19 August 2012

वाघ्या कुत्रा आणि वादाचे कारण

            सध्याचे वातावरण वाघ्या कुत्र्याच्या शिल्पामुळे तापलेले आहे. शिवचरित्रात व इतर सर्व संदर्भ साधनात वाघ्याचा कुठेही उल्लेख नाही.म्हणुन एका काल्पनिक कुत्र्याचे शिल्प  शिवरायांच्या अमाधीसमोर असणे हा शिवरायांचा आणि शिवचरित्राचा अपमान आहे.त्यामुळे शासनाने हे वादग्रस्त शिल्प रायगडावरून तात्काळ हटवावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने गेल्या काही वर्षापासून लावून धरली होती.परंतू वारंवार मागणी करुनही शासनाकडून या शिल्पासंदर्भात कसलाच निर्णय न झाल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी १ ऑगस्ट २०१२ रोजी वाघ्याचे  वादग्रस्त शिल्प हटविले.काही सामाजिक संघटनांनी या कुत्र्याला आपल्या अस्मितेचे प्रतिक मानुन संभाजी ब्रिगेडच्या विरोधात अपप्रचार केला.या सामाजिक दबावाला बळी पडत शासनाने तात्काळ ते शिल्प पुनर्स्थापित केले.
        परंतू या वादात शिवरायांच्या अपमानाचा आणि वाघ्याच्या इतिहासात असण्याचा प्रश्न बाजुला पडला, मुळ प्रश्न आहे तो वाघ्या शिवचरित्र्यात असण्याचा. समकालीन संदर्भ साधनात कसलाही उल्लेख नसणार्या वाघ्याचे शिल्प केवळ दंतकथेवर आधारित आहे.शिवकाळानंतर ज्यांनी ज्यांनी रायगडचा या ना त्या प्रकारे अभ्यास केला  त्यांच्याही साहित्यात या कुत्र्याचा कसलाही उल्लेख मिळत नाही.उदाहरणादाखल : १८६९ साली "महात्मा जोतिराव फ़ुले" स्वत: रायगडावर गेले, शिवरायांची दुर्लक्षीत झालेली समाधी शोधुन काढली आणि शिवरायांवर प्रदिर्घ पोवाडा लिहिला.पण यात कुठेच वाघ्या डोकावला नाही. सन १८८१-८२ मध्ये "जेम्स डग्लज " हा इंग्रज अधिकारीही रायगडावर गेला. या अधिकार्यानेही त्याच्या "बुक ऑफ़ बॉम्बे" या पुस्तकात रायगडचे आणि शिव समाधीचे  नकाशासहीत तपशीलवार वर्णन केले आहे पण त्यांनीही वाघ्याचा कुठेही उल्लेख केला नाही.
१८८५ च्या सुमरास मुंबई इलाख्याचे गव्हर्नर असणरे "सर रिचर्ड टेम्पल" रायगड पाहण्यासाठी गेले त्यावेळी त्यांच्या सोबत "क्रॉफ़र्ड" नावाचा सहकारी होता. या सहकार्याने "सर रिचर्ड टेम्पल" यांच्या मोहिमेवर आधारीत "अवर ट्रबल  इन पुणा एण्ड डेक्कन"  हे पुस्तक लिहिले जे १८९७ मध्ये प्रकाशित झाले.या पुस्तकाचे वैशिष्ट म्हणजे "क्रॉफ़र्ड" यांनी स्वत: शिवरायांच्या शवाचे दहनस्थळ आणि समाधी याचे स्वतंत्र्य चित्र रेखाटले आहे पण याही पुस्तकात वाघ्याचा नामनिर्देश नाही.
            शिवरायांच्या समकालीन संदर्भ साहित्यात वाघ्याचा कोणताही उल्लेख नसणे आणि नंतरच्या मान्यवर लेखकांच्या लिखानातही वाघ्या नसने हे वाघ्याच्या शिल्पाचा फ़ोलपणाच सिद्ध करते. असे असताना वाघ्यासाठी शासनाचा एवढा अट्टाहास का ?
               आता काहींचं मत आहे की या वाघ्याचं अस्तित्व दाखवणारे पुरावे जर्मन लोकांनी अगदी जपुन ठेवले आहेत.आता गंमत अशी की, वाघ्या रायगडावर होता, हे जर्मनीतील लोकांना १० हजार मैलावरून दिसले, पण रायगडाच्या आसपासच्या १० मैलावरील कोणालाही तो दिसला नाही! शिवाजी महाराजांच्या काळातील एकाही माणसाला वाघ्या दिसत नाही. महाराज गेल्यानंतर २५० वर्षांनंतर झालेल्या माणसांना मात्र तो ढळढळीत दिसू लागतो!!असले चमत्कार मद्यपान केल्यानंतर सहजपणे होऊ शकतात.
           दंतकथेतील हा कुत्रा सर्वप्रथम डोकावला तो १९०५ साली "चिं. ग.गोगटे" यांच्या "महाराष्ट्र देशातील किल्ले" या पुस्तकात.या दंतकथेतील कुत्र्याचे ’वाघ्या’ असे नाटककार आद्य नाटककार ’राम गणेश गडकरी’ यांनी त्यांच्या "राजसंन्यास" या नाटकाच्या माध्यमातुन केले.गडकरींनी त्यांचे हे नाटक वाघ्याला अर्पण केलेले आहे म्हणुनच वाघ्याच्या चबुतर्याचर "राजसंन्यास" या नाटकातील काही ओळी कोरल्या आहेत.विशेष म्हणजे गडकरींचे हे नाटक शिवराय आणि शंभुराजे यांच्या बदनामीने ओतप्रत भरलेले आहे हे नाटक वाचतात वाचकांच्या लक्षात येते की , गडकरी हे काही इतिहास संशोधक नव्हते ते एक नाटककार होते.दंतकथा आणि नाटके ही जर इतिहासाच्या वस्तुनिष्ठ पुराव्यांवर टिकत नसतील तर ती एखाद्या युगपुरुषाच्या बदनामीला कारणीभुत ठरत असतील तर अशा दंतकथा नाकारल्याच पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे वाघ्याचे काल्पनिक शिल्प बसविण्यात आले आहे त्या खालील चौथरा हा शिवरायांच्या महाराणी सईबाईंची असण्याची  शक्यता काही इतिहासकारांनी वर्तवली आहे आणि यासंदर्भात इतिहासकारांचे एकमत आहे आणि  तो वाघ्याचा पुतळा शिवरायांच्या समाधीपेक्षा उंच आहे. रायगडावरील वाघ्याला काही संघटनेंचा विरोध आहे तो यामुळेच.वाघ्या कुत्र्याच्या समर्थकांनी आणि पुरातत्व खात्यानेही या कुत्र्या संदर्भात ऐतिहासिक पुरावे द्यावेत अन्यथा शिवप्रेमींची मागणी मान्य करत शिवरायांचा अपमान करणारे शिल्प ताबडतोब हटवावे.

शिवश्री डॉ. बालाजी जाधव, 
प्रकाशक पंचफ़ुला प्रकाशन,औरंगाबाद.
मराठ्यांनो षंड झालात काय ? या विक्रमी खपाच्या पुस्तकाचे लेखक