30 May 2013

स्वराज्याचे शिलेदार - सेनापती संताजी घोरपडे

           संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे (१६८९ ते १६९७) सरसेनापती होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची धूरा वाहिली. संताजी घोरपडे हे नाव धनाजी जाधव यांच्यासोबत मराठेशाहीत घेतले जाते. या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घ काळ (१७ वर्षे) औरंगजेबच्या बलाढ्य सेनेचा सामना केला,मुघल सैनिकां मध्ये संताजी आणि धनाजी यांची प्रंचड दहशत होती. सार्वत्रिकरीत्या मुघल छावण्यांवर हल्ले हे त्यांच्या युद्धनीतीचा भाग होते. अत्यंत नाजूक पडत्या काळात मराठ्यांचे स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचवले व जसजसे औरंगजेबचा प्रतिकार क्षीण होत गेला तसतसे नंतर धनाजींनी स्वराज्य पसरवण्याचे धोरण अवलंबले. १७०७ मध्ये औरंगजेबच्या मृत्यू समयी मराठ्यांनी मध्य भारतापर्यंतचा भूभाग स्वराज्यात आणला होता. शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या स्वराज्याला संताजी व धनाजी यांनी वाचवले व पसरवले. मराठ्यांनी १८ व्या शतकात जवळपास संपूर्ण भारतावर आपला दरारा निर्माण केला. त्यांच्या एका मोहिमेचा हा किस्सा ....... 
           शंभूराजानंतर राजाराम महाराजांनाही आता औरंगजेब वाट मोकळी करत नव्हता त्यामुळे पन्हाळ्या वरूनच राजाराम महाराज राजकारभार पाहत होते. सर्व मराठा मावळ्यांमध्ये एक शल्य होते आणि ते म्हणजे संभाजी महाराजांसाठी काहीच करू शकलो नाही ,मनात ठासून राग भरला होता पण याला पर्याय काय ? कोण घेणार पुढाकार ? कोण राखणार स्वराज्य ? कोण राखणार शिवरायांची शान ? कोण मिळवून देणार मावळ्यांचा आत्मविश्वास ? आणि याचा उद्रेक शेवटी होणार तो झालाच.मराठा सरदारांच्या गुप्त बैठका सुरु झाल्या.. कसे उट्टे काढायचे ? कसा बदला घ्यायचा ? त्या औरंग्याची दात घशात कशी घालायची ? कसे दाखवायचे मराठ्यांचे सळसळते रक्त ? कोण येणार पुढे ? गुप्त सल्लामसलतीमध्ये आघाडीवर होते संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव, सोबतीला संताजींचे दोन बंधू बहिर्जी आणि मालोजी सोबत विठोजी चव्हाण तसेच आणखी काही शूर सेनानी..या गुप्त बैठकीत धाडसी बेत ठरला कि औरंग्याला त्याचाच छावणीत घुसून लज्जित करायचा..त्याचा पाडाव करायचा. त्यात सोन्याहून पिवळी एक गोष्ट म्हणजे शंभूराजांचा बदला तुळापुर येथेच करायचा कारण औरंग्या इथेच होता.. (तुळापुर जिथे संभाजीराजांना मारण्यात आले) चर्चा झाली.. निर्णय ठरला.. धनाजीरावांकडे पाहत संताजी घोरपडे म्हणाले “खानाचा माज तुम्ही जिरवा फलटणला आणि मी खुद्द २००० निवडक मावळ्यान्सोबत औरंग्याला मराठ्यांचा रुद्रावतार दाखवितो, दाखवितो मराठे आजही आहेत.. तुमास्नी आसमंत दाखवायास”या निर्णयावर शिक्कामोर्तब करणे इतके सोपे नव्हते परंतु संताजींनी सर्व मोहीम नियोजनबद्ध आखली, दस्तुरखुद्द संताजींनी एका एका मावळ्याला प्रत्यक्ष भेटून त्याचा जोश वाढविला आणि प्रसंगी संयम राखण्याचा सल्ला दिला.. हळूहळू संताजींची हि तुकडी तुळापुरकडे कूच करू लागली, औरंग्याला त्यावेळी विचारसुद्धा नव्हता कि अशी त्याची वाट मावळे लावतील,भयान अंधारातून पायवाट काढली जाऊ लागली, झाडाझुडपाचा, पालापाचोळ्याचा आणि रातकिड्याचा आवाज कानी घुमू लागला.. तुळापुर जसजस जवळ येत होत तसतस मुघलांची घुबड दिसू लागली.
        रात्रीची भयाण शांतता तुळापुरभोवती पसरलेली होती.. त्यावेळेस काही मराठी लोकांच्या फौजही औरंग्याकडे होत्याच त्यामुळे मुघल सैन्याला वाटले आपलीच माणसे असतील……. आणि नेमका याच गोष्टीचा आणि या अंधाराचा फायदा घेत मावळ्यांची तुकडी थेट औरंग्याच्या छावणीत घुसली,काही कळायच्या आतच मावळ्यांनी “हर हर महादेव” चा जयघोष करत आणि “जय भवानी, जय शिवाजी” या नावाने मोघलांची अक्षरशः कत्तलच सुरु केली शीर धडावेगळे होत होते, कुठे नुसती रक्ताची चिळकांडी दिसून येत होती.औरंग्यासोबत अख्खी त्याची लाखोंची सेना भांबावून गेली होती, या अवस्थेत ते स्वतःच्याच सैन्यासोबत युद्ध करू लागलेबरगडीत मराठ्यांच्या तळपत्या तलवारी घुसून बाहेर पडू लागल्याने तडफडत जीव सोडू लागले.एकच हल्लकल्लोळ सुरु झाला परंतु तरीही संताजींचा एक मनोदय फसला तो म्हणजे औरंग्याला भुईसपाट करायचा अंगरक्षकांनी अक्षरशः पळवूनच नेले त्याला. जेवढे प्रचंड नुकसान करता येईल तेवढे करत करत शेवटी औरंग्याचा तंबुच उखडून टाकला.. औरंग्याचा डेरा भुईसपाट करून त्याचा सुवर्ण कलश निशाणी म्हणून घेऊन संताजींनी मावळ्यांना माघारी फिरण्याचा आदेश दिला.याअगोदर कि औरंग्याची सेना तयार होईल छोट्या छोट्या तुकडीत विभागून संताजींनी मावळ्यांना शेवटी मोहीम सिंहगडाकडे कूच करण्याचा आदेश दिला…. मोहीम फत्ते झाली होती.
रणझुंझार सेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा सलाम........!!!
“ जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे

19 May 2013

स्वराज्याचे शिलेदार - गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक

          स्वराज्य स्थापनेच्या कार्यात श्री शिवरायांच्या पराक्रमी अनुयायांबरोबरच त्यांच्या गुप्तहेर खात्याचा सुद्धा अत्यंत उपयुक्त सहभाग होता. स्वकीय विरोधक व उघड शत्रू यांच्या हालचाली, दूरवरच्या प्रदेशातील परिस्थिती इ. माहिती वेळच्या वेळी मिळण्यावर राजकीय आणि सैनिकी यश अवलंबून आहे हे ओळखून शिवराय गुप्तहेर खात्यावर भरपूर पैसा खर्च करत. शत्रूच्या हालचाली आणि गुप्त कारवाया तसेच शत्रुप्रदेशातील संपन्न शहरे, खजिन्याच्या जागा,हल्ल्यासाठी जाण्याचा आणि परत येण्याचा मार्ग इत्यादी गोष्टींची गुप्तहेरांमार्फत खडानखडा माहिती मिळवून श्री शिवरायांनी अनेक धाडसी हल्ले करून शत्रूंची शहरे लुटली.छत्रपती शिवरायांचे गुप्तहेर खाते अतिशय कार्यक्षम होते. या गुप्तहेरांपैकी एक नाव प्रसिद्धीस आले ते म्हणजे बहिर्जी नाईक यांचे. बहिर्जी नाईक हे मराठ्यांच्या इतिहासातील एका महानायकाचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली त्या स्वराज्याचा सुरुवातीपासुन ते महाराजांच्या निधनापर्यंतचा चा साक्षीदार म्हणजेच बहिर्जी नाईक होते.
           दिवसभर बहुरुप्याचे खेळ करुन पोट भरवणारे बहिर्जी एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले. महाराजांनी त्यांच्यातील कसब ओळखली, नाईक स्वराज्यनिर्मीतीच्या कामाला हिरा आहेत हे राज्यांनी ओळखेले आणि तात्काळ त्यांना त्या कामात रुजु करुन घेतले. महाराज नेहमी आपल्या माणसांतील गुण ओळखुन त्यांना कामे वाटत असत. बहिर्जी नाईक कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत होते. तसेच ते बोलण्यातही हुशार होते. त्यामुळे राज्यांनी त्यांना गुप्तहेर खात्यात रुजु करुन घेतले.
          बहिर्जी नाईक यांचे गुण सांगायचे ठरले तर अंगात स्फ़ुरण आल्याशिवाय राहणार नाही. नाईक हे महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. फ़किर, वासुदेव, कोळि, भिकारी, संत, अगदी कुठलेही वेशांतर करण्यात ते पटाईत होते. पण फ़क्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातुन शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होतं. ह्यातं सर्वात मोठं आश्चर्य हे कि विजापुरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा ह्यांच्या महालात वेशांतर करुन जात व स्व:त अदिलशहा व बादशहा कडुन ते पक्कि माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशहा नाईकांना एकदा देखील पकडू शकले नाहीत यातच त्यांची बुद्धीमत्ता व चातुर्य दिसुन येतं.
         महाराजांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तिन ते चार हजार गुप्तहेर असायचे. ह्या सर्वांच नेतृत्व नाईकांकडे होतं. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापुर, दिल्ली, कर्नाटक, पुणे इत्यादी शहरांत अगदी हुशारीने पसरवले होते. चुकिची माहिती देणार्यास कडॆलोट हा पर्याय नाईकांनी ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्याची जणुकाही एक भाषाच तयार केली होती. ती भाषा फ़क्त नाईकांच्या गुप्तहेरांना कळे. त्यात पक्षांचे, वार्याचे आवाज असे. कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई. महाराज आज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी नाईकांना माहित असायचं. त्याठिकाणची खडानखडा माहिती नाईक काढत व महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहचवीत. असं म्हटलं जात कि, महाराजांच्या दरबारात नाईक जर वेशांतर करुन आलेले असले तर ते फ़क्त महराजांनाच ओळखायचे-थोडक्यात दरबारात बहिर्जी नाईक नावाचा इसम नाहिच अशी सर्वांची समजुत असायची. ते फ़क्त गुप्तहेरच नाही तर लढवय्ये देखील होते. तलवारबाजीत-दांडपट्यात ते माहिर होते. कारण गुप्त हेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे त्यांना माहित होते. कुठल्याही घटणेचा ते खुप बारकाईने विचार करी. शत्रुचे गुप्तहेर कोण? ते काय करतात? ह्यांची देखील माहिती ते ठेवत. तसेच त्यांच्याकडे एखादी अफ़वा पसरवायची असल्यास किंवा शत्रुला चुकिची माहिती पुरवायची असल्यास ते काम ते चतुराईने करीत. फ़क्त शत्रुच्याच प्रदेशाची नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील पुर्ण माहीती ते ठेवत.
         शिवाजी राजे व शंभु राजे जेव्हा दिल्लीच्या बादशहाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला भेटायला गेले असताना त्याआधीच दिल्लीत नाईकांचे गुप्तहेर दाखल झाले होते कारण महाराजांना काहि दगा फ़टका होऊ नये ह्याची त्यांनी पुर्ण काळजी त्यांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी आपले साडे चारशे गुप्तहेर वेगवेगळ्या वेशात दिल्लीच्या कानाकोपर्यात लपवले होते आणि तेही महाराजांच्या येण्याच्या महिनाभर अगोदर केले. हा एकच प्रसंग परंतु महारांजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणुन त्यांचा सहभाग असायचा. त्यात अफ़जलखानाचा वध, पन्हाळ्यावरुन सुटका, शाईस्ताखाणाची बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा, किंवा सुरतेची लुट असो प्रत्येक प्रसंगात बहिर्जी नाईक महाराजांचे अर्धे काम पुर्ण करत असत. ह्या प्रत्येक घटनेत नाईकांनी शत्रुची इत्यंभुत माहिती महाराजांना दिली होती.बर्याच वेळा महाराज बहिर्जींनी दिलेल्या सल्यांचा विचार करुन पाऊल टाके. राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्ट मंडळाची निर्मीती केली होती त्यात गुप्तहेर खातं तयार करण्यात आलं होतं. तेव्हा देखील नाईक त्या खात्याचे प्रमुख होते.
        राजगडापासून जवळपास ५०० कि.मी. अंतरावर असणारी सुरत हि व्यापारी पेठ लुटण्याचे ठरताच सुरतेची संपूर्ण माहिती, एवढेच नव्हे तर कुठे निश्चितपणे भरपूर धन हाती लागेल अशा सुरतेमधील ठिकाणांची तपशीलवार माहिती आणण्याच्या कामी महाराजांनी बहिर्जी यांना पाठविले. अचूक योजनेसाठी लागणारी अचूक माहिती बहिर्जी नाईकांनी किती कसोशीने मिळविली हे सुरतेची केवळ पाचच दिवसात लुटलेली कोट्यावधींची संपत्ती सांगते. या माहितीसाठी बहिर्जींनी कुठली सोंगे घेतली, गुप्त जागी ठेवलेल्या धनाचा पत्ता कसा लावला हे आजही आपल्यासून गुप्त आहे.१६७९ साली जालानापूर लुटून महाराज येत असताना ती बातमी लागून संगमनेराजवळ मोगली सैन्याने मराठ्यांना गाठून कोंडीत पकडण्याची वेळ आणली होती. या भागातील डोंगरातील गुप्त वाटांची माहिती असणाऱ्या बहिर्जी नाईकांनी महाराजांना लुटीसह सुरक्षितपणे पट्टा उर्फ विश्रामगड या किल्ल्यावर पोहचविले.हेर हे राजाचे डोळे आणि कान असतात हि म्हण सार्थ करणारे बहिर्जी नाईक महाराजांच्या अनेक यशस्वी मोहिमांमागे,धाडसी हल्ल्यांमागे, दूरवरच्या प्रदेशात अचानक जाउन केलेल्या लुटीमागे आणि सुखरूप परत येण्यामागे असणारी कल्पक, चतुर, प्रसंगावधानी आणि हरहुन्नरी व्यक्ती. 
           अश्या ह्या बहिर्जी नाईकांपासुन व त्यांच्या हुशारी पासुन आपण शिकण्यासारखं बरच काहि आहे. हे शक्य झालं नाही तरी नाईकांचे स्वराज्यासाठीचे लाखमोलाचे योगदान विसरु नका.

3 May 2013

इतिहासाच्या फ़ेरलिखाणाची गरज

            काही दिवसांपुर्वी सांगली मध्ये विद्रोही साहित्य आणि सांस्क्रुतीक संमेलन झाले.या साहित्य आणि सांस्क्रुतीक संमेलनात "इतिहासाचे विक्रुतीकरण आणि बहुजनांचे उद्ध्वस्तीकरण" या विषयावर तडाखेबंद परीसंवाद झाला.लेखणी हातात असलेल्या आणी वर्णवर्चस्ववादाच्या भुताने झपाटलेल्या ब्राह्मणी इतिहासकारांनी बहुजनांच्या इतिहासाची,त्यांच्या नायकांची चुकीची मांडणी करून बहुजनांच्या अस्मितेचे जाणीवपुर्वक विक्रुतीकरण केल्याचा सुर विद्रोही साहित्य संमेलनात एका विशेष परीसंवादात उमटला.लोकसाहित्याचा अभ्यास करून इतिहासाच्या फ़ेरमांडणीची गरज व्यक्त करण्यात आली.
बहुजनांच्या इतिहासाचे चुकीचे चित्रण केले जात असल्याची चर्चा होत असलेल्या पार्श्वभुमीवर हा परिसंवाद हा संमेलनाचे एक प्रमुख आकर्षण ठरला होता.ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.अशोक राणा,डॉ. नारायण भोसले, डॉ.राजेंद्र कुंभार यांनी कमालीच्या परखडपणाने आपली मते मांडली.
डॉ.राणा तर म्हणाले ब्राह्मणी वर्णवर्चस्ववादाच्या इतिहास संशोधन लेखनांवर आता केवळ टिका करून चालणार नाही, तर आता अभ्यास करून त्यांनी बहुजनांच्या चुकीच्या मांडलेल्या या इतिहासाची दुरुस्ती करावी लागेल.केवळ ब्राह्मणांना शिव्या घालून चालणार नाही, तर त्यांना रोखणे गरजेचे बनले आहे.भटांच्या ओंजळीतील तीर्थ प्यावेच लागते.त्यांनीच लिहिलेल्या इतिहासातील संदर्भ देऊन आता चालणार नाही.या प्रस्थापितांनी जाणीवपुर्वक संस्क्रुती कोशाची चुकिची रचना करून बहुजनांवर अन्याय केला आहे.मात्र आता नविन कोश तयार करण्याची गरज आहे.रामायण,महाभारत यांची रचना यांनी केली नसल्याचा दावा यावेळी केला.बहुजनांच्या सम्रुद्ध संस्क्रुतीला मोडण्याचा हा डाव मोडून काढण्यासाठी आता बहुजनातील अभ्यासकांनी पुढे येण्याची गरज आहे.
              खोटा इतिहास माथी घेऊनच बहुजनांची वाटचाल सुरु आहे.महाराजा शिवछत्रपतींनी तळागाळातल्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्याची उभारणी केली, पण त्याला लबाड इतिहासकारांनी दोन धर्मातील संघर्षाचे स्वरुप दिले.ब्रिटिश काळापासून विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी इतिहास आणि धर्माचा वापर केला जात आहे.आता देखील तेच सुरु आहे.जातीयवादाच्या इतिहासाला आता महत्व दिले जात आहे, हे चुकीचे आहे.चमचेगिरी करणार्या बखरकारांमुळेच चुकीचा इतिहास मांडला गेला.शिवरायांची सर्वाधिक बदनामी करणार्या बाबासाहेब पुरंदरे यालाच शासन आणि शिवरायांचे वारसदेखील पायघड्या घालून मदत करतात, हे खेदाचे आहे.भाजपचे सरकार मुळेच याला वेग आला आहे.नवीन इतिहासकारांनी बहुजनांचा खरा इतिहास समोर येण्यासाठी प्रचंड अभ्यास करण्याची गरज आहे.
सगळ्यात मोठी खंत म्हणजे बहुजनांचे शत्रु असलेल्यांच्या ताब्यात इतिहास आणि त्याचे पुरावे आहेत.डॉ. नारायण भोसले म्हणाले, लेखणी हातात असणार्यांनीच इतिहासाची चुकिच्या रितीने मांडणी केली आहे. वि.का.राजवाडे यांनी ब्राह्मणी व्यक्तिमत्वांना अडचणीत आणणार्या पुराव्यांना  जाळून टाकले आहे. त्यांनी केवळ  ब्राह्मणांचा गौरव करणारा निवडक इतिहासच निवडला.मुस्लिम राज्यकर्त्यांचे चुकीचे चित्रण करून वर्णवर्चस्ववाद्यांनी समाजात भांडणे लावल्याचा त्यांनी शेवटी आरोप केला.
इतिहासाच्या विक्रुत मांडणीने बहुजन समाजाचे मोठे नुकसान केले गेले आहे.वेदपुराणात ब्राह्मणांनी स्वत:ला देव तर बहुजनांना राक्षस मानल्याची  टीका इतिहास संशोधकांनी केली.आर्य चाणक्य,परशुराम यांचा चुकीचा इतिहास मांडला गेला आहे.महंमद ,अकबर आदी राजांचे चुकीचे चित्रण केले आहे.मुजुमदार,सावरकर यांनी मुघल काळ हिंदुसाठी वाईट ठरवलेला आहे.कुळवाडीभुषण बहुजनप्रतिपालक असलेल्या शिवरायांना सर्वाधिक त्रास देनार्या ब्राह्मणांनीच त्यांना आता गोब्राह्मण प्रतिपालक केले आहे.अफ़जलखान वधाच्या पोस्टरमागे केवळ राजकारण असल्याचा आरोप संशोधकांनी केला.मानवतेच्या सभ्यतेला कलंक असणार्या पेशवाईत विक्रुत सत्ताकारणांचा कळस गाठलेला असताना त्यांचे इतिहासात का चित्रण आले नाही.असाही सवाल बर्याच इतिहास संशोधकांनी केला.
आद्य नाटककार महात्मा फ़ुलेच !
आज विष्णूदास भावे यांची आद्य नाटककार म्हणून करून दिली जात असलेली ओळख हाच सर्वात मोठा बहुजनांच्या इतिहासाचा गळा घोटल्याचा पुरावा आहे.भावे यांनी फ़क्त नाटकातील पदांची रचना केली.महात्मा फ़ुले यांनीच सर्वप्रथम "त्रुतीय रत्न" हे मराठीतील पहिले नाटक लिहिले.पण तसा त्यांचा उल्लेख केला जात नाही, नव्हे तो वर्णवर्चस्ववाद्यांनी करून दिला नाही.राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फ़ुले हेच आद्य नाटककार आहेत.
वक्ते काय बोलले !!
* पेशव्यांचा पराक्रम लिहिणार्या इतिहासकारांनी नानासाहेब पेसव्याने क्षुद्रांना मंदिर प्रवेशाची केलेली बंदी इतिहासात का लिहिली नाही.
* नाना फ़डणीसांच्या भानगडींच्या माहितीचा कागद वि.का.राजवाडे यांनी का जाळून टाकला.
* दुसर्या बाजीरावाच्या काळात विवस्त्र महिलांच्या चालण्याच्या स्पर्धा होत होत्या पण त्यांचा इतिहासात कोठे उल्लेख नाही.
* झाशीच्या राणी लक्ष्मीबाईचा दत्तक मुलगा अठरा वर्षाचा असताना पोटाशी लहान मुल बांधुन घोडा चालविणार्या लक्ष्मीबाईची थोरवी गायली जाते.
* ज्यांना ब्राह्मणांकडून सर्वाधिक त्रास सहन करावा लागला, त्या धर्मनिरपेक्ष शिवरायांना गोब्राह्मण प्रतिपालक का व कोणी केले ?
* मानवतेवरील कलंक असणारी पेशवाई येण्यासाठीच रानडे आणि टिळक यांचे लेखन.
* बाबासाहेब पुरंदर्याकडून शिवरायांच्या इतिहासाची विक्रुत मांडणी, तरी देखील सरकार त्यांनाच लाखॊ रुपयांची मदत देते.
* जेम्स लेन ला वर्णवर्चस्ववाद्यांनीच मदत करून शिवछत्रपतींची बदनामी करण्याचा प्रयत्न केला.
* रा.चि.ढेरे सर्वाधिक बदमाश असल्याची घाणाघाती टीका यावेळी डॉ.राणा यांनी केली.
[ पण धाकलं पाटील सहमत नाहीत या टीकेला, कारण बाबा पुरंदरेसारखा बदमाश जगात कोठेच सापडायचा नाही ]

11 April 2013

शाहू छत्रपतींचा जातीअंताचा लढा

              राजर्षी शाहू छत्रपती यांच्या काळातील फ़ार गाजलेले वेदोक्त प्रकरण तर समद्यास्नी ठाऊक असेलच.त्या वेदोक्त प्रकरणात थुसिडाईडस या तत्वज्ञानाच्या "आमचे मालक होणे तुमच्या हिताचे असेल पण तुमचे गुलाम बनण्यात आमचे कोणते हित आहे ?" या वचनाची प्रचिती आणि अनुभव शाहू महाराजांना आला.वेदोक्त प्रकरणाचे मुळ हिंदुंच्या वर्णव्यवस्थेच्या आधारीत असणार्या समाजरचनेत शोधावे लागते.हिंदु मध्ये ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य आणि क्षुद्र हे चार वर्ण मानले जात होते पण नंतर त्यातही बदल घडला शुरवीर(?) परशुराम याने प्रुथ्विवरील क्षत्रिय नष्ट केले आणि वैश्य आपोआप नष्ट झाले.त्यामुळे या विश्वात ब्राह्मण आणि क्षुद्र असे दोनच वर्ण शिल्लक राहिले.जे ब्राह्मणेत्तर आहेत त्यांना क्षुद्र समजले जाते.वेदोक्त मंत्रांप्रमाणे आपले धार्मिक संस्कार करून घेता येतील ते फ़क्त ब्राह्मणांना.पण ब्राह्मणेत्तरांना मात्र आपले धार्मिक संस्कार वेदोक्त पद्धतीनुसार करण्याचा अधिकार नव्हता.ब्राह्मणेत्तर आपले धार्मिक संस्कार पुराणोक्त पद्धतीने करू शकत होता.पुरोणोक्त पद्धत म्हणजे जे धार्मिक संस्कार पुराणातील मंत्राच्या आधारे केले जातात व वेदोक्त पद्धत म्हणजे वेदातील मंत्राप्रमाणे केले जातात.वेद हे   अपौरुषेय आहे तर पुराणे ही मानवाने रचलेली आहेत.
          हिंदू धर्मातील चार वर्णात ब्राह्मण हे सर्वश्रेष्ठ मानण्यात आले होते.म्हणूनच हिंदू समाजरचणेत आपणच सर्वश्रेष्ठ आहोत,इतरांचे गुरुपद आणि नेत्रुत्व ही आमची मिरासदारी राहिली पाहिजे,आमचे वर्तन भ्रष्ट झाले तरी त्यामुळे आमच्या श्रेष्ठ्त्वाला काहीच बाधा येवू शकत नाही अशी आडमुठी भुमिका ब्राह्मण वर्गाकडून मांडली जाऊ लागली.या दर्पोक्तीतच जरी ब्राह्मण झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ हे त्यांचे ब्रीदवाक्य खरे ठरू पाहत होते.या मिरासदारीच्या दर्पोअक्तीतुनच ब्राह्मणांनी मराठे हे क्षत्रिय नसून क्षुद्र आहेत असे म्हणुन वेदोक्ताचा अधिकार नाकारला.
            शाहू छत्रपतींचा जन्म घाटगे नामक मराठा कुळात झाला असल्याने त्यांना क्षत्रियांच्या वेदोक्त संस्कार पद्धतीने आपले धार्मिक विधी करून घेता येणार नाहीत अशी दुराग्रही भुमिका घेतली.त्यातूनच छत्रपतींचा आश्रित असणार्या नारायण भटाने शाहुंच्या १८९९ सालच्या पंचगंगेतील पवित्र कार्तिक स्नानाच्या वेळी बुरस्या अंगाणे पुराणोक्त मंत्र उच्चारून उद्दामपणे म्हंटले ,धर्मानुसार ब्राह्मण श्रेष्ठ आहेत आणि सर्वशक्तिमान ब्राह्मणवर्ग तुम्हाला क्षत्रिय म्हणून मान्यता देत नाही,तोपर्यंत तुम्ही क्षत्रिय कुळावतंस अशी बिरुदावली जरी मिरवली तरी तुम्ही आमच्यासाठी क्षुद्रच.
या अपमानाचे जहर पचवून उद्याची समाजक्रांती घडविण्यासाठी शाहू छत्रपतींच्या मनात अंतर्यामी कोठेतरी विद्रोहाची एक ठिणगी हळूहळू पेट घेत होती.वेदोक्त वादाची सुरुवात करणारा पंचगंगेच्या काठी घडलेला शाहू छत्रपतींचा अपमान करणारा तो प्रसंग छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनातील क्रांतिकारक क्षण होता.चेदोक्त वादात सनातनी ब्रह्मव्रुंदांनी त्यांचा अत्यंत मानसिक छळ केला.त्यामुळे हिंदू समाजरचणेत प्रत्येक व्यक्तिचा सामाजिक दर्जा ठरविण्याचा जो ब्राह्मणांना सार्वभौम अधिकार होता,त्या अधिकारालाच आव्हान देऊन ब्राह्मणांचे वर्चस्व कमी करण्याचा जबरदस्त प्रयत्न वेदोक्त वादातून शाहू छत्रपतींनी केला.वेदोक्त प्रकरणाने त्यांना दिव्यद्रुष्टी लाभली.त्यानंतर त्यांनी आपली सत्ता व संपत्ती शुद्रातिशुद्रांच्या कल्याणासाठी उपयोगात आणण्याचे अलौकिक कार्य हाती घेतले.वेदोक्त प्रकरणानंतर शाहू महाराज जातीय विषमता नष्ट करण्याच्या प्रयत्नाला लागले.हिंदू समाजातील वर्णव्यवस्था व सम्रुद्धीचे जीवन जगता यावे म्हणून उच्चवर्णीयांसाठी निर्माण करण्यात आलेली सर्वच क्षेत्रातील १०० टक्के राखीव जागांचीच व्यवस्था होती.जातीय समानता प्रस्थापित करणे म्हणजे जातीसंस्थेच्या अस्तित्वाला सुरुंग लावणे हे समीकरण शाहू राजांच्या मनात पक्के रुजले होते.जातीसंस्था नष्ट करण्यासाठी तथाकथित उच्च जातींनीच जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत असा छत्रपती शाहूंचा ठाम विश्वास होता.जपान देशातील जातीभेदाचा बीमोड होण्याचे कारण उच्च वर्गाच्या सामुराई लोकांनी सुरुवात केली हेच आहे.म्हणुनच जपान आज महासत्ता आहे.
             शाहू महाराज जातीसंस्था नष्ट करण्याच्या द्रुष्टीने अनेक क्रांतिकारक निर्णय घेऊन कटाक्षाने त्यांची प्रत्येक्ष अंमलबजावणी करत होते.त्यांची जातीसंस्था संपविण्याच्या द्रुष्टीकोणातून आंतरजातीय विवाहाचा प्रयोग आपल्याच राजघराण्यात केला.शाहू महाराजांची चुलत भगिनी चंद्रप्रभा व इंदुरचे युवराज यसवंतराव होळकर यांचा मराठा-धनगर या दोन्ही पक्षांनी ठरवलेला सुनियोजित आंतरजातीय विवाह ९ फ़ेब्रुवारी १९२४ रोजी इंदुर मुक्कामी मोठ्या थाटामाटात साजरा झाला.परंतू हा विवाह पाहण्यास शाहू छत्रपती हजर नव्हते कारण ६ मे १९२२ रोजी त्यांचे निधन झाले होते.डॉ.बाबसाहेब आंबेडकरांनी एका ब्राह्मण महिलेशी आंतरजातीय विवाह करून असाच आदर्श समाजाला घालून दिला आहे.
             "विद्येविना मती गेली,मतीविना नीती गेली" हा महात्मा फ़ुले यांचा आदर्श समोर ठेवून छत्रपती शाहूंनी १९०१ ते १९२२ पर्यंत आपली राजधानी कोल्हापूर शहरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम, ख्रिश्चन, महार, सोनार, शिंपी, पांचाळ, ब्राह्मण, प्रभू, वैश्य, ढोर, चांभार, सुतार, इ.विविध धर्माच्या आणि अठरापगड जातींच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक शाळा व  अनेक वसतीग्रुहे सुरु केलीत.अस्प्रुष्यांना त्यांनी शिक्षणाचे दरवाजे खुले केलेत आणि कोरवी,वडार, फ़ासेपारदी यांसारख्या गावकुसाबाहेरील जाती जमातींच्या मुलांना सुद्धा त्यांनी शिक्षणाच्या परिघात आणले.त्यांनी सर्वांना प्राथमिक शिक्षण मोफ़त व सक्तीचे केले.१८३५ साली हंटर कमिशनसमोर महात्मा ज्योतिराव फ़ुले यांनी बहुजन समाजातील मुलांसाठी प्राथमिक शिक्षण  सक्तीचे करण्याची मागणी केली होती.त्यांनी १८५१ मध्ये महार, मांग, समाजातील मुलांसाठी पुण्यात पहिली भारतीय शाळा काढली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये अनुच्छेद ४५ अन्वये १४ वर्षापर्यंतच्या मुलांना मोफ़त व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद केली आहे.परंतू केंद्र सरकारला सदरहू कायदा करण्यासाठी २००९ साल उजडावे लागले त्यातही चालाखी करण्यात आली.पहिली ते आठवी परिक्षा न घेता विद्यार्थ्यांना सरसकट वरच्या वर्गात ढकलायचे आहे.परीक्षाच नाही तर गुणवत्ता कशी कळणार ? याचा दुष्परिणाम असा होईल की पुढील पिढ्यांच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता आठवी पास आणि नववी नापास अशी राहिल.भारतात आज परकिय इंग्रजांचे सरकार आहे की लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालवलेले सांददिय लोकशाही सरकार आहे.संभ्रम निर्माण करणारा हा परिक्षा न घेण्याचा निर्णय आहे.असा निष्कर्ष काढण्यावाचुन पर्याय नाही.
              राजर्षी शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील स्नेहसंबंध अत्यंत जिव्हाळ्याचे होते.३१ जानेवारी १९२० रोजी डॉ.बाबासाहेब यांनी "मुकनायक" हे पत्रक सुरु केले.त्या व्रुत्तपत्रास छत्रपती शाहूंनी २५०० रुपयांची भरघोस मदत दिली होती.शाहू छत्रपतींनी "मुकनायक" ला आर्थिक मदत देऊन पाठीशी सर्वशक्तीनिशी उभे असतात तर दुसरीकडे टिळकांचा "केसरी" पैसे देऊनसुद्धा अस्प्रुष्यांच्या व्रुत्तपत्राची जहिरात देखील छापण्यास तयार नव्हता, हि बाब लक्षात घेतली पाहिजे.१९०२ पासून १९२० पर्यंत शाहूंनी आपल्या संस्थानात मागासवर्गीयांसाठी राखीव जागा, अस्प्रुष्यांसाठी मोफ़त शिक्षणाची सोय,इत्यादि कार्य केले आहेत.
            ज्या मंडल आयोगामुळे आज ओबीसींना २७ टक्के राखीव जागा मिळाल्या आहेत,त्या ओ.बी.सी.च्या प्रतिनिधित्वाचा प्रस्ताव सर्वप्रथम राष्ट्रपिता ज्योतिराव फ़ुले यांनी आपल्या "शेतकर्याचा आसूड" या ग्रंथात मांडला.तर शाहू छत्रपतींनी अस्प्रुष्यता नष्ट करण्यासाठी पहिले पाऊल म्हणून २६ जुलै १९०२ रोजी आपल्या संस्थानातील मागासलेल्या जातींसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवण्याचा जाहीरनामा काढला.मागासवर्गीय व ओबीसींचा भाग्योदय राष्ट्रपिता फ़ुले,छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या प्रचंड संघर्षाचे फ़लित आहे.हे मान्य करावेच लागेल.टिळकांनी तर "तेल्या तांबोळ्यांना संसदेत जाऊन काय नांगर हाकायचा आहे ? " अशी भुमिका घॆऊन या वर्गाचे हक्क नाकारले होते.असे असूनही ओबीसी या तीन महापुरुषांचे विचार स्विकारत नाहीत, हीच आजची शोकांतिका आहे.
          राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फ़ुले यांचे विचार हीच छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा होती.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तर महात्मा फ़ुलेंना तिसरे गुरु मानले होते.महात्मा फ़ुलेंचा जन्म ११ एप्रिल १८२७ व म्रुत्यू २८ नोव्हेंबर १८९०, छत्रपती शाहुंचा जन्म २६ जुन १८७४ व म्रुत्यू ६ मे १९२२ तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ व म्रुत्यू ६ डिसेंबर १९५६ रोजी झाला.१८२७ ते १९५६ अशा १२९ वर्षाच्या कालखंडातील या तीन महापुरुषांनी केलेल्या सामाजिक संघर्षामुळे हजारो वर्षे उच्चवर्णीयांच्या जुलमी सत्तेखाली दडपला गेलेला बहिष्क्रुत आणि ओबीसी समाज त्यांच्या सामाजिक व अर्थिक गुलामितून मुक्त झाला.या तीन विभुतींनी या देशाचा सामाजिक,सांस्क्रुतीक व राजकीय इतिहास बदलून टाकला आणि सर्वसामान्य माणसाला भयमुक्त जीवन जगण्याचे स्वातंत्र्य बहाल केले.
             जर फ़ुले-शाहू-आंबेडकर यांचे अनुयायी एकत्र आले तर देशातील जातीव्यवस्था नष्ट होऊन सामाजिक समता प्रस्थापित होण्यास वेळ लागणार नाही.आज मराठ्यांना आरक्षण मिळावे अशी मागणी होत आहे.परवाच महामोर्चा निघाला मुंबईमध्ये.कालचे तालेवार जमीनदार मराठे आज अल्पभुधारक आणि भुमिहीन होत आहे.तरीही सुंभ जळाला पण जातीय अहंकाराचा पीळ अजुन कायम आहे.त्यामुळे मराठ्यांनी शाहू राजांना स्विकारले नाही.हे आजचे दाहक वास्तव्य आहे.पण आंबेडकरांच्या अनुयायींनी मात्र फ़ुले आणि शाहू यांना स्विकारले आहे.कारण फ़ुले-शाहू आणि आंबेडकरांचे कार्य परस्परांशी पुरक आहे.म्हणूनच आंबेडकरांच्या अनुयायींनी सर्वा जाती-जमातींना एकत्र जोडण्यासाठी आपल्या चळवळीला फ़ुले-शाहू-आंबेडकर चळवळ अशी सर्वसमावेशक केली आहे.हि चळवळ व्रुद्धिवंत होऊन फ़ुले-शाहू-आंबेडकरांचे जातीविरहीत एकसंघ भारताचे स्वप्न साकार होईल,अशी आशा करूया.राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याला विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी मानाचा मुजरा !...

2 April 2013

कुळवाडीभूषण छ.शिवाजी महाराज

           आजपर्यंतच्या जागतिक इतिहास तज्ञांच्या मते कोणालाही राजा होण्यासाठी त्यांच्या अलौकिक राजगुणांची आवश्यकता असली पाहिजे.हे अलौकिक राजगुण कोणते ? याबाबत इटालियन जागतिक किर्तिचे तज्ञ "मॅकिल व्हॅली" यांनी अलौकिक राजगुणांची काही तत्वे आजपर्यंत कोणात्याही इतिहासकाराने आक्षेपार्ह मानली नाहीत ती सर्व मान्य ठरतात.
         मॅकिल व्हॅली यांनी ही राजगुणांची तत्वे दोन विभागात मांडली असून ती पुढीलप्रमाणे :
१) न्याय नीती व चारित्र्य : - राजा हा दिसण्यास सर्वसाधारणपणे सुंदर असावा.तो निरोगी व आरोग्य संपन्न असावा.तो हुशार आणि बुद्धिमान असावा.त्यांची नैतिक पातळी उच्च दर्जाची असावी. तो आध्यात्मिक आणि तात्विक ज्ञान संपन्न असावा.तो कर्तव्यदक्ष, नि:स्वार्थी आणि संयमी तसेच जनतेसाठी झटणारा असावा.स्त्रीदाक्षिण्य हा गुणही त्याच्या असावा.
२)इतर गुण :- राजा हा सिंहाप्रमाणे शुर असावा.नीती व अनीतीचा वेळप्रसंगी विचार करणारा असावा.त्याला द्रव्याची अभिलाषा नसावी.तो इतर कोणाच्या धर्मात हस्तक्षेप करणारा नसावा.न्याय व नीती ही तत्वे मुख्य अंग असले पाहिजे.
वरीलप्रमाणे असणार्या राजगुणांचा विचार करता जगातील अत्यंत पराक्रमी ज्येते म्हणजे नेपोलियन,सिकंदर,ज्युलियस,हॉलिबूड रॉबर्ट वगैरे अनेक देशी - विदेशी राजांचा व छत्रपती शिवाजी राजांचा तुलनात्मकद्रुष्ट्या अभ्यास करता शिवाजी राजांच्या नैतिकतेशी हे पराक्रमी राजे बरोबरी करू शकत नाहीत कारण 
* २७ वर्षे घोड्यावरील मांड कधी काढली नाही व आपली तलवार कधी म्यान केली नाही
* मद्याच्या थेंबालाही कधी स्पर्श केला नाही.
* स्त्रियांना मातेसमान मानले,एवढेच नाही तर शत्रुपक्षातील स्त्रियांना साडी चोळी देऊन सत्कार केला व त्यांचे रक्षण केले. 
* शिवरायांनी कधी मद्याची अभिलाषा केली नाही.
* शिवरायांनी इतर धर्मियांना सहिष्णूतेची वागणूक दिली.
* विशेष म्हणजे छ.शिवरायांनी न्याय व नीतीचा योग्य वापर करून रयतेसाठी राज्य निर्माण केले होते.
वरीलप्रमाणे जागतिक इतिहासकारांनी शिवाजी महाराजांचे अलौकिकत्व मान्य करून हा राजा सर्वात श्रेष्ठ आहे असा निष्कर्ष काढला.
             जागतिक इतिहास तज्ञांचे निष्कर्ष लक्षात घेता हे सिद्ध होते की मध्ययुगीन कालखंडात असा एक राजा होऊन गेला की,असा राजा आजतागायत झाला नाही आणि तेथुन पुढेही होणार नाही.असा राजा म्हणजे कुळवाडी भूषण बहुजनप्रतिपालक छ.शिवाजी महाराज.
           छत्रपती शिवरायांच्या सैन्याचे शिवरायांवर एवढे प्रेम होते की महाराज ज्या ठिकाणी पाय ठेवू पाहात तेथे हे मावळे ह्या राजासाठी स्वत:चे बलीदान देण्यास तयार होत असत.याउलट छ.शिवाजी महाराजांना आपला प्रत्येक मावळा म्हणजे लाख मोलाचा हिरा वाटायचा म्हणुन ते म्हणत, मी माझा लाख मोलाचा हिरा असा तसा गमावणार नाही.म्हणून जेंव्हा अफ़जलखान, शाहिस्तेखान,मिर्जा राजा जयसिंग हे प्रचंड सैन्यानिशी स्वराज्यावर चालून आले त्यावेळी महाराजांनी त्यांच्याशी युद्ध करून आपल्या सैन्याची जीवित हानी होण्यापेक्षा  ते स्वत:चा जीव धोक्यात घालून स्वत: शत्रुवर चालून गेले व त्यांचा पराभव केला.यात अफ़जल खानाला तर ठार केलेच. व मिर्जा राजा जयसिंगाबरोबर तहाची बोलणी करून स्वराज्यासाठी स्वत:चा त्याचबरोबर स्वत:च्या कोवळ्य़ा शंभु राजपुत्राचा जीव धोक्यात घालून तह मंजुर करून घॆण्यासाठी ते आग्रा येथे औरंगजेबाकडे गेले.
            जगामध्ये शिवरायांनंतर जे-जे राजे अथवा जगज्जेते होऊन गेले ते स्वत:साठी, संपत्तीसाठी, स्वत:च्या धर्मासाठी व जातीसाठी लढले.शिवरायांचे युद्ध हे मुस्लिम किंवा कोणत्याही धर्माविरुद्ध किंबहुना जातीविरुद्ध नव्हते तर ते परकिय सत्ताधिशांच्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध होते.म्हणूनच अदिलशहाचे पठाणी सैनिक व घोडदळाच्या तुकड्या शिवरायांना मिळाल्या आणी मोघल सत्तेविरोधात लढल्या तसेच छ.शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम सैन्य होते.ते एकनिष्ठपणाने लढले.अठरापगड जातीचे मावळे शिवरायांच्या जीवाला जीव देणारे सैन्य सर्वशक्तिनिशी यश संपादन करत होते.त्यामुळे शिवरायांचा विजय हा ठरलेलाच असायचा.
           छ.शिवरायांनी शेतकर्यांच्या हितासाठी अनमोल असे कार्य केले त्यांच्या काळामध्ये एकाही शेतकर्याने आत्महत्या केल्याचे दिसून येत नाही.मात्र आज शेतकर्यांचे म्हणुन जे स्वत:ला समजतात त्यांच्या राज्यामध्ये इतकेच नसून देशामध्ये लाखॊ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या.खरेच या नेत्यांना छ.शिवाजी महाराजांच्या कार्यकर्त्रुत्वाची जाणीव असती तर जगाचा पोशिंदा असणार्या शेतकर्यांनी कधीच आत्महत्या केल्या नसत्या.पण हेच नेते छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन देशात,शासन व्यवस्था चालवित आहेत.
इतिहासाचा अभ्यास केला असता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक राजगुणांची ठळक वैशिष्ठे पुढील प्रमाणे दिसून येतात.
१) स्वधर्माभिमानी परंतू इतर धर्मीयांशी सहिष्णुतेने वागणारा राजा..
२) संत सज्जनांचा उपासक परंतू दुष्टांचा संहार करणारा राजा..
३) भारतीय सैन्याबरोबर मुस्लिम सैन्य बाळगणारे व त्यांच्या शौर्याची कदर करणारा राजा..
४) वैदिक धर्माच्या देव-देवळांबरोबर मुस्लिमांच्या मशिदी व मकबरे यांचे पण रक्षण करणारा राजा..
५) युद्धाच्या वेळी कुराणाची प्रत सापडल्यास ती आदरपुर्वक मुल्ला - मौल्लवीकडे परत करा,स्त्रियांच्या आब्रुचे,लहान मुलांचे,म्हातार्या माणसांचे रक्षण करा,शरण आलेल्यांना ठार मारू नका अशी सैन्यास ताकिद देणारा राजा..
६) स्वराज्याच्या व रयतेच्या रक्षणासाठी गडकोट व आरमाराची निर्मिती करून त्याद्वारे रयतेला रोजगार निर्मिती करून देणारा राजा..
७) शेतकरी सुखी तर प्रजा सुखी,प्रजा सुखी तर राजा सुखी ही त्रिसुत्री जाणुन शेतकर्यांना सर्वतोपरी मदत करून शेती सुधारणा करणारा व शेतकर्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावु नका अशी सैन्याला सक्त ताकीद देणारा राजा..
८) अठरापगड जातीचे सैन्य पदरी बाळगणारा,बहुजन समाजातील सैन्यांच्या हाती शस्त्र देऊन त्यांच्या क्षत्रिय बनवणारा म्हणजेच जातीयता व भेदभाव नष्ट करणारा राजा..
९) स्त्रियांच्या अब्रुचे रक्षण कराणारा राजा
१०) धर्मातरितांना स्वधर्मात घेऊन धर्म वाढविणारा  राजा...
११) मराठी भाषेचा पुरस्कार करणारा राजा..
१२) शत्रु सैन्याच्या गोटात निशस्त्र जाऊन आपल्या गगनभेदी सिंहगर्जनेने शत्रुची दानादान उडविणारा राजा...
१३) बलाढ्य व शुर अशा मुस्लिम शत्रुला ठार केल्यानंतर सन्मानाने त्याची कबर बांधणारा राजा.
१४) आजपर्यंत जवळ जवळ ६०० राजे होऊन गेलेत असा इतिहास सांगतो पण शत्रुचीही कबर बांधुन म्रुत्युनंतर वैर संपते हा संदेश देणारा राजा..
१५)राज्याभिषेक शककर्ता राजा...
१६) परकीय राम्राज्यशाहीविरुद्ध बंड पुकारून जगात स्वराज्याची पहिली मुहुर्तमेढ रोवून रयतेसाठी राज्य निर्माण करणारा राजा........
             म्हणजेच जगदवंदनीय जगाचा महामानव ठरलेला राजा म्हणजेच विश्ववंद्य छ.शिवाजी महाराज होय आणि म्हणुनच जागतिक इतिहास तज्ञ "अनॉर्ड टायरबन" म्हणतात- " छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्या देशात जन्माला आले असते तर त्यांच्या पराक्रमाचा आणी स्म्रुती चा अक्षय ठेवा आम्ही आमच्या डोक्यावर घेऊन आनंदाने नाचलो असतो " 
जय जिजाऊ । जय शिवराय । जयोस्तु मराठा । जय महाराष्ट्र

29 March 2013

॥ राजा शिवछत्रपती ॥

॥ राजा शिवछत्रपती ॥
लेखक : बळवंत मोरेश्वर पुरंदरे
आव्रुत्ती चौदावी, दिनांक : १ एप्रिल २००१
        राजाशिवछत्रपती ग्रंथ पुरंदरे यांनी १ एप्रिल २००१ रोजी प्रसिद्ध केला. त्यांनी महाराष्ट्रातील लोकांना चांगलच एप्रिल फ़ुल बनवलं असं दिसतं. त्यांनी ग्रंथात पान नं.१२५ व १२६ तसेच १८१ व १८२ वर जेम्स लेन सारखेच लेखन केलेले आहे. कदाचित त्यांना असं सुचवायचं आहे की काही शब्द व वाक्य वगळून अर्थबोध असे उतारे करा.

पुरंदरेंच्या ग्रंथातील काही लेखन : पंतांचे शहाजीराजांवर, आईसाहेबांवर, शिवबाबर, भोसले कुटुंबावर असे प्रेम होते की स्वामी आणि सेवक हे नाते उरलेच नव्हते. पंत म्हणजे भोसल्यांच्या कुटुंबातलेच. आजपर्यंतची सारी हयात राजांच्या पदरीच गेलेली होती. ते वयाने सत्तरीच्या दारात उभे होते. शहाजी राजेही त्यांना फ़ार मान देत. राजांच्या घरातले ते मानाचे, धाकाचे, दरार्याचे, मायेचे आणि ममतेचे वडीलधारे पुरूष होते, ते सर्वांवर हक्काने प्रेम करीत.
सतत दोन पिढ्या पंत राजकारणात वावरत असावेत. राजांचा आणि त्यांचा स्वभाव सारखाच होता. स्वतंत्र दौलत स्थापावी असं दोघांनाही वाटले. आईसाहेबांवर ते फ़ार माया करीत. हि बाई अशी तशी नाही, हिची जडण घडण काही वेगळीच आहे; पण त्यांची ती मुळची रग थोडीच जाते, हे त्यांनी ओळखले होते. शिवबांवर तर खुद्द शहाजीराजांचाही नसेल इतका जीव पंताचा होता.
ते अधुनमधुन, कधी कधी स्वत:च्या संसारातही लक्ष घालीत. पंत देशस्थ रुग्वेदी ब्राह्मण. गोत्र ? गोत्र शांडिल्य; पण खरे म्हणजे त्यांचे, आईसाहेबांचे आणि शिवबाचे गोत्र एकच होते. पंत म्हातारे झाले होते; पण त्यांच्या स्वभावातला हौशीपणा कमी झाला नव्हता. मोठा हौशी म्हातारा !. म्हातारपणी हौस करायला मन तरूण असावे लागते.
वरील उतार्यांमध्ये एकही शब्द किंवा वाक्य बाहेरचे नाही. किंवा अनुस्वार मात्रा, उद्गारवाचक चिन्हे, प्रश्नचिन्हे  बाहेरून लावलेली नाहीत. वरील लिखाण पुरंदरेंच्या कादंबरीमध्ये पान नं.१२५ व १२६ वर आहे.

पाने १८१ व १८२ वर पुरंदरे त्यांच्या ग्रंथात लिहितात : एखाच्या शिल्पकाराने देवाची सुंदर मुर्ती घडवावी, प्रसन्न देवपण त्या मुर्तीत उतरावे, ओंजळभर फ़ुले भक्तिभावाने वाहावीत अन असे म्हणावे, त्वमेव माता पिता त्वमेव... त्वमेव सर्व ममदेव देव! ही मुर्ती मी घडवली, मीच हिचा निर्माता आहे, हा अहंकार तेथे रतीभरही न सापडावा. त्यांचा आनंद त्या शिल्पकाराचा होता, शिवरायांची मुर्ती त्यांनी घडवली होती. पण ही मुर्ती मी घडवली, मीच हिचा निर्माता आहे असा अहंकार पंतांच्या मनात कधीही उमटला नाही.
            याआधीच्या जुण्या आव्रुत्ती मध्ये सुद्धा पुरंदरेनी जे अकलेचे तारे तोडले आहेत ते तर कहरच आहेत. हे सर्व करण्यामागे पुरंदरेंच्या मनात काय पाप आहे ते दिसून येते. हळू हळू येईल बाहेर यांनी काय काय दिवे लावलेत ते. बर्याच ठिकाणी पुरंदरेनी घेतलेले मुद्दे अनाकलनीय आहेत. परत मला प्रश्न पडतो की पुरंदरेंना शिवशाहीर का म्हंटलं जातं ? वासरात लंगडी गाय शहाणी असा प्रकार आहे हा. पण आज खर्या इतिहासकारांमुळे पुरंदरेंचे पितळ उघडे पडले आहे हे निश्चित.
            पुरंदरे शिवरायांचा इतिहास सांगत नाही, तर ते दादोजी कोंडदेवचे उदात्तीकरण पडद्यामागून करत आहेत. पुरंदरेनी लेन ला कोणत्या प्रकारची माहीती दिली हे चाबकाचे फ़टके मारून काढून घ्यावेत. या अगोदरच सोलापुरच्या समारंभात त्यांनी जेम्स लेन च्या पुस्तकाचे कौतुक केले होते. पुरंदरेचे वरील उतारे जिजामाता, शिवाजी राजांचे चरित्रहनन करतात. आता पर्यंत साप सोडून जमीन धोपटण्यासारखा प्रकार चालला होता. चोर सोडून संन्याशाला फ़ाशी असा प्रकार चालू होता. मराठी संघटना, मराठा समाज यांच्याविषयी पुरंदरेंच्या मनात असुया आहे. व्यासपिठावर त्याचे खाण्याचे दात व दाखवण्याचे दात निराळेच असतात.

पुरंदरे पान नं.५० व लिहितात : मरायला माणसे मराठ्यांची चांगली. दुसर्यासाठी वक्तशीरपणे मरतात. कडक झुंजतात. अगदी कोंबड्यासारखी जीव खावून! मालकाला यश मिळवून देतात...कुठेही चार दाणे फ़ेकले की तेवढे टिपीट पोट भरतात. त्यांना मालकाने कापून खाल्ले तरी त्यांची तक्रार नसते.
            पुरंदरेने लेनच्या पुस्तकाची स्तुती केलेली आहे. आनंद देशपांडे यानेे सप्टेंबर २००३ च्या दैनिक "सामना" मध्ये लेनच्या पुस्तकाचे कौतुक करताना म्हंटले की लेन चे पुस्तक संदर्भग्रंथ म्हणुन ग्रंथालयामध्ये असावे. ब्राह्मण संपादक, वार्तापत्रे यांनी मराठी संघटनांना दोष दिला आहे. जेम्स लेनच्या पुस्तकाला कारणीभुत झालेला पुरंदरे यांनी मात्र तोंड उघडले नाही. ते पाहत आहेत महान नाटक. त्यांचे स्वतःचे नव्हे; महाराष्ट्रातील लोकभावनांचे. चाणक्यनितीचा मनुष्य तो म्हणतो "मी माझ्या ’राजाशिवछत्रपती’ चौदावी आव्रुत्ती या ग्रंथात एवढे लिहुनही त्यांच्या डोक्यात अजुनही कसे शिरले नाही ?" या सर्व सर्व घटनांत पुरंदरे सर्वात पुढे आणि पिलावळ त्याच्या मागून. 
            पुरंदरे लेनची स्तुती करतात, धिक्कारही करतात. बेभरवशाचा माणुस! लोकं म्हणतात त्याला शाहीर. पण मला अजुनही समजलं नाही की पुरंदरेंना शाहीर का म्हणतात. कधिही शाहिरी न गायलेली. पण ब्राह्मण लेखकांनी दिलेला शाहिरीचा डगला मात्र अंगावर घालतात आणि शाहिरीचं ढोंग करून ,शिवरायांचा खोटा इतिहास सांगुण साध्या भोळ्या लोकांना फ़सवतात. मराठ्यांचा खरा इतिहास सांगण्याऐवजी खोटा इतिहास सांगतात.
         आधीच्या काळात होनाजी बाळा, राम जोशी, पट्ठे बापुराव हे शाहीर होते. शाहीर स्वतंत्र असतो. तो बुद्धीचातुर्याने लोकांचे मनोरंजन करतो. पोवाडे, कथानकांचे वर्णन करतो. पुरंदरेंचा रग मुस्लिमद्वेष. जळी, स्थळी, पाषाणी त्यांना मुसलमान दिसतो. मुसलमान राज्यकर्यांविषयी ते राईचा पर्वत करतात. पण खरं तर मुस्लिम सुलतानांनी जेवढे अत्याचार प्रजेवर केले तेवढे  अत्याचार पेशवे काळात प्रजेवर झाले आहेत.
            पुरंदरेचा इतिहास थोडा, कल्पना मात्र भव्य. कल्पनेतच वाचायचं...अहंगडाला गोंजारून, सत्याला बाजुला सारून. पुरंदरेवर सेतूमाधवराव पगडी, शेजवळकर, एम.व्ही.धोंड यांनी कडाडून हल्ला केला आहे. हे सर्व जण म्हणतात की ब्राह्मण शाहिरांनी, कादंबरीकारांनी, कथाकारांनी, नाटककारांनी, सिनेमावाल्यांनी इतिहास नासवला आहे. या सर्वांवर पुरंदरेने कडी केली आहे. 
इतिहासकार, इतिहाससंशोधक, श्रीमंत कोकाटे यांनी पुरंदरेच्या फ़ोटोसहीत एका छोट्याशा पुस्तिकेमध्ये लिहिले आहे की, "बाबा पुरंदरे हाच खरा जेम्स लेन" ते म्हणतात लेन च्या लिखाणासारखेच पुरंदरेंचे लिखान भयानक, वाचवतही नाही. मन,अंत:करण द्रुढ करावे लागते. जसजसे वाचत जावे तसतसे रक्त तापत जाते आणि शेवटी उद्गार बाहेर येतात. "काय हा उलट्या काळजाचा माणुस! याने तर जिजामाता, शिवबांचे पंख लावून कोट्यावदी रुपये मिळवले आणि या अशा माणसाने जिजामातेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवावेत ! "
काही वर्षापुर्वी प्रतिकात्मक "शिवस्रुष्टी" शिवाजी पार्क, मुंबई इथे उभी केली होती. चिपळून तालुक्यातील डेरवण येथे कोल्हापुरच्या वालावलकर धर्मादाय विश्वस्त संस्थेकडून "शिवस्रुष्टी" उभा केली. उद्घाटन सरसंचालक सुदर्शन यांच्या हस्ते झाले. त्यासाठी त्यांना त्यांच्या डोक्यावर पडलेल्या चपलांच्या पावसाचे स्वागत करावे लागले. कारण होते "शिवस्रुष्टी"त रामदास आणि कोंडदेवाची शिल्पे. तेथे जी शिल्पे आहेत तेथे शहाजी राजांची शिल्पे नाहीत.