10 October 2013

विश्ववंद्य छ.शिवरायांचे सांस्क्रुतीक धोरण

          कुळवाडीभूषण विश्ववंद्यछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा कधी हिंदू धर्मरक्षक, कधी महाराष्ट्र रक्षक,कधी मराठी भाषा रक्षक,कधी सांस्क्रुतीक रक्षक तर कधी मुस्लिम विरोधक अशा प्रकारे उभी करण्यात आली.पण शिवरायांच्या चरित्रासंबंधी ऐतिहासिक तथ्यांचा अभ्यास केला असता शिवरायांच्या वरील प्रतिमा अनैतिहासिक आणि शिवरायांना संकुचित ठरविणार्या आहेत,हे स्पष्ट होते.
शिवरायांना संस्क्रुतीचा जरूर अभिमान होता. पण कोणत्या संस्क्रुतीचा ? तर सिंधु संस्क्रुतीचा,परंपरेचा म्हणून महात्मा फ़ुले त्यांचे वर्णन "कुळवाडीभूषण" शिवराय असे करतात.कुळवाडीभूषण म्हणजे अठरापगड बारा बलुतेदार यांचा राजा,शेतकर्यांचा,रयतेचा राजा.सांस्क्रुतीक धोरणांमध्ये महत्वाचा भाग म्हणजे भाषा! शिवरायांना मराठीचा अभिमान होता याबाबत कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही.पण मराठीबद्द्ल आंधळा अभिमान त्यांच्याकडे नव्हता.मराठीच्या अभिमानापोटी इतर भाषांचा अनादर महाराजांची कधीच केला नाही.याउलट शिवरायांच्या पत्रात अरबी,पार्सी भाषेचा (शब्दांचा) त्यांनी मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे.याबाबत डॉ.प्र.न.देशपांडे त्यांच्या "शिवरायांची पत्रे" या ग्रंथातील प्रस्तावनेत लिहितात-शिवाजी महाराजांच्या कचेरीपत्रामध्ये प्रामुख्याने पुढील मायना आढळतो.अजरख्त खाने राजर्षी शिवाजीराजे दामदैलत हूं आणि पुढील अर्ध्या भागात बजानीखा कारखुनांनी हाल व इस्तकथाल देशमुखांनी अशा आशयाचा मजकूर येतो.अजरख्त खाने याचा अर्थ कचेरीपासुन असा असून ’दामदौलत हू” याचा अर्थ त्याचे राज्य चिरायु होवो,असा होतो.तर बजानीबु याचा अर्थ ’कडे’ असा असून "हाल" म्हणजे हल्लीचे आणि "इस्तकबाल" म्हणजे पुढे होणारे भावी असा आहे.(प्रुष्ठ क्र.१४) वरील अनेक शब्द पार्सी,अरबी आहेत.याचा अर्थ शिवरायांनी केवळ संस्क्रुत,मराठी याच भाषांचा कैवार घेतला आणि इतर भाषांचा द्वेष केला असे सिद्ध होत नाही.शिवरायांचे सांस्क्रुतीक धोरण हे भाषावादाचे नव्हते,तर जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर अनेक भाषा अवगत असल्या पाहिजेत अशाच स्वरूपाचे होते.शिवरायांचे पुत्र संभाजीराजेंनी तर एक संस्क्रुत आणि तीन हिंदी असे चार ग्रंथ लिहिले.म्हणजे शिवकाळात भाषावाद अस्तित्वात नव्हता.आजच्या राजकारण्यांनी राजकीय लाभासाठी भाषावाद उभा केलेला असून मराठी भाषेच्या अस्मितेचे प्रतिक म्हणून शिवरायांची प्रतिमा उभी केली जाते.शिवरायांचे सांस्क्रुतीक धोरण पाहता ही बाब अत्यंत खोटारडी आहे.
शिवाजी राजांचा पोषाख व राहणीमान पाहता सुफ़ी संतांच्या भारतातील वास्तव्याने बहुजन-मुस्लिम धर्मियांमध्ये मोठ्या प्रमाणावर सांस्क्रुतीक देवाण-घेवाण झाली.याबाबत इतिहासतज्ञ चंद्रशेखर शिखरे त्यांच्या प्रतिइतिहास या अभ्यासपुर्ण ग्रंथात लिहितात मुस्लिम स्त्रियांनी सौभाग्य अलंकार म्हणून पुरुषांचा झब्बे आणि तंग तुमानी हा पोषाख वापरणे या गोष्टी शिवरायांच्या पुर्वीपासून घडत आलेल्या होत्या.शिवाजी महाराजांचा पोषाख व राहणीमान यातूनही हा सांस्क्रुतीक प्रभाव जाणवतो याचा अर्थ कोणी धर्म बदलला असा होत नाही(प्रथमाव्रुती प्रुष्ठ क्र.५६). कुळवाडीभूषण शिवाजी महाराजांना आपल्या धार्मिक अस्मितेचा अभिमान होता.भवानी माता,महादेव,खंडोबा यांच्याबद्दल शिवाजी महाराजांना नितांत आदर होता.ते देव म्हणून नव्हे तर भवानीमाता, महादेव, खंडोबा हे सर्व श्रद्धास्थाने आहेत.त्यांच्याबद्दल शिवरायांना आदर होता पण यश मिळवण्यासाठी हाती तलवार घ्यावी लागते.केवळ नामस्मरण आणि देवपुजा केल्याने आपणाला यश मिळणार नाही असे समजण्याइतके महाराज प्रगल्भ विचारसरणीचे होते.
शिवाजी राजे बुद्धिप्रामाण्यवादी होते.वैदिक धर्मग्रंथात अनेक अतार्किक बाबी आहेत.त्यांचे अनुकरण महाराजांनी कधीही केले नाही.शिवरायांनी आरमारदलाची उभारणी केली.सिंधुदुर्गसारखे सागरी किल्ले बांधले.बेदनुरवर समुद्रामार्गे स्वारी करून शिवरायांनी सिंधू बंदी तोडली.समुद्र उल्लंघन करणे पाप आहे असे लिहुन ठेवनार्या वैदिक ग्रंथाचे काही ठिकाणी प्रामाण्य नाकारले.शिवरायांनी शुद्रातिशुद्र  बांधवांना हक्क-अधिकार दिले. म्हणजे महाराजांनी विषमता नाकारली.राज्यात समता निर्माण केली.समतावादी स्वराज्य हे शिवरायांच्या सांस्क्रुतीक धोरणाचे महत्वाचे अंग होते.
शिवराय महाराजांचे बरेचसे आयुष्य लढाया राजकीय संघर्ष स्वराज्याची निर्मीती प्रवास यामध्ये गेलेले आहे.त्यांना जर दीर्घायुष्य लाभले असते तर त्यांनी दुसर्या राज्याभिषेकानंतर निश्वितच अब्राह्मणी धार्मिक संहिता निर्माण केली असती.तरी देखील त्यांच्या पत्रावरून,जीवनातील काही प्रसंगावरून त्यांचा मानवतावाद,प्रेमळपणा,धार्मिक.सांस्क्रुतीक धोरणे प्रकर्षाने जाणवते.त्यांनी २३ ऑक्टोंबर १६६२ रोजी सर्जेराव जेधे यांना पत्र पाठवले आहे.त्या पत्रात ते लिहितात की मोघल स्वराज्यावर चाल करून येत आहेत तरी रयतेला सुरक्षीत ठिकाणी हलवावे.मोघलाकडून रयतेला त्रास झाला तर "त्याचे पाप तुमच्या माथी बैसेल".यावरून परोपकार हे पुण्य आणि परपीडा हे पाप आहे हे महाराजांचे सांस्क्रुतीक धोरण होते.
शिवाजी महाराजांची हिंदू धर्मरक्षक आणि मुस्लिमांचा कर्दनकाळ अशी प्रतिमा झाली किंवा तशी केली गेली.शिवाजी महाराजांचे अदिलशहा, मोघल यांच्याबरोबर राजकीय संघर्ष होता,धार्मिक नव्हे.शिवरायांनी अफ़जलखानाला ठार मारले,शाईस्तेखानावर वार केला ते मुस्लिम होते म्हणून नव्हे तर स्वराज्याचे शत्रू होते म्हणून.शिवाजी महाराजांनी जसा अफ़जलखानाला ठार मारला तसाच खानाचा निष्ठावंत वकील क्रुष्णा कुलकर्णी यालाही उभा कापला.शिवरायांच्या सैन्यात अनेक मुस्लिम अधिकारी होते.शिवरायांच्या सैन्यात ज्याप्रमाणे अनेक मुस्लिम अधिकारी होते त्याचप्रमाणे मोघल. अदिलशहाच्या सैन्यात देखील मराठा , रजपुत, ब्राह्मण अधिकारी होते.याचाच अर्थ संघर्ष हा धार्मिक नसून राजकीय होता.शिवरायांचे धोरण कोणत्या धर्माला विरोध किंवा कोणत्या धर्माचा अनुनय करण्याचे नव्हते. याउलट औरंगजेबाला १६५७ साली लिहिलेल्या पत्रावरून शिवरायांचा मानवतावाद प्रकर्षाने जाणवतो.
बहुजनप्रतिपालक विश्ववंद्य छ.शिवाजी महाराजांच्या धार्मिक आणि सांस्क्रुतीक धोरणावरून हे स्पष्ट होते की शिवरायांना जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, लिंग, वंश, राष्ट्र भेदाच्या पलीकडे जाऊन मानवाचे आनंददायी प्रसन्न भेदा-भेदरहित असे स्वराज्य अपेक्षीत होते.त्याची प्रत्येक्ष कार्यवाही त्यांनी आपल्या स्वराज्यात केली.शिवरायांचे खरे सांस्क्रुतीक आणि धार्मिक धोरण जगाला समजेल तेंव्हा जगात शांतता आणि विकास झपाट्याने वाढेल.शिवाजी हे केवळ मराठी, महाराष्ट्र, भारताचे राजे नाहीत तर संपुर्ण जगातील आदर्श व्यक्तिमत्वांचे आदर्श आहेत.
अशा कुळवाडीभूषण समतेचे पुरस्कर्ते हिंदवी स्वराज्य संस्थापक विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी विनम्र अभिवादन !
जय जिजाऊ ॥ जय शिवराय ॥ जय महाराष्ट्र.

19 प्रतिक्रिया :

 1. पाटील साहेब लेख छान अहे पण तुम्ही विश्ववंद्य असणार्या राजा शिवरायांना मराठा पुरताच मर्यादित करत नाही ना एवढी दक्षता घ्या म्हणजे झाले.
  धन्यवाद.

  ReplyDelete
  Replies
  1. मराठा हा शब्द जातीवाचक नाही समुहवाचक आहे याचा अर्थ व्यापक आहे म्हणून तर रामदास हिंदू तितूका मेळवावा न म्हणता मराठा तितुका मेळवावा असे म्हणाले होते म्हणजे त्यांना समजले असणार की मराठा म्हणजे एक जात नव्हे एक समुह ज्यामध्ये सर्व जाती जमातींचा समावेश होतो.

   Delete
 2. शिवरायांची प्रतिमा म्हणजे मुस्लिमांचा कर्दनकाळच पण शिवरायांच्य सैन्यात मुस्लिमांचा सहभाग होता हे सत्य कोणाला माहीत नाही अजुन.शिवराय हे धर्मनिरपेक्ष होते.
  जय शिवराय जय महाराष्ट्र

  ReplyDelete
 3. ।। "हे हिन्दुशक्तिसंभुतदिप्तितमतेजा"......।।
  ।। "हे हिन्दुशक्तिसंभुतदिप्तितमतेजा"......।।
  ।। "हे हिन्दुशक्तिसंभुतदिप्तितमतेजा"......।।
  ।। "हे हिन्दुतपस्यापुतईश्वरिओजा" ........।।
  ।। "हे हिन्दुश्री सौभाग्यभुतिच्यासाज्या"।।

  ।। "हे हिन्दुनृसिंहा प्रभो शिवाजी राजा" ....।। ।। ".प्रभो शिवाजी राजा"....।।
  ।। "हे हिन्दुनृसिंहा प्रभो शिवाजी राजा" ....।। ।। ".प्रभो शिवाजी राजा"....।।

  ।। "करि हिन्दुराष्ट्र हे तु ते ....".वंदना"....... ।।
  ।। "करि अंतःकरणज तुज ... "अभिनंदना". ।।
  ।। "तव चरणी भक्तिच्याचर्चि..."चंदना ".. ....।।
  ।। "गुढाशा पुरवी त्या न कथु शकतो जा".. ।।

  ।। "हे हिन्दुनृसिंहा प्रभो शिवाजी राजा" ....।। ।। ".प्रभो शिवाजी राजा"....।।
  ।। "हे हिन्दुनृसिंहा प्रभो शिवाजी राजा" ....।। ।। ".प्रभो शिवाजी राजा"....।।

  ।।"जि शुध्दि ह्रदाचि रामदास शिर डुलवी ".. ।।
  ।।"जि बुध्दि पाचशाह्यास शत्रुच्या झुलवी" ... ।।
  ।।"जि युक्ति कुटनितिक खलासि बुडवी" ..... ।।
  ।।"जि शक्ति बलोन्मत्तास पदतलि तुडवी "....।।

  ।।"ति शुध्दि हेतुचि कर्मि ..राहुदे" .......... ।।
  ।।"ति बुद्धि भाबड्या जिवा ....लाहुदे "....... ।।
  ।।" ति शक्ति शोणिता माजि..वाहुदे

  ReplyDelete
 4. हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना अलेक्झांडर ते नेपोलियनपर्यंतच्या अकरा जागतिक योद्ध्यांशी करून छत्रपती शिवराय हे विविध पैलूंनी आणि उदाहरणांवरून एक अद्वितीय पुरुष असल्याचा संशोधनात्मक निष्कर्ष जागतिक इतिहासावर प्रदीर्घ अभ्यासानंतर डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी इंग्रजी आणि मराठीत मांडला आहे.

  ReplyDelete
 5. हिंदूंचा नवा अध्याय शिवरायांपासून सुरू होतो. हिंदू राजांनी विश्वास ठेवावा आणि परकियांनी दगे द्यावेत हा इतिहास बदलून शिवरायांनी दगे द्यावेत आणि शत्रूला थक्क करावे हा नविन इतिहास सुरू झाला. राजे धार्मिक होते पण धर्मभोळे नव्हते. साहसी होते पण आततायी नव्हते. त्यांची राहणी वैभव संपन्न होती पण उधळी नव्हती. राज्याचे सिंहासन ३२ मणाचे बनवणारा राजा सूती वस्त्रात, लाकडी पलंगावर झोपत असे. चित्र, शिल्प आणि संगीत ह्यांना आश्रय देणे यासाठी ना त्यांच्याकड़े वेळ होता ना पैसा. त्यांना मोठ्या मोठ्या ईमारती बांधण्याची फुरसत देखील नव्हती. दुष्काळात लाखो लोक अन्न-अन्न करीत मरत असताना २० कोट रुपये खर्चुन ताजमहाल बांधण्यात त्यांना रस नव्हता किंवा त्यांच्या मनाचा तो कल देखील नव्हता. अकबराने हिंदूंना औदार्याने वागवले, तर राजांनी मुसलमानांना औदार्याने वागवले. त्यांच्याकडून आक्रमणाची भिती होती तरीही. हिंदूंकडून अशी भीती कधीच नव्हती. राजांनी सर्वांना समान वागवले ते भोवतालच्या मुस्लिम राज्यांच्या भीतीने नव्हे तर स्वयंभू औदार्य म्हणुन.

  ReplyDelete
 6. समाजाला नेहमीच नाट्यमय आणि रोमांचकारी घटनांची जास्त आवड असते आणि अश्या नाट्यमय घटनांमुळे खरे कर्तुत्व दृष्टीआड होण्याचा धोका असतो. महाराजांच्या जीवनात अश्या घटना ५-६ पेक्षा अधिक नाहीत. पहिली अद्भुत घटना १६५९ मध्ये अफझलखानवध ही आहे. तर शेवटची १६६६ ला आग्र्याहून सुटका ही आहे. ह्या ७ वर्षात पन्हाळा - बाजीप्रभु, शाहिस्तेखान प्रकरण, सूरतलूट ह्या घटना आहेत. म्हणजे एकुण ५० वर्षाच्या जीवनात पाहिल्या नाट्यमय घटनेपूर्वी २९ वर्षांचा नाट्यशून्य काळ आणि शेवटच्या नाट्यमय घटनेनंतर १४ वर्षांचा कालखंड...!!! ह्या अश्या ५-६ घटनांवर आपल्या कर्त्या पुरुषाचे चरित्र कसे पूर्ण होइल ??? छत्रपतींचे कार्य आणि चरित्र समजुन घेताना ह्या नाट्यमय रोमांचकारी घटनांचा मोह आपण टाळला पाहिले.

  ReplyDelete
 7. छत्रपति शिवरायांच्या कार्याचा अभ्यास करताना अनेक इतिहासकारांनी त्यांचे व्यक्तिमत्व वेगवेगळ्या दृष्टीकोनातून मांडले आहे. 'कै. नरहर कुरुंदकर' हे असेच एक प्रभावी लेखक. त्यांनी लिहिलेल्या 'छत्रपति शिवाजी महाराज - जीवन रहस्य' या पुस्तकात त्यांनी असेच काही वेचक आणि वेधक विचार मांडले आहेत.
  इतिहासाच्या वाचकांना 'नरहर कुरुंदकर' माहीत असले तरी सामान्य वाचकांना मात्र ते 'श्रीमान योगी'च्या प्रस्तावनेतून माहीत आहेतचं. रणजीत देसाई यांना लिहिलेल्या विस्तृत पत्रातून त्यांनी शिवरायांचे व्यक्तिमत्व मांडण्याचा यशस्वीपर्यंत केलेला आहे.पाटील साहेब लेख छान अहे धन्यवाद

  ReplyDelete
 8. शिवाजीमहाराजांनी मराठी माणसांना स्वातंत्र्याची चटक(चांगल्या अर्थाने) लावली. हा फार मोठा सामाजिक बदल होता, आणि म्हणूनच, त्यांच्या आणि नंतर शंभूराजांच्या मृत्यूनंतरही मराठे लढतच राहिले.
  मराठ्यांना हे जाणवलं होतं, की आता जर हे राज्य टिकवण्यासाठी लढलं नाही, तर पुन्हा एकदा सुलतानी अत्याचार आणि आपला बळी जाणं हे अटळ आहे.
  खूप छान माहिती आहे तुमच्या लेखातही.
  थोडसं अजून वाचायचं असेल तर..
  http://puputupu.blogspot.com/2010/10/original-photo-chhatrapati-shivaji....
  मी वर जे लिहिलंय त्याला या ब्लॉगचा संदर्भ आहे. हा कुणा इतिहास्कराचा ब्लॉग आहे का माहिती नाही. म्हणजे मी सगळं वाचलं नाहिये अजून. (पुढे यावरून काही वाद होऊ नयेत अशी आशा आहे.) पण जे लिहिलय ते खोटं/ न पटण्यासारखं नसावं.

  ReplyDelete
 9. माझे अवघे मी पण मराठाआयुष्याचा कणकण मराठा,ह्रदयामधले स्पंदन मराठातन-मन हिंदू, जीवन मराठा !
  धगधगणारी मशाल मराठाआकाशाहुन विशाल मराठा,सागरापरी अफाट मराठाहिमालयाहुन विराट मराठा!
  तलवारीचे पाते मराठामाणुसकीचे नाते मराठाअन्यायावर प्रहार मराठामानवतेचा विचार मराठा!
  महिला, बालक, जवान मराठाखेड्यामधला किसान मराठा,शहरांमधुनी फिरतो मराठाहरेक मस्जिद, मंदिर मराठा!
  झंझावाती वादळ मराठाहिंदू हिंदू केवळ मराठा
  सिंहाच्या जबड्यात घालून हातमोजीन त्याचे दातअशी आमची मर्द मराठा जात......!!!

  ReplyDelete

 10. ‘शिवाजी महाराज हे सार्वकालीन सर्वश्रेष्ठ राज्यकर्ते होते’, या मताशी सारेजण सहमत असतील. तसेच ‘शिवाजी महाराज हे व्यक्ती म्हणूनसुद्धा आजपर्यंतच्या ज्ञातमानवी इतिहासातील सर्वश्रेष्ठ मानव आहेत’ हे महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापनही उभं जग, संशोधक, अभ्यासक मान्य करतील.

  ReplyDelete

 11. शिवरायांनी संपुर्ण आयुष्यात कधीही जात धर्म पहिला नाही पण त्यांचे अनुयायी आता त्यांच्या नावाचा गैरवापर करत आहेत.शीवराय महान व्यक्ती मत्व होऊन गेले हिंदूस्तानात.
  जय शिवराय जय हिंदूराष्ट्र

  ReplyDelete
 12. या लेखात लेखकाने काही भन्नाट विधाने केलेली आहेत लेखक म्हणतो "म फुले शिवाजी महाराजांचे वर्णन कुळवाडीभूषण असे करतात"वास्तविक कुळवाडीभूषण गातो पवाडा शिवाजीचा असे फुले म्हणतात ते स्वतःला कुळवाडीभूषण म्हणवून घेतात राजेना ते गो-ब्राह्मण प्रतिपालक असेच म्हणत होते
  महात्मा फुले समग्र वागमय पान न ७०१
  "शिवाजीने ज्या ज्या लढाया केल्या त्या त्या लढायामध्ये आमचे नुकसान झाले आमच्या मराठे लोकांचे राज्य स्थापित झाल्यावर आम्हास सुख मिळण्याचा व आमच्या अडचणी दूर होण्याचा संभाव होता परंतु काही झाले नाही का आपल्या स्थितीमध्ये फरक पडला नाही याचे काहीतरी कारण असावे आपल्याच इतिहासावरून कळून येते कि शिवाजी आपण आपल्या राजा होण्याचे कारण फक्त "गो ब्राम्हाणाचे रक्षण करण्या करिताच "असे उघड सांगत होता व तो आपल्या सांगण्याप्रमाणे "गो ब्राम्हाणाचे रक्षण करीत होता असे उघड दिसते मुसलमानी राज्यात आमच्या स्तिथीचे जे स्वरूप होते त्यापेक्षा दुःसह स्तिथी मराठे लोकांच्या राज्यात झाली असे म्हणण्यास बाध येणार नाही "
  लेखक म्हणतो "आत्ता शिवाजी महाराजांनी आपल्या पत्रात अरबी फारशी भाषेचा शब्दांचा वापर केला आहे असे डॉ प्र न देशपांडे आपल्या पुस्तकात म्हणतात "अरे अरे एका ब्राह्मणाचा संदर्भ तुम्हाला देण्याची पाळी येते त्याचे वाईट वाटते मग जरा त्या पुस्तकातील पत्रे वाचा किंवा पुण्याला भारत इतिहास संशोधन मंडळातील पत्रे वाचा कित्येक पत्रात दादोजी कोंडदेव याचा गौरवपूर्ण उल्लेख आहे समर्थ रामदासांचा पण अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख आहेत
  लेखक म्हणतो :भवानीमाता'महादेव खंडोबा याच्याबद्दल महाराजांना नितांत आदर होता तो देव म्हणून नव्हे तर भवानीमाता महादेव खंडोबा हि सर्व श्रद्धास्थाने आहेत " लेखकाच्या मनात भरपूर गोंधळ दिसतो शिंगणापुरचा महादेव तर भोसले घराण्याचे कुलदेवत आणि भवानीमाता कुलस्वामिनी लेखक काहीही वेडसर आणि विदुषकी लिहित आहे (बाकी पुढील पत्रात जर हे प्रसिद्ध केले तर

  ReplyDelete
 13. लेखक म्हणतो "शिवाजी महाराजांनी वैदिक ग्रंथात अनेक अतार्किक गोष्टी आहेत त्याचे अनुकरण केले नाही "म्हणजे ज्या गोष्टी तार्किक किंवा तर्कशुद्ध आहेत त्याचे मात्र अनुकरण केले असे ह्या लेखकाला म्हणावयाचे आहे
  आत्ता परशुरामाने २१ वेळेस पृथ्वी नि:क्षत्रिय केली असे म्हणतात तसेच ज्या स्त्रिया गर्भवती होत्या त्यांचे गर्भ मारून टाकले असे पुराणात लिहिले आहे आत्ता पृथ्वी एकदा नि:क्षत्रिय केल्यावर :क्षत्रिय कोठे उरले मग पुन्हा नि:क्षत्रिय करावयाचे म्हणजे काय ?जास्तीजास्त २ वेळेस करायची त्यानंतर नि:क्षत्रिय करायचे म्हणजे काय करायचे ?म्हणजे क्षत्रिय म्हणजे आजचे मराठा नसून ब्राह्मणांची संतती आहे असे यांना सांगावयाचे आहे काय ? हि सगळी पुराणातील वांगी आहेत दुपारच्या वेळेस वाती वळता वळता करमणूक म्हणून लिहिल्या आहेत आणि कलियुगात ब्राह्मण व शुद्र या दोनच जाती आहेत याचा अर्थ क्षत्रिय व वैश्य यांना प्रमोशन मिळून ते ब्राह्मण झाले आणि अद्याप शुद्र ब्राह्मण होण्याची प्रक्रिया सुरु आहे असा त्याचा अर्थ आहे
  शिवाजी महाराजांनी शाक्तपन्तथानुसार राज्याभिषेक केला म्हणजे वैदिक धर्म नाकारला असे हा लेखक म्हणतो आहे म्हणजे शाक्तपन्तथानुसार अभिषेक केला त्याच्या आदीच्या दिवसापर्यंत ते वैदिक होते आणि शाक्तपन्तथानुसार अभिषेक केला त्या दिवशी ते अवैदिक झाले असे या लेखकाला म्हण्यायाचे आहे वास्तविक पहिला राज्याभिषेक केल्यावर लगेचच जिजाऊ यांचे निधन झाले रायगडावर वीज पडली त्यात नुकसान झाले आणखी २ /३ अपशकून झाले त्यानंतर हे शाक्तपंथी आले आणि सांगितले कि राज्याभिषेक बरोबर झाला नाही उगाच विषाची परीक्षा कशाला घ्या म्हणून शिवाजी महाराजांनी शाक्तपन्तथानुसार राज्याभिषेक केला शाक्तपंथ हि वैदिक धर्माचीच एक शाखा आहे
  "शिवाजी महाराजांची हिंदू धर्मरक्षक आणि मुस्लिमांचा गर्दनकाळ अशी प्रतिमा ब्राह्मण इतिहासकार यांनी केली मोगलाबरोबरचा संघर्ष राजकीय होता धार्मिक नव्हे असे हा लेखक म्हणतो " औरंगजेबाच्या सैन्यात ८५ % बहिंदू सैनिक होते म्हणून औरंगजेब हिंदुत्वनिष्ठ होता असे म्हणण्यासारखे आहे शहाजी आदिलशहाच्या व कुतुबशहच्या सैन्यात होते म्हणजे त्या शाह्या हिंदुच्या होत्या असे म्हणण्यासारखे आहे असे असते तर नेताजी पालकर आणि बजाजी निंबाळकर यांना पुन्हा हिंदू करूनच घेतले नसते मग हिंदू काय आणि मुसलमान काय ? लोकांना पटेल अशी काहीतरी विधाने करीत जा
  अशा गो-ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रियकुलावतंस राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम

  ReplyDelete
  Replies
  1. चांगले काही अनुकरणीय असेल तर ते करतीलच मग भले ते कुराण का असेना....
   राहिली गोष्ट परशूरामाची हे तुम्हीच लिहिले आहे ते कालबाह्य असेल तर जाळून टाका मग ....संतती ?? मी तर ब्राह्मणांची संततीला ब्राह्मण मानत नाही..

   शाक्तपंथ वैदिक च आहे तर तुम्ही किती हिम्दू राज्याभिषेक सोहळा साजरा करतात ?

   औरंगजेब हिंदुत्वनिष्ठ नक्कीच नसेल पण हे धार्मिक युद्ध नव्हतेच...शुद्धीकरण करून हिंदु धर्मात परत घेण्याचा अधिकार फ़क्त ब्राह्मणांना होता .....शिवरांनी मग नेताजींना शैव धर्मात घेतले असे नक्कीच आहे.

   गोब्राह्मणप्रतिपालक ??? एवढे बहुजन सोडून शिवराय ब्राह्मणांच्या रक्षणाची जबाबदारी घेतील असे वाटत नाही.....ब्राह्मणांना संरक्षण दिल्याचे उदाहरण नाही पण ब्राह्मण संपविल्याचे उदाहरणे मिळतील तुम्हाला..

   जय बहुजनप्रतिपालक कुळवाडीभूषण ब्राह्मणनिर्दालक विश्ववंद्य शिवरायांना मानाचा मुजरा....!!
   जयोस्तु मराठा

   Delete
  2. आयला हा शिवधर्म कोठून काढला? शिवधर्म वगैरे काहीही नसून शैव व वैष्णव हे दोन पंथ राजेंच्या काळात होते अजूनही आहेत शैव म्हणजे हर म्हणजे शंकर आणि वैष्णव म्हणजे हरी म्हणजे विष्णू हे दोन पंथ आहेत तुकाराम महाराज म्हणतात
   "हरिहरा भेद /नाही करू नये वाद /एक एकाचे हृदयी /गोडी साखरेच्या ठाई /भेदकासी नाड /एक वेलांटीच आड /उजवे वाम भाग /तुका म्हणे एकची अंग /
   तुकाराम महाराज म्हणतात कि विचार करून पहिले तर उजव्या आणि डाव्या बाजूचे अवयव मिळून जसे एकाच शरीर असते त्याप्रमाणे हरी-हरात एकच परमात्वतत्व आहे त्यामुळे शिवधर्म नावाचा कोणताही धर्म अस्तिवात नसून तो हिंदू धर्माचा भाग आहे शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर व बजाजी निंबाळकर यांना हिंदू करून घेतले त्याचे पौरोहित्य ब्राह्मणांनीच केले आहे
   त्यामुळे गो-ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रियकुलावतंस राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज कि जय

   Delete
  3. शिवधर्म नव्हे शैव धर्म म्हंटलो मी ते हिंदू मधून वेगळे आहेत..त्याशिवाय का ते भेदाभेद माणनारे नाहीत...हिंदू असते तर त्यातही भेदाभेद असते.
   बाकी तुकाराम महाराजांनी म्हंटले आहे ते खरं आहेच...तुम्हीही हिंदुमधे तसे आचरण करा..
   जय बहुजनप्रतिपालक कुळवाडीभुषण ब्राह्मणनिर्दालक विश्ववंद्य छ.शिवाजीराजेंना मानाचा मुजरा...

   Delete
 14. अहो हा शैवधर्म हा काय प्रकार आहे ? शैवधर्म नावाचा एक धर्म असून त्याचे दुसरे नाव आहे लिंगायत तो बसवेश्वर यांनी १२ व्या शतकात स्थापन केला दुसरा कोणताही शैवधर्म अस्तित्वात नाही हा धर्म शिवाजी महाराज यांनी केव्हा स्वीकारला होता ?
  या धर्माचे वैशिट्य म्हणजे मुल आईच्या पोटात असताना ७ व्या महिन्यात लिंगायत भटजी हा विधी करतात व मातेला एक लिंग देतात ती माता मुलाचा जन्म होईपर्यंत ते शिवलिंग आपल्या शिवलिंगाला बांधून ठेवते व मुलाचा जन्म जाल्यावर ते मुलाच्या गळ्यात घालतात नंतर मुलाच्या ८ व्या वर्षी भटजी ते एक विधी करून (उपनयन सारखा ) ते एका सूत्रात बांधून ठेवतात हा विधी मुलगा तसेच मुलीचा पण असतो हे शैवधर्मी मांसाहार करीत नाहीत व मृत्युनंतर त्यांना जमिनीत पुरतात
  असा शैवधर्म राजेंनी केव्हा स्वीकारला ?इतिहासात असा कोणताही उल्लेख नाही याउलट राज्याभिशेकापुर्वी राजेंची मुंज (उपनयन) लावण्यात आली होती व त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या देहाला अग्नी दिल्याची नोंद आहे त्यामुळे राजे शैवधर्मी होते आणि त्यांनी नेताजी पालकर व बजाजी निंबाळकर यांना शैवधर्मी मध्ये प्रवेश दिला हा चक्क बकवास आहे असे असते तर आज फलटणचे निंबाळकर शैवधर्मी असते हिंदू नसते

  ReplyDelete
  Replies
  1. शैव वारकरी असे जे तुम्ही पंथ सांप्रदाय बनवलाय ते मुळात धर्मच आहेत ..त्यांची समतावादी विचारसारणी सगळीकडे पसरल्यामुळे तुमचे जगणे असह्य झाले म्हणून तुम्ही त्यांना एक धर्मामध्ये बंदिस्त केला जसा बौद्ध धर्मामद्ये प्रवेश करून धर्म संपवला तसा पण हिंदू धर्मापेक्षा वारकरी धर्मच श्रेष्ठ आहे..जो समतावादी विचार ठेवून हिंदूंच्या विचारांच्या विरोधात अहे....

   आणि ते तुमचे उकिरडे[पुराणे वैगैरे] आता बंद करा ......एका पुराणार गणपतीचा जन्म कसा झाला हे वाचून धक्काच बसला .....असले पोर्नोग्राफ़ी पुराणे खाक करायच्याच लायकीची आहेत.

   Delete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.