2 June 2012

सुर्याजी पिसाळ - फ़ितूर नव्हेच ! [पान २]

पक्षांच्या पंखावर शेवाळ उगवते.
             आवळसकर सांगतात की, याबाबत पुर्व इतिहासकारांचे लेखन अत्यंत भ्रामक स्वरुपाचे आहे. मराठ्यांनी शर्थ केली,पण शेवटी रायगड सुर्याजी पिसाळांच्या फ़ितूरीमुळे मोंगलांच्या हाती गेला तसे नाही.शिवसून येसूबाईंनी रायगड मजबुत आहे, हे जाणले होते.’छत्रपती राजाराम व त्यांच्या पत्नींनी गडावरून निघावे’.राजाराम सहकुटूंब प्रतापगडाकडे ५ एप्रिल १६८९ ला बाहेर पडल.वेढा आरंभी अगदीच शिथील होता.
          संपुर्ण रायगडला वेढा  देणे, तेथील आजची ही भौगोलिक स्थिती पाहाता अशक्य होते.राजारामांच्या बरोबर खंडो बल्लाळ, रामचंद्र आमात्य, प्रल्हाद निराजी, शंकराजी नारायण इ. नामवंत माणसे वेढ्यातून निसटली. एकही मोंघलांच्या हाती लागला नाही.रायगडच्या खोर्यात श्रावण, भाद्रपद व आश्विन महिन्यात पाऊस इतका कोसळतो की ’पक्षांच्या पंखावर शेवाळ उगवते’ व वारा इतका सुटतो की, त्यावेळी वेढा घालणार्या सैनिकांना नुसते उभे राहाणेदेखील अशक्य ! ’वेढा नाममात्र. गड अजिंक्यच ! मोठी मंडळी बाहेर पडल्याने शत्रु त्यांचे अंगावर जाईल, गडावरील ताण कमी होईल.
          राजारामांच्या दोन्ही भार्या रांगणा,विशाळगड, गगनगडकडे सुरक्षित गेल्या.छत्रपती राजाराम पुढे जिंजीस जाताना कोल्हापूर प्रांतातील शिवगड (दाजीपूर) गगनगड-काळम्मावाडी खोर्यातूनच गेले, त्यासमयी भागातील राणे, जाधव, खोपडे, पाटील, कुलकर्णी या मराठ्यांनीच त्यांना सर्व बाबतीत सहय्य केले आहे.
मोठी लढाई नाही, ठिसूळ पुरावा
            म्हणजे परीसरात अशी लढाई झाली नसावी. तसे पुरावे नाहीत.शर्थीची झुंज दिली असती तर शेकडो मुसलमान सैनिक मरण पावले व त्यांची एखादी कबर तरी रायगड परिसरात सापडली. एकही नाही ! मराठ्यांनी नष्ट केली म्हणावे तर त्यांचा तो स्वभाव नाही.रायगडावरच्या फ़ितूरांचा गवगवा,गाजावाजा हा कालविपर्यासाचा प्रकार आहे.सुर्याजी वाई प्रांतातील ओझर्डे देशमुख.तो दुरवरच्या रायगडावर कशाला जानार ? तो सरदार वा किल्लेदारही त्यावेळी नव्हता.
          ’फ़ितुरी’स भक्कम पुरावा नाही.इतिहासकारांचे भ्रामक,रंजित लिखानच काय तो ठिसुळ पुरावा.तो ग्राह्य धरता येणार नाही.पण गडावरुन सुटलेल्या राजारामांचे तरुण साथीदार संताजी व धनाजींनी बादशाही फ़ौजेस ’दे माय धरणी ठाय’ करुन सोडले.बादशहाच्या तंबूचे सोन्याचे कळसही कापले.पाण्यात त्यांना ही जोडगोळी दिसायची म्हणे.खरे की वाडःमयीन रंजितपणा ? मग त्यांनी फ़ितुर सूर्याजीचा खातमा का केला नाही ? तसे काही नव्हतेच.                                      
शुभविवाह
           विशेष गोष्ट अशी की, छत्रपती राजारामांची दासीपुत्री व सूर्याजी पिसाळांचा दासीपुत्र यांचा विवाह होऊन ते व्याही झाले.हा विवाह इ.स.१६८९ नंतर व १७०० चे पुर्वी दासीपुत्री अनौरस..तिचा विवाह कोनाशीही झाला तरी चालेल असे अशी समाजनिती इतिहासकालात नव्हती.उलट समसमासंयोग साधण्याची प्रव्रुत्ती असे. त्या कालात अशी संतती शिष्टसंमत होती.छत्रपती राजाराम सूर्याजीशी नाते जोडतात, याचा स्पष्ट अर्थ असा की सूर्याजी इ.स.१७०० पर्यंत तरी फ़ितुर नव्हते.रायगड समेटामुळे पडला ती तारीख ३ नोव्हेंबर १६८९ आहे.झुल्फ़िकारखानाच्या मर्दमुखीमुळे नव्हे, तर राणी येसूबाईंच्या मुत्सदीपणामुळे गड ताब्यात दिला गेला.
            फ़ितुर्यांच्या, खंजीर खुपसणार्यांच्या मुलास, स्वातंत्र्याची किंमत जाणणारा, जाणत्या शिवरायांचा मुलगा राजाराम आपली मुलगी,दासीपुत्री असो , देईलच कसा ? इति सूर्याजी पिसाळ रायगडप्रकरणी पुर्णपणे निर्दोष आहेत. माझे तसे स्पष्ट मत आहे.
इतिहासकार सरदेसाई
          इतिहासकार सरदेसाई म्हणतात, फ़ितूरीपुढे हद्द आहे... वाईच्या सूर्याजी पिसाळास देशमुखी हवी होती.तिच्या लोभाने किल्ल्याचा दरवाजा खानास सताड उघडा झाला असे एके ठिकाणी लिहितात, तर दुसरीकडे ’ आठ महीने झाले तरी इतिकादखानाचे (झुल्फ़िकारखान) पाऊल य:त्किंचितही पुढे पडेना.... कपटविद्या, हुशार सूर्याजी पिसाळास वाईच्या देशमुखीचे आमिष .... त्याने मोंघलांचा आत प्रवेश करुन दिला.राणी येसूबाईंच्या अवस्थेची त्यांना काळजी पडते ! आणि त्या खानाकडुन शपथ घेववुन मुलामंडळीसह    खानाच्या स्वाधिन होतात.असे सांगतात.कुलाबा ग्याझिटियरने तीच री ओढली आहे. पण प्रथम सूर्याजी हे वाईचे नव्हे,ओझर्ड्याचे. तसेच ते किल्लेदार नव्हते की रायगडावरही त्यांचे आस्तित्व १६८९ मध्ये नव्हते.ही दुसरी गोष्ट लक्षात घेतली तर फ़ितूर ठरविणारे सारे खोटे पडतात.
               शिवाय पुणे जहागीर व आसपासचे पहीले तीन देशमुख शिवाजीराजेंना मिळाले ते जेधे,पिसाळ व मरळ हे होत.ते प्रथमपासून विश्वासातील होते, असे सध्याचे त्यांचे वंशज ओझर्डेचे नरसिंगराव पिसाळ, देशमुख ठासून सांगतात.सूर्याजी हे मुळ पुरुष हरनाकपासून सातव्या पिढीतील.
इतिहासकार राजवाडे
         इतिहासकार राजवाडे तर सांगतात की, छत्रपती राजाराम कर्नाटकात गेले.रायगड व इतर किल्ले गनिमाने घेतले.त्यावेळी जेधे-देशमुख गनिमास सामील झाले ! पण पुढे या पत्रास राजवाडे टिप देतात की, पत्र विश्वसनीय दिसत नाही ! मोठ्या प्रमाणावर फ़ितुरी होणे  असंभव. शिवचरित्र साहित्य खंड १० मधील लेखांक २४ च्या उतार्यांन्वये राजाराम छत्रपतींनी चंदीहुन (जिंजी) नरसोजी गायकवाड रायगडावर असता इतिकादखानास गडावरील हावपालत सांगितली म्हणून त्याचा मुलगा संभाजी गायकवाड देशमुख तपे(तालुका) बिरवाडी याची देशमुखी जप्त केली.गुन्हा तसा गंभीर,पण पुढे ५०० पातशाही होन खंड घेऊन देशमुखी दुमाला केली आहे.
सरदेसाई व राजवाडे दोन्ही खरोखरच मातब्बर इतिहासकार पण त्यांच्याकडून काहीच चुकणार  नाही असे कसे म्हणायचे.
सर जदुनाथ सरकार
               बंगालचे जागतिक कीर्तीचे इतिहासतद्न्य सर जदुनाथ सरकार १९३१ च्या दरम्यान ओझार्डे येथे आले होते.त्यांनी आत्ताच्या पिसाळ मंडळींची भेट घेतली होती.त्यांच्या चर्चेत सूर्याजी पिसाळांवरचा आरोप खोटा आहे, असे प्रतिपादिले गेले.(इति नरसिंगराव पिसाळ) हिस्ट्री ओफ़ औरंगजेब भाग ४ या त्यांच्या इतिहासग्रंथात सरकारांनी आपले विचार मांडले आहेत.१६८८ डिसेंबरमध्येच आसदखानपुत्र इतिकादखान रायगडकडे निघाला होता.१९ ओक्टोंबर १६८९ मध्ये रायगड घेऊन शिवाजी,संभाजी व राजाराम यांचे परिवारास कैद केले.
               चिटणीसांची बखर व इश्वरदास यांचे संयुक्तीक म्हणने असे की, येसूबाई आणि तिचे सल्लागार यांनी बहुदा असे ठरविले असावे की,संभाजींचा म्रुत्यू व राजारामांचे  महाराष्ट्राबाहेर जाणे या गोष्टी ध्यानी घेता व महत्वाची बरीच मातब्बर माणसे महाराष्ट्राबाहेर गेली आहेत.अशावेळी रायगडावर असलेल्या सामान्य बिनलढाऊ माणसांचा प्रतिकाराचा यत्न फ़ुकट आह. शांतपणे शरण जाण्यातच शाहू व सर्वांचे कल्याण आहे.फ़ुका मरण व नुकसान यापेक्षा तह समेट योग्य.  

13 प्रतिक्रिया :

  1. अमोल कळेकरSunday, 03 June, 2012

    खूप छान लेख आहे . सूर्याजी पिसाळ यांच्या विषयी कधी वाचला नव्हता. पण हा लेख १९९९ ला प्रकाशित झाला होता पण त्याचा काही उपयोग झाला असे मला वाटत नाही कारण अलीकडेच एक मराठी चित्रपट प्रदर्शित झाला "अर्जुन " त्यामध्ये सुद्धा सूर्याजी पिसाळ यांना फितुरच म्हंटले आहे .

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ! अमोल
      हो मला माहित आहे पण काय करणार त्याचा प्रासार झाला पाहिजे तसा झाला नाही.याचा पुस्तक रुपी प्रचार केला पाहिजे तरच हा योद्धा निष्कलंक होऊन अमर होईल

      Delete
  2. खुप छान लेख लिहिला आहात. एका लढवय्या वीराला कलंकीत केले जाते यापेक्षा वाईट गोष्ट कोनती असु शकते ? पण आता हळु हळु खरा इतिहास जगासमोर आणला पाहिजे आपण म्हणता तसे इतिहासाची पुनर्रमांडणी अत्यावश्यक आहे.
    | जय भिम ।

    ReplyDelete
  3. अभिजीत लेख खुप चांगला लिहिला आहे. याआधी फ़क्त नाव ऐकले होते सूर्याजी पिसाळ हे. तु म्हणतो तसं अजुही एखाद्याने गद्दारी केली की हे विशेषन देतात. निवडणुकीच्या काळात तर सर्रास हे नाव विरोधी पक्षातील उमेदवाराला दिले जाते हे थांबायला हवं.कागल मध्ये तर हे नाव जास्त घेतात होना ? राजकारणाचं विद्यापीठ.

    ReplyDelete
  4. लेखाबद्दल खुप आभार चांगला लेख लिहिला आहे.आपला मराठा मावळा फ़ितूर नव्हता स्वामीनिष्ट होता हे समजल्यावर काही लोकांना वाईट वाटेल ,राग येईल पण आपण लिखाण सुरुच ठेवा. नि:र्भिडपणे आणी नि:पक्षपाती लिहिता त्याबद्दल धन्यवाद!
    ॥ जय भिम ॥

    ReplyDelete
  5. खुप छान लेख लिहिलात अभिजीत सूर्याजी पिसाळ फ़ितुर नव्हते हेच ऐतिहासिक सत्य आहे.आणि आपण ते इथे मांडले याबद्दल आभार. एखादा लेख भारताचे पहिले क्रांतीकारक उमाजी नाईक यांच्या विषयी पण लिहा.
    धन्यवाद !

    ReplyDelete
  6. खुप छान लेख आहे. असेच लिहित रहा.

    ReplyDelete
  7. खुप छान लेख लिहिलात अभिजीत सूर्याजी पिसाळ फ़ितुर नव्हते हेच ऐतिहासिक सत्य आहे.आणि आपण ते इथे मांडले याबद्दल आभार.

    ReplyDelete
  8. आता तरी मराठयांनी संसोधन करावे व स्वतः चा जज्ज्वल्य इतिहास दुरुस्त करावि तथा सत्य तपासावे

    ReplyDelete
  9. आता तरी मराठयांनी संसोधन करावे व स्वतः चा जज्ज्वल्य इतिहास दुरुस्त करावि तथा सत्य तपासावे

    ReplyDelete
  10. ब्राम्हणांच्या कारस्थानाला बळी पडलेला एक मराठा योद्धा..

    ReplyDelete
  11. भटमंडळींच्या कारस्थानाला बळी पडलेला आणखिन एक मराठा योद्धा.....!!!!

    ReplyDelete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.