भाषेत लिहिणं - ह्या जबाबदार्या एकटा अनंतराव जबाबदारीनं सांभाळायचा" (प्रुष्ठ क्र.४५०) मराठावाडा नामांतराचा लढा पुरोगामी ब्राह्मणांनी कसा लावून दिला, पुणे , मुंबई विद्यापिठाच्या नामांतराबद्दल न बोलणार्या पुरोगामी ब्राह्मणांचे नेमाडे यांनी पितळ उघडे पाडलेले आहे."अशा भंपक सुधारणा आपल्या पुण्यात किंवा मुंबईत न होता दुसर्या मागासलेल्या भागात झाल्या तर उत्तमच, असं वाटणार्या पुण्या - मुंबईच्या उच्चवर्णीय पुरोगामी विचारवंतांनी सगळीकडून मराठावाडा विद्यापिठाचं नाव बदललं पाहिजे , अशी मोहिम सुरु केली "(प्रुष्ठ क्र.४६४) दशमान पद्धती हि आर्य, द्रविडपुर्व अतिप्राचिन असुन त्याबाबतचे संशोधन झाले पाहिजे आणि  ब्राह्मणी व्युत्पतीवर नेमाडेंचा विश्वास नाही , त्याबाबत ते लिहितात "दहा पर्यंतचे आकडे वेगळे करायचे , अकरा- बारा-तेरा - पंधरासतरा-अठरा - ह्या सगळ्यांच्या शेवटी रा आहे. रा म्हणजे दहा -----रावणमध्येही दहा या अर्थी रा-----असावं------राव म्हणजे आवाज म्हणून रावण, असल्या संस्क्रुत बंडल व्युत्पत्त्यांवर आपला विश्वास नाही" (प्रुष्ठ क्र.५३४) ग्रेट निकोबरी सारख्या आदिवासी समाजात बायकोवर कोणत्याही स्वरुपाचा संशय घेत नाहीत्पण हिंदू संस्क्रुतीची अवस्था काय आहे याचे विवेचन करतात , "लहान मुलं ज्या निकोबारी तरुणाला सतत चिकटून असायच त्या तरूणाला मंडीने विचारले , हा कोण ? निकोबारी म्हणाला--माझ्या बायकोचा मुलगा---असं कसं ? ह्यावर तो चिडून म्हणाला , तुम्हा बायकांना हे कळायला पाहिजे, बायकोला मी सोडून दुसर्यापासून मुल नाही होऊ शकत ? आश्चर्य , अरे, इंग्लंड मध्ये सुद्धा कुठलाही नवरा असं चिंतू सुद्धा शकणार नाही.हि नैतिकता भारतीयांच्या केंद्रस्थानी यायला पाहिजे.इथे थोड्याशा संशयावरून बायकोला जाळुन टाकणारी आमची हिंदू संस्क्रुती -----" (प्रुष्ठ क्र.५३८) हिंदूधर्मात मुलींची किंमत नाही, याबाबत नेमाडे लिहितात " मुलींची काय किंमत ?  गचाळ हिंदू कुटूंब व्यवस्था" (प्रुष्ठ क्र.५८३)   
           भालचंद्र नेमाडे यांनी अशा अनेक बाबी प्रस्तुत कादंबरीमध्ये नोंदविल्या आहेत.त्यांचे सविस्तर लेखन म्हणजे एका पुस्तकाचा विषय आहे, हे काम पुढे कोणी तरी करेलच , नेमाडे यांची भाषा लोकभाषा आहे , ती कष्टकरी , श्रमकर्यांना आपली वाटणारी आहे,नेमांडेंच्या भाषेला ब्राह्मणी निकष लावणे गैर आहे, नेमांडेंकडे जस फ़टकळपणा आहे , विनोद आहे तसेच दु:खी, श्रमकरी, कष्टकरी, शेतकरी स्त्रिया यांच्या व्यथा मांडणारे कारुण्य देखील आहे,भाषा , आशय, वाकप्रचार, म्हणी , शब्द, साहित्य, कादंबरी ही ब्राह्मणीच असली पाहिजे या ब्राह्मणी सांस्क्रुतीक दहशदवादाला गाडणारी आणि त्यांच्या  व्यवस्थेला उघडी पाडणारी  भालचंद्र नेमाडे यांची "हिंदू - जगण्याची सम्रुद्ध अडगळ" ही कादंबती आहे.

40 प्रतिक्रिया :

  1. तुम्हाला खरच असं वाटतय की ब्राह्मण सगळ्या समस्येचं मुळ आहे आणि त्यांना संपविले तर संपेल सर्व प्रश्न ? तुम्ही ब्रिगेडी च्या आहारी जाऊ नका.. तुमचा ब्लोग खुपच चांगला आहे तेंव्हा चांगला वापर करा तुमच्या ब्लोग वर ब्राह्मण विरोधीबरेच लेख आहेत पण ते ब्रिगेड सारखे विशारी नाहीत...दु:ख देणारे असले तरी ते खरे आहेतच काही अंशी, बघा आपल्यासारखे लोकच जातियवाद संपवू शकतात.
    जय शिवराय ।

    ReplyDelete
    Replies
    1. कुणालाही मारून कुठलाही प्रश्न सुटत पन वाद हा व्हायला पहिजेच ना कारण वाद - विवाद हे जिवंत असण्याचे लक्षण आहे.विरोध करणे आणि मारणे यात बराच फ़रक असतो असे मला वाटते आम्ही विचारांना विचारांने विरोध करतो कुणाला मारा किंवा संपवा ही व्रुती पण विक्रुतीच आहे.

      Delete
  2. आज काय परिस्थिति आहे काही समजत नाही आपल्या धर्मात कोणीही येतं आणि काहीही लिहुन जाते आम्हाला खर्या हिंदुंना त्याचे काहीही नाही , खरच यासाठीच एकत्र येणे गरजेचे आहे.

    ReplyDelete
  3. साहेब त्या कादंबरी मध्ये अजुन बरेच काही दिलेले आहे ते तुम्ही वाचले नाही काय ? तुम्हाला नुसता ब्राह्मन द्वेष वाटतो कोणत्याही गोष्टीत. तुम्ही ब्रिगेडी वाले काही पण कराल काय सांगता येत नाही तुमचं.ब्राह्मण दिसला की लगेच सुरु होता. विकास करा.

    ReplyDelete
  4. नाद खुळा पाटील जबरद्स्तच लिवलाय बघा लेख...आता सगळे भट कसे गप्प बसतील आपल्य लिखानामुळे. आपण एक चांगले काम करत आहात हे आम्हाला समजले तसे आम्ही अशी आशा करतो की भटांना पण समजेल एक दिवस..

    ReplyDelete
  5. नेमाड्यांनी या कादंबरी साठी बराच काळ अभ्यास करुन कादंबरी लिहिली आहे असे कुठेसे वाचले होते. आता या कादंबरीच्या पहिल्या खंडातुन मला तरी हे फारसे जाणवलेले नाही. कारण कादंबरीचा बराचसा भाग हा सधन शेतकर्‍याचे एकत्र बारदान आणि त्यांची जीवनशैली समजवण्यात गेला आहे. आता या भागात रिसर्च पेक्षा लेखकाचा अनुभव जास्त जमेचा असावा असे वाटते. पुढच्या भागात आलेले मराठवाडा विद्यापिठातले राजकारण किंवा चांगदेव चतुष्टया मधले शिक्षण संस्थेतले वातावरण हे लेखकाने अनुभवलेले असावे त्यासाठी काही खास अभ्यास करायची गरज पडली असेल असे मला तरी वाटत नाही. एखाद्या लेखकाने अभ्यासपुर्व लिहिलेल्या कादंबर्‍या म्हणुन मला डॅन ब्राउन च्या कादंबर्‍याचे उदाहरण पटते, डॅन चा प्रत्येक कादंबरीत त्याचा विषयाशी निगडीत केलेला रिसर्च जाणवतो. इतिहासाची कल्पने सोबत घातलेली सांगड उत्तम असते. हिंदु च्या बाबतईत अभ्यास फारसा जाणवत नाहीच.

    एकुणच या कादंबरी नंतर पुढच्या भागात आता नेमाडे काय लिहिणार आहेत ते फक्त तेच जाणो. त्यांनी एवढे वर्ष मेहनत घेतलेली त्यांचा पुस्तकातून जाणवली तर उत्तमच

    ReplyDelete
  6. मला एक कळत नाही, हे नेमाडे म्हणतात की ज्ञानेश्वरीची मूळ प्रत राजवाड्यांनी बदलली आणि ओव्या हव्या तशा बदलल्या...हे खरं मानलं तर काहीही लिहीलेले असो लोक ते डोक्यावर घेतात - लोकांना काही अक्कलच नसते असा अर्थ निघतो....मग नेमाडे पाटलांना हे माहित आहे तर एवढी पानं खरडण्याचा खटाटोप कराचाच का?

    वि.सू.स्वाक्षरीतील कोड हुकल्यास (बहुतेक वाक्य रंगवताना) मिपाच्या अख्ख्या पानाचा बोर्‍या वाजू शकतो!!
    धन्नवाद!

    ReplyDelete
  7. मलिक अंबर हा ‘महाराष्ट्र धर्म’ स्थापन करणारा पहिला माणूस. आपण रामदासांचे नाव घेतो; पण ते काही खरे नाही. मलिक अंबरनेच शहाजी इत्यादींसारख्या मराठ्यांना सर्वप्रथम एकत्र केले आणि त्यातून मराठा धर्म पुढे आला. आज आपण हिंदु संस्कृती जगत असलो, तरी बौद्ध धर्मही पाळत आहोत. आपल्या वारकरी संप्रदायाची सारी तत्त्वे बौद्ध धर्मातूनच घेतलेली आहेत,

    ReplyDelete
  8. मलिक अंबर हा ‘महाराष्ट्र धर्म’ स्थापन करणारा पहिला माणूस. आपण रामदासांचे नाव घेतो; पण ते काही खरे नाही. मलिक अंबरनेच शहाजी इत्यादींसारख्या मराठ्यांना सर्वप्रथम एकत्र केले आणि त्यातून मराठा धर्म पुढे आला. आज आपण हिंदु संस्कृती जगत असलो, तरी बौद्ध धर्मही पाळत आहोत. आपल्या वारकरी संप्रदायाची सारी तत्त्वे बौद्ध धर्मातूनच घेतलेली आहेत,

    ReplyDelete
  9. आजोबा-पणजोबांपासून अनेक गोष्टी आपण सांभाळून ठेवलेल्या असतात. त्यामागे आपल्या भावना असतात. अगदी इथेही आपल्याकडे सज्जामध्ये सायकल असते, पाळणा असतो, अनेक वस्तू असतात. ती तशी अडगळच असते. हिंदु धर्मात तशी सगळी अडगळच झाली आहे आणि त्याला इलाज नाही.

    ReplyDelete
  10. आपणच आपल्या धर्मावर टीका केली की, माध्यमे डोक्यावर घेतात हे लेखकांना नेमके ठाऊक असते. अन्य धर्मीय त्यांच्या धर्मावर अशी टीका करणार नाहीत; कारण आपल्याच धर्मावर आपणच टीका केली की, बहिष्कृत होणे वा मार खावा लागणे हे दोनच पर्याय समोर असतात. याची त्यांना पक्की खात्री असते. हिंदूंचे तसे नसते! त्यामुळे हिंदू असूनही हिंदूंवरच आघात करणार्‍यांचे फावते. त्यांच्या लेखनावर वा बोलण्यावर विरोधी प्रतिक्रिया उमटली की, ती करणार्‍यांना हे तालीबानी वगैरे संबोधून मोकळे होणार; पण पहिली खोड आपणच काढली, हे विसरणार. हे सर्व लिहिण्याचे कारण इतकेच की महाराष्ट्रातले थोर लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या `हिंदू जगण्याची एक समृध्द अडगळ' नामक बृह्द कादंबरीचा पहिला भाग लवकरच प्रकाशित होत आहे.

    ReplyDelete
  11. `स्टार माझा' नामक वाहिनीला २७ जून २०१० या दिवशी नेमाडेंनी दिलेली मुलाखत पाहिली. त्यात त्यांनी जे तारे तोडले ते भन्नाटच होते. त्यांनी कौरवांना महाभारताचे नायक ठरवले आणि पांडवांनी महाभारत `हायजॅक' केल्याचे सांगितले. दुर्योधन हा जातीभेद न मानणारा पुरोगामी होता. (म्हणजे आजचे पुरोगामी म्हणवणारे त्याचे वंशज समजावे काय ?) राम आणि कृष्ण हे मांसाहारी क्षत्रिय होते. त्यांना ब्राह्मण कोणी बनवले ? कृष्ण हा व्यभिचारी होता आणि तो सामान्य `ड्रायव्हर' होता, अशी अनेक मुक्‍ताफळे त्यांनी उधळली. ब्राह्मण आणि हिंदुत्व पुढे नेऊ पहाणार्‍यांनी हिंदु धर्माचा नाश केला', या बोलण्यातून त्यांचा जातीद्वेषच दिसतो. ढीगभर नोट्स आणि टिपा काढलेल्या `फाइल्स' त्यांनी दाखवल्या. यात मूळ धर्मतत्त्वांचा अभ्यास किती याविषयी नक्कीच शंका येते. `स्टार माझा'नेही हिंदुत्वाची संकल्पना मोडीत काढणारी कादंबरी म्हणून नेमाडेंच्या कादंबरीची भलावण केली. अशा चोपड्या-कादंबर्‍यांनी धर्मतत्त्वे पालटत नसतात. ती शाश्‍वत असतात. हिंदु हा धर्म आहे. तो जगण्याचा मार्ग वा भौगोलिक संस्कृती एवढ्यात कोंबण्याचा प्रयत्‍न नको. नेमाडे, खरेतर तुमच्यासारखे लेखक हीच एक मोठी अडगळ आहे, जी बाहेर पडली तरी काही हानी होणार नाही.

    ReplyDelete
  12. हिंदू धर्मात फतवे निघत नाही, उलट पुस्तकाचा खपा वाढतो म्हणून प्रकाशक निर्धास्त असावेत, हेच दुसर्‍या धर्मात असते तर नेमाडे कदाचित जिवंत नसते. परवाच पेपरात एका शिक्षकाचे हात कापल्याची बातमी वाचली - कारण त्याने परीक्षेत एक विवादास्पद उतार्‍यावर प्रश्न विचारले होते.

    ReplyDelete
  13. कोसला वाले नेमाडे हेच का?
    पुण्याचे पेशवे
    हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

    "फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी
    पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची

    ReplyDelete
  14. {राम आणि कृष्ण हे मांसाहारी क्षत्रिय होते. त्यांना ब्राह्मण कोणी बनवले ?}
    राम आणि/किंवा कृष्ण यांच्या आहाराच्या आवडीनिवडींबद्दल आणि/किंवा त्यांच्या वर्ण किंवा जातींबद्दल मला कल्पना नाही. (दोघेही क्षत्रिय असण्याबद्दल लहानपणापासून ऐकत आलेलो आहे, परंतु ही बाब व्यक्तिशः पडताळून पाहिलेली नाही.) मात्र, त्यांना कोणी 'ब्राह्मण बनवले' याची मला कल्पना नव्हती. निदान मी तरी कोणाला त्यांचा उल्लेख 'ब्राह्मण' असा करताना ऐकलेले किंवा पाहिलेले नाही.

    राम किंवा कृष्ण यांना कोणीतरी 'ब्राह्मण बनवले' असे श्री. नेमाडे नेमक्या कशाच्या आधारावर म्हणतात याबद्दल काही संदर्भ मिळू शकेल काय? मुळात असे विधान त्यांनी ज्या मुलाखतीत केले असे वर म्हटलेले आहे, त्या मुलाखतीच्या ट्रान्स्क्रिप्टचा अधिकृत दुवा पडताळणीकरिता अधिक संदर्भाच्या (context) तपासणीकरिता मिळू शकेल काय?

    ReplyDelete
    Replies
    1. श्री राम आणी क्रुष्ण हे क्षत्रिय होते हे त्यांच्या पराक्रमावरून कोणीही सांगेल.

      Delete
    2. mag ata Shri Ram aamche ki tumche asa bhandat basaicha ka ?

      Delete
    3. @ अनामित :
      भांडायला कशाला पाहिजे उत्तर समोर असताना ?

      Delete
    4. brigedi samarthakanche prachaaar vaacha facebook var. shriram, shrikrishnachi khilli kashi udavtat te.

      shrikrishnane sangitleli bhagvadgita tar shivdharmane nakarli ahe. ganpati, shriram, shrikrishna, laxmi, saraswati, ashya devtanche pujan shivdharmane nakarle ahe. te kshatriya asun !!!!! hyavar aaple spashta mat eikaila avdel....

      Delete
    5. @ अनामित : जे आमच्या देव देवतांचे बदनामी करतात ते मुर्खच असले पाहिजेत मग ते कोणत्याही जातीतील असो एकदा शिवरायांचं नाव घेऊन त्याच्या बदल्यात इतरांचा अपमान करणे हे आम्ही कसे मान्य करणार ?
      मूळात त्यांना क्षत्रिय म्हणनेच चुकीचे आहे कारण क्षत्रिय हा वर्ण हिंदू धर्मात आहे आनी त्यंनि हा धर्म सोडून शिवधर्म स्वापित केला.

      Delete
    6. he kaay navin ? Chhatrapati nni "Shivdharma" kadhi sthapan kela ? to tar Kokate/ Khedekar/ Salunkhe nni kaadhla...

      Chhatrapatinche nissim bhakt aaj Hindu naste rahile, te tar kadhich Shivdharmat gele aste naa itkya varsha madhe ?

      Delete
    7. ".....amche dev devatanche" ? Mhanje ? he sagle amche tumche kadhi zale ?

      dhakla patil saheb , aaplya manaat duhi asel tar ti me nahi kadhu shakat he dukh ahe

      Delete
    8. मी शिवरायांचं नाही बोलत तेच खेडेकर आणि कोकाटे यांच्या विषयी बोलतोय.

      Delete
    9. aaple mhanne kalale nahi. parat saangaal ka ?

      Delete
    10. @अनामित : इथे मी असं कधी म्हणालो की शिवरायांनी शिवधर्म स्थापण केला. शिवधर्म वाले हिंदू देवांना का मानत नाहीत हे सांगितले कारण ते शिवधर्मी आहे हिंदू नाहीत एवढेच

      Delete
  15. हा हा हा

    गेली चाळिस वर्ष हा माणुस एका कादंबरीच्या जीवावर मिशीला तुप लावुन फिरत होता, आता उरलेले आयुष्य (जीवेत शरदः शतम् ) विचारवंत म्हणुन फिरेल.

    --अवलिया

    --
    प्रत्येक हिंदूद्वेष्टा हा विचारवंत नसतो पण प्रत्येक विचारवंत हा हिंदूद्वेष्टा असतो..

    ReplyDelete
  16. कथानक म्हणून कोसला फार ग्रेट वगैरे नाही . पण त्यातल्या भाषाशैलीमुळे अनेकजण कोलमडले होते. मराठी भाषेला शैलीदारपणाच्या बुरख्यातून बाहेर काढणार्‍यांपैकी कोसला एक महत्वाचा टप्पा आहे.
    तुम्ही कोसला कोणत्या काळात आणि वयात वाचली यावर ती तुम्हाला कशी भावली हे ठरते.
    समकालीनांमध्ये फडके खांडेकर काकोडकर हे होते...या सार्‍यात भाऊ पाध्यांचा एक मोठा अपवाद होता

    ReplyDelete
  17. ’’’इस्लामी संस्कृती’मध्ये महंमद पैगंबरांचे (साने गुरुजी) यांनी केलेले वर्णन की, हे एक युगपुरुष होते, कनवाळू महात्मा होते. आज आपल्या हिंदुस्थानात विचित्र वाटत असतात त्या रीतिभाती, अरबस्थानात त्याकाळी विचित्र वाटत नव्हत्या. एक अरब गृहस्थ आणि त्याची एक लहानशी मुलगी, दोघेजण एक खड्डा खणत होते. पैगंबर साहेब तिकडे गेले तेव्हा पैगंबरांनी त्याला विचारले की, ’बाबा, तू कशाकरता हा एवढा खड्डा कणतो आहेस आणि ही मुलगी काय म्हणून तुला मदत करीत आहे?’ तेव्हा तो वृद्ध महंमदांना म्हणाला की, ’हा खड्डा पुरेसा खोल झाला का, मी आज ना उद्या मरणार इतका आता वृद्ध झालो आहे. माझ्यानंतर या मुलीचे या रानटी लोकांच्या समाजात काय हाल होतील, याची मला कल्पना आहे. म्हणून मी तिला गाडून टाकतो.’ हे पाहिल्यानंतर पैगंबर साहेबाना प्रचंड कळवळा आला. मुलीना, स्त्रियांना सतत पुरुषाचा अधिकार असणं हे महत्त्वाचे तत्व त्यांनी ओळखलं आणि पुढे मांडलं. म्हणून स्त्रियांसंबंधी कुराणात आणि नंतर शरीयतने तयार केलेल्या कायद्यामध्ये हे तत्कालीन परिस्थितीचं तत्त्व आहे. अशा पद्धतीचं आकलन इस्लामी संस्कृतीचे केलं पाहिजे.’’

    ReplyDelete
  18. आजकाल एक प्रचार लोकमान्य टिळकांबद्दल (काहींच्या मते भट-मान्य ) असा केला जातो कि त्यांनी शिवजयंतीला प्रत्युत्तर म्हणून गणेश उत्सव चालू केला. त्यांच्या मनात पराकोटीचा मराठा द्वेष अथवा मूलनिवासी द्वेष असता तर त्यांनी थोरले बाजीराव जयंती नसती का चालू केली ?

    आज बाहेर बघितला तर काय चित्र दिसते ? गणेश-उत्सवामध्ये जिकडे तिकडे सहभाग कोणाचा असतो ? ब्राह्मण मंडळी कि बहुजन मंडळी ?

    ReplyDelete
  19. @ अनामित :
    मित्रा शिवजयंती महात्मा फ़ुलेंनी सुरु केली १८६९ मध्ये तेंव्हा टीळक लहान होते.
    आता टिळ्कांनी गणेशोत्सव का सुरु केला त्यापेक्षा बहुजन एकत्र येतात हेच समाधान म्हंटले पाहिजे
    जय शिवराय !!

    ReplyDelete
    Replies
    1. kiti husharpane bagal dilit dhaakla patil ? "....tilkanni ganeshutsav ka suru kela...." ase mhanun tilkanna tyanchya karyache credit matra det nahi ! ek goshta aadun aadun , thodkyat asa suchavtai ka ki, tyancha uddesh veglach hota, pan zale bhaltech, ki bahujan samaj ekatra alai !!!

      aso. bahujan samaj aaj ganpati utsava madhe ekatra alai, hyache vaeet nakkich vatat nahi mala, pan jya hidis prakare hya utsavala swarup laabhlai, tyache vaeet vatte. hech tatva, navratra utsavala lagu ahe. hech logic dahihandi pan lagu ahe. hech logic sarvajanik satyanarayan pujela laagu ahe (sharavan mahinyat rikshaw stand, tempo stand bagha kase astat)

      he asle dev-devatanche utsav sarvajani thikani saajre karun apan aapla vel-paisa-shakti eka nirarthak karya madhe apan vaya ghalavto ase maze spashta mat ahe.

      hyavar aaple mat spashta aikaila aavdel.

      Delete
    2. @अनामित :
      अहो असं कसं म्हणुन चालेल ? टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला हे आम्ही शिवप्रेमी कधीही विसरणार नाही.
      असा ही प्रश्न आहे एवढ्या देवांपैकी गणपतीच का निवडला उत्सवासाठी ? याचं उत्तर समजणं महत्वाचे नही पण माहीत असेल तर क्रुपया सांगा

      Delete
  20. गणपतीच का , माझ्या कडे ह्याचे उत्तर खरच नाही. सिरीयसली. पण माझा एक अंदाज - गणपती म्हणजे गणांचा पती, म्हणजे जनतेचा प्रतोद, लीडर अश्या अर्थाने घेतला तर सर्वसामान्य माणसा मध्ये त्याचे स्थान जास्त आवडते आहे (थोडक्यात काय तर पॉपुलर आहे). असाच दुसरा देव म्हणजे मारुती. पण मग त्याचे का घेतले नाही, हे मला विचारले तर त्याचे उत्तर नाही माझ्या कडे. पण एकूण जर असे बघितले तर आम जाणते मध्ये पूजले जाणारे देव-देवी कोण - लक्ष्मी/ गणपती/ हनुमान/ शंकर ... बाकी कोणी इतर प्रतीकात्मक देवांची पूजा करताय असा दिसत नाही.
    छत्रपतींच्या काळा मध्ये समर्थ रामदासांनी अनेक ठिकाणी मारुतीचे मठ स्थापन केले हे माहित आहे का तुम्हाला ? बलोपासना हा त्या मागचा उद्देश होता. तिथे गणपती अथवा इतर कोणी त्यांच्या ध्यानी नाही आले.

    ReplyDelete
    Replies
    1. @ अनामित : धन्यवाद ! ब्लॉग वाचत रहा

      Delete
  21. तुम्ही दोघ म्हणजे निर्हा बावळट वाटून राहिले टिळकाने गणेशोस्तव ब्राह्मणांची रोजगार हमी योजना म्हणून सुरूकेली व शिवजयंतीला संपवण्या साठी सुरु केला व त्याला एका दिवसावरून दहा दिवसावर नेला त्यात बहुजनांच्या पोरांना नादि लाऊन आपल्या पोळ्या भाजून घ्यायच्या'व खऱ्या गानानायाकाला बाजूला सारून काल्पनिक सोंगाड्याची पूजा करायची व खरा गणांचानायकांची माहिती बहुजनं पासून लपवायची ज्या नायकांनी ब्राह्मणविरोध केला बहुजानंंचे रक्षण केले.पाटील तुम्हाला अधिक वाचनाची गरज आहे नाहीतर हिंदू काल्पनिक देवतांची तुम्ही स्तुती केलीच नसती.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सल्ला दियाबद्दल मी नक्की अभ्यास करेन

      Delete
  22. हिंदू देवता म्हणजे आपल्याला गुलाम बनून ठेवण्याचे मोठे साधन आहे आणि त्याच्याच नदीलाउन ठेवण्यासाठी ब्राह्मण सतत प्रयत्न करीत असतात आजपर्यंत आपण गुलामीत असण्याचे प्रमुख कारण म्हणजे ह्या देवताच आहे म्हणूनच फुले, आंबेडकरांनी हिंदू देवता नाकारल्या

    ReplyDelete
  23. रवींद्रनाथ एकदा परदेशी गेल्यावरती त्यांना एक प्रश्न विचारला होता कि भारताची वळक काय आहे हे एका वाक्यात सांगा तेंव्हा त्यांनी सांगितले एक वाक्यात भारताची वळकच सांगायची झाली तर शिवाजीराजांचा पराक्रम आणि बुद्धाचे तत्वज्ञान . मला एक प्रश्नाचे उत्तर द्या रामदास आणि त्यांच्या ३०० शिष्यांनी राजे संभाजीला पकडून औरंगाजेब कडे का दिले आणि नंतर औरंगाजेबने राजे संभाजी यांना सोडून दिल्यानंतर रामदास आणि त्यांच्या ३०० शिष्यांनी संभाजी राजे यांना का मारले ? हे रामदास कोण होते ?
    मराठ्यांनी जातिवाद कदीच केला नाही पण ये पाप ब्राह्मणानी केले काही ब्राह्मणानी ते एकटेच शहाणे आणि बाकी सगळे वेडे ये धोरण अमलात आण्याचा प्रकार केले त्यांनीच देव वाटून घेतले आणि दिले ?श्री संत ज्ञानेश्वर
    ,राजे संभाजी अशी माणसे जगात कधीच होणार नाहीत आज सगळ्यांना माहित आहे कि ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी लिहिली पण किती जणांना माहित आहे कि राजे संभाजी महाराज यांनी ज्ञानेश्वरा पेक्षा कमी वयामध्ये संस्कृत मधून अनेक ग्रंथ लिहिले मग तुम्ही ये जगापुढे का उपलब्ध करून देत नाहीत.
    जय महाराष्ट्र
    श्री छत्रपती शिवाजी,संभाजी महाराज कि जय ! श्री माउली ज्ञानेश्वर महाराज कि जय ! श्री जगदगुरु तुकाराम महाराज कि जय !
    अनिल भुरे बारामती

    ReplyDelete
  24. श्री छत्रपती शिवाजी,संभाजी महाराज कि जय ! श्री माउली ज्ञानेश्वर महाराज कि जय ! श्री जगदगुरु तुकाराम महाराज कि जय !
    अनिल भुरे बारामती

    ReplyDelete
  25. रवींद्रनाथ एकदा परदेशी गेल्यावरती त्यांना एक प्रश्न विचारला होता कि भारताची वळक काय आहे हे एका वाक्यात सांगा तेंव्हा त्यांनी सांगितले एक वाक्यात भारताची वळकच सांगायची झाली तर शिवाजीराजांचा पराक्रम आणि बुद्धाचे तत्वज्ञान . मला एक प्रश्नाचे उत्तर द्या रामदास आणि त्यांच्या ३०० शिष्यांनी राजे संभाजीला पकडून औरंगाजेब कडे का दिले आणि नंतर औरंगाजेबने राजे संभाजी यांना सोडून दिल्यानंतर रामदास आणि त्यांच्या ३०० शिष्यांनी संभाजी राजे यांना का मारले ? हे रामदास कोण होते ?
    मराठ्यांनी जातिवाद कदीच केला नाही पण ये पाप ब्राह्मणानी केले काही ब्राह्मणानी ते एकटेच शहाणे आणि बाकी सगळे वेडे ये धोरण अमलात आण्याचा प्रकार केले त्यांनीच देव वाटून घेतले आणि दिले ?श्री संत ज्ञानेश्वर
    ,राजे संभाजी अशी माणसे जगात कधीच होणार नाहीत आज सगळ्यांना माहित आहे कि ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी लिहिली पण किती जणांना माहित आहे कि राजे संभाजी महाराज यांनी ज्ञानेश्वरा पेक्षा कमी वयामध्ये संस्कृत मधून अनेक ग्रंथ लिहिले मग तुम्ही ये जगापुढे का उपलब्ध करून देत नाहीत.
    जय महाराष्ट्र
    श्री छत्रपती शिवाजी,संभाजी महाराज कि जय ! श्री माउली ज्ञानेश्वर महाराज कि जय ! श्री जगदगुरु तुकाराम महाराज कि जय !
    अनिल भुरे बारामती

    ReplyDelete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.