29 March 2013

॥ राजा शिवछत्रपती ॥ पान २

             पुण्यात लालमहालाच्या पश्चिम बाजुला शिवाजी राजे सोन्याच्या नांगराने मशागत करत आहेत आणि शेजारी जिजामाता, शिवबा आणि कोंडदेव यांची शिल्पे दाखवली आहेत. त्या ठिकाणी शहाजी राजेंचे शिल्प नाही. ही शिल्पे महापालिकेची परवानगी न घेता पुरंदरेनी निनाद बेडेकर आणि त्याचा पंत यांच्या साह्याने उभारली आहेत. जेजुरीला शिवाजी राजे - शहाजी राजे भेट होत आहे. अशी शिल्पे आहेत. मतितार्थ हा सांगायचा आहे की, पुण्याहुन शिवाजी राजे, जिजामाता आणि कोंडदेव हे जेजुरीपर्यंत आले आहेत आणि शहाजी महाराज बेंगलोर वरून जेजुरी पर्यंत आले आहेत. जणूकाही पहिल्यांदाच शिवाजी राजे आणि शहाजी महाराजांची भेट होत आहे, हे पुरंदरे यांनी सूचित केले आहे. वरील सर्व ठिकाणी शिल्पे उभारण्याचे कारस्थान पुरंदरेनी केलं आहे. पण, वस्तुस्थिती अशी आहे की, शिवाजी राजे स्वराज्याची स्थापना करत असताना ते शहाजी महाराज आणि जिजामाता यांच्या सहवासात राहिले होते. शहाजी महाराजांनी या दोघांनाही मार्गदर्शन केलेले आहे. (डॉ.जयसिंगराव पवार)
          महाराष्ट्रात पुरंदरेनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर महानाट्याचे अनेक प्रयोग केले. विषेश करून प्रयोगास मराठा सरदार, जहागिरदार, शिवाजी राजांचे वंशज, आमदार, खासदार मंत्री या सर्वांचे सहाय्य घेतले. शिवरायांच्या नावाने ललकार्या दिल्या. प्रयोगाच्या सुरुवातीस उपस्थित असलेल्या थोरामोठ्यांवर स्तुतीसुमने उधळली. त्यांच्यासमोर आपल्या डोक्यातील इतिहास कथन केला. किर्तनकारांप्रमाने अधुनमधुन प्रेक्षकांना वेठीस धरून शिवाजीराजे आणि जिजामातेच्या नावाने घोषना केल्या. श्रोते डोलू लागले. लगेच व्यासपीठावर घोडे येऊन नाचू लागले. असा हा त्यांच्या महानाट्याचा कोट्यावदी रुपये मिळवण्याचा महान प्रयोग आहे.
         पण या प्रयोगातील महत्वाच्या घटनांचे पुरंदरे वर्णन करत नाही. अफ़जलखान वधाचे वर्णन : अफ़जलखान - शिवाजी राजे यांच्या युद्धाचे वर्णन करताना दोन्ही बाजुचे दहा-दहा संरक्षक, सय्यद बंडा, जिवा महाला, संभाजी कावजी, शिवरायांचे चुलते मंबाजी भोसले या सर्वांचे पुरंदरे वर्णन करतात; पण एक गोष्ट लपवतात, ती म्हणजे शिवरायांच्या डोक्यावर हल्ला करणारा अफ़जलखानाचा वकील क्रुष्णा भास्कर कुलकर्णी. ते द्रुष्य पुरंदरे दाखवतच नाही. अशा अनेक सत्य घटना पुरंदरे सांगत नाहीत. पुरंदरे मराठी माणसाला फ़सवत आहेत. तरुणांना त्यांच्या महानाटकांत त्यांनी बळीचा बकरा केले. ते राबराब राबले आणि पुरंदरे यांनी त्यांच्या हातावर चणे, चिरमुरे ठेवले. स्वत: मात्र पैशाला चिकटून बसले. पुरंदरे अनेक राजकीय व्यक्तिंच्या जवळ गेला आणि कार्यभाग पुर्ण झाल्यावर त्यांच्यापासून दुर गेला. आपल्या मधाळ भाषणाने त्यांच्यावर मोहिनी घालून आपलेसे करून त्यांना वापरून फ़ेकून दिले.
            प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी शिवाजी महाराजांचे मोठेपण दाखवले आहे. प्रबोधनकार ठाकरेंचे इंग्रजीत एक वाक्य आहे - Thakare Fried the brain of brahmin. अर्थ : ठाकरेंनी ब्राह्मणांचा मेंदू तळला. उद्वेगाने त्यांना असे का म्हणावे लागले. तर ब्राह्मण लेखकांनी खोटा इतिहास लिहिण्याच्या संदर्भावरून. ब्राह्मणांनी शिवरायांचा खोटा इतिहास लिहिलाच, वर त्यांच्या डोक्यावर कोंडदेव, रामदास हे दोन गुरु बसवले; पण हे दोघेही शिवाजी राजांचे गुरु नव्हते, मार्गदर्शक शिक्षकही नव्हते.
            प्रबोधनकार आपल्या "दगलबाज शिवाजी" मध्ये लिहितात की पुरंदरेचे व मेहेंदळेचे शिवाजीवरील लिखाण पौराणिक दंतकथांवर आहे. शिवाजींची स्वराज्य स्थापना ही परमेश्वराची इच्छा होती आणि त्या स्वराज्य स्थापनेला आकस्मिकरित्या रामदासांचा आशीर्वाद मिळाला. या विचारावर प्रबोधनकार हल्ला करतात. "हे केवळ ब्राह्मण लेखकांचे बिनबुडाचे पोकळ शब्द आहेत" पुढे ते लिहितात, इतिहासकारांचे कर्तव्य म्हणजे त्यांनी राष्ट्रीय महानायकांचे कार्य, त्यांचे शौर्य, त्यांचा देशाभिमान नि देशासाठी दिलेले बलिदान याचा जगात प्रसार केला पाहिजे. पण आमचे इतिहासकार राष्ट्रीय नायकांच्या कथा, पुराणं दंतकथेच्या चौकटीत बसवतात. असले इतिहासकार शिवाजी राजांना परमेश्वाचा अवतार मानतात.
          उत्तम उदाहरण प्रबोधनकार कौसल्याचे देतात, "अयोध्याचा राजा दशरथ यांची पट्टराणी कौसल्या रामाच्या वेळी गर्भवती होत्या आणि त्यांना अनेक प्रकारची स्वप्ने पडत होती", या प्रकारची दोहाळ्यांची स्वप्ने जिजाऊंना शिवबांच्या वेळी पडत होती. असले इतिहासकार छोटासा कुठला तरी धागा पकडून त्यावर कल्पनेचा भव्य राजवाडा बांधतात. त्या राजवाड्याला रुप नसते, निराळा द्रुष्टीकोन नसतो. सुरुवातीपासून शेवटपर्यंत भावनांचा खरकटवाडा. शक्य, अशक्यतेचा विचार नाही. वातावरणाची आणि त्याच्या निरिक्षणाची द्रुष्टी नाही. मानवी स्वभाव जाणण्याचं ज्ञान नाही.
            सर्वकष पाहता पुरंदरेंची कृत्ये या पलीकडची आहेत. हिंदुत्ववादी संघटनांना काळजी वाटते की, पुरंदरेंच्या मागे इतिहासाचे काय होणार ? महाराष्ट्राला शिवकथा कोण सांगणार ? यांचं आवडीचे साधन, अफ़जलखानाच्या कोथळ्याची पोस्टर्स की जी माजी कै.बाबासाहेब भोसले यांनी शिवून टाकली होती; पण या राजकीय संघटनांना अफ़जलखानाचा कोथळा उसवून, पुन्हा पोस्टर्स तयार करून समाजाला दाखवण्यात रस फ़ार. यामध्ये सर्वच पक्ष सहभागी आहेत.
          जात्यांध पुरंदरे यांनी माता-पुत्र जिजाऊ -शिवाजी राजे यांचे चरित्रहनन केले आहे. हे त्यांच्या "राजा शिवछत्रपती" १४ व्या आव्रुत्ती मध्ये आढळते. द्रुष्य स्वरुपात लालमहालातील शिवबा - जिजाऊ शिल्पे. हे पुरंदरेनी केलेले महापाप दर्शवतात. या कारणास्तव दादोजी कोंडदेवाच्या लालमहालातील शिल्पाबाबत २६ ऑगस्ट २०१० रोजी पुण्यात विराट मोर्चा निघाला. माजी न्यायमुर्ती पी.बी.सावंत व बी.जी.कोळसे पाटील यांच्या नेत्रुत्वाखाली लोकशासन आंदोलनाने कष्टकरी, शेतकरी व वारकर्यांचा मोर्चा महानगरपालिकेवर नेला होता. राज्यभरातील मच्छिमार, कोळीबांधव व आदिवासीही मोर्च्यात सामील होते. शिवप्रेमी संघटेनेचे नेतेही मोर्च्यात सामील होते. महापौर मोहनसिंग राजपाल हे मोर्च्याला सामोरे गेले. चुकिच्या मार्गाने उभारलेला पुतळा २४ तासाच्या आत काढला जाईल, असे त्यांनी आश्वासन दिले. नेत्यांची पोटतिडकिने भाषणे झाली. वातावरण शिवमय होऊन जिंकु किंवा मरू असे होते. माजी न्यायमुर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी काही आव्हाने उभी केली, अशी की पुरंदरे डाकू आहे, बाळासाहेब ठाकरे सावरकर यांच्या च्या पुतळ्याला जोडे मारतील का ?, बहुलकराचे समर्थन करणार्या ठकरेलाच काळे फ़ासायला पाहिजे.
            मराठा संघटनेचे नेते श्री मानकर, अरविंद शिंदे आणि इतर नेते म्हणाले : कोंडदेवाचा पुतळा कोणताही ऐतिहासिक पुरावा नसताना ते शिल्प जर लालमहालातून हलविले नाही तर आम्ही तलवारी उपसू ! न्यायमुर्ती कोळसे पाटील म्हणाले : अम्ही मराठा - ब्राह्मण वाद घालत नसून खोटा इतिहास लिहिणार्या अपप्रव्रुत्तीविरुद्ध उमटलेला हा जनतेचा आवाज आहे. मुठभर लोकांनी आपला इतिहास लिहिल्याने खरा इतिहास समोर आलाच नाही. सर्व शिक्षणसम्राट, साखरसम्राट व नेते मराठी आहेत. पण पुतळा हलविण्याची एकाचीही हिंमत झाली नाही.(२६ ऑगस्ट २०१० - पुढारी)
           आतापर्यंत शिवचरित्राचे सिंहावलोकन केल्यानंतर लक्षात येते की, लेखकांचे दोन तट, ब्राह्मण आणि ब्राह्मणेत्तरांचा. ब्राह्मण लेखकांनी शिवाजी राजांचे अपहरण केले आहे. त्यांच्या पाठीमागून शिवरायांना सोडवण्यासाठी ब्राह्मणेत्तर लेखक धावत आहेत. मराठा नेत्यांनी बगळ्याची भुमिका घेतली. मासा दिसतो आहे पण पकडत नाहीत. मोठा मासा तर त्यांना वाकुल्या दाखवतो आहे; पण नेत्यांनी पाण्यात उभा राहून झोपेचे सोंग घेतले आहे. त्यांना जागे करण्याकरीता हा बडा मासा त्यांच्या ढेंगेतून, मागुन पुढून फ़िरत त्यांच्या वाढदिवसाचे निमंत्रण स्विकारत आहे. प्रश्न अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा असो अगर ऐतिहासिक सत्य - असत्याविषयी असो, त्या बड्या माशाशिवाय या राजकीय नेत्यांचे पान हलत नाही. शाहीर जनतेला अमृत पाजत आहेत की विष, हे राजकीय नेत्यांना समजत नाही. नेत्यांचा काडीचाही संबंध शिवरायांविषयी येत नाही; पण जेथे जेथे शिवपुतळा, तेथे तेथे हजर. त्यांना शिवरायांच्या डोळ्यातून येणारे अश्रू दिसत नाहीत. ते अश्रू सामान्य जनता पाहते आणि पुसण्याचा प्रयत्न करते.

॥ राजा शिवछत्रपती ॥ पान ३

         ब्राह्मण लेखकांनी शिवाजी महाराजांवर पक्षपाती लिखाण केले आहे. ब्राह्मण लेखक स्वत:ला श्रेष्ठ मानतात. बळीराजाचा जसा धर्ममार्तंड वामनाने बळी गेतला. तसा शिवचरित्राचा हे लेखक बळी घेत आहेत. प्रजाहितदक्ष राजा शिवरायांची गणना जगातील चिरंजींवांमध्ये आहे. "मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज"  ग्रंथ गारगोटीचे सुभाष देसाई यांनी लिहिला. या ग्रंथात रयतेच्या कल्याणकारी सम्राटांची पत्रे, साम्राज्यांचे नकाशे व वैभवशाली कालांचे वर्णन आहे. त्यांचा ग्रंथ ज्ञानाचा अनमोल खजीना आहे.
           या प्रुथ्वीतलावर क्षत्रियच उरला नाही, असे धर्ममार्तंड माणतात. त्यांचा हा अहंमगंड त्यांच्याच जातीतील माजी पोलिस प्रताप जोशी(IPS) यांनी खोडून काढला आहे. ते लिहितात : परशुरामाने २१ वेळा क्षत्रियांचा संहार केला हे काल्पनिक आहे. त्रेतायुगातील परशूरामाने कोकण भुमीची स्थापणा केली, ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. ग्रीक लोक व्यापाराच्या निमित्ताने भारताच्या किणार्यावर इ.स.६४३ ते ६५६ या दरम्यान आले. त्यातील काही लोकं कारणास्तव १४ लोकं म्रुत झाले. परशूरामाने त्या १४ लोकांना जीवंत केले व त्याचे स्थानिक स्त्रियांशी लग्न लावून दिले, अशा स्वकल्पनेनेरचलेल्या कथा खोट्या आहेत. अशाच कथा पुरंदरेे  यांनी त्यांच्या ग्रंथात रचलेल्या आहेत.
          आता एक नवीन संशोधन समोर आले आहे. पुण्यातील राम पायगुडे यांचा " परशूराम नव्हे, तर जामदग्न्य राम" अशा शिर्षकाचा प्रदिर्घ लेख इ.स.२००५ च्या "शिवराय" या विशेषकांत प्रसिद्ध झालेला आहे. त्यात जामदग्न्य राम हा क्षत्रिय राजा होता. त्याने २१ वेळा क्षेत्र संहार केला नाही तर २१ इंद्रियांवर ताबा मिळवला होता. परशूराम हा पुरुष जन्माला घालून त्याला ब्राह्मणांनी चिरंजीवित्वही बहाल करण्यात आलं आहे.
               इतिहास संशोधक, इतिहासकार डॉ.जयसिंगराव पवार जेम्स लेनच्या ग्रंथाला शिवचरित्र मानत नाहीत. लेनचा ग्रंथ म्हणजे शिवचरित्राचा अभ्यास आहे. लेन पुर्णत: बखरी, दंतकथा यावर अवलंबून आहे. शिवाजी महाराजांच्या पित्रुत्वाबद्दल कुणी तरी हेतुत: कुचाळकी सांगुण ती ग्रंथात घालण्यास प्रव्रुत्त केले असावे. जो घाणेरडा मजकूर होता, तो विनोद होता असे लेन म्हणतो, लेनला मुळ सुत्रधाराला पाठीशी घालावयाचे आहे.
          डॉ.जयसिंगराव पवार यांनी लेनचे विधान व विचारवंतांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. जेम्स लेनच्या ग्रंथावर हल्ला करून त्याच्या विक्रुत विधानांना चव्हाट्यावर आणण्याचे पहिले धाडस साप्ताहिक "चित्रलेखा" चे संपादक श्री ज्ञानेश महाराव यांनी दाखवले. २२ डिसेंबर २००३ च्या "चित्रलेखा" च्या अंकात "विदेशी पुस्तक व देशी मस्तक" या शीर्षकाखाली त्यांची लेनचे विधान प्रसिद्ध करून शिवरायांप्रमाणेच जिजाऊमातेला दैवत मानणार्या काळजाला अस्सल कोब्रा नाग डसावा अशी ही पिचकारी आहे.
           डॉ.जयसिंगराव पवारांनी थोर समाजवादी नेते प्रा.मधू दंडवतेंची प्रतिक्रिया दिली आहे. प्रा.मधू दंडवते यांनी म्हंटले आहे की ऐकिव दंतकथा किंवा कुटाळकीने पसरवलेल्या महान व्यक्तीच्या जीवनाबद्दलच्या अफ़वा हा इतिहासाचा आधार होऊ शकणार नाही, हा संकेत पाळला गेला नाही तर इतिहास लेखणाची विश्वासार्हता संपुष्टात येईल. नागरिकांची सहिष्णुता आणि इतिहासकारांची विश्वासार्हता यांची सांगड हिच इतिहास संशोधनाची खरी आधारशिला होऊ शकते. सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव यांनी म्हंटले आहे की, लेनची विधाने म्हणजे त्याच्या विद्वत्तेची दिवाळखॊरीच होय. विचारवंत व पत्रकार श्री मुकुंदराव किर्लोस्कर यांनी लिहिले आहे की, लेनची विधाने अत्यंत खोडसाळ व हेतुपुर्वक गैरसमज निर्माण करणारी आहेत,विलक्षण चिड यावी अशी आहेत.
            विचारवंत प्रा.सोनाळकरांनी लेनच्या विक्रुत मनोभुमिकेवर हल्ला करताना म्हंटले आहे : लेनसारखी विधाने काही विशिष्ट जातीची मंडळी महाराष्ट्रात खाजगीत करत असतात. त्यामागे वर्णवर्चस्व मनोभुमिका आहे. इतकी थोर, बुद्धिमान, कर्त्रुत्ववान व्यक्ती फ़क्त आमच्याच जातीत जन्माला येवू शकते. बुद्धिमत्तेचा सारा ठेका फ़क्त आमच्याकडेच आहे. महाराष्ट्रातील सगळी कर्त्रुत्ववान माणसे आमच्यात जातीत जन्माला आलेली आहेत, मग हा अपवाद कसा ? कदाचित याचे मुळ आमच्याच जातीत असेल अशी ही घ्रुणास्पद विक्रुत मनोभुमिका आहे.
थोर विचारवंत न्या.बी.जी.कोळसे पाटील म्हणतात की इतका कुचका मेंदू, इतकी नीच मनोव्रुत्ती व विक्रुत प्रव्रुत्ती या देशात विशेषत: पुण्यात का निर्माण होते याचे संशोधन इतिहासकारांनी, मानसशास्त्रज्ञांनी, समाजशात्रज्ञांनीही करण्याची गरज आहे.
          वरील सर्व विचारवंतांचे विचार डॉ.जयसिंगराव पवार यांनी डॉ.वसंतराव मोरे यांच्या "जेम्स लेन संशोधक की विध्वंसक ?" या पुस्तकामध्ये प्रदिर्घ प्रस्तावनेत दिलेले आहे. 
डॉ.जयसिंगराव पवार यांनी आणखी काही विचारवंतांचे विचार दिले आहेत. भांडारकर संस्थेवरील हल्ल्याबाबत मुंबईच्या विदुषी डॉ.वर्षा शिरगावकर लिहितात: आपण एखाच्या व्यक्तीला दैवी पातळीवर बसवतो, तेंव्हा तिच्याबद्दल विश्लेषणाचा आमच्या मनात कधीच विचार येत नाही. त्या व्यक्तीबद्दल कोणी विश्लेषणात्मक काही लिहिले तर आमच्या अभिमानाचा अंगार इतका फ़ुलतो की त्याचा वणवा होतो. अमुक विशिष्ट ऐतिहासिक व्यक्तींबद्दल लिहिणे ही आमचीच मक्तेदारी असून इतरांनी तसा प्रयत्न केल्यास आम्ही पुरावे नष्ट करू, असा दहशतवाद पसरवू की, परत कोणी आमच्या अतीव प्रितीच्या व्यक्तीबद्दल लिहिण्याचे धाडस करणार नाही. ही व्रुत्ती पाशवी व्रुत्तीपेक्षा वेगळी नाही. इतिहास संशोधन ही कोणाची मक्तेदारी नाही (दैनिक.महाराष्ट्र टाईम्स : दि.१६ जानेवारी २००४)
             पत्रकार व विचारवंत श्री प्रकाश बाळ म्हणतात, आपला समाज परंपरागत, पुराणमतवादीच राहिला. राज्यसंस्था मात्र आधुनिक बनत गेली. अशा परिस्थितीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याला या परंपरा व पुराणमतवादाच्या मर्यादा पडल्या. जेम्स लेनसारखे रस्त्यावरच्या गोष्टी ऐकूण. लेनची विधाने कागदपत्रांच्या आधारावर केलेली नाहीत. इतिहास लेखनशास्त्राशी तो प्रामाणिक राहिलेला नाही.
७ फ़ेब्रुवारी २००४, NDTV वर Big Fight या कार्यक्रमात शिवसेनेचे नेते श्री संजय निरूपम, राष्ट्र्वादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, "लोकसत्ता" चे संपादक कुमार केतकर होते. चर्चेचा विषय : भांडारकर संस्थेवरील हल्ला : कुमार केतकरांची भुमिका : हि पुस्तकबंदी केवळ लोकशाहीविरोधी नव्हे तर संस्क्रुतीविरोधी आहे. अशा मार्गाने जाणारे शेवटी बुद्धाच्या मुर्त्या फ़ोडणारे तालिबानवादीच होणार. भांडारकर संस्थेवरील हल्ला हा केवळ रानटीपणा असून पुस्तकावरील बंदी ही हुकुमशाहीचे निदर्शक आहे. आपण लोकशाहीत राहतो, आम्ही संस्क्रुती, परंपरा व विचारस्वातंत्र्य यांची बुज ठेवली आहे. विचाराला विचाराने, पुस्तकाला पुस्तकाने उत्तर दिले पाहिजे, दगडाने नव्हे !
             पण जिथे विकार आहे, विक्रुती आहे तिथे काय करायाचे ? केतकर म्हणतात : विक्रुत लेखन करणार्या लेखकांची उपेक्षा केली पाहिजे. हे केतकर यांचे बालीश उत्तर आहे. थोर स्त्रिच्या चारित्र्यावर जर तो किंवा इतर कोणी हल्ला करत असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर होत आहे. भांडारवरील हल्ला हा हिंसात्मक, रानटी नाही काय ?
             ब्राह्मणेत्तरांच्या मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांसारख्य़ा संघटना या ब्राह्मणी वर्चस्वाविरोधात सतत दंड थोपटून उभ्या आहेत. या उलट ब्राह्मणवाद्यांचे प्रयत्न गनिमी काव्याचे, भुमिगत स्वरुपाचे आहेत. आज ब्राह्मण - ब्राह्मणेत्तर या दोन समजाच्या सरम्यान संशयाचे व अविश्वासाचे धुके निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात इतिहास संशोधन व लेखन या क्षेत्रात ब्राह्मण आघाडीवर होते. रामदास हा शिवरायांचा गुरु नव्हता, हे ब्राह्मण लेखक प्रा.न.र.फ़ाटक यांनी त्यांच्या पुस्तकार निदर्शनास आणुन दिले आहे.
            भांडारकरवरील मंडळींनी लेनला मदत करणार्यांची नावे पुण्याचे श्री म.अ.मेहंदळे यांनी एका लेखात दिलेली आहे. ही माहिती दैनिक सकाळ दि.३ जुन २००४ मधली आहे.ती नावे अशी आहेत. ग्रंथपाल श्री वा.ल.मंजुळ, डॉ.श्रीकांत बहुलकर आणि सुचेता परांजपे, श्री मंजुळ यांनी लेन ला ग्रंथ उलपब्ध करून दिले. डॉ.बहुलकर याने त्याला "शिवभारत" या संस्क्रुत ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर करण्यात सहाय्य दिले आणि डॉ.परांजपे यांनी त्याला मराठी शिकवले.
संदर्भग्रंथ :
राजा शिवछत्रपती ,आव्रुत्ती १४ वी,२००१.[बाबा पुरंदरे], शिवशाही[प्रा.मा.म. देशमुख], शिवधर्म[प्रा.मा.म. देशमुख], शिवछत्रपती एक मागोवा[डॉ.जयसिंगराव पोवार], मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज[डॉ.सुभाष के.देसाई], जेम्स लेन :संशोधक की विध्वंसक[डॉ.वसंतराव मोरे], ब्राह्मण द्वेष्टा जेम्स लेन[प्रा.विष्णूदास एच.मगदूम], शिवाजी राजेंचे खरे शत्रू कोण ?[प्रा.श्रीमंत कोकाटे], शिवाजी आणि शिवकाळ [सर जदुनाथ सरकार], छ.शिवाजी आणि त्यांची प्रभावळ[सेतु माधवराव पगडी], छ.शिवाजी की साहित्यिक प्रतिमा. कितनी सही, कितनी प्रेरक[डॉ.वसंतराव मोरे], जेम्स लेन च्या पुस्तकावर विद्वानांची मते.,महाराष्ट्रातील वार्तापत्रे आणि विद्वानांची मत

19 March 2013

सनातनी ब्राह्मण आणि पुरोगामी ब्राह्मण एकच..

माझ्या मते सनातनी ब्राह्मण आणी पुरोगामी ब्राह्मण यांच्यात फ़रक करणे मुर्खपणाचे लक्षण आहे.ते दोघे एकच आहेत.ते एकाच शरीराच्या दोन भुजा आहेत आणि एकाला वाचवण्यास त्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी झगडा करायला सुद्धा ते कटिबद्ध आणि वचनबद्ध असतात.
- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
आज सतत असे म्हंटले जाते की,सगळे ब्राह्मण वाईट नाहीत.आंतरजालावर तर हा मुद्दा कायमच असतो.थोड्या लोकांमुळे सर्व समाज कसा काय दोषी असू शकतो ?,सगळेच ब्राह्मण वाईट आहेत का ? काही चांगले ब्राह्मण देखील असतात.अगदी बरोबर ! सगळेच ब्राह्मण वाईट नसतात,काही चांगले ब्राह्मण देखील असतात,होते आणि असतील देखील,पण जेंव्हा शिवरायांची बदनामी एखादा ब्राह्मणच करतो तेंव्हा चांगले ब्राह्मण कोठे जावून बसतात कोणाच ठाऊक.जेंव्हा विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी झाली तेंव्हा पुरोगामी -चांगले ब्राह्मण कोठे गेले होते ? शिवरायांच्या बदनामी कटातील  भांडारकर संस्थेवर जेंव्हा संभाजी ब्रिगेड ने कारवाई केली तेंव्हा ब्राह्मणांसह बहुजनांनीदेखील संभाजी ब्रिगेड वर टिका केली.तेंव्हा एक तरी पुरोगामी ब्राह्मण भांडारकरवरील संभाजी ब्रिगेड चा हल्ला निषेधार्ह असेल तर शिवरायांची बदनामी करण्यार्यांचा निषेद करण्यासाठी पुढे का आले नाहीत ? अनेक मराठ्यांनी संभाजी ब्रिगेडचा निषेद केला.तेंव्हा एका तरी पुरोगामी ब्राह्मणाने शिवरायांची बदनामी करणार्या पुरंदरे, बेडेकर, लेन, भांडारकर संस्था यांचा निषेद का केला नाही ? याउलट पुरोगामी ब्राह्मण भांडारकर संस्थेच्या मदतीला धावले. त्यामध्ये डॉ.श्रीराम लागू, कुमार केतकर, डॉ.नरेंद्र दाभोळकर, कुमार सप्तर्षी, अनंत दीक्षित इत्यादी पुरोगामी ब्राह्मण आहेत.डॉ.श्रीराम लागू,कुमार केतकर इत्यादी पुरोगामी ब्राह्मणांनी भांडारकर संस्थेला आर्थिक मदत केली.
लाल महालातील "जिजाऊ - शिवबा" पुतळ्याशेजारील दादू कोंडदेवाचा पुतळा काढण्याचा निर्णय महानगरपालिकेने कायदेशीर बाबी पुर्ण करून घेतला.तेंव्हा पुणे मनपाचे कायदेशीर सल्लागार एड.अभ्यंकर यांनी या बाबीचा निषेद म्हणून राजीनामा दिला.नगरसेवक शाम देशपांडे,उज्वल केसकर,प्रा.मेधा कुलकर्णी, मुक्ता टिळक यांनी दादू कोंडदेवाचा पुतळा काढण्यास विरोध केला.पुतळा काढू नये म्हणुन शिवसेनेच्या आमदार डॉ.निलम गोर्हे या लालमहालाबाहेर तीन दिवस पहारा देत होत्या.आमदार निलम गोर्हे या स्त्रीवादी आहेत.स्त्रियांना हक्क अधिकार मिळावेत यासाठी लढत असतात.स्त्रियांवर कोठे अन्याय झाला तर त्या त्यांच्या मदतीला धावून जातात.पण जेंव्हा जिजाऊंची बदनामी झाली तेंव्हा त्या रस्त्यावर आल्या नाहीत.बदनामी करणार्यांचा निषेद केला नाही.जिजाऊ माता कोणत्या जातीच्या आहेत, कोणत्या धर्माच्या, पंथाच्या आहेत याचा विचार न करता त्या एक स्त्री आहेत.त्या स्त्री ची बदनामी होत असताना स्त्रीवादी नेत्या निलम गोर्हे जिजाऊमातांच्या नव्हे तर दादू कोंडदेवाच्या मदतीला आल्या.दादू कोंडदेवाचा पुतळा काढल्याच्या निषेधार्थ निलम गोर्हे यांनी पुण्यात दंगल घडविण्याचा कट केला.त्याबद्द्ल पुणे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.सांगा ब्राह्मण खरेच चांगले आणि पुरोगामी आहेत का ? स्त्रीभ्रुणहत्या करणारे परळीचे डॉ.सुदाम मुंडे यांच्या निषेधार्थ बीडच्या आ.उषा दराडे आणि सुशीलाताई मोराळे ह्या डॉ.मुंडे यांच्या विरोधात निषेद करण्यासाठी रस्त्यावर आल्या.ही नैतिकता आणि प्रामाणिकता आ.निलम गोर्हे, मेधा पाटकर यांच्याकडे कधी येणार ? स्त्री ची बदनामी करणार्या पुरंदरे आणि बेडेकर यांच्याविरोधात आ.गोर्हे, विद्या बाळ, मेधा पाटकर कधी मोर्चा काढणार आहे का ? यावरून स्पष्ट होते की ब्राह्मण स्त्रिया देखील ब्राह्मणी व्यवस्थेच्या बळी आहेत.जगातील सर्व स्त्रीयांचा आदर सन्मान झाला पाहिजे.शिवरायांनी शत्रुंच्या स्त्रीयांचा देखील आदर केला.त्यांच्या मातेची बदनामी करणार्यांचा निषेद करण्यासाठी एकही पुरोगामी ब्राह्मण किंवा ब्राह्मण स्त्री पुढे आली नाही.दादू कोंडदेव शिवरायांचे गुरु नव्हते असे नगरसेवक रविंद्र माळवदकर पुणे मनपात म्हणाले तेंव्हा नगसेविका मेधा कुलकर्णी ढसाढसा रडल्या असेही आम्हांस ऐकावयास मिळाले.जिजाऊंची  बदनामी झाली तेंव्हा कुलकर्णी रडल्या नाहीत.मराठी साहित्य संमेलनाचे उमेदवार पुरोगामी ब्राह्मण ह.मो.मराठे याने शिवरायांबद्दल गरळ ओकले (शेण खाले इ.स.२०१२) तेंव्हा त्यांच्यावर संभाजी ब्रिगेडने पोलिस कारवाई केली.
यावरूनच स्पष्ट होते की शाहू महाराजांनी जे म्हंटले आहे की ब्राह्मण हा ब्राह्मणच असतो हे खरे आहे.बाबासाहेब आंबेडकरांनी म्हंटल्याप्रमाणे पुरोगामी ब्राह्मण निर्णायक क्षणी प्रतिगामी ब्राह्मणांच्या मदतीला धावतो.तो कधीही सत्याच्या, बहुजनांच्या बाजुने उभा राहत नाही.पुरोगामी ब्राह्मणांनी माझा आरोप खोटा ठरावा इतक्या चांगल्या पद्धतीने वागावे ही अपेक्षा.

15 March 2013

पहिले स्वातंत्र्य योद्धा : छत्रपती शिवाजीराजे भोसले

               इंग्रजांच्या विरोधात १८५७ साली झालेल्या उठावाचा भारतीय इतिहासकारांनी "भारतीय स्वातंत्र्याचा श्रीगणेशा" म्हणुन खुपच उदो उदो केला आहे आणि त्या उठावातील काहीजणांचे इतके उदात्तीकरण करण्यात आले आहे की, एका विशिष्ट समाजापलिकडे भारतीय स्वातंत्र्याबाबत कुणालाही जाणीव नव्हती असे वाटू लागले.खारे पाहता प्रत्यक्ष १८५७ उठाव हे भारतीय स्वातंत्र्यासाठी केले बंड होते की धार्मिक भावना दुखावल्याने निर्माण झालेले बंड होते याचा मागोवा घेतला पाहिजे.इतिहासाचा निरपेक्षपणे अभ्यास केला तर स्पष्ट्पणे जाणवते की भारतीय स्वातंत्र्यासाठी पहिला उठाव त्याच दिवशी झाला ज्या दिवशी शिवरायांनी तोरणागड जिंकला आणि भारतीय स्वातंत्र्याचे तोरण बांधले.म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचे तोरण इ.स.१६४६ मध्ये तोरणगड जिंकुणच बांधले गेले."साम्राज्यशाही विरुद्ध बंड उभारुन स्वराज्याची पहिली मुहुर्तमेढ छ.शिवाजी महाराजांनी रोवली. - मार्शल बुल्गानिन (मा.पंतप्रधान- रशीया)"
 शिवरायांच्या इ.स.१६४६ मधील इस्लामी राजवटी विरोधातील उठावास भारतीय स्वातंत्र्याचा पहिला उठाव म्हणुन संबोधावे लागेल.कारण अखेर इस्लामी राजवट ही अभारतीय होती, परकीय होती.भारतात भारतीयांची राजकीय व्यवस्था (सत्ता) अभिप्रेत ठरविल्यास अन्य सर्व राजवटी परकीय ठरतात.परकीय राजवटीतून भारताची व भारतीयांची मुक्तता करण्यासाठी झालेला प्रत्येक प्रयत्न हा भारतीय स्वातंत्र्यासाठीच झालेला प्रयत्न ठरतो.इंग्रज परकीय होते.म्हणूण त्यांच्या विरोधातील उठाव भारतीय स्वातंत्र्यासाठी ठरतो तर मग त्या इंग्रजांच्या आधी आलेले आणि नंतर प्रशासक म्हणून प्रस्थापित झालेले परकीय ठरत नव्हते काय ? परंतू वर्णवर्चस्ववादी इतिहासकारांना छत्रपती शिवरायांना "पहिले भारतीय स्वातंत्र्य योद्धा" ठरवणे अडचणीचे गेले असावे.कारण त्यातून भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाच्या प्रारंभाचे श्रेय मराठ्यांकडे गेले असते.मग काहीही न करता स्वातंत्र्याचे श्रेय लाटता येत नसते.
            छत्रपती शिवरायांनी अभारतीय राजवटी विरोधात तोरणा किल्यावर स्वातंत्र्याचे निशाण फ़डकवले.ही घटना भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेल्या प्रयत्नातील पहिली घटना होय.असे नमुद केल्यावर काहीजन दुखावतील हे निश्चीत त्याबद्दल क्षमस्व !.यावर असा आक्षेप घेतला जाऊ शकतो की त्यावेळी राज्य व राजवटी होत्या.तशी महाराष्ट्रातही मराठी राज्य स्थापन करण्यासाठी ,एक राजवट स्थापन करण्याचा शिवरायांनी प्रयत्न केला.तथापि त्याला सकल भारतीय स्वातंत्र्यासाठी केलेला प्रयत्न कसा म्हणता येईल ? या प्रश्नाचे उत्त्तर अगदीच सोपे आहे.भारतात वेगवेगळी राजे व राजवटी असल्या तरी भारताच्या केंद्र स्थानावरून दिल्लीवरून होणारा कारभार हा अखेर अभारतीय राजवटीखालीच होत होता जिच्या विरोधात शिवरायांचा उठाव होता.शिवरायांचे लक्ष केवळ महाराष्ट्रात मराठा साम्राज्य स्थापन करण्याइतके सीमित नव्हतेच. त्यांच्यावर तसा आरोप करणे कमालीचे संकुचितपणाचे होईल.शिवाय महाराष्ट्राबाहेर जाऊन गुजरात, कर्नाटक, ओरिसा याही प्रदेशावर स्वार्या करतात आणि दिल्लीशहाच्या भेटीला जाण्यात त्यांचा हेतू असाही असू शकतो की उद्या अखील भारतावर करण्याची संधी मिळाली तर दिल्लीवर स्वारी करण्यासाठी ज्या मार्गाने जावयाचे आहे.तो मार्ग आधीच नजरेखालून घातलेला बरा.या उद्देशानेच ते दिल्लीला गेले व आग्र्यावरून सुटका करून घेतल्यानंतर बिहार मार्गे परतले असण्याची शक्यता आहे.
        भारतीयांचे विशेषत: महाराष्ट्रिय जनतेचे दुर्दैव की शिवरायांसारख्या महापुरुषांना दिर्घायुष्य लाभले नाही,स्वजनांचे सहकार्य लाभले नाही.
सर्वधर्म समभाव की धर्मांधता ?
       धार्मिक व राजकीय स्वार्थापुरता विचार करणारे "विचारवंत" छत्रपती शिवरायांच्या सामाजिक उल्लेखाकडे दुर्लक्ष करतानाच शिवरायांच्या धर्मविषयक द्रुष्टीकोनाकडेही अत्यंत पुर्वाग्रहदुषीत व उपेक्षीत द्रुष्टीनेच बघतात.शिवराय सर्वधर्मसमभाव पाळत होते की धर्मांध होते ?.
          यशस्वी राज्यकर्या हा धर्मांध असून चालत नाही,हा संदेशच जणू शिवरायांनी आपल्या चरित्रात दिलेला आहे.शिवरायांच लढा हा इस्लाम धर्म व सर्व सामान्य मुसलमान याच्या विरोधात नव्हताच.त्यांचा लढा स्वराज्यासाठीचा होता.तो इस्लामी राजवटी विरोधात होता.भारतात हिंदू धर्मातील छळाला कंटाळून शुद्र वर्णातील अनेकांनी मध्ययुगीन काळात बुद्ध धम्माचा स्वीकार केला होता.भारतामध्ये अनेक संप्रदाय निर्माण होण्याची कारणे ही सुद्धा शुद्र वर्णातील लोकांना मिळणार्या हिनसकतेच्या वागणुकीमध्येच होती.शुद्रांना हिनसकतेमध्ये ठेवण्यासाठी ज्याप्रकारे ज्ञान संपादनाची मनाई करण्यात आली होती,त्याचप्रमाणे कर्मकाडांदी निराधार प्रकारांची निर्मीती करण्यात आली होती.वैशिष्ट्ये म्हणजे साराच प्रकार धर्माच्या नावाखाली चालत होता.अशा धर्मात शिवरायांनी जन्म घेतला होता हे सत्य असले तरी त्या धर्माची धर्मांध भुमिका स्विकारून त्यांनी व्यवहार केल्याचे एकही उदाहरण संपुर्ण शिवचरित्रामध्ये किंवा इतिहासामध्ये शोधून सापडणार नाही.याउलट त्यांची अन्य धर्माबाबतची भुमिका ही आदराची व सर्वधर्मसमभावाचीच आढळते.
          अजुन महत्वाचे म्हणजे शिवकालीन संघर्ष हा हिंदू विरुद्ध मुस्लिम असाही नव्हता.त्यांचे मुळ कारण त्यापुर्वी सुमारे सहाशे वर्षे अगोदर आलेले मुस्लिम हे या मातीशी समरस झालेले होते.सुफ़ी संप्रदायाने तर निखळ मानवतावादाची पेरणी केली होती.जगदगुरु संत तुकाराम महाराजां प्रमाणेच कुळशी येथील मुस्लिम संत बाबा याकुत हे शिवाजी महाराजांचे प्रेरणास्थानी होते.काशीनाथ आठल्ये यांनी "महाराष्ट्राचा राजा : छ.शिवरायांचे चरित्र" या पुस्तकाच्या प्रुष्ठ २१९ वर शिवरायांनी गुरुस्थानी मानलेल्या सत्पुरुषांची यादी दिली आहे.त्यात बाबा याकुत केळशीकर या नावाचा उल्लेख आहे.इतकेच नव्हे प्रुष्ठ २२५ वर  बाबा याकुत यांस आपले गुरु केले असे नमुद केले आहे.क्रुष्णराव केळूसकर लिखित शिवचरित्रातही बाबा याकुतांचा उल्लेख आहे.रियासतकार यांच्या "न्यू हिस्ट्री ऑफ़ द महाराज" या ग्रंथातही रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र तीरावर बागकोटच्या खाडीशी असलेल्या केळशी या गांवचे बाबा याकुत असल्याचा उल्लेख आहे.(प्रुष्ठ १३ ) या सर्व बाबीवरून समजून येईल की  शिवराय व त्यांचे पुर्वज यांचे इस्लाम धर्म आणि सर्व सामान्य मुस्लिम यांच्याशी वैर नव्हते आणि स्वातंत्र्याचा उठाव हा इ.स.१८५७ मध्ये नसून इ.स.१६४६ मध्येच झाला आणि भारतीय स्वातंत्र्याचे पहिले योद्धे विश्ववंद्य कुळवाडीभुषण छ्त्रपती शिवाजी महाराज आहेत.
जय जिजाऊ । जय शिवराय । जयोस्तु मराठा । जय महाराष्ट्र

9 March 2013

इतिहासातील अनमोल रत्न : बळीराजा

            शेतकर्यांच्या द्रुष्टीकोनातून बळीराजाचा इतिहास नीट समजून घेणे आवश्यक आहे.भारतातील समाजाचा सांस्क्रुतीक, सामाजिक, वगैरे प्रकारचा इतिहास जाणुन घेण्यासाठी प्रस्तुत लेखाचा प्रपंच महात्मा जोतिराव फ़ुले यांनी दस्युचा पोवाडा लिहिला आहे.त्यांच्या तिसर्या कडव्याची सुरुवात "बळी राजादि कुळ स्वामीला" या शब्दांनी केलेली आहे.याचाच अर्थ बळीराजाला ते आपल्या अत्यंत आदरणीय पुर्वज मानतात.बळी ! एक लोक कल्याणकारी राजा,मानवतावादाचा महान पुजारी,दानशूर,विश्वबंधुत्वाचे आचरण करणारा भारताच्या इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व.सुमारे साडेतीन हजार वर्षापुर्वी होऊन गेलेला बहुजन समाजाचा एक महासम्राट बळीराजा.ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण गमावले,पण तत्वांशी तडजोड केली नाही.आपल्या जीवात जीव असे पर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिला.बहुजन समाजावर कोणतेही अत्याचार होऊ दिले नाहीत.पण आपण मात्र धन्य की आपण आपल्याच डोळ्यादेखत आपल्याच राजाचा अपमान सहन करत आलो आणि सहन करत आहोतच. आपण आज खॊट्या नाट्या पुराण कथांना बळी पडलो आहोत.स्वत:चे डोके कधी वापरतच नाही.आपण आपल्या राजासाठी कायमची ह्रुदये बंद करून टाकलीत.
बळीराजाच्या काळात शेतकरी अतिशय सुखी व संपन्न होता.आपल्याकडे सुपीक शेतीमध्ये सर्व जनतेला ज्ञान होते.शेतकर्यांना सर्व ज्ञान असल्यामुळेच त्यांची शेती सम्रुद्ध होती.प्रजा सुखी,समाधानी व कर्तबगार होती.कुठलाच अधर्म नव्हता.शोषण विरहीत समाजरचना हे बळीराजाचे खास वैशिष्ट होते.स्त्री-पुरुष आपापल्या कुवतीनुसार आणि कौशल्यानुसार राज्याच्या सर्वच वैभवात भर टाकत असे.अत्यंत सुरेख आणि सम्रुद्ध अशी नगरे सुमारे साडेतीन हजार वर्षापुर्वी वसवली होती.दस्युचे स्वत:ची सम्रुद्ध नगरे होती.याचा अर्थ त्यांचे जीवन अत्यंत सम्रुद्ध आणि संपन्न व विकसित होते.असं हे सुखी व सम्रुद्ध राज्य परकीय आक्रमकांनी नष्ट केले.
महात्मा जोतिराव फ़ुले यांनी केलेली या कथेची चिकित्सा :-
चिकित्सा करताना फ़ुले समग्र वाड:मयात म्हणतात वामनाचा एक पाय प्रुथ्वीवर व दुसरा पाय आकाशात होता.प्रुथ्वी व आकाशातील अंतर करोडो मैल आहे.माणसाचा एक पाय जमिनीवर असल्यास तीन फ़ुट अंतरावर जाता येत नाही कारण त्याच्या पायाची लांबी व दोन पायातील अंतर मर्यादित असते.वामनाचा एक पाय प्रुथ्वीवर व दुसरा पाय आकाशात असता तर वामनाची ....फ़ाटून गेली नसती काय ? (फ़ुले समग्र वाड:मय) डॉ.आ.ह.साळूंखे - बळीवंश या पुस्तकात प्रुष्ठ क्रमांक २०१ वर म्हणतात वामनाने पहिल्या पावलाने विशिष्ट भुप्रदेशातील लोकांना यज्ञाच्या कर्मकांडात गुंतवून टाकले व दुसरे पाऊल वेदप्रामाण्य होते.लोकांनी वेदांवर विश्वास ठेवावा आणि आपली बुद्धी स्वतंत्रपणे मुळीच वापरू नये असा या पावलाचा अर्थ होता.तिसरे पाऊल बहुजनांच्या वाकशक्तिला कुंठित करून टाकणारे होते.म्हणजेच वाणी वापरण्याचा खराखुरा अधिकार ठराविक लोकांनाच असेल  आणि इतरांनी लिहिणे, वाचणे , बोलणे  या बाबतीत स्वतंत्रता राहता कामा नये असा कठोर नियम करण्यात आला.तात्पर्य यज्ञाने भुमी व्यापणे,वेदप्रामाण्याने लोकांना गुलाम करणे आणि वाणीवर एकाधिकार प्रस्थापित करणे हा वामनाच्या तीन पावलांचा खरा अर्थ आहे.
याचात अर्थ आजची आपली स्थिती सर्कशीतल्या वाघाप्रमाणे आहे.तुम्हाला ट्रेनिंग दिलय, तुम्ही तुमच्यात भांडणे करा पण चुकुनही आमच्यावर वार करू नका.तुमची नखे काढून टाकलीत.तुमच्या दाताला रक्ताची चव लागू नये म्हणून तुम्हाला पिंजर्यात कोंडून ठेवलय.एका विशिष्ट चौकटीत आपण बंदिस्त आहोत.जन्मापासून तर मरे पर्यंत आपल्याला बामन चिकटलाय.अरे आठवा आपल्या पुर्वजांचा इतिहास आणि तोडा सर्व गुलामीच्या चौकटा. कोणाच्या आदेशावर कशाला चालता.आपल्याला डोकं आहे ना ? काय खरं आणि काय खोटं तपासून घ्या.अरे कॊण दिड फ़ुट असलेला वामन आपल्या बळीराजाला मारणारा आपला देव अवतार कसा ? आजही शेतकरी बळीप्रतिपदेला "इडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे" असं म्हणतात. याचाच अर्थ बळीराजा महान असला पाहिजे आणि वामन वाईट असला पाहिजे.तेंव्हा प्रत्येक बहुजनांने बळीराजाचे गुणगान गायले पाहिजे.इतिहासातील एका अनमोल रत्न असलेल्या महात्मा बळीराजाला खरे अभिवादन हेच ठरेल.
"इडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे"  ॥ "इडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे" 

5 March 2013

सत्य इतिहास जाणुन घ्या

तुषार शिंदे
संपर्क : ७६२००६०९२२
           छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फ़ेब्रुवारी १६३० रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. रयतेला राजा मिळाला. ब्राह्मणांच्या हजारो वर्षापासूनच्या व्यवस्थेला पायदळी तुडविणारे व भारतातील बहुजन महापुरुष कुळवाडीभुषण छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या जयंती निमित्त फ़क्त ढोल - ताश्यांच्या तालात नाचण्या ऐवजी त्यांच्या विचारधारेचा प्रसार- प्रचार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सर्वांनीच वेगवेगळ्या माध्यमातून करायला पाहिजे.कुळवाडीभुषण छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घ्यायला पाहिजेत. तरच त्यांच्या विचारांचा जय होईल.कारण महापुरुषांचा जय त्यांनी आपल्या हयातीतच बघितलेला असतो.पण आजचा समाज जय-जय करण्यातच धन्य मानतो.जय शिवाजी आणी जय भवानी अशा घोषणा तोंड फ़ाटेस्तोवर देऊन स्वत:ची फ़सगत करून घेतो.
भारत देशामध्ये अनेक क्रांत्या व प्रतिक्रांत्या झाल्यात तसेच काही होऊ घातल्या आहेत.भारत देशावर विदेशी लोकांनी आक्रमन करून कब्जा केला व भारत देशाला गुलाम बनवले.येथील व्यवस्था त्यांच्या ताब्यात घेतली.हजारो वर्षापासून ही व्यवस्था परकियांच्या हाती होती.त्याविरोधात आपल्या भारतातील महापुरुष गौतम बुद्ध,सम्राट अशोका,संत कबीर,छत्रपती शिवाजी महाराज, जगदगुरु संत तुकाराम महाराज, राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फ़ुले,राजर्षी छत्रपती शाहू महाराज,विश्वभुषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,संत गाडगेबाबा,साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे या महापुरुषांनी लढा दिला.आपल्या या महापुरुषांचे आंदोलन आपल्याला पुढे न्यायचे आहे आणि यशस्वी करायचे आहे म्हणून या विचाराची प्रेरणा आपण घेतली पाहिजे.यातच आपला उद्धार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी या व्यवस्थेच्या विरोधात खुप मोठा संघर्ष केला.येथील भुमिपुत्रांना स्वातंत्र्याच्या आस्तित्वाची जाणीव करून दिली.१६३० ते १६८० या अर्धशतकाच्या कालावधीत त्यांनी इतिहास घडविला.शिवरायांना त्यांच्या आई जिजाऊमाता यांची प्रेरणा मिळाली होती तसेच वडील शहाजीराजांनी त्यांना सर्व युद्धाची सर्व तंत्रे शिकवली होती.छत्रपती शिवाजी राजे संत तुकारामांना गुरु मानत.छत्रपती शिवरायांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत जात-पात, धर्म न मानता भुमिपुत्रांसाठी लढा दिला.थोडक्यात सांगायचे म्हणजे शिवरायांनी समता,बंधुता व न्यायाची शिकवण भुमिपुत्रांना दिली.खरच छत्रपती शिवरायांचे कार्य महान होते.
आज या भटाळलेल्या देशात आणि विशेषत: महाराष्ट्रात अशा या थोर महापुरुषाचा वापर आपले लोक,नेते,पुढारी जनतेला भावनिक बनवून स्वार्थसाठी फ़ायदा करून घेत आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन महाराष्ट्रात अनेक संघटना व पक्ष पुढे आले आहेत.पण त्यांना छत्रपतींच्या कार्याबद्दल तसेच त्यांच्या बदनामीच्या विरोधात बंड करणे याविषयी काहीही गंभीरता वाटत नाही.
"शिवाजी - हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया" हे पुस्तक जेम्स लेनकडून लिहुन घेणार्या १४ भांडारकरी ब्राह्मणांना धडा शिकवण्यासाठी सर्वांचीच पाठफ़िरवणी झाल्याची दिसून येते.हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊमाता यांच्या बदनामीचे ब्राह्मणी षडयंत्र होय.या विरोधात आपण आवाज उठविला पाहिजे.छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास आपण जाणुन घ्यावा कारण शिवरायांचा खोटा इतिहास या षडयंत्रकारी ब्राह्मणांच्या सांगण्यावरून सांगण्यावरून जेम्स लेनने लिहिला आहे.शिवरायांचे गुरु त्यांची आई,वडील आणि जगदगुरु संत तुकाराम महाराज असतानांही दादू कोंडदेव आणि रामदास यांसारखी माणसं त्यांचे गुरु म्हणुन लादले गेले.कुठे आहे आमचा शिवप्रेमी समाज ? शिवरायांची बदनामी करणारे साहित्य लिहिले जात आहे.त्यांचा खोटा इतिहास सांगितला जात आहे.आजही आंतरजालावर अशा संघटना कार्यरत आहेत ज्या कायम खोटा प्रसार करत असतात व इतिहासाचे विक्रुतीकरण करत असतात.शिवरायांच्या नावाचा दुरुपयोग केला जात आहे.तेंव्हा छत्रपतींच्या मावळ्यांनी आता जाग्रुत व्हायला पाहिजे.
छत्रपती शिवरायांच्या बदनामी विरोधात लढणार्या व त्यांचे कार्य व खरा इतिहास सांगणार्या संघटनांमुळे शिवरायांची खरी चळवळ जीवंत आहे.ही चळवळ वाढविण्याची जबाबदारी आम्हा मावळ्यांची आहे.म्हणून एवढे सांगावेसे वाटते की छत्रपती शिवराय कोणत्या जाती - धर्मासाठी लढले नव्हते, ते खर्या अर्थाने आपल्या रयतेच्या हितासाठी लढणारे राजे होते.पुर्वी शिवरायांनी खुप संघर्ष केला आहे मग तो वैदिक ब्राह्मणांच्या विरुद्ध असो नाहीतर मुस्लिमांच्या विरुद्ध असो.पण शिवरायांना मुस्लिम विरोधी दर्शवण्याचे काम ब्राह्मण इतिहास लिहिणार्यांनी केले आहे.शिवराय हे विखुरलेल्या देशबांधवांसाठी व त्यांच्या ऐक्यासाठी झगडले होते.तेंव्हा जाती-धर्म विसरून एकिने लढून शत्रुंना धडा शिकवण्यास सज्ज झाले पाहिजे.आपला इतिहास आपला वारसा आहे.इतिहास जाणुन घ्या व मुक्तीचा मार्ग स्विकारा .या व्यवस्थेच्या मुळावर घाव घातल्याशिवाय आपला देश या गुलामगिरीतून मुक्त होणार नाही.हा देश छत्रपती शिवरायांचा आहे तेंव्हा इथे त्यांचीच व्यवस्था आम्हाला पाहिजे.
जय जिजाऊ । जय शिवराय