8 December 2016

मराठा क्रांती मोर्चा : सामाजिक क्रांती.

          महाराष्ट्रामध्ये काही दिवसापासून प्रत्येक समुहाचे ओबीसी - बहुजन - दलित ऐक्य-संविधान संबंधीत नावाने भव्य मोर्चे सुरु आहेत, मोर्च्याला सुरुवात झाली ती "मराठा क्रांती मोर्चा" ने. कोपर्डी येथे एका लहान मुलीवर दलितांकडून पाशवी अत्याचाराची घटना घडल्यानंतर त्याची प्रतिक्रिया म्हणून महाराष्ट्रभर मराठा क्रांती मोर्चाची मालिका सुरु झाली. मराठा क्रांती मोर्चे अतिभव्यपणे आणि तेवढ्याच शांततेने मूकपणे चालू झाले. क्रांती म्हंटले की प्रतिक्रांतीही आलीच त्यामुळे आम्हीही एकत्र येवू शकतो हे दाखवण्यासाठी मराठा मोर्चा विरोधातही "बहुजनांचे" प्रतिमोर्चे निघू लागले. सध्याचा काळ मोर्चेबांधनीचाच काळ आहे. सध्याही एकाच गोष्टीची चर्चा आहे मोर्चा आणि त्याच्या ठळक मागण्या. महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या "मराठा क्रांती मोर्चाचा" समाजाला किती फ़ायदा होईल त्यांच्या मागण्या मान्य होतील का ? झाल्याच तर किंवा नाही झाल्याच तर पुढे काय ? हा मुद्दा थॊडा बाजुला ठेऊ. माझ्या मते "मराठा क्रांती मोर्चाचे" चे मोठे फ़लीत म्हणजे सामाजिक पारदर्शकता. "मराठा क्रांती मोर्चा" मुळे समाजामध्ये पारदर्शकता आली. आम्ही एकच आहोत असे सर्वकाळ ओरडनार्या सर्वांचे मित्रत्व किंवा शत्रुत्व अगदी सुर्यासारखे स्पष्ट झाले. आज पर्यंत ब्राह्मणवादाच्या विरोधात लढताना स्वत:ला बहुजन म्हणनार्यांचे सुद्धा पितळ उघडे पडले. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे हिंदुत्व - बहुजनवाद - पक्ष यामध्ये विभागलेला मराठा "फ़क्त मराठा" म्हणून एक झाला आणि विश्वाला आपल्या मराठा शक्तीचे दर्शन करून एक नवा आदर्श दिला. अनेक वेळा मोर्चे निघतात त्यात अनेकदा मोर्चाला हिंसक वळण लागते, सरकारच्या अडचणीमध्ये वाढ होऊन सामान्य नागरीकांना हकनाक वेठीस धरले जाते पण अपवाद असेल तर तो अतिभव्य मराठा क्रांती मोर्चा. कारण क्रांतीची सुरुवात आणि शेवट हे सुधारणा आणि क्रुतीने होत असते.आपण जर इतिहासातील सर्व मोर्चे आणि आंदोलनाचा इतिहास पाहिला तर सहज लक्षात येईल , तोडफ़ोडी, जाळपोळी, लुटालुट, सरकारविरोधी नारेबाजी, सार्वजनिक मालमत्तेची नासधुस तसेच सामाजिक तनाव ही मोर्च्याची खास वैशिष्टे राहिलेली आहेत. अशा वेळी मराठ्यांनी शिस्त, शांतता आणि स्वच्छतेचे दर्शन घडवून इथुन पुढच्या मोर्च्यांसाठी एक आदर्श घालून दिलेला आहे ही बाब मराठ्यांसाठी निश्चितच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे.
आरक्षण आणि सामाजिक मानसिकता
               सेनापती बापटांनी म्हंटलेले आहे "महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले, खरा वीर - वैरी पराधिनतेचा, महाराष्ट्र आधार भु-भारताचा". मराठा सेवा संघासोबत इ.स.१९९६ मध्ये मराठा आरक्षणासंबंधी एका बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी म्हंटले होते की, "आजपर्यंत केवळ देणेच माहीत असलेल्या मराठा समाजावर आज आरक्षण मागायची वेळ आली आहे ही महाराष्ट्रासाठी भुषणावह बाब नाही, परंतू मराठा समाज सर्वार्थाने सशक्त होण्यासाठी शासनाचे प्रयत्न राहतील". मराठा नेत्यांनी समाजाकडे दुर्लक्ष केल्याचे मतही त्यांनी मांडले. तेंव्हापासून आजतागात आरक्षणासाठी मराठ्यांचा संघर्ष चालूच आहे. मराठा समाज आरक्षण मागत असला तरी ते स्वतंत्र आरक्षण मागत आहेत कुणाचे कमी करून नाही. मराठा आरक्षणाचे काही समाजाने समर्थन केले आहे तर काहींनी अप्रत्यक्ष विरोध. आरक्षण म्हणजे गरीबी हटाव कार्यक्रम नाही असे म्हणणारे मराठा आरक्षणावर बोलताना मात्र मराठ्यांच्या आर्थिक परिस्थितीचे वर्णन करतात हेच दुटप्पीपणाचे लक्षण आहे विशेष म्हणजे त्यांना आर्थिक सवलती घेताना अजिबात लाज वाटत नाही. मराठा समाज आज मागास परिस्थितीत जगत आहे पण भारतीय संविधान त्यांना मागास मानायला तयार नाही. भारतीय संविधानाचा आजही देशात "सवर्ण आणि दलित" जगत आहेत यावर ठाम विश्वास आहे मग ते कितीही समानतेची शिकवण देवो. मोजक्या लोकांच्या स्थितीवरून समाजाच्या परिस्थितीचे मोजमाप करणे हेच चुकीचे आहे. आरक्षणाचा मुद्दा संपुष्टात आणायचा असेल तर एकतर सर्वच जातीना लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण द्यावे नाहीतर सर्वच आरक्षण रद्द करावे लागेल. आर्थिक निकषावर आरक्षण असाही एक पर्याय शक्य आहे. मी वयक्तिक मराठा आरक्षणाला जेवढं समर्थन करतो त्याच्या पेक्षा जास्त सर्वच आरक्षण रद्द करण्याला माझं समर्थन आहे.कारण आरक्षणानं देशाची आर्थिक स्थिती फ़ारच दयनीय झालेली आहे. असंच चालू राहिलं तर देश भिकेला लागायला वेळ लागणार नाही.आरक्षणाच्या शैक्षणिक - व्यवसायिक आर्थिक सवलती मध्ये कोट्यावधी रुपये विनाकारण वाया घालवले जात आहेत.त्यामुळे किमान अशा सवलती देण्या अगोदर आर्थिक निकष तपासणे अत्यंत आवश्यक आहे.
मराठा वि.दलित : मोर्चे आणि प्रतिमोर्चे.
                 मराठा मोर्चे जसे रेकॉर्डब्रेक गर्दी करायला लागले तसे आधी दुर्लक्ष करत असलेल्या माध्यमांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.इतर जातींमध्ये अस्वस्थता कशी पसरेल याची काळजी प्रसारमाध्यमांनी घेतली.मोर्चा - प्रतिमोर्चा मुळे सध्या सामाजिक संकेतस्थळावर जातीयवादाला हुरुप आला आहे. काही ठिकाणी दंगलीचे वातावरण पण झाले होते. ॲड. प्रकाश आंबेडकरांनी मराठ्यांच्या मागण्या सरकारविरोधी आहेत आणि राज्यात अराजकता निर्माण करण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे प्रयत्न आहेत त्यामुळे प्रतिमोर्चा काढू नये असे आवाहन केले होते.त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत. तरीही प्रसारमाध्यमांनी मराठा मोर्च्यातील अनेक मागण्या बाजुला सारून अ‍ॅट्रोसिटीच्या मागणीस सर्वाधिक चर्चेत ठेवून, आरक्षणावरून भयभीत करून दलितांना प्रतिमोर्चा काढण्यास भाग पाडले. दलितांनी यामागचा उद्देश लक्षात न घेता मराठ्यांच्या विरोधात मोर्चे काढले खरे पण त्याचा त्यांना कितपत फ़ायदा होईल दलितांनी याचा विचार करणे आवश्यक आहे.
               मराठा मोर्चा तथा प्रतिमोर्चाचे फ़लीत म्हणजे ब्राह्मणवादा विरोधात बहुजन सज्ञेमध्ये वावरणार्या मराठा आणि दलित लोकांचे पारदर्शक रुप समोर आले.मराठा - दलित हा वाद काही आजचा नाही. हे शत्रुत्व जुनेच आहे फ़क्त बहुजन एकीच्या नावाखाली दबलं गेलं होतं. सामाजिकतेचा विचार केला तर आज मराठा-दलित एकमेकांचे हाडवैरी बनले आहेत. दोन्ही समाजामध्ये दरी निर्माण झालेली आहे. किमान कोणत्याना-कोणत्या चळवळीत काम करत असलेल्यांची तर हिच भावना आहे. इथे संपुर्ण समाज असा उल्लेख अपवादात्मक सुद्धा करणे शक्य नाही. एकीसे कितीही डोस पाजले तरी सत्य परिस्थिती लपवणे किंवा अमान्य करणे सोप्पे नाही. वर - वर एकतेचे दर्शन देणार्यांची मानसिकता सामाजिक संकेतस्थळावर वेळो - वेळी बाहेर आली आहे. सामाजिक संकेतस्थळ म्हणजे समाज नव्हे असे आपण म्हंटले तरी आज तो एक समाजाचा भाग बनला आहे.मराठा आणि दलित समाज हे वैचारिक सामाजिक पातळीवर एकत्र येणे कदापी शक्य नाही.मराठा-दलित यांचे संबंध हे हिंदु-मुस्लिम धर्मासारखे आहेत वर-वर भाई-भाई म्हणायला ठिक आहे पण प्रश्न सामाजिकता-परंपरेचा येतो त्यावेळी दोन्ही परस्पर विरोधी आहेत. हिंदु-मुस्लिम भाई-भाई असं आपण कितीही म्हणालो तरी परंपरा - इतिहास - श्रद्धास्थानं - प्रेरणास्थानं - लग्नपद्धती ही भिन्न टोकाची आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये सामाजिक एकी होऊ शकत नाही तीच अवस्था इथे मराठा आणि दलितांमध्ये आहे. निव्वळ बुद्धीजीवींच्या विचारावर एकमत झाले तर सामाजिक समता येत नाही तसेच आंतरजातीय विवाहाने समता-समानता येईल असे मानने म्हणजे सदसदविवेकबुद्धीशी शत्रुत्व पत्कारण्यासारखे आहे. त्यामुळे दोन्ही समाजाने उघड - उघड भुमिका घेणे गरजेचे होते जे "मराठा क्रांती मोर्चा" आणी त्याच्या विरोधातील "बहुजन मोर्चा" च्या रुपाने का असेना साध्य झाले आहे मग कितीही "मराठा - दलित ऐक्य" च्या बाता मारल्या तरी त्याने फ़रक पडेल अशी सध्या तरी परिस्थिती नाही ही बाब दोन्ही समाजाने मान्य केली पाहिजे. नाहीतर परिस्थिती बदलायची असेल तर निर्लपबुद्धीने आणि नि:पक्षपातीपणे एकत्र येवून विचार मंथन करणे गरजेचे आहे किंवा जे चालू आहे तेच चालू द्यावे हेच दोन्ही समाजाच्या हिताचं आहे.
ॲट्रोसिटी कायद्यातील बदल
         अनुसुचित जाती-जमातींच्या रक्षणासाठी त्यांच्यावरील अत्याचार रोखण्यासाठी ॲट्रोसिटी (अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक) कायद्या केला गेला.परंतु नंतर त्याचे रुपांतर रोजगार हमी योजना अंतर्गत कायद्यामध्ये झाले की काय अशी शंका येते. कारण कायद्याचा वापर संरक्षणासाठी होत असता आर्थिक उन्नतीसाठीपण होत असल्याच्या काही घटना काही दिवसात समोर आल्या आहेत. त्यामुळे दोन्ही समाजामध्ये दुही पसरली आहे. दलितांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे केले पाहिजेत हे मान्य करून आणि त्या अत्याचाराचा आम्ही निषेद करतो पण खोट्या केसेस दाखल केल्या जात नाहीत असे म्हणणे म्हणजे दु:साहस तथा अज्ञानीपणाचे लक्षण आहे. मराठा मोर्चामध्ये ॲट्रोसिटी कायद्यामध्ये बदल करण्यासाठीची एक मागणी होती. त्या मागणीच्या विरोधातच दलितांनी प्रतिमोर्चा काढला होता. पण बदल म्हणजे नेमका काय बदल करायचा आहे याबद्दल ऐकुन घेण्याची मानसिकता कोणत्या दलितामध्ये किंवा त्यांच्या नेत्यांमध्ये नव्हती म्हणूनच ॲट्रोसीटी कायदा मुळे दोन्ही समाजात दरी निर्माण झाली आहे ती दरी आहे तोपर्यंत तरी एकीच्या गप्पा झाडणे म्हणजे विनाकारण वेळ घालवण्यातला प्रकार आहे. दुर्दैवाने देशामध्ये खोट्या केसेस करण्यार्यांना कठोर शिक्षा देण्याची तरतुद आपल्याकडे नाहीये मग कायदा कोनताही असो.त्यामुळे अशा वेळी गुन्हा सिद्ध झाला नाही किंवा फ़िर्यादी फ़ितुर झाला तर कठोर शिक्षा देण्याची आणि त्याला मिळालेले पैसे परत शासनाला परत करण्याची तरतुद करणं अत्यंत गरजेचे आहे.असे केल्याने बर्याच प्रमाणात खोट्या केसेस ला तथा धमक्यांना आळा बसेल. यासाठी दोन्ही समाजातील तज्ञ लोकांनी एकत्र येवून याविषयी चर्चा करुन दोन्ही समाजाला अनुकूल, दलितांवरील अत्याचार थांबावेत आणि ॲट्रोसिटीचा गैरवापरही होऊ नये असा सुवर्णमध्य काढणं अत्यावश्यक आहे;(आरक्षण आणि ॲट्रोसिटी : क्रमश:).

17 प्रतिक्रिया :

  1. छान लेख आहे.सर्व परिस्थिती थोडक्यात मांडली आहे.पण एक मुख्य गोष्ट म्हणजे आपण बहुजन मोर्च्याला मराठा मोर्च्याचा प्रतिमोर्च्या म्हनून उल्लेख करत आहात ते चुकिचे आहे.तो त्यांच्या हक्काधिकारासाठी होता.नमुद करताना बहुजन प्रतिमोर्चा असं ठळक केला आहात यामागे तुमचा उद्देश मराठा आणि बहुजन शे वेगवेगळे आहेत हे दाखवण्यासारखे आहे जे चुक आहे.मी मराठाच आहे बरीच वर्ष बहुजन चळवळीमधून कार्य करतोय.समाज एक होईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.ॲट्रोसिटी बदलाला मी सुद्धा समर्थन करतो पण आपण व्यवस्थेशी लढताना बहुजन म्हणूनच लढले पाहिजे.
    जय शिवराय जय भिम जय मुलनिवाशी

    ReplyDelete
  2. मराठा समाजाने आता बहुजनवाद सोडून दिलेला बरा काहीअंशी संभाजी ब्रिगेड आणि बामसेफ़ मध्ये जे आहेत त्यांनी अजुन कास सोडलेली नाही बहुजनवादाची पण तेही एक दिवस येतील बाहेर.मराठ्यांनी आता मराठ्यांसाठी लढले पाहिजे.हिंदुत्ववादाला विरोध करून बहुजनवादाचा पुळका ज्यांना येत होता त्या सगळ्यांना आता अक्कल आली असेल अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही.

    ReplyDelete
  3. ब्राह्मणवादाच्या विरोधात सर्व एक होऊन लढत होते.संभाजी ब्रिगेड,भारत मुक्ती मोर्चा आणि बामसेफ़ अचानक मराठा मोर्च्याने सर्व विस्कळीत केलं त्यामुळे फ़ायदा हा मनुवादी व्यवस्थेला झालेला आहे.दलीतांनीही असं समजण्याची गरज नाही की आम्ही आता एकत्र आलो आहोत त्याने काहीही फ़रक पडत नाही पण मराठा मोर्च्यामुळे जातीय तनाव वाढण्यास मदत झाली.त्यामुळे आपण आणखी थोडे मागे गेलेलो आहोत.त्यामुळे पुन्हा आपल्याला फ़ार कष्ट घ्यावे लागणार आहेत.लवकरात लवकर सगळे मोर्चे संपवून आपल्याला पुन्हा जोमाने लढावं लागणार आहे.

    ReplyDelete
  4. माझा व्यक्तीश: मराठा आरक्षणाला विरोध आहे कारण मी आरक्षणाचाच विरोधक आहे.भारताला खाइत लोटलय आरक्षणाने.जातीय विषमता नष्ट करण्याच्या प्रयत्नात आंबेडकरांनीआर्थिक विषमता आणली आहे आणि आपल्या जातीबांधवांसाठी त्याचा लाभ करून घेतला बाकिचा समाज खितपत पडलाय.मनुस्म्रुती काय नी घटना काय एक जातीय विषमतावादी एक आर्थिक विषमतावादी.

    ReplyDelete
    Replies
    1. आरक्षण दिले गेले तरी आर्थिक परिस्थितीवर दिले गेले पाहिजे.जातीवर आधारीत नको असे केल्याने ज्याला गरज आहे तो मागेच राहतो आणि पुढचा पुढेच जातो.आज मागासवर्गियांसाठी इतर लोकांमध्ये रोषा अहे तो यासाठीच.त्यामुळे सगळे आरक्षण आर्थिक निकशावर दिले गेले पाहिजे.

      Delete
    2. सर्व सवर्ण समाजाने एकत्र येवून देशाला गरीबीच्या खाईत लोटणार्या आरक्षणाला विरोध करावा दंगली झाल्या तरी चालतील पण नंतरचा काळ सुखाचा असेल.मरतील ते मरतील किमान जिंवत राहतील ते जिवंतपणी तरी मरणार नाहीत.
      #आरक्षण_संपवा_देश_वाचवा

      Delete
  5. सर केवळ आर्थिक प्रगती साठी आरक्षण नाही आहे सामाजिक समानता आहे.आरक्षण म्हणजे गरीबी कमी करण्यासाठी नाही.सामाजिक समानता आली पाहिजे आंतरजातीय विवाह,शासनात आणि सत्तेत वाटा मिळाला पाहिजे.असे अनेक मुद्दे आहेत.केवळ पैसे आले म्हणून आरक्षण बंद होऊ शकत नाही.आजही समाजात मागासवर्गियांवर अत्याचाराचे प्रमाण जास्त आहे.ते थांबले पाहिजे ॲट्रोसीटी असुनदेखील अन्याय होतोच परवा सातार्याचे प्रकरण आपल्याला माहीत आसेलच.त्यामुळे आरक्षण बंद करणे चुकीचे आहे.मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे याला आमचा विरोध नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. शासकीय किंवा सत्तेतील स्थान ठिक आहे पण जातीयवादाच आणि आंतरजातीय विवाहाचा काय संबंध ? त्याने थोडीच समानता येणार आहे ते एक कुटुंबाचा प्रश्न असतो केवळ समतेसाठी कोण असे करेल असं वाटत नाही.बाकी ज्ये लोकं आरक्षणावर प्रगतीवर आले.त्यांनी आता आरक्षणाचा लाभ घेणे सोडले पाहिजे प्रामाणिक पणे.तरच देशाची प्रगती होईल नाहीतर आधीच देश भिकेला लागत आहे.

      Delete
    2. माझं मत आहे की फ़क्त एका पिढीलाच आरक्षण द्यायचं पुढच्या पिढीला मिळणार नाही अशी व्यवस्था केली पाहिजे.राहिली गॊष्ट आंतरजातीय विवाहाची तर यांचा जास्त जोर त्यावरच आहे.कोणताही बौद्ध शिकला की त्यांना सवर्ण समाजाशी जुळण्याची इच्छा दिसते किंवा सवर्ण जातीतील मुलींविषयी आकर्षण आहे असं दिसून येते.शिकलेले दलीत म्हणजे खरे जातीयवादी असतात.देशाला भिकेला यांनीच लावले.सगळ्या सवलती काढून घ्या म्हणावं मग समतेच्या गप्पा हाणा.

      Delete
    3. बौद्ध तथा दलीत लोंकांकरीता समतेचा अर्थ नेमका काय आहे ते समजायला मार्ग नाही तसही आंतरजातीय विवाह ही सरकारी सवलत नाही आदेश काढला आणि आमलात आणला असं व्हायला.मुळात यांची आंतरजातीयची व्याख्या आणि मागणीच निष्फ़ळ आहे.श्रीमंत बौद्ध मुलगी गरीब शेतकरी मराठा बरोबर लग्न करणार नाही पण यांच्या खड्डे खणणार्या किंवा गटारे उपसनार्यांबरोबर लग्न करावेत.बौद्ध श्रीमंत शिक्षित मुले गरीब मराठा मुलीबरोबर लग्न करणार नाहीत पण यांच्या गावभर धुणीभांडी करणार्या मुलींना मराठांनी घरची सुन बनवावी असं यांचं मत असते.आंतरजातीयला विरोध नाही पण केवळ जात बघून पण लग्न होत नाहीत मुलगा.शिक्षण घरचे संस्कार राहणीमान सर्व बघितले जाते.हे माहीत नसेल तर अवघड आहे.

      Delete
    4. आंबेडकरवादी दलीतांचा एक मोठा गैरसमज आहे तो म्हणजे लग्न करताना केवळ जात पाहिजे जाते अर्थात त्यांच्या कडून हेच अपेक्षित आहे पण केवळ जातीचा म्हनून कोण लग्न करत नाही.मुलगा व्यसनी असेल,बेकार असेल,घरदार चांगले नसेल तर केवळ मराठा आहे म्हणून कोण लग्नाला तयार होत नाही आधी सगळं बघितलं जातं शिक्षण-नोकरी-घरदार-स्वभाव मग त्यानंतर जात-पात तीही आता नाहीशी होत आहे पहिल्यापेक्षा जास्त आंतरजातीय विवाह होत आहेत फ़क्त एवढाच की दलीतांबरोबर होत नाही त्यला कारण आहे अस्वच्छता-असभ्यता-राहणीमान.त्यांनि स्वत:मध्ये सुधारणा केल्या पाहिजेत.मग अपेक्षा करणे बरोबर आहे.

      Delete
    5. आजही मेललं जनावरं खाणारे दलित लोकं आढळतात.मुळात यांचे राहणीमानच एवढे घाणेरडे असते ना विचारूच नका.यांच्या रहत्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय असते त्याची अवस्था बघितली तर जागीच उलट्या होऊन माणुस मरेल म्हणून ते घाण करून मस्त पैकी हवेशीर रस्त्याकडेला शौचालयास बसतात.त्यातच त्यांना सुख असतं आणि यांच्याशी सोयरिक करायची म्हणे हाड.

      Delete
  6. मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे पण ओबीसींतुन देऊ नये असे आमचे मत आहे ते मराठा विरोध म्हनून नव्हे.तर आधीच आहे त्या लोकसंख्येत आरक्षणाचा लाभ होत नाही.मग मराठा संख्येने मोठा आहे तो जर ओबींसी मध्ये आला तर कुणालाच काहीही मिळणार नाही.धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. आरक्षणाची टक्केवारी प्रमाणे घसरण होईल पण आर्थिक स्थर सगळ्यांचा समान उंचावेल ना ? बाकी तुमचं म्हणणं मान्य.

      Delete
  7. मराठा समाजाला आरक्षण मिळणे कठीण असले तरी फ़डवणीस सरकार काहीतरी योजना राबवतीलच अशी आशा आहे.आर्थिक परिस्थिती बघून मराठ्यांसाठी वसतीग्रुहांची सोय केली आणि आर्थिक भार उचलला येवढे जरी आमलात आणले तरी फ़ार झाले आरक्षण लढा चालूच राहिल

    ReplyDelete
  8. मुळात आरक्षण एक शाप आहे असं माझं मत आहे.मराठा असो वा कोणीही जातीवर आधारीत आरक्षण बंद केलं पाहिजे.आर्थिक निकशावर आरक्षण दिलं पाहिजे.

    ReplyDelete
  9. अनुसुचित जाती जमाती जशा वेगळ्या असल्या तरी त्या दलित म्हणून एकत्र येतात तशा मराठा ब्राह्मणादी लोकांनी सवर्ण म्हणून एकत्र येणे काळाची गरज आहे त्याशिवाय आपले भले होणार नाही.

    ReplyDelete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.