12 January 2016

दादोजी,छ.शिवाजी महाराज आणि सत्य

        "दादोजी,शिवाजी महाराज आणि सत्य" अशा मथळ्याचा राजा पिंपरखेडकर लिखीत लेख "लोकसत्ता" मध्ये ३१ ऑगस्ट २०१४ रोजी प्रसिद्ध झाला. अर्थात तो लेख म्हणजे एक पुस्तक परीचय होता. श्यामसुंदर मुळे यांनी लिहिलेले "हिंदवी स्वराज्याचे कारभारी दादोजी कोंडदेव : खंडण आणि मंडण " याच पुस्तकाचा परीचय. या लेखामध्ये लेखकाने असे लिहिले आहे की, "दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज यांचं सुरुवातीचं शिक्षण झालं, त्यांची नेमणूक खुद्द शहाजीराजांनीच केली होती" तसेच "दादोजी यांचं शिवाजी महाराजांच्या जडणघडणीतलं स्थान नाकारण्यात काहीच अर्थ नाही." असही सुचवले आहे. आजच्या सामाजिक संघटना इतिहासाची मोडतोड करून आपल्याला सोईस्कर इतिहास लिहितात असा आरोप त्यांनी केला आहे पण आजपर्यंतच्या तथाकथित इतिहासकारांनी जे उपद्व्याप केले आहेत त्याविषयी लिहायचे मात्र ते विसरलेत. अर्थात या लेखकांनी "सत्य" हा शब्द मथळ्यापुरताच मर्यादित ठेवला आहे. त्यामुळे सत्य काय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे.
           शिवचरित्रामध्ये सर्वात जास्त चर्चेचे ठरलेले प्रकरण म्हणजे त्यांचे गुरुत्व. यामध्ये रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव ही नावे आघाडीवर होती. पण आजपर्यंत रामदास स्वामींना शिवरायांच्या गुरुपदी बसवणारे लेखक अक्कल आल्यावर रामदास स्वामी आणि शिवरायांनी भेटच झाली नसल्याचे बोलत आहेत तसेच शिवराय आणि रामदास भेटीचे अस्सल पुरावे नाहीत हे तर इतिहाससिद्ध आहेच. त्यामुळे अशा वेळी एकच नाव उरते ते म्हणजे दादोजी कोंडदेव.
            राजा पिंपरखेडकर यांच्या म्हणण्यानुसार "शहाजीराजांनी दादोजी कोंडदेव यांची नेमणुक केली होती" हे खरे आहे पण नेमणुक केली होती ती सेवक म्हणून गुरु किंवा शिक्षक म्हणून नव्हे. शहाजी राजांनी शिवाजी महाराजांबरोबर काही नोकर दिले होते. शहाजी राजांच्या पुणे परीसरातील काही मुकाशांचा कारभार त्यांच्या वतीने दादोजी कोंडदेव पाहत असे. दादोजी कोंडदेव शहाजीराजांचा खाजगी नोकर होता. तो पुणे परगण्याच्या पाटस विभागातील मलठण गावचा कुलकर्णीही होता. काही इतिहासकार म्हणतात की दादोजी कोंढाण्याचा सुभेदार होता. परंतु कोंढाणा परीसरातील शहाजीराजांच्या मुलखाचा कारभार पाहण्यासाठी शहाजीराजांनी त्याची मुतालिक म्हणुन नेमणुक केली होती. अर्थात तो "अदिलशहाचा अधिकारी नव्हता तर शहाजीराजांचा नोकर होता. १६४१-४२ मध्ये शिवाजीराजे पुण्याला येण्यापुर्वी तो शहाजीराजांच्या आज्ञा पाळीत असे." शिवाजीराजे पुण्याला आल्यानंतर तो शिवाजीराजे आणि जिजाऊमाता यांच्या आज्ञा पाळीत असे.
          आत्तापर्यंतच्या बर्याच उत्तरकालीन बखरकारांनी व काही तथाकथित इतिहासकारांनी दादोजीला शिवाजी महाराजांचा बालपणीचा गुरु करून शिवरायांच्या स्वराज्यस्थापनेच्या प्राथमिक कार्याचे श्रेय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही इतिहासकारांनी शिवरायांना शस्त्रास्त्राचे शिक्षण दादोजी कोंडदेव याने दिल्याचे लिहिले आहे. यावरूनच प्रेरणा घेऊन महाराष्ट्र शासनाने उत्क्रुष्ट क्रिडा प्रशिक्षकासाठी "दादोजी कोंडदेव पुरस्कार" देखील सुरु केला होता व "दादोजी कोंडदेव स्टेडीयम" या नावाने मोठे स्टेडीयम ठाणे येथे तयार केले.
           दादोजी ने शिवरायांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण दिल्याचा किंवा स्वराज्य कार्यास प्रेरणा दिल्याचा अथवा मदत केल्याचा एकही उल्लेख समकालीन साधनांमध्ये नाही. शहाजी राजेंच्या पदरी असलेल्या जयराम पिंडे लिखित राधामाधवविलासचंपु, कविंद्र परमानंदाचे शिवभारत, जेधे शकावली या सर्वात विश्वसनीय समजल्या जाणार्या समकालीन साधनांमध्ये दादोजी कोंडदेव चा उल्लेखच नाही. स्वराज्यकार्यात लहानमोठे योगदान दिलेल्या अनेक व्यक्तींचे उल्लेख या ग्रंथांमध्ये असताना दादोजी कोंडदेवचा उल्लेख नसणे ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्यातील व जीवनातील दादोजीचे गौण स्थान दर्शवते. विश्वसनीय साधनांमधील सभासदाच्या बखरीतदेखील दादोजीने शिवरायांना शिक्षण दिल्याचे उल्लेख नाहीत. सभासद लिहितो, "शाहजीराजे कर्नाटक प्रांती बेंगरुळ येथे होते. शाहजीराजे यांसी दौलतीमध्ये पुणे परगाणा होता. तेथे दादोजी कोंडदेव शहाणा चौकस ठेविला होता. तो बेंगरुळास महाराजांच्या भेटीस गेला त्याचबरोबर राजश्री शिवाजीराजे व जिजाबाईआऊ ऐशी गेली. त्यासमयी राजियास वर्षे बारा होती. बराबर शामराव निळकंठ म्हणून पेशवे करून दिले व बाळक्रुष्णपंत व नारोपंत दीक्षितांचे चुलतभाऊ मुजुमदार दिले.व सोनाजीपंत डबीर व रघुनाथ बल्लाळ सबनीस ऐसे देऊन दादोजीपंतास व राजे राजे यांसी पुण्यास रवाना केले. ते पुण्यास आले. येताच बारा मावळे काबीज केली. मावळे देशमुख बांधून, दस्त करून पुंड होते त्यास मारीले. त्यावर कालवशात दादोजी कोंडदेव म्रुत्यु पावले. पुढे शिवाजीराजे आपणच कारभार करीत चालले. "अर्थात इतर नोकर-चाकरांप्रमाणे दादोजी कोंडदेव हा नोकरच होता यात तीळमात्र शंका असण्याचे कारण नाही.
          पेशवेकालीन बखरीमध्ये दादोजी कोंडदेव चे उदात्तीकरण करण्यात आले आहे. पेशवाईच्या उत्तर काळात स्वराज्य स्थापनेचे श्रेय जातीनिशी लाटण्यासाठी दादु कोंडदेव ला शिवरायांच्या गुरुपदावर आरुढ करण्याचं कार्य सुरु झालं. याच काळात लिहिल्या गेलेल्या शिवदिग्विजय, चिटणीस बखर यांसारख्या बखरीमधुन दादु कोंडदेव हा शिवरायांचा गुरु असल्याचा खोटा इतिहास रचण्यात आला. या  बखरींबद्दल इतिहास संशोधक सेतू माधवराव पगडी म्हणतात - मराठा साधनांपैकी एक्क्याण्णव कलमी बखर काय किंवा चिटणीस बखर काय, उत्तर पेशवाईतील असल्यामुळे भारूडांनी भरल्या आहेत. अशा बखरींमध्ये आलेला इतिहास हा आजपर्यंत होऊन गेलेल्या इतिहासकारांनी नाकारलेला आहे. सभासद बखरीचे संपादक दत्ता भगत म्हणतात, "उत्तरकालीन बखरकारांनी शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत दादोजी कोंडदेवाचे गुरु म्हणून चित्रण करताना दादोजीला अवास्तव महत्व दिले आहे, ते या (सभासद) बखरीत नाही. शिवाजी महाराजांना दादोजीबद्दल आदर असणार पण यांचे संबंध मालक/सेवक (चाकर) आहेत हे सभासदाच्या लक्षात आहे. " प्रसिद्ध विचारवंत, प्राच्च्यविद्या संशोधक व संस्क्रुतचे गाढे अभ्यासक डॉ.आ.ह.साळूंखे  यांनी परमानंदाच्या शिवभारतावर आधारित "शिवराय : संस्कार आणि शिक्षण" नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे त्यात प्रुष्ठ क्र.३८ वर ते लिहितात "महाराष्ट्रात आढळणार्या दंतकथांमधील तथाकथित गुरुंचा उल्लेखही नाही. शहाजी राजे आणि जिजाऊ यांच्या स्वत:च्या क्षमता, त्यांनी शिवरायांवर केलेले संस्कार स्वत: आणि विविध शिक्षकांमार्फ़त त्यांची करून घेतलेली तयारी या सर्वांचे परमानंदाने जे अत्यंत सविस्तर वर्णन केलेले आहे यातुन एक गोष्ट लक्षात येते की दंतकथामधील कोणत्याही गुरुचा साधा उल्लेखही परमानंदाने संपुर्ण ग्रंथात कुठेही केलेला नाही."   इतिहास संशोधक वा.सी.बेंद्रे यांनीही असे म्हंटले आहे की, "शिवाजी-जिजाई यांना दादोजी कोंडदेवाबरोबर पाठविले ही एक काल्पनिक माहीती आहे. अर्थात ती चुकीची आहे."
             वा.सी.बेंद्रे यांनी इ.स.१६४४ मध्ये मुहम्मद अदिलशहाने दादोजी कोंडदेवाचा एक हात कापल्याचे नमुद केले आहे. रा.व्य.जोशी देखील यांनी देखील आपल्या "परकियांच्या द्रुष्टीतून शिवाजी" या पुस्तकात "मुघल दरबारच्या एका कागदामध्ये दादोजीचा एक हात अदिलशाहने तोडल्याची बातमी आहे." असे लिहिले आहे.यावरून इ.स.१६४४ पासून त्याच्या म्रुत्युपर्यंत म्हणजेच इ.स.१६४७ पर्यंत दादोजीला एकच हात आहे. दादोजी शस्त्रकौश्यल्यासाठी प्रसिद्ध असल्याची समकालीन साधनांमध्ये एकही नोंद नाही. त्यातही एक हात तुटलेल्या अवस्थेमध्ये दादोजीने शिवरायांना शस्त्रास्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देणे अशक्यप्राय गोष्ट आहे.
              गो.ग.सरदेसाई यांच्यासारख्या बरेच इतिहासकार शिवरायांच्या सुरुवातीच्या काळातील किल्ले जिंकणे व स्वराज्य स्थापनेचे श्रेय दादोजी कोंडदेव ला देतात. सरदेसाईंचे असे मत होते की, "इ.स.१६४४ मध्ये कोंडाणा प्रांत व किल्ला दादोजीने हस्तगत केला तसेच दादोजीच्या मदतीने शिवाजीने तोरणा, रायगड, सिंहगड इत्यादी किल्ले घेतले. या गॊष्टीसाठी ते विजपुरहून सुटलेल्या फ़र्मानाचा दाखला देतात". पण ज्या फ़र्मानाचा ते उल्लेख करतात त्या फ़र्मानाचा आणि दादोजीने किल्ले घेतण्याचा संबंधच नाही. शाहजीवर अदिलशहाने बंडखोरीचा आरोप केला त्यासंदर्भात ते फ़र्मान आहे. फ़र्मान १ ऑगस्ट १६४४ चे असून कान्होजी जेधे याला उद्देशून आहे. सेतु माधवराव पगडी म्हणतात की, "सत्य हे आहे की, दादोजीच्या म्रुत्युनंतरच शिवाजीने किल्ले घेऊन स्वराज्यस्थापनेला सुरुवात केली". श्री ग.ह.खरे म्हणतात, "जेधे करीण्यात राजगडाविषयी माहीती आली आहे, ती कालप्रसंग अचुक असेल तर दादोजी चा म्रुत्यु झाल्यावरच शिवाजीने तोरणासह हा किल्ला जिर्णोद्धार करण्याचे काम चालविले होते असे ठरते". सभासद बखरीत देखील असाच उल्लेख आहे, "दादोजी कोंडदेवच्या म्रुत्युनंतरच शिवाजीराजांनी किल्ले जिंकण्यास सुरुवात केली". सेतु माधवराव पगडी म्हणतात, "महाराजांच्या स्वराज्यस्थापनेचा उपक्रम काही इतिहासकार इ.स.१६४४ पर्यंत मागे नेतात. पण त्याला आधार नाही. स्वराज्यस्थापनेच्या उपक्रमाची सुरुवात दादोजी कोंडदेवाच्या म्रुत्युनंतरच झाली आहे". यामुळे शिवरायांच्या स्वराज्यस्थापनेच्या कार्यात दादोजीचा काडीमात्र संबंध नसल्याचे निदर्शनास येते.
          राष्ट्रपिता महात्मा फ़ुले  शिवाजीमहाराजांच्या पोवाड्यात दादोजी व शिवाजीराजे यांच्या संबंधाविषयी वर्णन करतात. मासा पाणी खेळे गुरु कोण असे त्याचा । पोवाडा गातो शिवाजीचा ॥. शिवछत्रपतींचे कर्तृत्व हे त्यांचे स्वतः चे होते, त्याचे श्रेय दादोजीला द्यायला ज्योतिबा तयार नव्हते. या पोवाड्यातून महात्मा फ़ुलेंनी दादोजी हा शिवरायांचे गुरु नसल्याचेच प्रतिपादन केले आहे. कोल्हापूरचे इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनीही "उपलब्ध ऐतिहासिक दस्ता-ऐवजांवरून असे दिसते की कुठलाही पुरावा नसतांना दादोजी कोडदेव ह्यांना काही इतिहासकारांनी गुरु असल्याचे जाणीव पूर्वक घुसविले आहे" असे म्हणुन वरील सर्व मतांना पुष्टी दिलेली आहे.
          सर्व प्रख्यात विचारवंत आणि इतिहास संशोधकांनी दादू कोंडदेवचे गुरुत्व नाकारणे तसेच शिवरायांच्या समकालीन साधनांमध्ये दादू कोंडदेवचा साधा उल्लेखही नसने या दाव्यावरून हेच लक्षात येते की दादोजी कोंडदेव शिवरायांचा गुरु किंवा शिक्षक नव्हता. तसेच दादोजी कोंडदेव यांचा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेशी दुरान्वयानेही संबंध नाही हे सुर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे. समकालीन ग्रंथामध्ये दादोजी कोंडदेव चे नाव देखील नसताना, दादोजी कोंडदेव शिवरायांचा गुरु असण्यासंबंधीचा एकही ऐतिहासिक पुरावा नसताना दादोजी कोंडदेव शिवरायांचा गुरु म्हणुन सांबोधणारे आधुनिक इतिहासकार दादोजी शाहजीराजांचा नोकर होता ही गोष्ट कसे काय विसरले हेही एक आश्चर्य आहे. तसेच जिजाऊमातांच्या देखरेखीखाली प्रशिक्षित होऊन शिवरायांनी स्वयंप्रयत्नाने आणि मात्रुप्रेरणेने स्वराज्य स्थापन केले. या स्वराज्यासाठी शुर मावळ्यांनी स्वत:चे रक्त सांडले. अशा या शुर मावळ्यांनी रक्त सांडून स्थापन केलेल्या शिवरायांच्या स्वराज्यस्थापनेच्या अद्वितीय पराक्रमाचे श्रेय शाहजीराजांचा एका नोकर असलेल्या दादोजी कोंडदेवला देणे हे अनाकलनीय तथा चुकीचे आहे तसेच इतिहासाशी अप्रामाणिकता दर्शवणारे आहे.
जय शिवराय जयोस्तु स्वराज्य
संदर्भ :
छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचिकित्सक चरित्र,(पुर्वार्ध) प्रथमाव्रुत्ती १ मे १९७२. [वा.सी.बेंद्रे].
परकियांच्या द्रुष्टीतून शिवाजी [रा.व्य.जोशी].
शिवराय : संस्कार आणि शिक्षण (पृष्ट क्र. ३८) [डॉ.आ.ह.साळूंखे]
श्री राजा शिवछत्रपती,खंड १ भाग १,पूर्वोक्त (पृष्ट क्र.६०५ व ६०९ वरील तळटिप क्र ५४)[गजानन भास्कर मेहंदळे].
सभासद बखर (संपादक-दत्ता भगत).
स्वराज्यातील तीन दुर्ग [श्री ग.ह.खरे].
शिवचरित्र एक अभ्यास [सेतु माधवराव पगडी].
शिवरायांचे प्रेरणास्त्रोत आणि खरे स्वराज्यद्रोही [चंद्रशेखर शिखरे].
महात्मा फ़ुलेंक्रुत शिवाजींचा पोवाडा [महात्मा फ़ुले समग्र वाङमय,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्क्रुती मंडळ,आव्रुत्ती ५ वी].
मराठी व्रुत्तपत्रे ("लोकसत्ता" ,लेख : "दादोजी,शिवाजी महाराज आणि सत्य" राजा पिंपरखेडकर लिखीत  मध्ये ३१ ऑगस्ट २०१४ )

40 प्रतिक्रिया :

  1. अप्रतिम लेख काय बोलावे अत्यंत मुद्देशीर आणि अभ्यासिक लेख आहे.अगदीच सडेतोड आणि निर्लपबुद्धीचे लेखन उदाहरण आहे हे.खंडण करावे तर असे सत्य हि बाहेर येईल आणि कोणी पक्षपाताचे अरोपही करू नयेत.खुप छान मी दादोजी कोंडदेव आणि रामदास स्वामींवर अनेक लेख बाचले काही गुरु म्हणून तर काही त्याचे खंडण संबंधीत पण असा लेख वाचला नाही खुप छान धन्यवाद संदेह दुर केल्या बद्दल.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद विरेंद्रकुमार शिवरायांचे गुरुत्वाचा वाद खुप मोठा केला होता आणि सामान्यांचा गोंधळ होत होता नेमके खरं काय आहे ? म्हणून थोडासा प्रयत्न

      Delete
    2. श्री.अभिजीत पाटील tumhi itihaskar ka ? itihasat paas zalat ka kadhi ?

      Delete
    3. इतिहासकार नाही इतिहासअभ्यासक आहे.सत्य मांडण्याचा अधिकार फ़क्त इतिहासकारांनाच आहे का ?

      Delete
  2. खुप छान खंडन केले आहे इतिहासामधील अनाऐतिहासिक गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत.त्यासाठी इतिहासाचे पुनर्लेखन झाले पाहिजे.भविष्यातील वाद मिटवण्यासाठी इतिहासातील वाद मिटणे आवश्यक आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. खरं आहे विजया धन्यवाद प्रतिक्रिया साठी.

      Delete
  3. दादोजी कोंडदेव भलेही शिवरायांचे गुरु नसावेत पण चांगले साथीदार होते त्यांचे काहीतरी कार्य असणारच स्वराज्यासाठी.केळुस्कर गुरुजी यांनीही म्हंटले आहे की दादोजी कोंडदेव हुशार व इमानदार नोकर होते. त्यांना एकेरी भाषेत दादू म्हणने कितपत योग्य आहे ? हा महाराजांचा अपमान नव्हे काय ? बिग्रेड वाले तर खालच्या थरावर उल्लेख करतात आमच्या महापुरुषांचा ते राष्ट्रिय महापुरुष असताना हे योग्य आहे काय ?

    ReplyDelete
    Replies
    1. त्याचा कारभार शाहाजी महाराजांच्या नोकरीतील सुभेदार या नात्याने दादोजी कोंडदेव पाहात असे.
      यातील ‘शाहाजी महाराजांच्या नोकरीतील सुभेदार’ हे पूर्णत: खोटे व बनावट असून लेखकाची मखलाशी आहे. इतिहास असे सांगतो की, दादोजी कोंडदेवाने कारकून म्हणून आदिलशाहीची नोकरी पत्करली, नंतर तो हवालदार झाला, त्यानंतर सुभेदार होऊन अखेरच्या श्वासापर्यंत त्याने आदिलशाहीची चाकरी केलेली आहे. त्यास सुभेदार करण्याचा अधिकार शाहाजी राजांचा नसून आदिलशाहाचा होता. येथे एक बाब स्पष्टपणे लक्षात घेतली पाहिजे की, सन १६३२ ते १६३६ अखेर शाहाजीराजे हे निजामशाहाचे पूर्ण अखत्यार होते तर दादोजी कोंडदेव हा आदिलशाहीचा चाकर होता. म्हणजे शाहाजीराजे ज्यांच्या विरुद्ध लढा देत होते त्या शत्रुपक्षाचे कारकून दादोजी कोंडदेव होते. अशा शत्रुपक्षातील माणूस शाहाजी महाराजांच्या नोकरीतील सुभेदार होता असे म्हणणे हास्यास्पद आहे.

      Delete
  4. पाटील दादु कोंडदेव,कुलकर्णी आणी मलठणकर हे एकच आहेत की अनेक म्हणजे बर्याच ब्रिगेड च्या लोकांचे वाचले की दोदोजी कोंडदेव आणि कुलकर्णी एकच होते पण शिवरायांच्या पदरी होता तो मलठणकर कोणी तरी गोचिवडे होता.काय खरं आहे आणी दादू कोंडदेव हा शिवरायांचा विरोधक होता स्वराज्य द्रोही होता असं मी वाचले आहे काय खरं आहे त्यावर एकादा लेख लिहा.आजपर्यंत एका स्वराज्य विरोधकाला गुरु बनवण्याचा भ्याडपणा ब्राह्मणांक्डून झाला आहे त्याचा उजेडात आणा.

    ReplyDelete
    Replies
    1. इतिहास तज्ञ वा.सी.बेंद्रे लिहितात "शिवाजी राजे पुण्यात आपल्या बापाच्या जहागिरिवर आले तेंव्हा ते लहान म्हणजे १३ वर्षाचे होते.त्यांच्या संरक्षणार्थ व दिमतीस दिलेली मंडळी जुन्या जमान्यातील होती.त्यांमुळे त्यांच्या तरूण रक्तात हिंदवी स्वातंत्राबद्दल किंवा स्वराज्य बद्दल उसळणार्या भावनांना दादोजी कोंडदेव प्रभुतिंच्या मार्गदर्शत्वाखाली दाबून ठेवणे त्यांस भाग होते.या कल्पनेला मुर्त स्वरुप देण्याच्या उद्योगाला दादोजी कोंडदेवाचा साहजिकच विरोध होता." असे सांगुन दादोजी कोंडदेवाच्या निधनानंतरच शिवरायांनी दुर्गम गड घ्यायला सुरुवात झाली.साभासद बखरीत सुद्धा दादोजी कोंडदेवाच्या निधनानंतरच शिवाजी राजांनी किल्ले जिंकण्याच्या उद्योगास सुरुवात केल्याचा उल्लेख आहे.सेतु माधवराव पगडींनी सुद्धा वरील मुद्द्याला स्पुष्टी दिलेली आहे.मराठ्यांचा इतिहासकार ग्रॅंट डफ़ लिहितो, "जे समयी शिवाजी किल्ला बांधावयास लागला तेंव्हापासुन दादोजी कोंडदेव याने वारंवार हितोपदेश केला की अशाने सर्व कुळ बुडेल.शिवाजीने मान्य केले असे दाखवले.जेंव्हा दादोजी असे समजला की हा स्वत:च्याच मनाप्रमाणे वागेल माझे ऐकणार नाही" असे त्याच्या (दादोजीच्या ) मनात येतात त्याला अत्यंत चिंता लागली आणि वार्धक्यामुळे दुखणे लागले, तेणे करून तो मरणोन्मुख झाला."

      Delete
  5. असे विषय काढून काहीही फ़ायदा नाही आपण एक होणे काळाची गरज आहे पाटील साहेब.एकमेकांना दुषणे देत किती दिवस राहणार आहोत ? मला या दादोजी किंवा समर्थाच्या गुरुत्वाविषयी काही देणं घेणं नाही आमची निष्टा हिंदुत्वाशी आणि शिवरायांच्या चरणी अर्पण आहे.दादोजी कोंडदेव किंवा रामदास स्वामी शिवरायांचे गुरु म्हणून सिद्ध झाले तरी आमच्या समस्या संपणार नाही मग असल्या चर्चेतून आपलीच ताकत वाया का घालवायची ?विचार करा आपण भांडणे लावण्यात किंवा करण्यात वेळ वाया घालवतोय.एकत्र या एक व्हा.

    ReplyDelete
    Replies
    1. अमित देशपांडेSaturday, 30 January, 2016

      जातीपातीत भेदभाव न करणाऱ्या छत्रपतींना जातीच्या राजकारणात अडकवू नका. संभाजी ब्रिगेडने छत्रपती संभाजी महाराजांचं नाव वापरू नये, त्यांची तेवढी लायकीही नाहीये. बाहेरील जेम्स लेन सारख्या लेखकांमुळे आपापसात कशाला लढायचं? महाराज आम्हाला माफ करा, तुम्हालाही स्वकीयांविरूद्धच अधिक लढाव लागलं अन आजही तेच घडतंय. इतिहासातून आम्ही काही शिकलो नाही. तुमचा पुतळा प्रत्येक चौकात आहे पण रक्तात कुणाच्या तुम्ही उतरलाच नाहीत.माफ करा, राजे! माफ करा आम्हाला

      Delete
  6. आदेश अंतुलेWednesday, 13 January, 2016

    खुप मस्त लेख.दादू कोंडदेवाच्या प्रकरणात तथाकथित शिवभक्तांची खरी ओळख पटली जी शिवसेना जी शिवाजी या नावावर दुकानदारी करते त्या शिवसेनेने लेनचा कधीत निषेद केला नाही पण दादूचा पुतळा काढल्यावर शिवभक्तांचा निषेद केला यावरून ती शिवसेना आहे की दादूसेना हे एकदा समोर आले.एकाही हिंदुत्ववादी संघटनेने लेनचे निषेद केला नाही.यावरून हिंदुत्ववाद्यांना निव्वळ शिवरायांचा वापर करायच आहे बाकी काही नाही.

    ReplyDelete
  7. संभाजी ब्रिगेडने दादोजी कोंडदेवांचा पुतळा काढून काय पराक्रम केला ? उलट त्यांनी लेनला खरे ठरवले लेनने जेवढा अपमान केला त्याच्यापेक्षा जास्त ब्रिगेड ने केला आहे गावभर बोंबाबोंब करून त्याला आळा घाला आधी आणि वैचारीक वाद घालणारे भांडारकवर हल्ला करून सरकारचे नुकसान करून यांनी काय मर्दमुकी गाजवली ते सगळ्या जगाला माहीत आहे.तोडफ़ोडीमध्ये ब्रिगेड चा हातखंडा आहे हीच त्यांची खरी ओळख आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. यामध्ये काहीही वाईट झालेले नाही.दादोजीचा पुतळा काढणे म्हणजे काही पराक्रम नव्हताच ते होते शिवभक्तांचे कर्तव्य.मुळात संभाजी ब्रिगेड फ़क्त निषेद नोंदवायला गेली होती नुकसान करायला नाही नाहीतर ७२ मावळे जायची गरजच नव्हती ७० मावळ्यांना घरी बसवून २ मावळे २ लिटर पेट्रोल घेऊन गेले असते तरी काम झाले असते.पण ब्रिगेड तिथे निषेद करायला गेले होते.विषेश बाब म्हणजे हल्ला (?) करून मावळे पळाले नाहीत तर तिथेच जिजाऊ-शिवरायांचा जयघोष करत राहिले कारण ते होते शिवबाचे मर्द मावळे होते, भाड्याचे टट्टु नव्हते हल्ला करून पळ काढायला हा निश्चितच पराक्रम आहे.खर तर तुम्ही दादोजीचा पुतळा काढणार्यांचे आभार मानले पाहिजेत कारण पुतळा काढला तेंव्हा पंचवीस-तीस बहुजन संघटना रस्त्यावर आल्या होत्या.प्रत्येक संघटनेच्या थोड्या जरी कार्यकर्त्यांनी मनात आणलं असतं तर एकही पेठ शिल्लक राहिली नसती पण त्यांनी लोकशाहीनुसार (म्हणून बाबासाहेबांचे पण आभार माना) आंदोलन केले

      Delete
    2. कमाल आहे तुम्ही त्या संभाजी ब्रिगेडच्या आक्रमक हल्ल्याचे समर्थन करताय ? अहो प्रत्येक विचारांना उतर विचारांतच द्यायचे आहे साहेब हे संभाजी ब्रिगेडला कसं सांगणार ? त्यांनी पत्रके वाटून जगभर बदनामी केली आहे माता जिजाउंची.हे तुम्ही दुर्लक्षित करताय का ?

      Delete
    3. अमित देशपांडेThursday, 14 January, 2016

      तुम्ही काहीपण लिहा प्रचार करा आजही आम्हाला दादोजीं पुज्य आहेत त्यांच्या विषयी तेवढाच आदर आहे आणि शेवटपर्यंत राहनार
      जय दादोजी जय परशुराम

      Delete
    4. @ प्रकाश कुलकर्णी पहिला मुद्दा संभाजी ब्रिगेड च्या या कार्याला पुर्ण समर्थन आहे कारण विचारांचे उत्तर विचारांनीच द्यावे पण विक्रुती ठेचावीच लागते.संभाजी ब्रिगेडने जिजाउंचा अपमान केला पत्रकं छापून असं म्हणणं तर मुर्खपणाचं आहे.म्हणजे "अन्याय करून त्याच व्यक्तीला बोलायचे की कुठे बोलु नको नाहीतर तुझाच अपमान होईल" असं आहे.ब्रिगेडने पत्रकं काढली म्हनून तर मला समजले ना भट-भिक्षुकांचे उपद्व्याप त्यांचे आभारच मानतो मी.

      Delete
    5. @ अमित देशपांडे मग अफ़जलखानाला मानणार्या मुस्लिमांविरोधात मुग गिळा आम्ही बघून घेतो काय करायचं ते.

      Delete
    6. अनिकेत घोलपFriday, 15 January, 2016

      सर्व कष्टकरी, आदिवासी, कुणबी या आंदोलनात आहेत. जिजामाता व छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे दैवत आहे. त्यांची बदनामी आम्ही खपवून घेणार नाही. शिवाजी महाराजांनी मच्छीमारांना आरमार मिळवून दिले, तर आदिवासी, कातकऱ्यांना राजा केले. त्यामुळे शिवाजी महाराज हे एका जातीची मक्तेदारी नाही. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलविण्याच्या माध्यमातून अन्यायाच्या लढाईची ही सुरवात होती.

      Delete
    7. रमेश भंडारीFriday, 15 January, 2016

      जातीजातीत फूट पाडून काहीही साध्या होणार नाही आहे. मराठा आणि ब्राह्मण एकत्र आले तेव्हाच मराठेशाहीचे झेंडे अटकेपार लागले. काही रिकामटेकड्या लोकांना उद्योग नसल्यामुळे ते इतिहास "लिहीत" बसतात. इतिहास हा लिहायचा नसतो, तर "घडवायचा" असतो

      Delete
  8. दादोजी कोंडदेव छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते, असा कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही

    ReplyDelete
  9. आमचे शेजारी बाजीराव कुलकर्णी मला एकदा म्हणाले "कुत्राचा पुतळा काढला तर दुसर्या दिवशी पुन्हा बसविला पण आमच्या दादोजींचा पुतळा काढला तो अजुन बसवला नाही म्हणजे आमच्या दादोजींपेक्षा कुत्रा..." असे म्हंटले आणि ढसा ढसा रडायला लागले.मी सांत्वन केले अहो बुवा तुम्ही असे मुळीच समजु नका की दादोजींपेक्षा कुत्र्याला जास्त किंमत होती. दोदोजी काय नी कुत्रा काय दोन्ही आम्हा शिवभक्तांना समानच आम्ही जातीभेद करत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. प्रिया जोशी-देशपांडेFriday, 15 January, 2016

      मराठे ब्राह्मण द्वेष कधी सोडणार कुणास ठाऊक? आता समस्त ब्राह्मणांना बहुदा देशाबाहेर जावे लागेल.

      Delete
    2. सत्य सांगणे म्हणजे द्वेष नव्हे.साप चावेल सावध रहा असे म्हणने म्हणजे सापाचा द्वेष करणे नव्हे.लक्षात घ्या प्रियाजी.

      Delete
    3. अमित देशपांडेSaturday, 30 January, 2016

      दादोजी कोंडदेव हा ब्राह्मण होता हे आज या वादानंतरच कळले.पण शिवाजी,दादोजी,बाजीप्रभू, मालुसरे,येसाजी याना जात नव्हती म्हणून शिवाजी छत्रपती झाले हे या पाटीलना कसे कळणार.यामुळेच पाटीलकी पण गेली.यांनी महाराजांचे/दादोजींचे नाव सूद्धा घेऊ नये. मी प्रथम शिवरायांचा मग ब्राम्हण.याचाही गर्व आहे.

      Delete
  10. संभाजी ब्रिगेड रुपी "ॲन्टीव्हायरस" ने शिवचरित्र रुपी "संगणकातील" दादू आणि रामदास रुपी अतिभयानक "व्हायरस" कायमचे काढून टाकून संगणक क्लिन रुपी "स्वच्छ" केल्याबद्दल आम्ही थॅंक्स रुपी "आभार मानतो." इथुन पुढे हे महत्कार्य करत रहा.

    ReplyDelete
  11. बर भलेही दादोजींना ब्राह्मण गुरु नाही मानोत पण एका चाकरासाठी एक पुस्तक लिहितात म्हणजे यांच्यासाठी तो किती महत्वाचा होता हे सिद्ध होते.दादोजीने उदत्तीकरण केले जात आहे आज ते थाबवणे गरजेचे आहे.

    ReplyDelete
  12. समीर रमजानFriday, 15 January, 2016

    लढा मराठा विरुद्ध ब्राह्मण असा नाही
    "लाल महालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा काढण्याचा हा लढा मराठा विरुद्ध ब्राह्मण असा नाही. दादोजींच्या नावाने अभिजन वर्गात शंभर वर्षांपासून कुजबूज होती. या पार्श्‍वभूमीवर हा पुतळा काढलाच पाहिजे. महापालिकेने पुतळा काढण्याचा निर्णय घेतल्याने दलित, आदिवासी, मच्छीमार, कातकरी या सर्वांसह या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांचा विजय झाला आहे, : बी.जी.कोळसे-पाटील.

    ReplyDelete
  13. प्रिया जोशी-देशपांडेFriday, 15 January, 2016

    दादोजी कोंडदेव छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते असे जर सिद्ध होत असेल तर त्यांचा सत्कारच करायला हवा

    ReplyDelete
    Replies
    1. जर तर ला इतिहासात स्थान नसते.तरीपण दादू कोंडदेव शिवरायांचे गुरु असते तर नक्कीच आदर दिला आणी सत्कार केला असता.पण सध्या तरी तशी काही योजना नाही.

      Delete
  14. प्रथमेश गायकवाडFriday, 15 January, 2016

    हा लढा ब्राम्हणी प्रवृत्ती विरुध्द आहे. समाजातले जे चांगले यशस्वी ते आम्ही आमच्या मुळेच आणि जे कुरूप आणि पराभूत ते बाकीची जनता ह्या वृत्तीला ठेचण्याची वेळ आली आहे. डॉ भटकर ब्राम्हण नाहीत हे समजल्यावर बर्याच लोकांना धक्का बसला होता. केवळ १० वर्षापूर्वी. अब्राम्हण सुपर कॉम्पुटरचा निर्माता? छे. डॉ आंबेडकर हे विद्वान गृहस्थ होते हे मान्य करायला ही वृत्ती आजही तयार नाही.

    ReplyDelete
  15. अमित देशपांडेSaturday, 30 January, 2016

    राजा शिवाजी प्रमाणे न्यायी राजा गेल्या ३५० वर्षात महाराष्ट्राला लाभला नाही. आपण स्वतः न्यायाधीश. भारताचा, महाराष्ट्राचा इतिहास आपणाला ज्ञात आहे - जेम्स लेन सारखा जेंव्हा एखादे पुस्तक लिहितो तेंव्हा ते शब्द बनतात आणि येणाऱ्या युगान्वरती ते पसरतात. त्या शब्दांना मिटवू शकतात ते शब्दच. दादोजींचा पुतळा उखाडण्यापेक्षा जेम्स लेनचे शब्द नामोशेष होतील असे प्रतीपुस्तक तुम्ही का लिहित नाही? शब्दाला शब्द, पुस्तकाला पुस्तक, डोळ्याला डोळा, तलवारीला तलवार

    ReplyDelete
  16. *** प्रबोधन ***

    काही धुर्तांनी लपवीला l खरा इतिहास
    खोटा इतिहास l लिहून काढीला ll

    जिजाऊ माता l होती सक्षम
    तिनेच शिक्षण l शिवबास दिले ll

    जाधवांची लेक l जिजाऊ होती
    युद्ध नीति l ती जाणे ll

    हे मात्र l पाखंडीने लपविले
    दादोजीस केले l शिवाजीचा गुरू ll

    औरंगजेब चा वकील l कृष्णा भास्कर कुलकर्णी
    जखम तयांनी l शिवरायांस केली ll

    हे मात्र लोकांस l ना दावीले
    भलतेच लिहले l काही चांडाळांनी ll

    काही ब्राह्मण मंत्र्यांनी l शिवाजीस मारले
    विष दिले l इतिहासकार "डफ" म्हणतो ll

    राज्यभिषेकास केला l ब्राह्मणांनी विरोध
    इतिहासात नोंद l आपण पाहावी ll

    " अनिल " म्हणे l पाहा खरा इतिहास
    ब्राह्मनी इतिहासास l चूड लावा ll

    *** Anil Vikram Jadhav ( ओमान - दुबई )

    ReplyDelete
  17. *** प्रबोधन ***

    काही धुर्तांनी लपवीला l खरा इतिहास
    खोटा इतिहास l लिहून काढीला ll

    जिजाऊ माता l होती सक्षम
    तिनेच शिक्षण l शिवबास दिले ll

    जाधवांची लेक l जिजाऊ होती
    युद्ध नीति l ती जाणे ll

    हे मात्र l पाखंडीने लपविले
    दादोजीस केले l शिवाजीचा गुरू ll

    औरंगजेब चा वकील l कृष्णा भास्कर कुलकर्णी
    जखम तयांनी l शिवरायांस केली ll

    हे मात्र लोकांस l ना दावीले
    भलतेच लिहले l काही चांडाळांनी ll

    काही ब्राह्मण मंत्र्यांनी l शिवाजीस मारले
    विष दिले l इतिहासकार "डफ" म्हणतो ll

    राज्यभिषेकास केला l ब्राह्मणांनी विरोध
    इतिहासात नोंद l आपण पाहावी ll

    " अनिल " म्हणे l पाहा खरा इतिहास
    ब्राह्मनी इतिहासास l चूड लावा ll

    *** Anil Vikram Jadhav ( ओमान - दुबई )

    ReplyDelete
  18. patil asale lekh lihun satya zakat yet nahi Dadoji he shivrayanche guru hote he satya aahe aani tyache puraave uplabdha aahet, aani saglyat mahatvacha mhanje kombda zakla mhanje surya ugvaycha rahat nahi tevha asale kevilvaane prayatna Karun swatahacha hasu Karun gheu naka, ajun khup abhyas karaycha aahe tumhala, tya purshya khedekar che pivali pustaka vachun swatahala itihisacha abhyasak samjna he hasyaspadach nahi tar murkhapanaacha aahe. aso tumhala kaay kalnaar mhana murkhashi vaad ghalana mhanje swatahala tyachya shrenit neun basavna aahe, mala tumchya saarkhyachya shrenit yaycha naahi tumhi murkha zalat mhanun mala itka khali utarna jamnaar nahi. liha ajun khota liha aani jati patincha raajkaran kara.

    ReplyDelete
  19. http://chatrapatishivajimaharaj.blogspot.in/2010/12/blog-post_27.html?m=1

    ReplyDelete
  20. सिलींबकर देशमुख प्रकरण - १६३८ साली सिलींबकर देशमुख घराण्यात वारसा हक्का बद्दल मलिक अंबरच्या आधीपासून भांडणे व खुणाखुनी चालू होती. १६३८ ला दादाजी कोंडदेव यांनी सिलीमकरांच्या बाजूने न्याय निवडा केला होता.. परंतु दुसऱ्या एका करीन्यातील संदर्भानुसार..तसेच दादाजी कोंडदेव ह्यांचा निकाल शिवाजी महाराजांनी १६५७ ला फिरवला ह्या दोन्ही संदर्भावरून दादाजींनी चुकीचा न्याय निवडा केला होता असे आढळून येते...
    फुलाजी नाईक व बाजी मौजे भिडगावने येथे उतरले. तो सिलीमकर पळून गेले. त्यावर फुलाजी नाईकांनी आपले वर्तमान दादाजी पंतांकडे विदित केले, सिलीमकरांनी माझ्या वडिलाच मारा करून माझे वतन घेतले आहे, ते मला परत मिळावे असे दादाजी पंतांकडे मागणी केली. दादाजी पंतांनी सिलीमकरांना बोलावून चौकशी केली. व शेवटी निम्मे निम्मे वतन वाटून खाणे असा उपाय सुचवला.. पण फुलोजी नाईकांनी ह्याला स्पष्ट नकार दिला. त्या वेळी दादाजी पंतांनी मध्यस्थी टाकून फुलोजीला वळवण्याचा प्रयत्न केला. पण फुलोजी माघार घेण्यास तयार झाला नाही. ह्या वेळेस सिलीमकरांनी दादाजी पंतांना गैरवाका समजावून लाच दिल्हा. त्यावरून दादाजींनी सिलीमकरांचे अगत्य धरून फुलोजीस न्हेऊन बासाचा मार देऊन जीवे मारिले - (अर्थात ह्या अन्याय कारक न्याय निवाड्याची पुष्टी १६५७ ला शिवाजी महाराजांनी केलेल्या न्याय निवाड्या नुसार दादाजींचा निवडा रद्द बातल ठरवून हबाजी व बालाजी नाईकांना ते वतन परत मिळवून दिले..)

    ReplyDelete
  21. शाहाजी महाराजांनी दादोजी कोंडदेवाची नेमणूक केलेली होती.हे पूर्णत: चूक आहे. शाहाजी राजांनी दादोजी कोंडदेवाची आपल्या जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी नेमणूक केलेली नव्हती व नाही. शाहाजी महाराजांनी कोंडदेवाची नेमणूक केल्याचा एकही पुरावा नाही, तसा हुकूमनामा, पत्र नाही. दादोजी कोंडदेवाची नेमणूक विजापूरच्या आदिलशाहाने केलेली होती.
    इ.स. १६३६ नोव्हे./डिसें. तथा जाने. १६३७ मध्ये रणदुल्लाखानाच्या आश्रयाने सख्य झाल्यामुळे मुर्तुजा निजामशहास खानजमान याचे हवाली करून शिवनेरी, माहुलीसह शेवटचे सहा किल्ले आदिलशाहीकडे सोपवून शाहाजीराजे, जिजाऊ, संभाजीराजे, शिवाजीराजे यांचेसह विजापुरास पोहोचले, त्यावेळी दादोजी कोंडदेव हा शिवनेरीवर आदिलशाहीचा चाकर म्हणून पुढचे काम पाहण्यास पोहोचला होता. सन १६३७ मध्येच विजापुरी शिवाजी राजे व सईबाईसाहेब यांच्या विवाह झाल्यानंतर पुणे जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी त्यांनी शिवाजी राजे व जिजाऊ यांची नेमणूक करून त्यांना इतर कारकुनांसह सन १६३९ मध्ये पुण्यास पाठविले आहे. त्यावेळी दादोजी कोंडदेव विजापूरचा चाकर म्हणून विजापूरकरांसाठी पुणे परगण्याचा कारभार पाहात होता.

    ReplyDelete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.