14 February 2014

शिवजन्मोत्सव : १९ फ़ेब्रुवारी

        शिवरायांची आठवण तर उठता बसता, चालता फिरता, कायमस्वरुपी यायला हवी. पण जर एकाच दिवशी महान शिवजन्मोत्सव  करायचा असेल तर तो तारखेप्रमाणे केला पाहिजे. १९ फ़ेब्रुवारी ही तारीख अवघ्या जगभरात मान्य केली असताना हिंदुत्व वाद्यांच्या काही सडक्या कल्पनेने नासलेले काही लोक मात्र तिथी चा आग्रह धरतात. मुळात देशातला कोणताच व्यवहार हा तिथी प्रमाणे न होत तारखे प्रमाणे होतो. शाळा, कोलेज, न्यायालये, बाजारपेठा, संसद हे सगळे तारखेप्रमाणे चालतात आणि तारीख ही जगभरात इथुन-तिथुन एकच असते. म्हणजे तारखेप्रमाणे (१९ फ़ेब्रुवारी) जर शिवजयंती साजरी केली तर ती जगभरात साजरी होईल आणि सर्व मराठे एकत्र जमतील ही भीती सड्क्या डोक्याच्या उपटसुंभांना आहे म्हणुन त्यांनी तथाकथित हिंदूह्र्दयसम्राटांना  हाताशी  धरून  मराठ्यांत  फ़ुट  पाडण्यासाठी  आणि  शिवजयंती फ़क्त महाराष्ट्रापुरती मर्यादित करण्यासाठी तिथी चा आग्रह धरतात.कुठल्याही व्यक्तीला शिवजयंतीची तारीख विचारली तर तो १९ फ़ेब्रुवारी ही तारीख पटकन सांगू शकेल. पण तिथी कोण सांगु शकेल काय ? 
         छत्रपती शिवरायांच्या जन्मदिनाबाबतचा वाद गेली शंभर वर्ष आहे, शिवचरित्राच्या अनेक साधनांमधून साधारणत: दोन जन्मतिथी येतात.वैशख शके १५४९ म्हणजे एप्रिल१६२७ आणि फ़ाल्गुन शके १५५१म्हणजे फ़ेब्रुवारी १६३०. सर्वप्रथम १९०० मध्ये वि.का.राजवाडे यांनी बखरीच्या आधारे शके १५४९(१६२७) हा शक निश्चित केला.नंतर "जेधे शकावली"मिळाल्यावर शके १५५१शुक्ल संवत्सर, फ़ाल्गून वद्य त्रुतीया(१६३०) ही नवी तिथी उजेडात आली. जेधे शकावली हे मराठ्यांच्या इतिहासातील एक अस्सल साधन व अव्वल प्रतिचा ऐतिहासिक कागद मानल्याने या जन्मतिथीबद्दल विद्वानांत एकमत होऊ लागले.
              इ.स. १६२७(शके १५४९) ही जन्म तारीख पुढील साधनांच्या आधारे मानली गेली होती. [१]९१ कलमी बखर [२] मल्हार रामराव चिटणीस बखर [३] मराठी साम्राज्याची छोटी बखर [४] शिवदिग्विजय [५] श्री शिवप्रताप [६] पंत प्रतिनिधीची बखर इ.इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती अशी की, या बखरी व इतर साधने पेशवाई व उत्तर पेशवाईतील आहेत.
                इ.स.१६३०(शके १५५१) या तिथीचा आधार मुखत्वे जेधे शकावली, शिवभारत व शिवराम ज्योतिषी हा आहे.जेधे शकावली ही छत्रपतींच्या म्रुत्युनंतर १०-१५ वर्षांत लिहिण्यात आली आहे. शिवभारत हा काव्यग्रंथ छत्रपती शिवरायांच्या पदरी असणार्या परमानंद कवीने लिहिला आहे. तर शिवराम ज्योतिषी हा छत्रपती शिवरायांचा समकालीन होता.
             वरील सर्व मतमतांतरातून शिवजन्माची तिथी निश्चितीसाठी महाराष्ट्र राज्यशासनाने दत्तो वामन पोतदार, प्रा.न.र.फ़ाटक, डॉ.आप्पासाहेब पवार, ग.ह.खरे,बा.सी.बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांची "निर्णय समिती" १९६६ मध्ये नेमली. परंतू त्यातून तिथीनिश्चिती न झाल्याने इ.स.१६२७ ही तिथी चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. हा वाद २००१ पर्यंत चालला.शासनाने २००१मध्ये अध्यादेश काढून १९ फ़ेब्रुवारी १६३० ही जन्मतारीख निश्चित केली. या तारखेनंतर एक नवा वाद काही ब्राह्मणवादी मंडळींनी सुरु केला. त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरे, "कालनिर्णय" वाले जयंत साळगावकर, निनाद बेडेकर आदींचा समावेश आहे. या मंडळींच्या मते शिवजयंती ही इंग्रजी तारखेप्रमाणे साजरी न करता मराठी तिथीप्रमाणे करावी.तिथीप्रमाणे शिवजयंतीची तारीख सतत बदलत राहते. म्हणजे २००० साली शिवजयंती २३ मार्च ला होती तर २००१ ला १२ मार्च,२००२ ला ३१ मार्च, २००३ ला २० मार्च, २००४ ला ०९ मार्च आणि २००५ ला २८ मार्च रोजी.
             आता इथे एक प्रश्न तयार होतो तो असा की ,बाळ गंगाधर टिळक,हिंदुत्ववाद्यांचे प्रेरणास्थान विनायक सावरकर, गांधी, नेहरू अशा अनेकांची जयंती सर्वत्र  इंग्रजी तारखेप्रमाणे साजरी होते मग विश्ववंद्य छत्रपती शिवरायांची जयंती तिथीप्रमाणे का ?
              हिंदुंच्या  कालगणनेनुसार शिवजयंती व्हावी असा आग्रह हे लोक धरतात. परंतु  हिंदूंची  कालगणना  एक  नाही. भारतात  विक्रम संवत व शालीवाहन शक अशा दोन  कालगणना  हिंदुंच्या आहेत. यातही बोंब अशी की   या   कालगणनेमध्ये   भारतातच  अनेक  बदल  आहेत  .उदा. विक्रम संवतच्या  वर्षाची सुरुवात बंगाल व इतर प्रांतात चैत्र शुक्ल प्रतिपदा आहे. तर  गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात आषाढ शुद्ध प्रतिपदा आहे. तर शाहीवाहन शक महाराष्ट्रापेक्षा तामीळनाडूत एक वर्षाने  पुढे आहे. म्हणजे तामिळनाडूत  ३०० वी  शिवजयंती असेल  तर महाराष्ट्रात २९९ वी शिवजयंती असते.
                याचा अर्थ इतकाच की हिंदूंची म्हणून खात्रीपुर्वक सांगता येईल अशी सर्वमान्य कालगणना वापरात नाही. व्यवहारात सर्व सामान्य माणसे हिंदूंची कालगणना वापरत नाहीत तर इंग्रजी कालगणना वापरतात.जर तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करायची म्हंटले तर मागील वर्षी किती तारखेला जयंती झाली किंवा पुढील वर्षी  किती तारखेला जयंती येईल हे साळगांवकर सारख्या भटांच्या पंचांगाचा आधार घेतल्याशिवाय सांगता येणार नाही.
         आज शिवजयंती महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर आणि भारताबाहेरदेखील साजरी होत आहे. त्यामुळे शिवजयंती ही प्रतिवर्षी एकाच तारखेला शिस्तबद्धपणे साजरी होणे महत्वाचे आहे. काही ब्राह्मणवाद्यांना मात्र शिवजयंतीच्या माधमातून स्वत:चे स्वार्थी राजकारण राबवायचे आहे म्हणून ते इंग्रजी तारखेला विरोध करत असतात. तिथीच्या आग्रहामुळे शिवजयंती उत्सवात एकवाक्यता राहत नाही. ही गोष्ट छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्वास हानीकारक आहे. म्हणून १९ फ़ेब्रुवारी १६३० ही तारीख बरोबर आहे हे सत्य स्विकारून मोठ्या प्रमाणात शिवजयंती १९ फ़ेब्रुवारी रोजीच धुमधडाक्यात साजरी केली पाहिजे. शेवटी शिवभक्तांचा निर्णय हा अंतिम आहे. पुन्हा एकदा शिवभक्तांना विनंती कि छत्रपती शिवराय यांच्या दोन जयंत्या करुन राजांची थट्टा थांबवावी. छत्रपतींचा जन्मोत्सव जर जागतिक दर्जाचा बनवायचा असेल तर आपणास जगमान्य असलेल्या कॅलेंडर नुसार तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करावी लागेल. सर्व शिवभक्तांना पुन्हा एकदा आवाहन शिवजयंती हि तारखे प्रमाणेच करावी. 
जय जिजाऊ । जय शिवराय । जयोस्तु मराठा । जयोस्तु शिवराष्ट्र ॥

11 प्रतिक्रिया :

  1. मस्त लेख आहे साहेब बरोबर आहे शिवजयंती १९ लाच साजरी करायची ??

    ReplyDelete
    Replies
    1. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !!!

      Delete
  2. ज्योतिबा फुले यांनी रायगडावर जाऊन शिवरायांची समाधी शोधून काढली आणि शिवजयंतीची सुरवात केली हे आपले म्हणणे पटण्यासारखे नाही याचे कारण असे कि फुले यांनी आपल्या पोवाड्यात शिवराय घाबरत होते आणि दगलबाजी करून शूर अशा अफजलचा खून केला दादोजी कोंडदेव याने शिवरायांना मुद्दाम निरक्षर ठेवले समर्थ रामदास यांना लोकप्रीतीसाठी गुरु केले आणि शिवराय लुटारू होते आणि राज्याभिषेकाच्या निमित्ताने गागाभठ याने शिवरायकडून संपती लुटली म्हणजे एका लुटारूने दुसर्या लुटारूकडून लुटमार करण्यासारखी आहे असे म्हंटले आहे त्यामुळे फुले शिवजयंतीची सुरुवात करणे शक्यच नाही
    लोकमान्यना स्वराज्याची चळवळ लोकाभिमुख करावयाची होती त्यामुळे शिवराय हे आदर्श होते आणि त्यासाठी शिवजयंती सुरु केली आणि शिवजयंतीची तिथी नेमकी कोणती असावी यासाठी त्यांना नेमकी तिथीच्या माहितीची आवशकता होती
    आत्ता शिवजयंती तारखेप्रमाने का साजरी करायची तर ती जगभर साजरी व्हावी असा तुमचे दावा आहे पण हा चुकीचा आहे आत्ता दिवाळी जगभर साजरी होते एव्डेच काय बुद्धजयंती श्रीलंका चीन थायलंड इ देशात साजरी होते ती वैशाख पूर्णिमेला त्यामुळे ती तारखेप्रमणे साजरी केली तरच जगभर साजरी होईल हा आपला उक्तिवद चुकीचा आहे

    ReplyDelete
    Replies
    1. आपण म्हणत आहात ते सत्य असेल तर आमचे प्रामाणिक मत आहे की शिवचरित्रासारखा फ़ुलेंच्या साहित्यांचे पण संशोधन झाले पाहिजे.कारण बाळ टिळक किंवा सावरकर शिवरायांचा अपमान करतील हे आपण समजू शकतो पण कोणताही बहुजन शिवरायांचा अपमान करणार नाही.राहिली गोष्ठ निरक्षर म्हंटल्यची :: त्यावेळी काही पुरावे नव्हते पण आता उपलब्ध झाले आहेत.त्यावेळी उपलब्ध झाले असते तर फ़ुलेंनाच जास्त आनंद झाला असता कारण ते खरे शिवभक्त होते..
      लोकमान्य : टिळकांना लोकमान्य म्हणने म्हणजे लबाडी आहे त्यांनी असं लोकांसाठी काय केले जे त्यांना आपण लोकमान्य म्हणता..म्हणे युगपुरुष...तेल्या-तांबोळ्यांच्यावर टिकास्त्र सोडणारे लोकमान्य ? वेदोक्त प्रकरणामध्ये शिवरायांना आणि शाहूंना शुद्र म्हणून संबोधले यापेक्षा अपमान कोणी केला असेल का ???
      शिवजयंती : दरवर्षी वेगळ्या तारखेला कोण साजरा करतो का एखादा कार्यक्रम किंवा वाढदिवस ?? बुद्धजयंती इकडे ज्या तारखेला असते तीच तारीख धरून परदेशात साजरी केली झाले

      Delete
    2. छान माहीती

      Delete
  3. शिवजयंती कोणी सुरु केली त्यापेक्षा आपण मोठ्याने हा उत्सव साजरा करतो हे पुरे नाही का ??
    टीळकांनी उत्सव सुरु केला हे माहीत असताना मराठ्यांनी शिवजयंती साजरी केली नव्हती का ? की आता महात्मा फ़ुलेंनी सुरु केली म्हणून कोण ब्राह्मण साजरी करायचं थांबणार का ? नही मग वाद कशाला.
    सर्वांनी एकत्र येवून उत्सव साजरा करूया.तुम्ही तिथीनें करा आम्ही तारखेप्रमाणे करतो खरं तर आपल्या शिवरायांचे स्मरण करण्यासाठी एकच दिवस का ठरवावा ?
    ॥ जय शिवराय जय महाराष्ट्र ॥

    ReplyDelete
  4. इंद्र जिमि ज़ृंभ पर,बाडव सअन्भ पर
    रावण सदंभ पर,राघुकुलराज है!
    पवन बारिबाह पर ,संभु रतिनाह पर
    ज्यों सहसबाह पर ,राम द्विजराज है !
    दावा द्रुमदंड पर ,चीता मृग्झुन्द पर
    भूषण वितुण्ड पर, जैसे मृगराज है !
    तेज तमअंस पर, कन्ह जिमि कंस पर
    त्यों म्लेंच्छ बंस पर
    शेर शिवराज है ||
    शेर शिवराज है ||

    ReplyDelete
  5. 19 फ्रेबुवारी 1630 या दिवशी या क्रांतीसूर्याचा जन्म झाला. शिवबाच्या जन्माने साडेतीनशे वर्षांच्या काळ्याकुट्ट अशा मोगल, आदिलशहा, सिद्दी यांच्या जुलूमी राजवटीचा अस्त झाला. जिजाऊ ही शिवबाजी केवळ जन्मदात्री नव्हती तर त्यांची ती स्फूर्ती, प्रेरणा, मार्गदर्शिका व मायेची सावली होती. जिजाऊंचे पुत्रप्रेम अजोड होते, तर शिवरायांची मातृभक्ती अपरंपार होती. पराक्रमी व कर्तृत्वान अशा आदर्श मातेचे छत्र शिवरायांना लाभलं.

    ReplyDelete
  6. शिवभक्तांना दिशाहिन करण्यासाठी काही मंडळी शिवजयंती ही तिथी प्रमाणे साजरा करण्याबाबत आग्रह धरतात. या मध्ये त्यांचे शिवप्रेम नाही अस नाही पण ते छत्रपती शिवराय यांना पंचागामध्ये बंदिस्त करु इच्छीतात. जगाच्या पाठीवर पंचाग मानणारे प्रदेश किंवा देश किती आहेत ? माझ्या मते नेपाळ आणि भारत (यामध्ये सुध्दा बहुधर्मिय असल्याने 100 टक्के माणनारे नाहीत )हे हिंदू राष्ट्र संकल्पना जतन करणारे देश आहेत. त्यामुळे ते पंचाग मानतात. छत्रपती शिवराय हे जागतिक किर्तीचे महामानव होते. त्यांची किर्ती सर्व जगात पसरलेली आहे. शिवजयंती हि केव्हा साजरी करावी याबाबत जगाच्या पाठीवर परदेशात असणारे शिवभक्त यांना सतत संभ्रम निर्माण व्हावा. त्यांची एकजूट होवू नये यामुळेच शिवजयंती हि तिथीप्रमाणे करण्याबाबत आग्रह धरतात ही सत्य परिस्थीती आहे असे माझे मत आहे. शिवरायांनी 350 पेक्षा जास्त किल्ले बांधले , आरमार उभे केले परंतु केव्हांही पंचाग पाहिले नाही किंवा सत्य नारायण केला नाही. या शिवाय छत्रपती शिवराय यांची आई राजमाता जिजाऊ यांची जयंती देखील 12 जानेवारी ला साजरी केली जाते . शहाजी राजे यांची देखील इंग्रजी कॅलेंडर प्रमाणेच जयंती साजरी केली जाते. इंग्रजी कॅलेंडर हे जगमान्य आहे आणि छत्रपती शिवराय हे देखील जागतिक किर्तीचे राजे होते. त्यामुळे सर्व शिवभक्तांनी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी न करता तारीख प्रमाणेच म्हणजे 19 फेब्रुवारी ला करावी. आणि तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यास सांगणारे शिवभक्त हे ते मानत असलेल्या महामानवचा जन्म दिवस तिथीप्रमाणे का करत नाही ? याबाबत देखील त्यांना विचारावे म्हणजे त्यांना तेच योग्य उत्तर देतील . शेवटी शिवभक्तांचा निर्णय हा अंतिम आहे.पुन्हा एकदा शिवभक्तांना विनंती कि छत्रपती शिवराय यांच्या दोन जयंत्या करुन राजांची थट्टा थांबवावी. छत्रपतींचा जन्मोत्सव जर जागतिक दर्जाचा बनवायचा असेल तर आपणास जगमान्य असलेल्या कॅलेंडर नुसार तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करावी लागेल. सर्व शिवभक्तांना पुन्हा एकदा आवाहन शिवजयंती हि तारखे प्रमाणेच करावी .
    जय जिजाऊ...............जय शिवराय.

    ReplyDelete
  7. तिथि म्हणजे थोतांड >>
    चांद्रवर्ष प्रत्यक्षात ३५४ दिवसांचे असते. तर सुर्यवर्ष ३६५.२५ दिवसांचेअसते. चंद्रवर्ष व सुर्यवर्ष यात "३६५.२५ वजा ३५४ बरोबर ११.२५" असा ११.२५ दिवसांचा फरक पडतो. चांद्रवर्ष ३५४ ते ३६० दिवसांच्या दरम्यान बदलत असते. हा फरक भरून काढून चांद्रवर्ष सुर्यवर्शाशी जुळवन्यासाठी दर तिन-चार वर्षांनी अधिक महिना येतो.त्यावर्षी चांद्रवर्ष व सुर्यवर्ष ३६५ दिवसांचे असते. याप्रमाणे सुर्यवर्ष३६५ ...दिवसांचे मानले जाते.पण दर वर्षी ०.२५ दिवस शिल्लक राहतो. म्हणून दर चार
    वर्षांनी ०.२५ * ४ = १ दिवस, यानुसार लिप इयर येते. त्यावर्षी फेब्रुअरीमहिना २९ दिवसांचा असतो. यालाच अधिक महिना, लिप इयर म्हणतात. ते ३६६ दिवसांचे असते. यात वैद्यानिक व समन्वयाचा सबंध येतो. कुठेही धर्माचा सबंध नाही.मानवी जीवनाच्या विकासासाठी सरल साधे इंग्रजी कैलेंडरच आहे. तिथि, कैलेण्डर हा ब्रम्हानंचा रोजगाराचा व्यवसाय
    आहे. त्यानावे ब्राम्हण बहुजनान लुटतात.त्यासाठीच तिथीचा आग्रह धरला जातो. दुसरया महायुध्दानंतर १९४५ साली युनोची स्थापना झाली. त्यानुसार युनोचे सदस्य हे जवळ पास सर्वच जगभर झाले. त्यात जागतिक, राजकीय, वा वैद्यानिक
    घटनासाठी सामाइक महिना, कैलेंडर, वेळ, वर्ष सर्वच देशांनी वापरावे असा ठराव मंजूर झाला. स्टैंडडर्ड टाइम आयर्लंड येथील ग्रीनिच या ठिकाणी धरन्यात आली. त्यानुसार प्रतेक देशाने आपल्या देशातील घडयाले सुर्याच्या आणि पृथिविच्या तिशी जोडून घेतली. मोठ्या देशांनी आपल्या देशात तिन-तिन टाइम झोन केले. भारतात देशभर एकच वेळ धरली जाते. भारत सरकारने १९५७ मधे लोकसभेत कायदा मंजूर करुन देशातील सर्वच कारभार याच कालगणनेनुसार चालविन्यास मंजूरी दिली. त्याला जोड़ शालिवाहन शक आहे. अशा प्रकारे इंग्रजी कैलेंडर, वर्ष, महीने हे ख्रिश्चानांचे नसून सर्वांचे आहेत. भारतात शाला,ग्रामपंचायत यानुसारच चालतात. केवल धार्मिक कार्यक्रमात पंचांग वापरतात. एकंदरीत पंचांग ही गोस्ट थोतांड आहे.

    ReplyDelete
  8. महाराज राजश्रियाविराजीत सकळगुणमंडळीत राजनीतीधुरंदर प्रौढप्रतापपुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज कुळवाडीभूषण बहुजनप्रतिपालक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय

    ReplyDelete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.