2 June 2012

सूर्याजी पिसाळ - फ़ितूर नव्हेच ! [पान ३]

मुत्सद्दी राणी येसूबाई
             रायगडाबाबत धोरणी,निग्रही व मुत्सद्दी येसूबाईंनी प्रतिकार अशक्य झाल्याने कमीतकमी नुकसान सोसून किल्ला स्वाधिन केला.पुढेही औरंगजेबाच्या स्वारीचा रेटा अन भर ओसरेपर्यंत हे धोरण मरठ्यांनी स्वीकारलेले दिसते. म्हणजे मोठी फ़ितूरी नाही.सूर्याजींचे नावही तेथे नाही.जेधे शकावलीत नोंद ’कार्तिक महिन्यात रायगड झुल्फ़िकारखानाच्या स्वाधिन करण्यात आला.शाहूस (शिवाजी द्वितीय) गडावरुन तुळापुरास औरंगजेबकडे नेण्यात आले.बादशहाने त्यास सहा हजारी मनसबदार केले व शाहू राजे असे नाव ठेवले.आणि त्यास आपल्या ’जाळी’ (तुरुंगात) मध्ये ठेविले.शिवचरित्रप्रदीपमध्ये हे पहिल्या ५० पानात वाचावयास मिळत.खानास राजधानीत खुप द्रव्य सापडले .त्याने सिंहासन फ़ोडले.बंदीवासात प्रतापराव गुजरांचे कुटुंब आणि मुलगा खंडेराव होते.खंडेरावावर धर्मांतराचा प्रसंग आला. नाव बदलले नाही. सुटून दक्षिणेत आल्यावर, म्रुत्यूनंतर त्यांचे व्रुंदावन  कसबे परळी येथे बांधिले.सूर्याजींचेवर धर्मांतराचा प्रसंग नंतर आलाच.शिवरायांची एक भार्या व संभाजीची एक मुलगी, मोरोपंत सबनीस, राजाद्न्या, कारकून, कारभारी, कारखानदार असे व विश्वासू नोकर इ. हजार - पाचसे लोक कैद झाले होते.सर्वांच्या खर्चाची व्यवस्था बादशहाने लाऊन दिली.कदाचित राजा पौरसची इतकी व्यवस्था सिकंदराने लावली नसावी ! शाहूंचे लग्न कैदेतच झाले, तेंव्हा रायगडचा पाडाव करून आणलेली शिवाजींची भवानी तलवार त्यांनी शाहूस बक्षीस दिली.
फ़ितूर केंव्हा ?
           छत्रपती राजाराम सिंहगडावर इ.स.१७०० त निवर्तले. मराठ्यांसह छत्रपती नाही, शाहू कैदेत. पुर्ण पराभव करण्यास बादशहाने मराठ्यांचे किल्ले पुन्हा जिंकून घ्यायचे ठरविले.वाई प्रांतात वैराटगड, पांडवगड वगैरे चार किल्ले जिंकण्याचे काम (केंजळगड,कमळगडसहीत) बादशाही सरदार इस्माईल मका यांस करावयाचे होते. या इस्माईल मकास इ.स. १७०४ मध्ये सूर्याजी पिसाळची मदत झाली.मराठ्यांच्या द्रुष्टिने झाली असेल तर हिच त्याची फ़ितूरी होइल.पण १६८९ कोठे आणि १७०४ कोठे ? शिवाय तीन छत्रपतीनंतर झालेल्या विस्कळीत कारभारात इकडचे सरदार, देशमुख तिकडे तर तिकडचे इकडे, एरव्ही अकबर हा बादशहाचा मुलगा संभाजीराजेंकडे आश्रयास आलाच होता.जेधेंच्यावर वहीम आला.अशी स्वामीनिष्टेची थोडीफ़ार अदलाबद्ल त्याकाळी मुख्य आधार गेल्यावर घडचत असे.त्यात नविन काही नाही. पण महत्वाच्या प्रसंगी कोणी ’स्वामीनिष्ट’ फ़ितूर होत नसत, हेही ध्यानात घ्यावयास हवे.राजारामांची पत्नी ताराबाईंनी खुपच शौर्य गाजविले. स्वराज्याची ढासळली इमारत सावरुन धरली, हे नि:संशय शाहू सुटून आल्यावर थोडी भाऊबंदकी झालीच.दोन राज्ये झाली म्हणुन का,मराठे शिलेदारांच्या हालचाली सर्वथा फ़ितुरीस पोषक असे म्हणता यावयाचे नाही.
नरसिंगराव पिसाळांचे म्हणणे
            सूर्याजींना चार पुत्र जानोजी नाईक, फ़िरंगोजी, गुणाजी व रुद्राजी.नरसिंगराव पिसाळ म्हणतात की,इ.स.११०० ते १२०० च्या दरम्यान देवगिरीचे यादवांचे कारकीर्दीत त्यांचे पुर्वजास देशमुखी मिळाली.असो, पद्मसिंह पिसाळ शाहूंचे बरोबर कैदेत होते.नंतर ते शाहूंचे सेनापतीही झाले.सूर्याजी पिसाळ नंतर मुसलमान झाले.तेही शाहू व येसूबाईंना मुस्लिम करणार म्हणुन ! बहीण मिरा पिसाळ यांचे शहाजी लोखंडेबरोबर लग्न झाले.सूर्याजी मुसलमान झाल्यावर त्यांना इमामखान व तीन पुत्र झाल.सूर्याजी पिसाळांच्या मुसलमान वंशजापैकी गफ़ूर बाळासाहेब देशमुख सेवानिव्रुत्त (१९६२).
प्राथमिक शिक्षक सांगतात की सूर्याजी हे नंतर मुसलमान झाले आणि म्हणून त्यांना वाईची देशमुखी मिळाली(हेही चुक). पद्मसिंह पिसाळांना शाहूंनी एका कामगिरीत पाठविले त्या लढाईत ते मारले गेले. सूर्याजी पिसाळ घोडेगाव, ता. आंबेगाव,जि,पुणे येथे म्रुत्यू पावले. सुर्याजी पिसाळांच्या मुलीचा मुलगा (मानाजी ?) अक्कलकोट संस्थानात गेला.त्या शाहूंनी दत्तक घेतले, ते अक्कलकोटचे संस्थापक भोसले आडनाव लावतात.रायगडहून सातार्यास गादी आणताना पद्मसिंह पिसाळ (मुलगा) शाहूंबरोबर होते.शाहूंचा राज्याभिषेक झाला तेंव्हा पिसाळांनी आपल्या देशमुखी वतनातील  लिंब,वाघोली, बावधन, अष्टे इ. गावे नजराना म्हणून दिली आहेत.या सर्व गावांचे उत्पन्न सातारच्या छत्रपतींच्या खाजगीत जाते/मिळते.मूळ तारळे गावचे पण आत सातार चे देशपांडे वकील म्हणत, ’१९६५-६७ च्या दरम्यान श्री.बाबासाहेब पुरंदरे यांनी पिसाळ- देशमुखांचा व्रुतांत लिहावा म्हणून ठरविले होते पण ते घडू शकलेले नाही.
राजकारणातील विश्वासघात
     शत्रुला फ़ितूर होऊन स्वजनांचा विश्वासघात करणार्या व्यक्तिला ’सूर्याजी पिसाळ’ म्हणवयाचे. हा शब्दप्रयोग मराठी वाड:मयातच रुढ झालेला आहे. इतकेच नव्हे तर छोट्या-छोट्या फ़सवणुकीच्या, लबाडीच्या, काही काल संधिसाधुपणा करणार्या व्यक्तिंना आपण काही मंडळी सर्रास सूर्याजी पिसाळ हे नामाभिधान करुन रिकामे होतो, हे गैर. राजकारण्यांनादेखील सवंगपणे लावला जातो.थोडाफ़ार उलटा गेला की खंजीर खुपसणारा, सूर्याजी पिसाळ ही विशेषणे लावण्यास राजकारणी भूषण मानतात.देशांतर्गत राजकारणात अशी दुषणे लावणे सर्वथा चूक.Everything is fair in love and war (and Election !) प्रेमात,युद्धात अन आता लोकशाही जमान्यात, निवडणुकीत सारेच क्षम्य ! सारे चालते, चालवून घेतले जाते. पण तसे नाही / नव्हेच. विरोध पक्ष (शत्रुपक्ष म्हणनेही चुक) नेत्यांच्या चुका दाखविणे ठिक. पण राळ, चिखल अन त्याही पुढे जाऊन वैयक्तिक अतिनीचतम पातळीवरुन गलिच्छ, गालीप्रधानात्मक भाषा वापरणे कितपत योग्य हे पाहाणे इष्ट ठरेल.
अन्यायाची परमावधी
             किंबहुना एकाच देशातील लोक पक्ष, संघटना, संस्था अनेक कारणांनी भांडता.ते एकमेकांचे विरोध अलंकारीकरित्या शत्रुपक्ष म्हणने इथपर्यंत ठिक, पण वारंवार शत्रु, सूर्याजी पिसाळ, राय नाईक (रायनाक),,आनंदीबाई (’ध’ चा ’मा’ ), दुसरे बाजीराव (पळपुटा) असे जर आपण म्हणत राहीलो तर त्या एतिहासिक व्यक्तिंवर आपण सारे घोर अन्याय करतो.उचलली जीभ लावली टाळ्याला, असा प्रकार होऊ नये. Tell a lie hundred times and it become a truth - खोटे शंभर वेळा सांगा अन ते सत्यच ठरते.या हिटलरी न्यायाने असत्ये सत्य म्हणुन लोक स्वीकारतात. याचे भानही बोलणार्यास, लिहिणार्यास राहात नाही. गैरसमज खोडुन सत्य प्रस्थापित करणे अवघड होते.नुकसान होऊन जाते.इतिहासकारांनी ते काम करु नये.त्यांचे काम सत्य मांडणे.
           शेवटी पुनश्च लक्षात घेऊया की, रायगड व राजकुटूंब सूर्याजी पिसाळांच्या फ़ितूरी,विश्वासघातकीपणा, स्वार्थी यामुळे शत्रुच्या ताब्यात गेलेले नाही.तसे झाले असते तर इतर मराठा मंडळातील सरदार-दरकदारांनी सूर्याजींचा खातमा तात्काळ केला असता.बादशाहाच्या छावणीचे सोन्याचे कळस कापणारे छ,राजारामांचे तरुण साथीदार आणि सेनापती संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनी सूर्याजी पिसाळांना शिल्लक ठेवले नसते.राजारामांनी त्यांची कन्या त्यांच्या पुत्रास दिली नसती. रायगडावर वेढ्याच्यावेळी त्यांचे तेथे आस्तित्व नव्हते.मोठी लढाई रायगड काबीज करताना झालेली नाही.
          शिवाजी द्वितीय (शाहू) केवळ ९ वर्षाचे होते.राणी येसूबाई आणि त्यांचे सल्लागार मराठा मंडळाने ’ शांतपणे शरण जाण्यातच शाहूंचे व सर्वांचे कल्याण आहे’ असा विचार तो बरोबरच. मराठेशाहीत अन बिकट प्रसंगाच्या युद्धात किल्ल्यांच्या आणि माघारीबाबत हाच विचार क्रुतीत आणला जात असे/जातो."शक्य तेवढा प्रतिकार अशक्य झाल्यास कमीत कमी नुकसान सोसून किल्ला स्वाधीन करणे हेच धोरण  मराठ्यांनी औरंगजेबच्या दक्षिण स्वारीचा जोर ओसरेपर्यंत स्वीकारले.’......’ तेच धोरण राणी येसूबाईंनी अमलात आणले.
            सूर्याजीने ना गडाचा दस्तुरखुद्द दरवाजा उघडला ना फ़ितुरी केली हे नि:संशय. येथुन पुढे फ़ितूर "फ़ितूरच" ,  सूर्याजी पिसाळ नव्हे.
          (पूरक माहीती : श्री नरसिंगराव पिसाळ-देशमुख,ओझर्डे; श्री राम राजेशिरके, कोल्हापूर; अनेक इतिहासग्रंथ)

11 प्रतिक्रिया :

 1. खुप छान लेख लिहिला आहात. एका लढवय्या वीराला कलंकीत केले जाते यापेक्षा वाईट गोष्ट कोनती असु शकते ? पण आता हळु हळु खरा इतिहास जगासमोर आणला पाहिजे आपण म्हणता तसे इतिहासाची पुनर्रमांडणी अत्यावश्यक आहे.
  । जय भिम ।

  ReplyDelete
  Replies
  1. राजेश पाटोळे
   प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद !

   Delete
 2. अप्रतिम लेख आहे. सूर्याजी पिसाळांचा इतिहास प्रकाशित करून खुप छान काम केले आहे.कारण बरेच वर्षे यांचा इतिहास कलंकीतच होता.एकंदरीत ब्लोगवरील सर्व लेख हे नि:पक्षपाती लिहिले आहेत त्याबद्दल आभार.

  ReplyDelete
  Replies
  1. प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद !

   Delete
 3. चांगला लेख आहे ! अगदी खोलवर जाऊन इतिहासाचा अभ्यास केलेला दिसतो. असे इतिहासात बरेच वर आहेत ज्यांचा इतिहास जाणीवपूर्वक लपविला गेला आहे .
  आभिजीत तू चान लिहितोस एक "महाराष्ट्र राजकारण" मथळा असलेला लेख लिहिशील का ?
  नारायण प्रभुदेसाई !

  ReplyDelete
  Replies
  1. नक्की लिहिन पण माझ्याकडे महाराष्ट्र राजकारण याविषयी काही माहीती नाही कारण मला त्यामध्ये रस नाही तुझ्याकडे काही माहीती असेल तर पाठव नक्की आहे तशी लिहिन कोनताही जातियवाद न करता.

   Delete
 4. छान लेख आहे. असे अन्याय वीरांना न्याय देण्यासाठी इतिहास परत लिहावा लागेल.सगळ्या जगाला माहीत झालं पाहिजे की "मर्द मराठ्यांनी सजविला इतिहास आणी ब्राह्मणांनी सुजविला इतिहास" हे बाहेर आलं पाहिजे की पायपोस किमतीचे पेशव्यांनी "शिवशक " बंद पाडुन तिथे मुस्लिमांचा "फ़सली-शक" सुरु केला. हे बाहेर आलं पाहिजे की महात्मा फ़ुलेंनी शिवजयंती सुरु केली तेंव्हा टिळक १२-१३ वर्षाचं बाळ होतं. शिवजयंतीचा वाद बाबा पुरंदरे (बाब्जु) ,(नादान) बेडेकर, आणि (हरामी) साळगावकर यांनी निर्मान केला.त्या ब्राह्मणांचा धिक्कार असो.
  ।जय मुलनिवासी ।

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद ।
   हो आत मी बाबा पुरंदरेवर एक लेख लिहित आहे. नाक्किच आवडेल

   Delete
 5. मैं बहुत दिनों से सूर्याजी पिसाल के बारे में जानना चाहता था. आपके ज्ञानपरक लेख के लिए आपका आभारी हूँ, तात्या टोपे और उनके तथाकथित पकड़वाने की बदनामी अपने सिर लेने वाले मानसिंह की कथा भी कुछ ऐसी ही है.

  ReplyDelete
 6. Satya mev jayate

  ReplyDelete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.