8 July 2012

समुद्रावरचा राजा - कान्होजी आंग्रे

मराठा साम्राज्याच्या आरमाराचे प्रमुख ’ सरखेल’ कान्होजी आंग्रे यांची ४ जुलै रोजी पुण्यतिथी, त्यानिमित्य त्यांच्या स्म्रुतीला उजाळा देणारा लेख.
             छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कान्होजी आंग्रे सुवर्णदुर्ग येथे चाकरीला होते.१६८८ मध्ये सुवर्णदुर्ग चा किल्लेदार अचलोजी मोहिते पैसे घेऊन फ़ितूरीने किल्ला सिद्धीकडे सोपवणार असे कळल्यावर कान्होजी यांनी सिद्धीवरून किल्ला लढवला आणि पराक्रम केला.पुढे १६९८ मध्ये सरखेल सिधोजी गुजर गेल्यानंतर राजाराम महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना सरखेल(आरमाराचा सरसेनापती) पद सोपवले.ते त्यांच्या म्रुत्युनंतर त्यांच्याकडेच होते.मराठा - मुघल युद्धामध्ये कोकणपट्टी सांभाळण्याचे कार्य कान्होजी आंग्रे यांनी यशस्वीरित्या पार पाडले.पोर्तुगीज, इंग्रज, आणि सिद्धी यांना त्यांनी चांगलेच जेरीस आणले आणि संपुर्ण भागात आपला वचक प्रस्थापित केला.
 जन्म आणि वैवाहिक जीवन
            कान्होजी आंग्रे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेडजवळील कालोसे या गावी १६६९ मध्ये झाला वडिलांचे नाव तुकोजी संकपाळ आणि आईचे बिम्बाबाई होते.नवसाने आणि अंगाच्या धुपाराने कन्होजींचा जन्म झाला म्हणून आंग्रे हे आडनाव लावले गेले.त्यांनी ३ लग्ने केली.पहिली पत्नी राजूबाई/मथुराबाई. यांच्याकडून त्यांना सेखोजी आणि संभाजी म्हणजेच आबासाहेब अशी २ मुले झाली.सेखोजी हे नाव त्यांच्या आजोबांच्या नावावरून ठेवले गेले.दुसरी पत्नी राधाबाई/ लक्ष्मीबाई यांच्याकडून त्यांना मानाजी आणि तुळाजी असे २ पुत्र झाले, तर तिसरी पत्नी गहिणबाई यांच्याकडून त्यांना येसाजी आणि धोंडजी असे २ पुत्र झाले.शेवटी एक मुलगी झाल्याने तिचे नाव "लाडूबाई" ठेवले गेले.
समुद्रावरचा शिवाजी
          कान्होजींनी अलिबागचा कुलाबा किल्ला जिंकुन घेऊन तेथे आपली राजधानी थाटली.छत्रपती महाराजांनी आंग्रे यांना आरमारचा प्रमुख केले आणि आंग्रे कोकण किणार्याचे राजे झाले.इ.स. १७०० मध्ये राणी ताराबाईंनीही या पराक्रमी वीराला सन्मानित करून सावंतवाडी ते मुंबईपर्यंतची किनारपट्टी रक्षणासाठी ताब्यात दिली.या नव्या आव्हानाबरोबर कान्होजींना एकाच वेळी परकीय आणि स्वकियांबरोबर लढा द्यावा लागत होता.१७०७ मध्ये मराठेशाही मध्ये फ़ुट पडल्यावर त्यांनी कोणाचीही बाजू न घेता स्वतंत्रपणे कारभार सुरु केला.पुढे त्यांचे बालमित्र असलेला बाळाजी विश्वनाथ भट (पेशवे ) याने त्यांचे मन वळवून सातारा गादी बरोबर वळवंड, लोणावळा येथे तह करवला.कोकणाबरोबरच कच्छ, सौराष्ट्रपासून त्रावणकोर, कोचीनपर्यंतची सागरी सत्ता कान्होजींच्या हाती होती.
परकियांना पुरुन उरले 
              सागरी भागात मुक्तपणे संचार करणार्या परकियांवर निर्बंध आले होते. १६९८ पासून मराठी राज्याची सारी सागरी सत्ता कान्होजींकडे आली होती. त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही सागरावर व्यापार करू शकत नव्हते याचा प्रतिकार करण्याचे परकियांनी ठरवले.सर्व परकियांनी एकत्रित येऊन कान्होजींना संपविण्याचे ठरवले.तरीही त्यांनी इंग्रज, पोर्तुगीजांनाही पराभुत केले.शत्रुच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी कान्होजींनी दुर द्रुष्टिने अगोदरच अनेकांशी मैत्रीचे संबंध ठेवले होते.अशा संबंधांच्या मदतीने त्यांनी आपले आरमार अधिक शस्त्रसज्ज केले.पोर्तुगीजांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रनिर्मितीचा कारखाना आणि कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग येथे सुधारीत पद्धतीने जहाज बांधनीचे कारखाने त्यांनी उभारले.या सुसज्जतेसह कान्होजींनी समुद्रकिनार्यावर एक दबदबा निर्मान केला होता.कान्होजींचा लढा धार्मिक आक्रमनाची धार कमी करण्यासाठी पण होता.कान्होजी आंग्रे यांनी कोकणातील मंदिरासह , पंढरपुर, आळंदी, जेजुरी, तुळजापूर येथील देवस्थानांना इनाम व रोख देणग्याही दिल्या.
         छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्रुत्युनंतरही औरंगजेबाला मराठी मुलूख काबीज करता आला नाही.यामागे अनेक शुर सरदारांचे योगदान होते.कोकण किणार्यावरील राजसत्तेचा जागता पहारा असणारे कान्होजी हेही त्यातीलच एक. दि.४ जुलै १७२९ रोजी कान्होजींनी जगाचा निरोप घेतला.

1 July 2012

पानिपत : मराठ्यांचे कि पेशव्यांचे ?

राज्य पेशव्यांचे आणि पानिपत मराठ्यांचे कसे ? 
         पानिपत कोणाचे झाले ? असा प्रश्न विचारला की, पहिलीच्या मुलांपासून ते पदवीधर तरुणांपर्यंत सर्वजन एकच उत्तर देतात की, मराठ्यांचे पानिपत झाले.परंतू यामध्ये आपल्या मुलांचा किंवा त्या तरुणांचा दोष नाही.कारण त्यासाठी जबाबदार आहे ती  शिक्षण व्यवस्था आणि इतिहासकार वि.का.राजवाडे, अ.रा.कुलकर्णी, सेतु माधवराव पगडी, पांडुरंग सदाशिव पिसूरलेकर,व्ही.टी.गुन्हे, के.एन.चिटणीस, शं.ना.जोशी, वा.क्रु.भावे, सरदेसाई इत्यादी इतिहासकारांनी मराठ्यांचा इतिहास लिहित असताना मराठ्यांचे पानिपत झाले हा विचार इतिहासामध्ये जाणिवपुर्वक रुजवला.परंतू इतिहासाचा एक चिकीत्सक अभ्यासक या नात्याने विचार केल्यास आपणास ही गोष्ट सिद्ध करता येईल की, पानिपत हे मराठ्यांचे झाले नसून पेशव्यांचे  झाले आहे.
               इतिहासामध्ये पानिपतच्या एकुण तीन लढाया झाल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे - 
१) पहिली पानिपतची लढाई - २० एप्रिल इ.स.१५२६(इब्राहिम लोबी द बाबर)
२) दुसरी  पानिपतची लढाई - ५ नोव्हेंबर इ.स.१५५६(अकबर द हेमू)
३) तिसरी पानिपतची लढाई - १४ जानेवारी इ.स.१७६१(पेशवे द अहमदशाह अब्दाली)
            यापैकी तिसर्या पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांचे नव्हे तर पेशव्यांचे पानिपत झाले, ते कसे आपण पाहू.
 मराठ्यांच्या सत्तेचा कालखंड - इ.स.१६३० ते इ.स.१७१३.
पेशव्यांचा म्हणजेच ब्राह्मणांचा कालखंड - इ.स. १७१३ ते इ.स. १८१८.
              इ.स. १७१३ मध्ये बाळाजी विश्वनाथ हा मुख्य पेशवा झाला आणि तेंव्हा पासुनच मराठा छत्रपतींच्या हाती नाममात्र सत्ता राहुन सर्व राजकीय सत्ता पेशव्यांनी आपल्या ताब्यात घेतली.त्याच मराठा राज्याची राजधानी सातारा बदलून ती पुण्यास करण्यात आली.याच बाळाजी विश्वनाथला इतिहासकार मराठा सत्तेचा दुसरा संस्थापक असे म्हणतात.
          बाळाजी विश्वनाथ नंतर पहिला बाजीराव (इ.स.१७३०-४०) हा पेशवेपदी आला. या पहिल्या बाजीरावाच्या शौर्याबद्दल तर इतिहासकार फ़ारच उदो उदो करतात.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर शौर्य आणि धाडस यासाठी पहिल्या बाजीरावाचाच क्रम लागतो, असे इतिहासकार लिहितात.कदाचित असे लिहुन छत्रपती शिवाजी महाराजांइतकी लोकप्रियता पहिल्या बाजीरावालाही मिळेल असे त्यांना वाटत असावे.पण आपण एक गोष्ट समजून घ्यायला हवी ती म्हणजे पहिल्या बाजीराव पर्यंतच मराठा स्वराज्य होते नंतर त्याचे रुपांतर पेशवाईत झाले 
          पहिल्या बाजीरावाच्या म्रुत्यूनंतर त्याचा मोठा मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ़ नानासाहेब (इ.स.१७४०-६१) हा  पेशवेपदी असता याच दरम्यान म्हणजे इ.स.१७४८ मध्ये छत्रपती शाहूंचा म्रुत्यू झाला.त्यामुळे संपुर्ण मराठ्यांची सत्ता ही नानासाहेब पेशव्यांच्या हाती आली.(याचा अर्थ असा होतो की, पेशवे ठरवतील तीच पुर्व दिशा, मराठे ठरवतील ती नव्हे !).नानासाहेब पेशव्यांच्याच कालखंडात दोन महत्वाच्या घटना घडल्या 
१) अटक येथील प्रदेशावर विजय (१७५८) 
२) पानिपत लढाईमध्ये पराजय (१७६१)
            या दोन घटनांच्या विशेषणा वरून इतिहासकारांचा पक्षपातपणा लक्षात येतो. कारण इ.स.१७५८ मध्ये नानासाहेब पेशव्यांचा कनिष्ट भाऊ रघुनाथरावाने इंदुरच्या मल्हारराव होळकरांच्या मदतीने अटक किल्यावर जरीपटका फ़डकावून विजय मिळवला.या विजयाचे वर्णन करण्यासाठी इतिहासकारांनी इतिहासामध्ये एक म्हण प्रचलित केली :-
" पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले."
             काही हरकत नाही रघुनाथरावाच्या नेत्रुत्वाखाली विजय मिळवला म्हणुन इतिहासकारांनी अगदी सत्य इतिहास समाजासमोर आणण्यासाठी या म्हणीचा उपयोग केला असेल.
             परंतू अवघ्या ३ वर्षानंतर म्हणजेच इ.स.१७६१ मध्ये नानासाहेब पेशव्याचाच चुलत भाऊ सदाशिवराव याच्या नेत्रुत्वाखाली पानिपतचे युद्ध झाले.या पानिपतच्या युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या "गनिमीकावा" या युद्ध तंत्राचा सदाशिवरावांनी वापर केला नाही, म्हणुनच पानिपतच्या लढाईत पेशव्यांना पराभव पत्कारावा लागला. हा पराभव आपला नसून मराठ्यांचा आहे, हे सांगण्यासाठी ढोंगी इतिहासकरांनी आणखी एक म्हण प्रचलित केली :-
" मराठ्यांचे पानिपत झाले"
           अशा प्रकारे या दोन घटनांचे विश्लेषण त्यांच्या पद्धतीने केले आहे.विजयाचे श्रेय स्वत:च्या नावावरती घेतले आणि पराजय मात्र मराठ्यांच्या नावावर खपवला.आमचे एवढेच म्हणने आहे की, पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले असतील तर पानिपतही पेशव्यांचेच झाले आणि मराठ्यांचे पानिपत झाले असेल तर अटकेपार झेंडे ही मराठ्यांनीच लावले, याला म्हणतात वस्तुनिष्ठ इतिहास लेखन करणे. परंतू वस्तुनिष्ठ इतिहास लेखन न करता त्यांना अनुकूल असा इतिहास लिहिला.
            परंतू छत्रपतींचा मावळा आता पुस्तक वाचनातून जाग्रुत होत आहे.तो आता कोणत्याही षडयंत्राला बळी पडनार नाही.कारण आता  इतिहासाच्या पुनर्लेखनास सुरुवार झाली आहे.

26 June 2012

रयतेचा राजा शाहू छत्रपती । जन्म दिन

              २६ जुन १८७४ शाहू छत्रपतींचा जन्म झाला.त्यांचे वडिल जयसिंगराव व आई राधाबाई मुधोळच्या राजकन्या म्हणुन लौकीक होता.तर जयसिंगराव उर्फ़ आबासाहेब हे कोल्हापूरचे छत्रपती बाबासाहेब महाराज यांच्या भगिनी बाळाबाई यांचे पुत्र.असा दोन्ही घराण्यांकडुन यशवंतरावांना उत्तम वारसा मिळाला होता.शाहूंचे पाळण्यातले नाव यशवंत.३जानेवारी १८७६ रोजी आबासाहेबांना दुसरे पुत्ररत्न झाले.त्यांचे नाव पिराजीराव. दोन्ही देखण्या मुलांच्या कौतुकात रमलेल्या राधाबाईंना आकाश पण ठेंगणे झाले होते.१८७७ रोजी त्या निधन पावल्या आणि दोन्ही मुले आईविना पोरकी झाली.त्यानंतर आबासाहेबांवर १८७८ मध्ये कागल जहागीर सांभाळण्याची जबाबदारी आली. मुलांबरोबर मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी १८८४ साली शाळा काढली.१८८० मध्ये त्यांनी "नेटिव्ह लायब्ररी" सुरु केली होती.रयतेच्या आरोग्यासाठी दवाखाने सडका व झाडे लावलीत. कागलचा कायापालट केला त्यामुळे कोल्हापूर संस्थानचे रिजंट म्हणुन इंग्रजांनी त्यांची नेमनुक केली २० मार्च १८८६ रोजी आबासाहेबांचे निधन झाले.
यशवंत ते छ.शाहू 
            शिवरायांनी स्थापण केलेल्या स्वराज्याचे रक्षण संभाजी राजांच्या करुण शेवटानंतर राजाराम महाराजांची पत्नी महाराणी ताराबाई यांनी केले.स्वत: हाती समशेर घेऊन त्या रणरागिणीने औरंगजेबाशी दोन हात केले.औरंगजेबाच्या म्रुत्यू नंतर संभाजीपुत्र शाहू मोघलांच्या ताब्यातून सुटला, त्यांने स्वराज्यावर आपला हक्क सांगितला पण ताराराणी ने नाकारला यातूनच सातारा आणि कोल्हापूर अशी स्वराज्याची दोन शकले झालीत.कोल्हापूर संस्थानच्या संस्थापक ताराराणीच्या निधनानंतर या सिंहासनाला योग्य वारस लाभला नाही कारण या गादीचे वारस अल्पवयीन व अल्पकालीन ठरलेत.इंग्रजांचा अंमल सुरु झाल्यावर त्यांच्या मर्जीनुसार वारस नेमले जात त्या राजाचा अधिकार नाममात्र होता.अधिक्रुत वारस नसल्यामुळे जवळच्या नातलगाचा मुलगा दत्तक घेण्याची प्रथा होती त्यानुसार कोल्हापूर संस्थानचे वारस चौथे शिवाजी यांच्या गादीवर छ.शाहू यांची नेमणूक झाली.कोल्हापुर संस्थानमधील कागलच्या थोरल्या पातीचे जहागिरदार जयसिंगराव घाटगे यांचे पुत्र यशवंतराव यांनाच पुढे शाहू हे नाव मिळाले.दि.१७ मार्च १८८४ रोजी "शाहू छत्रपती " या नावाने दत्तकविधान झाले.त्यावेळी त्यांचे वय दहा वर्ष होतं.
राज्यकारभार
            राज्यकारभारात सर्वच जाती-धर्माच्या लोकांची नेमणुक करून समतोल साधला जावा ही शाहू छत्रपतींची इच्छा होती.कोल्हापूरचे संस्थान हाती घेतल्यावर शाहू छत्रपतींच्या लक्षात एक गोष्ट आली ती अशी की त्यावेळी प्रशासनात गोरे साहेब, पारशी आणि ब्राह्मण जातीतील कर्मचारी मोठ्या प्रमाणात होते. मोक्याच्या जागा विशेषत: चित्पावण ब्राह्मणांनी बळकावल्या होत्या त्यांच्या जागी हुशार व होतकरु ब्राह्मणेत्तरांना योग्य प्रतिनिधीत्व मिळवून देण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे नोकरशाहीतील ब्राह्मणी वर्चस्वाला शह बसला इ.स.१७७८ मध्ये पेशव्यांनी "शिवशक" बंद पाडुन फ़सलीशक सुरु केला होता. तो "शिवशक" छ.शाहू महाराजांनी पुन्हा सुरु केला आणि राज्यकारभारात राज्याभिषेक शकाचा वापर सुरु झाला.
        त्याचशिवाय त्यांनी अनेक शाळा , वसतीग्रुहे बांधली त्यातील पहिले वसतीग्रुह हे कोल्हापूर मध्ये बांधन्यात आले त्यामुळे कोल्हापूरला वसतीग्रुहाची जननी हा मान मिळाला.अशा अनेक पद्धतीने ब्राह्मणांचे वर्चस्व संपुष्टात आणले व संभाजीपुत्र शाहूंनी पेशव्यांच्या हातात कारभार देऊन जी चुक केली होती ती कोल्हापूरच्या राजाने सुधारली आणि पुन्हा उभारल स्वराज्य.
आरक्षणाची घोषणा
             वेदोक्त प्रकरणामुळे टिळक, शि.म.परंजपे, न.चि.केळकर, दादासाहेब खापार्डे इ. राष्ट्रीय चळवळीतील ब्राह्मण नेत्यांचे पितळ उघडे पडले.गोपाळक्रुष्ण गोखले आणि न्या.रानडे यांनीही जातीसाठी माती खान्याचा वसा घेतला.
           सातवे एडवर्ड यांच्या राज्यारोहण समारंभास शाहू महाराज इंग्लंड ला गेले होते. तेथे असतानाच त्यांनी एक क्रांतीकारक घोषणा केली.२६ जुन १९०२ रोजी महाराजांच्या आदेशानुसार कोल्हापूर ग्याजेट मध्ये आरक्षणाची घोषणा करणारे जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आले.तो जाहीरनामा असा "अलीकडे कोल्हापूर संस्थानामधील सर्व वर्गाच्या प्रजाजनांच्या शिक्षणाला उत्तेजन देण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. परंतू विशेष मागासलेल्या जातींत हे प्रयत्न अपेक्षेप्रमाणे फ़लद्रुप झाले नाहीत.या गोष्टीचा उल्लेख करताना महाराजांना मोठा विषाद वाटत आहे.या गोष्टीचा पुर्ण विचार करून महाराजांचे असे मत झाले आहे की , या निराशेचे कारण उच्च शिक्षणाची पारीतोषके विस्त्रुतरितीने विभागली जात नाहीत. ही परिस्थिती काही अंशी दुर करण्यासाठी व संस्थानमध्ये महाराजांच्या प्रजाजनांना उच्चशिक्षण संपादण्यास उत्तेजन देण्यासाठी या वर्गाकरिता आजपर्यंतच्या प्रमाणापेक्षा विस्त्रुत प्रमाणात संस्थानच्या नोकरीत जागा राखून ठेवण्याचा महाराजांचा क्रुतनिश्चय झाला आहे."
        " या धोरणाला अनुसरुन या हुकुमाच्या तारखेपासून ज्या मोकळ्या पडतील त्यापैकी शेकडा ५० जागा मागासलेल्या वर्गातील उमेदवारांना देण्यात येतील,अशी महाराजांची अनुद्न्या झाली आहे. ज्या ज्या ओफ़िसात मागासलेल्या लोकांचे प्रमाण हल्ली शेकडा ५० पेक्षा कमी आहे, त्या त्या ओफ़िसातील इत:पर मोकळी पडणारी जागा मागासलेल्या वर्गातील इसमाला देण्यात येईल. प्रत्येक खात्याच्या मुख्यांनी व हुकुमानंतर भरलेल्या जागांचा तिमाही अहवाल सादर केला पाहिजे."
          असे आरक्षण म्हणजे  ब्राह्मणी वर्चस्वाला चपराक होती.या आरक्षणानंतरच ब्राह्मण वर्गाला हादरा बसला व त्यांनी असंतोषाचा निरर्थक उद्रेक केला.त्यामध्ये टिळक आघाडीवर होते."मागासवर्गीयांना संस्थानच्या नोकर्यात ५०% जागा राखुन ठेवण्याबाबत शाहू छत्रपतींचा निर्णय, आदेश म्हणजे भारतातील आरक्षण धोरणाचा प्रारंभ होय."
रयतेचा राजा गेला
         छ.शाहूंनी बरीच समाजसुधारक कार्य केलेली आहेत. ती इथे मांडता येत नाहीत पण महाराजांचे चरित्र सविस्तर आपण वाचावे व त्यापासून काही बोध घ्यावा म्हणुन ही त्याची ओळख. आज फ़ुले-शाहू-आंबेडकर ही त्रिमुर्ती परीवर्तनाची प्रतिके आहेत.शाहू महाराज म्हणजे फ़ुले व आंबेडकर यांना जोडणारा सांधा होतातो सांधा अचानक निखळला.६ मे१९२२ रोजी सकाळी सहा वाजता त्यांना म्रुत्यु ने कवटाळले. छ.शाहू गेले पण त्यांच्या कार्याची प्रेरणा मात्र कायम आहे. त्यांच्या स्म्रुतीला कोटी कोटी प्रणाम... 

12 June 2012

मृत दादोजी करवी केले लालमहाल चे बारसे

                  पुण्यातील शिवारायांच्या या लालमहालाचं वर्णन बाबासाहेब पुरंदरेने आपल्या "राजाशिवछत्रती" या पुस्तकातही केलं आहे ते ते लिहितात- पुण्यातील वाडा बांधून पुर्ण झाला आईसाहेबांस वा शिवबास वाडा आवडला. पागा, गोशाळा, शिलेखाना, कचेरी, दफ़्तरखाना, सदर, कोठी,राहण्याचे महाल, देवघर वगैरे जागा बांधून झाल्या.मुहुर्त पाहून आईसाहेब आणि शिवबा यांना वाड्यात राहावयास पंतांनी आणलं,पंतांनी वाडा तर अगदी सायसंगीन,दणकट,पण झोकदार बांधला.वाड्याला पंतांनी नाव दिलं "लालमहाल".त्यांनी वाड्याचे जोते पूर्व पश्चिम १७॥ गज लांब व दक्षिण - उत्तर २८॥ गज रूंद (५२॥ x ८३॥)धरले होते.वाड्याची उंची १०। गज (३०॥ फ़ूट) होती.आत चौकात कारंजी तयार केली होती.कारंजाचे पश्चिमेस भव्य प्रशस्त सदर होती.सदर म्हणजे छोटासा दरबारी महालच. वाड्यात पाण्याचा मुबलक पुरवठा केला होता.तीन विहिरी बांधल्या होत्या.पंतांनी अस थाट एकूण केला होता.शिवाय लालमहालात तळघरं बरीच बांधली होती.तळघरांची खोली ४॥ गज (१२ ॥ फ़ुट) होती.
         पुरंदरेनी लालमहालाचं वर्णन मोठं बहारीचं व त्याचा भव्य विस्तार स्पष्ट करणारं केलं असलं तरी तो पंतांनी म्हणजे दादोजी कोंडदेव ने बांधला व पंतांनीच त्याला लाल महाल असं नाव ठेवलं, अशी चुकीची माहीती त्यात आहे.कदाचीत वर्णन करण्याच्या भरात आणि दादोजी कोंडदेव ला मोठं करण्याच्या कैफ़ात त्यांना शिवाजी महाराज आणि जिजाऊमांसाहेब या दादोजी कोंडदेव वारल्यानंतर (दादू इ.स.१६४७ ला वारला) दोन-तीन वर्षांनी म्हणजे इ.स. १६४८ -४९ ला पुण्यात कायम मुक्कामास आले.हे ऐतिहासिक सत्य पुरंदरे विसरले.त्यामुळे त्याने वारलेल्या दादोजी कोंडदेव पंतास लालमहाल बांधण्याचा व त्याचं बारसं घालण्याचा मान दिला.शिवाजी महाराज व जिजामाता खेडला राहात असल्या तरी ते काही काळासाठी पुण्यात येऊन राहत होते.पण ते लालमहालात नव्हे, तर पुण्याच्या झांबरे पाटलांच्या वाड्यात राहत असत.त्यावेळी पंताच्या हयातीत लालमहाल बांधलाच नव्हता.तसे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत.शिवाय शिवरायांना शहाजी महाराजांनी बंगरूळहून इ.स.१६४२ मध्ये पुणे जहागिरीवर पाठवलं, तेंव्हा ते पहिल्यांदा खेड ला राहिले.या संदर्भात जेधे करीन्यात स्पष्टपणे लिहिलंय - महाराजांनी (शहाजी महाराजांनी) राजश्री सिवाजीराजे यासमागमे (सोबत)  राजश्री सामराजपंत पेशवे व मानकोजी दहातोंडे सरनोबत व बालाजी हरी मज्यालसी व कारकून व स्वराजा जमाव देऊन पुण्यास पाठवले त्यावरी कसबे खेडेबारे येथे वाडे बांधले.या पुराव्याला पुष्टी देणार्या अनेक निंदी उपलब्ध आहेत.         

छ.शिवरायांबद्दल जगातील मान्यवरांचे गौरवोद्गार

मार्शल बुल्गानिन (मा.पंतप्रधान- रशीया) - "साम्राज्यशाहीविरुद्ध बंड उभारुन स्वराज्याची पहिली मुहुर्तमेढ छ.शिवाजी महाराजांनी रोवली."
प्रिंस ओफ़ वेल्स (इंग्लंड) - "छ.शिवाजी महाराज हे सर्वात मोठे योद्धे होते. त्यांच्या स्मारकाची कोनशिला बसविताना मला अत्यानंद होत आहे."
ब्यारन कादा (जपान) - "छ.शिवाजी महाराज सत्पुरुष होते. त्यांनी अखिल मानव जातीचे हित केले."
मि.एनोल्ड टायबर्न (जगविख्यात इतिहासकार) - "छ.शिवाजी महाराजांसारखे राजे आमच्या देशात जन्माला आले असते तर त्यांच्या स्म्रुतीचा अक्षय ठेवा आमच्या डोक्यावर घेऊन आम्ही आनंदाने नाचलो असतो."
डॉ.डेलोन (शिवकालीन युरोपीयन प्रवासी) - " छ.शिवाजी राजे अत्यंत हुशार आणि जाणकार असून सर्व धर्माशी ते सहिष्णुतेने वागतात"

वॉरन हेस्टिंग (व्हाईसराय जनरल) - "सर्व भारतात केवळ शिवरायांचे अनुयायी जाग्रुत व जिवंत आहेत, हा छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाचा  परिणाम आहे."
प्रबोधनकार ठाकरे - "शिवाजीराजे इतके महान आहेत की त्यांच्या पुढे ३३ कोटी देवांची फ़लटण बाद होते."
स्वातंत्र्यवीर नेताजी सुभाषचंद्र बोस, क्रांतीसिंह नाना पाटील, भगतसिंग, उमाजी नाईक - " स्वातंत्र्य आंदोलनाची प्रेरणा आम्हास छ.शिवरायांच्या चरित्रातून मिळाली " 
कर्मवीर भाऊराव पाटील  (शिक्षणमहर्षी ) -  "प्रसंग पडला तर जन्मदात्या बापाचे नाव बदलेन पण कोलेज  ला दिलेले शिवरायांचे नाव मी कधीच बदलणार नाही "
ग्रेंड  डफ (इंग्लंड ) - "राजे केवळ लढवय्ये नव्हते तर सामाजिक आणि अर्थकारण यांची उत्तम जाण असणारे राजकारणी पुरुष होते. त्यांच्या चानाक्ष योजकतेमुळेच हतबल झालेल्या बहुजनांना सत्ताधिश होता आले."
साहित्य रत्न आण्णाभाऊ साठे - "प्रथम मायभुमीच्या । छत्रपती शिवबा चरणा । स्मरोनी गातो कवना । "
नेताजी सुभाषचंद्र बोस - "हिंदुस्तानच्या इतिहासातील फ़क्त शिवाजी महाराजांचे तेजस्वी चरित्र माझ्या अंत:करणात मध्यान्हिच्या तळपत्या सुर्याप्रमाणे प्रकाशमान होऊन राहीलय.शिवाजी महाराजांइतके उज्वल चरित्र दुसर्या कुणाचे मला दिसले नाही सद्य:स्थितीत या महापुरुषाच्या वीर चरित्राचा आदर्शच आम्हाला मार्गदर्शक आहे.शिवाजी महाराजांचा हा आदर्शच  सगळ्या हिंदुस्तानासमोर ठेवला पाहिजे ." 
भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर - " छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि चरित्र उत्तम होते. त्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे पेशव्यांनी नुकसान केले " 
पो.व्हाईसराय आंतोनियू द मेलु - द काश्चू (१४ जानेवारी १६६४ ) - "शिवाजी राजा हा एक कष्टाळू आणि पराक्रमी राजा आहे."
ब्रिटीश इतिहासकार ग्रेंड डफ़ - "मराठा साम्राज्याच्या राजाची तुलनाच करावयाची झाली तर ती जगजेत्ता अलेक्झांडर व नेपोलियन बोनापार्ट  यांच्या बरोबर करावी लागेल"

दादोजीचा पुतळा हटला : इतिहासाचे शुद्धीकरण.[पान २]

            सोन्याच्या नांगराने भुमी नांगरली. दादू कोंडदेवाने सोन्याच्या नांगराने भुमी नांगरली, हा इतिहास आहे आणि तो कसा बदलायचा , असा प्रश्नही काहीजनांना पडला आहे.पुण्यातील संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी ७ जानेवरी २०११ च्या लोकप्रभा या साप्ताहिकात दादोजी पंती सिऊबांस शाहणे केले या मथळ्याखाली एक लेख लिहुन दादू कोंडदेव बद्दल शिवरायांस किती आदर होता, तो त्यांचा गुरु कसा होता, याची अनेक उदाहरणे दिली आहेत.पण त्यांनी दिलेल्या समकालीन पत्रांमध्ये शहाजी महाराज, शिवाजी महाराज, जिजामाता यांनी कुठेच दादू गुरु म्हणुन उल्लेख केलेला नाही हे मात्र स्पष्ट आहे. ज्या बखरी पेशवाईच्या उत्तराधार्त म्हणजे पळपुटा बाजीराव म्हणुन प्रसिद्ध असणार्या बाजीरावाच्या काळात किंवा त्याच्यानंतर लिहिल्या गेल्या.ज्या काळात ब्राह्मण - ब्राह्मणेत्तर वाद जोरात पेटलेला होता. तो इतका टोकाला गेला होता की पळपुट्या बाजीरावाने त्याला जेंव्हा मुलगा झाला तेंव्हा त्याचं नाव वामनराव ठेवलं. कारण त्याला वाटलं की हा वामन ब्राह्मणेत्तर बळीराजाला पुन्हा पाताळात गाडेल. पण हा वामन अल्पवयातच गेला आणि बाजीरावाचं स्वप्न अपुर्णच राहिलं.अशा काळातील अनेक चुकांनी भरलेल्या बखरींचा आधार घेऊन त्यांनी दादू ला शिवरायांचा गुरु करायचं योग्य नाही. कारण या  बखरींबद्दल इतिहास संशोधक सेतू माधवराव पगडी म्हणतात - मराठा साधनांपैकी एक्क्याण्णव कलमी बखर काय किंवा चिटणीस बखर काय, उत्तर पेशवाईतील असल्यामुळे भारूडांनी भरल्या आहेत.
           अशा बखरींमध्ये आलेला इतिहास हा आजपर्यंत होऊन गेलेल्या इतिहासकारांनी नाकारलेला आहे.एवढंच नव्हे तर पुण्याचे इतिहासकार मेहेंदळे ही या बखरीमधील इतिहास टाकाऊ व खोटा समजतात ( वाचा : राजाशिवछत्रपती प्रुष्ट : १००-११२)
               दादू कोंडदेवाने पुण्याच्या भुमीवर (पांढरी)  सोन्याचा नांगर धरला की नाही याचाही थोडासा मागावा घेऊ या. बलकवडे आपल्या उपरोक्त लेखात लिहितात -पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरल्याचा उल्लेख फ़क्त सहा कलमी शकावलीत आहे.तीच्यातील शेवटच्या कलमातील तो उल्लेख असा आहे : शके १५५७ युव नाम संवत्छरी शाहजी राजे भोसले यांसि बारा हजार फ़ौजेची सरदारी इदलशाहीकडुन जाली सरजांमास मुलुक दिल्हे त्यात पुणे देश राज्याकडे दिलकहा राज्याची आपले तर्फ़ेने दादू कोंडदेव मलटणकर यांसि सुभा सांगुन पुणियात ठाणे गातले तेंव्हा सोहन्याचा नांगर पांढरीवर धरिला शांती केली मग सुभेदार याणी कसब्याची व गावगणाची प्रांतात वस्ती केली.
               पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरला, असा उल्लेख असलेला हा एकमेव जुना कागद आतापर्यंत उजेडास आला आहे आणि त्यात दादू कोंडदेवचा स्पष्ट उल्लेख आहे.
            बलकवडे या शकावलीचं सहावं कलम अपुर्ण देतात. मुळात या शकावलीत लिहिलं आहे ... शके १५५७ युव नाम संवत्छरी शाहजी राजे भोसले यांसि बारा हजार फ़ौजची सरदारी इदलशाईकडुन जाली सरजांमास मुलुक दिल्हे.त्यांत पुणे देश राज्याकडे दिलकहा राज्यानी आपले तर्फ़ेने दादू कोंडदेव मलटणकर यांसि सुभा सांगुन पुणियास ठाणे गातले. तेंव्हा सोहन्याचा नांगर पांढरीवर धरीला. शांती केली मग सुभेदार याणी कसब्याची व गावगणाची प्रांतात वस्ती केली.कोल्याचे वषे दिल्हे.साहावे साली तनखा घेतला शाहजी राजे विज्यापूर प्रांती गेले. कलम १.
            बलकवडे या शकावलीतील शेवटचं एक वाक्यच्या वाक्यच गाळतात.कारण या वाक्यामुळे या कलमाचा स्पष्ट अर्थ समजुन येतो.साहावे साली तनखा घेतला शाहजी राजे विज्यापूर प्रांती गेले, हे वाक्य नसेल तर सोन्याची नांगर धरलेली घटना दादू कोंडदेव नी केली असं स्पष्ट होतं आणि शेवटचं वाक्य दिलं तर सोन्याचा नांगर शहाजी महाराजांनी स्वत:च धरल्याचं स्पष्ट होतं.वर दिलेली सहा कलमी शकावली ही ऐतिहासिक द्रुष्ट्या फ़ारशी विश्वसनीय नाही. तरीही या शकावलीतील इतिहास स्वीकारून निष्कर्ष काढायचा झाला तर सोन्याचा नांगर पुण्याच्या पांढरीवर धरला  असेलच तर तो शहाजी महाराजांनी धरल्याचं स्पष्ट होतं.
                 या सहा कलमी शकावलीतील उल्लेखावरून शिल्प करायचे झाले तर ते शहाजी महाराज सोन्याच्या नांगराने भुमी नांगरतात, आसे करायला पाहिजे. आणि सुसंगत तर्क म्हणुन त्यावेळी संभाजीराजे, बालशिवबा, व जिजाऊंना दाखवलं तर योग्य झालं असतं पण असं न करता पहिल्यांदा ऐतिहासिक साधनांचा अर्धवट उल्लेख करायचा. त्याच्या आधारावर असत्य गोष्ट सत्य म्हणुन ठासून सांगावयाची  आणि वेळवखत पाहून तशी शिल्प चित्र करावयाची या मागील कावा काय होता हे जेम्स लेनच्या पुस्तकाने जाहीर केलंय.
                 अशा या सोन्याच्या नांगराने भुमी नांगरणार्या समुहचित्राची मुळ कल्पना लढवण्याचा मान मात्र शिवशाहीर (?) बाबा पुरंदरे यांच्याकडे जातो. त्यांनी आपल्या राजाशिवछत्रपती व महाराज या पुस्तकात पहिल्यांदा अशा पद्धतीचं चित्र काढून घेऊन ती छापली.
           या चित्रांच्या आधारावरच १९९७-९८ मध्ये एक समुह शिल्प करून ते पुणे महानगरपालिकेने शनिवारवाड्याच्या मागे बांधलेल्या लालमहालात बसवायचं ठरवलं. त्यासाठी पुण्यातीलच संशोधक निनाद बेडेकर याच्या सल्ल्याने व मार्गदर्शनाखाली एक शिल्प तयार केलं गेलं. यामध्ये नांगरधारी बैलजोडी , बालशिवबा तो नांगर धरून, शेजारी थोडं वाकून बालशिवबाला नांगर धरायला शिकवणारे दादू कोंडदेव व शिवबांच्यामागे जिजाऊसाहेब असं शिल्प तयार झालं. हे शिल्प तयार करताना मात्र पुरंदरे ने काढून घेतलेल्या चित्रातही नाहीत  अशा जिजाऊसाहेबांना या शिल्पात आणलं गेलं.
          २००० मध्ये या शिल्पाचं अनावरण झालं. यासाठी छत्रपतींच्या वंशजांनाही बोलाविण्यात आलं.यात कोल्हापूरकर छ.शाहू  महाराज आणि सातारकर राजमाता सुमित्राराजे यांचा समावेश होता.शिवरायांचा कार्यक्रम म्हणुन या व्यक्ती हजर राहिल्या पण जेंव्हा इ.स. २००३ -०४ मध्ये जेम्स लेन चं पुस्तक प्रदर्शीत झालं आणि त्याने त्यातील दादू आणि रामदास संबंधाने जिजाऊंच्या चरित्राची विटंबना करणारे घाणेरडे उल्लेख समजले, तेंव्हा असे इतिहासाचा कोणतही पुरावा नसताना हे शिल्प का तयार केलं याचा उलगडा झाला. तेंव्हापासून या शिल्पातून दादू कोंडदेव काढावा अशी मागणी जोर धरू लागली. हे शिल्प चुकीच्या संदर्भावर तद्दन काल्पनिक व जिजाऊ, शिवराय, शहाजी महाराजांचा अपमान करणारं असल्यामुळे त्यात बदल करणं पुणे महानगरपालिकेला भाग पडल्याने २७-१२-२०१० रोजी दादू कोंडदेवाचा पुतळा काढावा लगला.
            असा हा पुतळा काढल्यामुळे इतिहास बदलत नाही तर इतिहासाचं शुद्धीकरण होतं त्यातील चुका दुरुस्त होतात हे आपण समजुन घेतलं पाहिजे. असंच इतिहासाचं शुद्धीकरण शिवपुत्र संभाजी महाराजांच्या बाबतीतही काही दशकापुर्वी इतिहास संशोधक वा.सी.बेंद्रे व डॉ.कमल गोखले यांनी केलं होतं. संभाजी महाराजांची उत्तरकालीन बखरकार,संशोधक, कादंबरीकार, लेखक यांनी केलेली बदनामी वरील संशोधकांनी अस्सल पुराव्यांच्या आधारे धुवून काढली होती.त्यावेळी त्यांनाही आज दादू चा पुतळा काढायला जशा काही प्रव्रुत्ती विरोध होत्या तसा विरोध झाला होता. पण आज शिवपुत्र संभाजी महाराजांचा कर्त्रुत्वशाली इतिहास सर्वांना मान्य झाला आहे.तसाच शिवचरित्रातील दादू कोंडदेव - रामदास शिवरायांचे गुरु नव्हते हा इतिहासही मान्य होईल, आणि तो मान्य करावाच लागेल.