Showing posts with label इतिहास. Show all posts
Showing posts with label इतिहास. Show all posts

15 May 2017

आदर्श समाजासाठी मराठा आचारसंहिता

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुढाकाराने काही दिवसापुर्वी मराठा आमसभा संपन्न झाली. मराठा मोर्च्यामध्ये मराठा समाज एकत्र आला आणि मराठा समाजाच्या ज्वलंत समस्या विषयी संशोधन सुरु झाले. अशा वेळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजन करण्यासाठी आदर्श आचार संहितेची गरज असल्याचे स्पष्ट झाले; त्यामुळे अनिष्ट रुढी-परंपरात अडकलेल्या मराठा समाजाला बाहेर काढण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कोल्हापूर येथे मराठा महासंघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मराठा समाजाची आदर्श आचारसंहिता बनवण्यात आली आहे. परंतु अनिष्ट रुढी-परंपरात आणि जातीच्या व्रुथा अभिमानात अडकलेला आणि त्या कालबाह्य परंपरेलाच प्रतिष्ठा मानणारा मराठा समाज या आदर्श आचारसंहिताचे पालन कितपत करतो हे सांगणे कठीण आहे. अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी - परंपरात तथा हुंडाबळी सारख्या समस्या मराठा समाजाबरोबर इतर समाजातचही मोठ्या प्रमाणात आहेत. पण मराठा समाज हा सगळ्यात मोठा असल्याने त्या समाजातील त्रुटी लगेच द्रुष्टीस पडतात हे सत्य असले तर जातीचा व्रुथा अभिमान बाळगण्यात मराठा समाज नेहमीच अग्रेसर असतो हे शास्वत सत्य आहे. जातीचा अभिमान वाईट नाही पण व्रुथा अभिमान समाजाच्या सर्वांगिण विकासामध्ये अडथळा ठरतो. मराठा समाज जातीच्या व्रुथा अभिमानामध्ये एवढा गुरफ़टलेला आहे की कोणीही केवळ जातीच्या नावाने मराठा समाजाचा स्वत:च्या हितासाठी वापर करू शकतो. यातून प्रथमत: मराठ्यांनी स्वत:ची सूटका करवून घेतली पाहिजे.
           राजकारण आणि मराठा समाजाचे अतुट नाते बनलेले आहे. राजकारण संकल्पना केवळ मराठ्यांना द्रुष्टी समोर ठेवूनच उदयास आली आहे की काय असे वाटावे इतके अतुट नाते. राजकारणामुळे मराठा समाजाचे खुप नुकसान झालेले आहे. शिवाजी महाराजांच नाव घेऊन राजकारण्यांनी आणि धर्मवाद्यांनी मराठा तरुणांचा खुप वापर केला. त्यामुळे चांगलं शिक्षण घॆऊन नोकरी - व्यवसाय करण्याच्या वयात राजकीय पक्षासाठी आणि धर्मासाठी रस्त्यावर उतरुन दंगा करण्यात जास्त वेळ घालवणे हे मराठा तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे आजपर्यंत. पण राजकारण काय नी धर्मवाद काय दोन्हीमुळे मराठ्यांचे केवळ नुकसान झाले आहे. मराठा समाजाला ना राजकारणाने काही दिले ना धर्माने. धर्मवाद्यांनी केवळ देव-धर्मासाठी मराठ्यांच्या शक्तीचा केवळ वापर केला परंतू मराठा समाजाच्या समस्येकडे कायमच साफ़ दुर्लक्ष केले. त्यामुळे आता मराठा समाजाने आत्मपरिक्षण केले पाहिजे. कायम देणंच माहीत असणार्या मराठा समाजावर आरक्षण मागण्याची वेळ येणे ही बाब मराठ्यांसाठी शोभणीय नाही. महाराष्ट्राला कायम भरभरून देणार्या समाजाची आज ही अवस्था का झाली याची कारणे मराठा समाजाने शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वांगीण विकासासाठी पहिली वाटचाल म्हणुन मराठ्यांनी प्रथमत: धार्मिक गुलामी झुगारून सुरुवात केली पाहिजे. अतिधार्मिकता मराठ्यांच्या प्रगतीमध्ये मोठा अडथळा बनली आहे. म्हणूनच आज कितीही गरीबीत असला तरी मराठा समाज कर्ज काढून धार्मिक सण - उत्सव तथा विधी करत असतो हे थांबवणे किंवा याचे प्रमाण कमी करणे अत्यंत गरजचे आहे, तरच मराठा समाजामध्ये सुधारणा शक्य आहे.
शहाण्णव कुळीचा बाऊ नको, बुवाबाजी हाकला : अखिल भारतीय मराठा महासंघ
         अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी - परंपरात गुरफ़ट जाणार्या मराठा समाजाच्या सर्वांगीण उन्नती आणि विकासासाठी महासंघाने आमसभेमध्ये  मराठा समाजासाठी आदर्श आचार संहिता निर्माण केली. त्यामध्ये बुवाबाजीला थारा नको, घरोघरी महाप्रसादाची प्रथा नको, विवाह ठरवताना शहाण्णव कुळीचा बाऊ नको, की अनाठायी खर्च नको, मराठा संस्कृती टिकविण्यासाठी समाजाने पुढाकार घेऊन मराठा समाजाचा विकास घडवावा,  असे आवाहन करण्यात आले.
आदर्श मराठा समाज घडवण्यासाठीची आचारसंहिता अशी
          वास्तुशांती, लग्नकार्य समारंभ इत्यादी कार्यक्रमामध्ये छ.शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करणे.  मराठा संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न करणे व समाजावर संस्कार करणे. समाजाच्या पूर्वजांची व वीरतेची कुलदैवते, कुलस्वामीनी (उदा. जोतिबा, खंडोबा, तुळजाभवानी) यांची मनोभावे पूजा व्हावी. या दैवतांमध्ये अनावश्‍यक वाढ होऊ नये. बुवाबाजीला थारा नको. घरोघरी महाप्रसादाची प्रथा नको.
          शहाण्णव कुळी समाजाची संभ्रमावस्था आहे. यात विभागणी होऊ नये. सर्व एकच आहोत, ही भावना वाढीस लावावी. यासाठी संशोधकांची मदत घ्यावी. विवाह ठरवताना शहाण्णव कुळीचा बाऊ करू नये. कर्तृत्त्वाला महत्त्व द्या. जन्मकुंडलीचा सांगोपांग विचार करून कालबाह्य रूढी झुगारून द्या व विज्ञानाची कास धरून रक्तगट तपासणी व्हावी. विवाहापूर्वी एच. आय. व्ही. च्या तपासणीला हरकत नाही.
विवाहातील बडेजाव व अट्टहास - 1) मुहूर्तमेढ - आंब्याच्या फांदीऐवजी कुंडीतील आंब्याचे कलमी रोप वापरावे.  2) आहेर - खोट्या प्रतिष्ठेपायी 100 ते 500 व्यक्तींपर्यंत आहेर करण्याची प्रथा बंद करावी, असा एकमुखी निर्णय. 3) काव्याक्षतांची नासाडी थांबवावी. 4) लग्न कार्यातील वधू-वरांना उचलण्याचा अट्टहास, काव्याक्षता फेकाफेकी व वरातीत डॉल्बी व दारूच्या वापराने तंटे होतात. त्यामुळे वरातीसारख्या पद्धती बंद व्हाव्यात. 5) अनाठायी खर्च टाळावा. 6) हुंडा व सोन्याच्या मोहापायी कर्जबाजारी होऊन होणारे अनर्थ टाळूया. 7) सामुदायिक विवाह पद्धतींना प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न करणे.
व्यक्तीच्या मृत्यूनंतर अनावश्‍यक रूढींचे प्रदर्शन थांबवावे. 1) बारा दिवसांचा दुखवटा काळ कमी करणे (पाच ते सात दिवस). 2) एक कलश रक्षा नदीमध्ये विसर्जित करावी व बाकी रक्षाकुंडात विसर्जित करावी किंवा शेतीमध्ये विसर्जन करून प्रिय व्यक्तीच्या स्मृती जागृत ठेवाव्यात. 3) रक्षा विसर्जनानंतर नैवेद्य रूपाने होणारी अन्नाची नासाडी टाळावी. घरच्या व्यक्तींनीच मृत व्यक्तीच्या आवडीचा पदार्थ ठेवण्यास हरकत नाही.  4) कालानुरूप वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन सकाळी नऊ ते दहाच्या आत रक्षा विसर्जन होण्यासाठी दक्ष राहावे.  कारण व्यावसायिक व नोकरदार यांना सोयीचे होईल. 6) दिवसकार्याप्रसंगी भेटवस्तू (भांडी) वाटप बंद करावे. 7) दिवस कार्यानंतर पै-पाहुण्यांकडून नव्याने येऊ घातलेली मटण भोजनाची प्रथा पूर्णपणे बंद करावी. 8) वास्तुशास्त्र-घर बांधणीमध्ये हवा, प्रकाश या पुरताच हा विषय मर्यादित ठेवावा. यामध्ये थोतांड करणाऱ्यांना आळा घालून जरब बसविणे. वास्तुशांती छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा पूजनाने करावी. 9) प्रत्येक गोष्टीची विज्ञानाच्या दृष्टिकोनातून चिकित्सा करावी. 10) मुलगा-मुलगी भेद नको. दोघांना समान वागणूक द्यावी. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी मराठा समाजाने प्रयत्न करणे. 11) गावच्या जत्रा, माही पूर्वीप्रमाणे आप्तांच्या पुरत्याच मर्यादित ठेवाव्यात. कर्ज काढून मोठ्या प्रमाणात भोजनावेळी बंदी व्हाव्यात. यामध्ये दारूचा वापर थांबवावा.
          मराठा समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मराठा आमसभेमध्ये ठरवलेल्या आचारसंहितेशिवाय पर्याय नाही. आदर्श आचारसंहिता मराठा समाजाबरोबरच इतर समाजासाठीही तेवढीच महत्वाची आहे. प्रबोधन हे केवळ बोलण्या - लिहिण्यापुरतेच राहू नये त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. जन्म संगोपनाने विचार करुन कालबाह्य रुढी झुगारुन दिल्या पाहिजेत. मराठा समाजातील गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक तथा वैद्यकिय मदत तसेच निराधारांना विविध प्रकारचे सहकार्य करणे हे मराठा समाजासाठी आद्यकर्तव्य आहे त्याचे पालन झाले पाहिजे.केवळ मोठ्या संख्येने एकत्र न येता एकमेकांच्या मदतीसाठीही मराठा समाजने हिंदुत्ववाद, बहुजनवाद असले वाद बाजुला सारून केवळ एक मराठा म्हनून एकत्र आले पाहिजे आपल्या मराठा समाजासाठी. आज समता-समानता म्हनूण कितीही ओरडले तरी मराठ्यांनी आपल्या जातीसाठी मराठा म्हणून एकत्र यावे आणि आपल्या समाजाच्या कल्याणासाठी वचनबद्ध व्हावे हिच काळाची गरज आहे. मराठा आमसभेमध्ये ठरवल्या गेलेल्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करुन मराठा समाजाच्या प्रगतीसाठी आदर्श समाज व्यवस्थेच्या नवनिर्माणासाठी कृती करावी.
जय शिवराय जयोस्तु मराठा जय महाराष्ट्र

17 January 2017

राजसंन्यास, धर्मवीर आणि शंभुप्रेमींची जबाबदारी

             महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात ३ जानेवारी २०१७ हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाच्या दिवसातील एक ठरला. छत्रपती संभाजी महाराज उद्यानात असलेला रा. ग. गडकरी यांचा पुतळा काही तरुणांनी मध्यरात्री हातोडी, कुर्‍हाडीचे घाव घालून फोडला आणि तो मुठा नदीत फेकून दिला. काही वेळातच हा प्रकार सर्वदुर पसरला. या घटनेचे शंभुप्रेमींनी जोरदार समर्थन केले तथा नितेश राणेंनी त्या तरुणांचा शब्द दिल्याप्रमाणे उचित सन्मान केला तर गडकरी प्रेमींनी निषेद आणि संताप व्यक्त केला. पण रा. ग. गडकरींचा पुतळा का तोडला,  यामागची भावना काय होती याचा विचार करणे निषेदार्ह संताप व्यक्त करणार्यां गडकरी प्रेमींना महत्वाचे वाटले नाही. कारण शिवभक्तांनी केलेल्या कोणत्याही घटनेला ब्राह्मणद्वेषाचे लेबल लावून त्यातुम निसटणे हा आज लोकप्रिय फ़ंडा झालेला आहे.
          राम गणेश गडकरीं यांची ओळख सांगायची तर, गडकरींचा जन्म गुजरात मधील नवसारी येथे २६ मे १८८५ रोजी झाला. तर २३ जानेवारी १९१९ रोजी त्यांचा म्रुत्यु झाला. वयाच्या ३४ वर्षात त्यांनी कविता, नाटक तथा विनोदी लेख यांसारखे बरेच साहित्य निर्माण केले. त्यांच्या साहित्यांनी आयुष्याच्या शेवटच्या काळात मराठी भाषा आणि साहित्यावर सत्ता गाजवली. प्रेमसंन्यास, राजसंन्यास, एकच प्याला, पुण्यप्रभाव ही त्यांची गाजलेली काही नाटके लिहिणारे गडकरी हे मराठीतील शेक्सपियर म्हणून ओळखले जात. राम गणेश गडकरींच्या पुतळ्याला मुठा नदीच्या पाण्याची चव चाखायला लावणारे त्यांचे साहित्य म्हणजे "राजसंन्यास" नाटक. आजपर्यंत इतिहासाचे बर्याच प्रमाणात विक्रुतीकरण झालेले आहे तसेच सत्य इतिहासही बाहेर आलेला आहे.महाराष्ट्राच्या इतिहासात अशा विक्रुती करताना बर्याच मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यापैकी म्हणजे इतिहासाचे संशोधन करताना नाना फ़डणीस याने भोगलेल्या रखेल्यांची यादी सापडली होती ती दत्तो वामन पोतदार याने गिळून टाकली. नाना ने रखेल्या भोगल्या पण पोतदार ने तर अखंड रखेल्या गिळुन नाना फ़डणीस वरच कढी केली. महाराष्ट्रातील इतिहास विक्रुतीने सडलेला आहे त्यात गडकरींच्या "राजसंन्यास" ची भर पडली.
राजसंन्यास आणि आधुनिक धर्मप्रेमी
        हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे विरश्रींचे शिरोमणी. वयाच्या १४ व्या वर्षी बुधभुषणम सारखा ग्रंथ लिहुन साहित्य क्षेत्रात आपले नाव अजरामर केले.शिवराज्याभिषेक विधी करणार्या गागा भट्टांनी देखील त्यांचा समयनद हा ग्रंथ संभाजी राजांना अर्पण केला आहे. या महानायकाने भारतातील साहित्यिकांना, कादंबरीकारांना, कथाकारांना, नाटककारांना वेगवेगळ्या प्रकारे खाद्य पुरविले. बुद्धीच्या अनेक ठेकेदारांनी आपापल्या पद्धतीने शंभुराजांचे चरित्र लोकांसमोर मांडले. परंतु राष्ट्ररक्षणार्थ बलिदान देणार्या पराक्रमी शिवपुत्रावर साहित्यिकांनी प्रचंड अन्याय केलेला आहे. राम गणेश गडकरींनी "राजसंन्यास" नाटकाच्या माध्यमातून सर्वांवर कढी केलेली आहे. कारण राजसंन्यास नाट्य छ.संभाजी राजांचे बदफ़ैली, स्त्रीलंपट चरित्र रंगवून प्रचंड अन्याय करणारे आहे. संभाजी राजांच्या बदनामीला सर्वप्रथम कारणीभूत होती ती मल्हार रामराव चिटणीसची बखर. स्वराज्यद्रोहा बद्दल संभाजी राजांनी बाळाजी आवजी चिटणीसला देहांत शासन दिले होते. बाळाजी हा मल्हार रामराव चिटणीसचा खापरपणजोबा होता. आपल्या खापर पणजोबाला शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिले होते, त्याचाच सूड घेण्यासाठी तब्बल १२२ वर्षांनी मल्हार रामरावाने बखर लिहून त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान केले. परंतू कै. वा. सी. बेंद्रे यांनी चाळीस वर्षे कष्ट घेऊन शंभुचरित्राचा खरा इतिहास उभा केला आणि जाज्वल्य इतिहासातून अनेक लेखकांना दिव्य द्रुष्टी दिली. त्यामध्ये शिवाजी सावंत, डॉ.जयसिंगराव पवार, विश्वास पाटील, डॉ.कमल गोखले, विजय देशमुख यांसारख्या विद्वानांनी खरे आणि भव्य दिव्य असे  शंभुराजांचे चरित्र जनमानसांसमोर आणले. पण दुर्दैवाने संभाजी राजांच्या ज्वाज्वल कर्त्रुत्वापेक्षा त्यांच्या इतिहासाची विक्रुत मांडणी करणार्यांना साहित्य क्षेत्रामध्ये आढळ स्थान दिले गेले. त्यावर कढी म्हणजे संभाजी राजांच्या चरित्रावर प्रचंड अन्याय करणार्या गडकरींचा पुतळा संभाजी राजांच्या नावाने असणार्या उद्यानात उभारणे हीच खरी महाराष्ट्राची शोकांतिका आहे.
          संभाजी महाराज उद्यानातील गडकरींचा पुतळा काढल्यानंतर खरी कसोटी लागली ती शंभुच्या रक्तगटाची तरून पिढी निर्माण करायला निघालेल्या आणि आयुष्य ब्राह्मणप्रतिपालनाला वाहुन घेतलेल्या हिंदुत्ववाद्यांची. आता काय करावे ? या प्रश्नाने गोंधळ घातला. एकिकडे शंभुराजांविषयी निष्ठा दाखायची होती तर दुसरीकडे गडकरींचा निषेद करायचा होता अशा धर्मसंकटात सापडलेल्या हिंदुत्ववाद्यांनी या सगळ्या कृत्याला नेहमीप्रमाणे ब्राह्मणद्वेषाची लेबल लावून हात झटकून घेतले. हिंदुत्वावाद्यांचे शिव-शंभुंवरचे खोटे प्रेम वेळोवेळी उघडे पडले आहे. संभाजी ब्रिगेड ने केलेली प्रत्येक गॊष्ट ब्राह्मणद्वेषाचा शिक्का मारून झाकुन ठेवायची ही हिंदुत्ववाद्यांची जुनी खोड आहे, म्हणुनच की काय जेम्स लेन प्रकरणावेळी संभाजी ब्रिगेडने जिजाऊ मातांच्या अपमानाचा तिव्र संताप आणि निषेद व्यक्त केल्यावर हिंदुत्ववाद्यांनी मात्र शांत राहाणंच पसंत केलं होतं. तोच स्थायी स्वभाव त्यावेळीही त्यांनी अबाधित ठेवला आहे. हिंदुत्ववाद्यांना जर संभाजी राजेंविषयी आदर आणि प्रेम असता तर गडकरींच्या लिखानाचा विचार केला असता आणि काही कारणास्तव निषेद करायला जमत नसले तरी किमान खंत तरी व्यक्त असती पण या दोन्ही ठिकाणी ते असमर्थ ठरलेत. बहुजनवाद्यांची काय वेगळी स्थिती नाही. संभाजी राजेंना शाक्तवीर ठरवनार्या बहुजनवाद्यांनी पण या प्रकराणाकडे केवळ संभाजी मराठा आणि गडकरी ब्राह्मण त्यामुळे ते दोघे बघून घेतील असा सोईस्कर विचार करून दुर्लक्ष करणंच पसंत केलेलं दिसतं. त्यामुळे सच्चा शंभुभक्तांच्या जबाबदाऱ्या आहेत.
महात्मा फ़ुले, केळुस्करादी लेखक आणि राजसंन्यास
गडकरींचा पुतळा  काढून फ़ेकल्यानंतर त्यांच्या साहित्यविषयी चर्चेला उधान आलं. बर्याच विद्वानांनी मते मांडली. संभाजी महाराजांविषयीचे हे चित्र दुर्दैवाने इतिहासकारांमध्येच बराच काळ प्रचलित होते. तेंव्हाचे सर्वच इतिहासकार या गैरसमजाला बळी पडलेले आहेत. केवळ गडकरीच नव्हे. त्यामुळे गडकरींनी लिहिलेले नाटक हे त्यावेळच्या संदर्भ आणि पुराव्यावर आधारीत आहे असे म्हणून या विद्वानांनी पद्धतशीरपणे गडकरींना पाठिशी घातले आहे. परंतु हे विद्वान हे विसरले आहेत की गडकरींनी राजसंन्यास मध्ये जो विक्रुतीचा उन्माद मांडलाय तो याआधी कोनत्याही लेखकाने किंवा इतिहासकाराने मांडलेला नाही. इतर लेखकांनी संभाजीराजेंच्या विक्रुत इतिहासातील संदर्भ आहे तसे वापरले आहेत पण गडकरींनी मात्र त्या विक्रुतीमध्ये स्वत:च्या विकृतीची घुसळण केलेली स्पष्ट जाणवते. त्यामुळे इतर इतिहासकार चुकिच्या इतिहासाला बळी पडले असे म्हणता येईल पण गडकरींबद्दल तसं समजता येणार नाही.
               महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड जे काही करेल त्याला ब्राह्मनद्वेषाची पार्श्वभुमी असते तसेच अफ़जल आणि औरंगजेबाची कबर उध्वस्त करणे हा इस्लामद्वेष नाही पण कोंडदेव आणि गडकरींचा पुतळा काढणे म्हणजे ब्राह्मणद्व्वेष आहे असा एक लाडका सिद्धांत हिंदुत्ववाद्यांचा असतो. पण संभाजी ब्रिगेडला विरोध करण्याच्या नादात आपण काय करतोय याचही भान त्यांना राहात नाही. याही प्रकरणात संभाजी ब्रिगेडला विरोध करण्याच्या भरात त्यांनी गडकरींच्या लेखनाचे समर्थन केले. मग खरच जर गडकरींच्या वेळी संभाजी राजेंचा तोच इतिहास प्रचलित होता तर त्या इतिहासामध्ये संभाजींची बदनामी आहे आणि तो आपण ऐतिहासिक आधार म्हणून घेऊ नये एवढी पण अक्कल गडकरींना असू नये हे मात्र न पटण्यासारखे आहे. एक वेळ मान्य केले की संभाजींचा इतिहास त्यावेळी तोच होता त्याला गडकरी बळी पडले पण शिवरायांचा इतिहास तर सत्य होताच ना तरीही शिवरायांना दुय्यम स्थान देऊन स्वराज्ज्याचे श्रेय रामदासांच्या घस्यात घालण्यामागचा गडकरींचा काय हेतु होता ? किमान याचा तरी विचार हिंदुत्ववाद्यांनी करावा. हिंदुत्ववादी मंडळीं दावा करतात की ते नाटक प्रकाशित झालं नाही त्यामुळे जे नाटक कोणीच वाचलेले नव्हते ते आता संर्वांना माहीत झाले. हिंदुत्ववाद्यांची एक सर्वात मोठी अडचण आहे ती म्हणजे त्यांना जे माहीत नाही ते आस्तित्वातच नाही असे ते ग्रुहित धरतात त्यामुळे "राजसंन्यास" आम्हाला माहीत नाही म्हणजे कोणालाच माहीत नाही असे त्यांनी सहज ठरवूनही ठाकले. पण त्यांना माहीत असणे गरजेचे आहे की,  'महाराष्ट्र शासनाने' 'राम गणेश गडकरी समग्र वाड्मय' प्रकाशित केलेले आहे.त्याचे संपादन प्र. के. अत्रे यांनी केलेले आहे. त्यामध्ये राजसंन्यास नाटकही प्रकाशित केले आहे. त्यामुळे हे नाटक कोणालाच माहीत नाही या भ्रमातून हिंदुत्ववाद्यांनी स्वत:ची सुटका करावी.
               राम गणेश गडकरींच्या बचावा साठी हिंदुत्ववाद्यांची एक मांडणी असते की, महात्मा फ़ुलेंनी शिवरायांना अक्षरशुन्य म्हंटले. तसेच क्रुष्णा अर्जुन केळूस्कर यांनीही संभाजी राजें आणि शिवरायांविषयी हेच मत मांडलेले आहे मग यांचं काय करायचं ?. महात्मा फ़ुलेंनी शिवरायांवर जे लिखाण केले ते त्या काळात जे पुरावे उपलब्ध होते त्यानुसार. शिवरायांना ते कमी लेखत नव्हते. किंबहुना शिवरायांचे श्रेष्ठ्त्व त्यांच्या साहित्यातून दिसून येतेच. शिवराय हे निरक्षर नव्हते. आज याचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे महात्मा फ़ुलेंना कोणताही दोष लागत नाही. आज महात्मा फ़ुले हयात नाहीत. ते हयात असताना जर असे पुरावे उपलब्ध झाले असते तर त्यांनी आपल्या भुमिकेत निश्चित बदल केला असता.किंबहुना त्यांना या गोष्टींचा खुप आनंदच झाला असता. महात्मा फ़ुले हे खरे सत्यशोधक छ्त्रपती शिवाजी महाराजांचे सच्चे अनुयायी होते. परंतु महात्मा फ़ुलेंच्या शिवरायांविषयीच्या बोलण्याची तुलना गडकरींच्या राजसंन्यास शी करणे म्हणजे कानाखाली चपटी मारलेल्याची तुलना आयसीस च्या आतंकवाद्याशी करण्यासारखे आहे. शिवरायांना दुय्यम ठरवून संभाजी राजेंना चरित्रहीन ठरवण्यापेक्षा केवळ अक्षरशुन्य म्हणने हा खुप मोठा अपमान हिंदुत्ववाद्यांना वाटतो यातून शिवरायांविषयीचा आदर नाही तर महात्मा फ़ुलेंविषयीचा द्वेषच स्पष्ट जाणवतो. केळुस्कर गुरुजींबद्दल बोलायचे झाले तर त्यांनीच आपल्या छत्रपती शिवाजी महाराज या पहिल्या शिवचरित्रामध्ये प्रस्थावनेत नमुद असे केले आहे कि, "लेखकाला ज्या गोष्टी आज सत्य वाटल्या व ज्या क्रमाने त्या घडल्या अशी त्याची खात्री झाली, त्या गोष्टी त्या क्रमाने त्याने प्रस्तुत ग्रंथात नमूद केल्या आहेत. अनेक पंडितांचे इतिहाससंशोधनाचे काम सांप्रत चालू आहे. त्यांचे शोध जगापुढे आल्यावर प्रस्तुत चरित्रलेखात दुरुस्ती करावी लागेल हे उघड आहे." त्यामुळे आज आपण त्यांच्या ग्रंथातील अनैतिहासिक मुद्दे बाजुला काढू शकतो पण गडकरींच्या राजसंन्यास मधील असे मुद्दे बाजुला काढण्याची हिम्मत गडकरीप्रेमी हिंदुत्ववाद्यांमध्ये आहे काय ?. त्यामुळे गडकरींच्या राजसंन्यास मधील विक्रुतीची तुलना इतर इतिहासकारांच्या लेखणाशी करणे ही सुद्धा एक विक्रुतीच आहे असं म्हणावं लागेल.
शंभुप्रेमींची जबाबदारी
           संभाजीराजे म्हणजे शिवरायांच्या वंदणीय व्यक्तिमत्वातून हे प्रकटलेले शंभुतेज. आपल्या अफ़ाट पराक्रमाने शंभुराजांनी हिंदवी स्वराज्याच्या सीमारेषा वर्धिष्णू करीत या तेजाची दाहकता सिद्ध केली. शिवरायांनंतर हिंदवी स्वराज्यावर लाखोंचा फ़ौजफ़ाटा घेऊन चालून आलेल्या औरंगजेबाला नामोहरण करणे ही सामान्य बाब नव्हती. नऊ वर्षाच्या अखंड संघर्षात एकही लढाई हरले नाहीत किंवा एकही तह केला नाही.मोगली सल्तनत, पोर्तुगिज, इंग्रज या बलाढ्य शत्रुबरोबरच स्वकियांविरोधात हिंदवी स्वराज्याच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी केलेली एकाकी झुंज ही निश्चितच संभाजीराजांच्या महानतेची आणि पराक्रमाची साक्ष देते.हे सगळं त्यांनी कोणासाठी केले ? स्वराज्यासाठी, तुमच्या - आमच्यासाठी. वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षीच संभाजीराजेंनी स्वराज्यकार्यी हौतात्म्य पत्करले. अटकेत असताना त्यांनी दिर्घकाळ यमयातना सहन केल्या, एक - एक अवयव तोडला गेला, अंगाची साल सोलून काढण्यात आली, डोळे काढून जीभ कापली गेली, पायापासून ते मस्तकापर्यंत अवघ्या शरीराची खांडोळी केली गेली, आणि हे सगळं सहन केलं ते स्वराज्यासाठी, आपल्या साठी. एवढ्या मरणयातना सहन करूनही स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा अभेदच राखुन बलिदानाची, त्यागाची एक परंपरा या राष्ट्राला समर्पित केली जिला देशातच काय पण जगाच्या इतिहासात तोड नाही. पण मालती तेंडुलकर "मराठ्यांचा राजा" या नाटकात म्हणतात, "संभाजी म्हणजे स्वाभिमानाची व शौर्याची जळती मशाल, परंतु दुर्दैवाने ते महाराष्ट्रात जन्मले ! त्यांच्या अतुल व अमोघ क्रुतीला आमच्या कारस्थानी इतिहासकारांनी हिडिस रुप दिले व मानभावी इतिहासकारांनी त्याला माना डोलवल्या". याचप्रमाणे संभाजी राजांच्या इतिहासाचे विक्रुतीकरण पुन्हा होऊ शकते.आपल्या समाजाची मानसिकता ही नाटक, कादंबरी, चित्रपट या माध्यमातून मांडला जाणारा इतिहास हाच खरा असे माननारी आहे. कारण ग्रंथापेक्षा या नाटक आणि चित्रपट माध्यमांचा प्रभाव खुप असतो. हेच काही वर्षात हे नाटक प्रकाशित होऊन त्या विक्रुतीखाली संभाजी राजांचा खरा इतिहास दडपला जाऊ शकतो. त्यामुळे संभाजी राजांचं खरे चरित्र आणि इतिहास सर्वांसमोर आणने हे महत्वाचे कर्तव्य आहे. संभाजी राजांचे मद्यान्हीच्या तळपत्या सुर्यप्रकाशाइतके शुद्ध चरित्र सर्वांसमोर आणने हे शंभुप्रेमींचे आद्य कर्तव्य आहे, हिच सर्वात मोठी जबाबदारी आहे. 

9 January 2016

छ.शिवरायांचा कालखंड हिंदू-मुस्लिम संघर्षाचा होता ?

          आजपर्यत शिवरायांची प्रतिमा मुस्लिम विरोधी आणि शिवरायांचा कालखंड हिंदू - मुस्लिम संघर्षाचा कालखंड म्हणुन सांगितला गेला. पण हा चुकीचा प्रचार आहे. छत्रपती शिवरायांचा कालखंड हा हिंदू-मुस्लिम धार्मिक संघर्षाचा कालखंड नव्हता तर राजकीय सत्तासंघर्षाचा कालखंड होता. जर छत्रपती शिवरायांचा कालखंड हा हिंदू - मुस्लिम असा असता तर सर्व हिंदू एका बाजूला आणि सर्व मुस्लिम एका बाजूला दिसले असते मात्र तसे इतिहासात अजिबात दिसत नाही. बरेच मुस्लिम शिवरायांच्या सैन्यात होते तर बरेच हिंदू लोकं मुस्लिम राज्यकर्त्यांच्या सैन्यात होते. दुसरे असे की शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेपुर्वी महाराष्ट्रात आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, इमादशाही व बरीदशाही ही पाच मुस्लिम राज्ये एकमेकांविरुद्ध लढत होती. याचा सरळ अर्थ असा की शिवकाळातील संघर्ष हा सत्तासंघंर्ष होता.
छ.शिवरायांचे मुस्लिम सैन्य
      छ.शिवरायांच्या सैन्यामध्ये अनेक मुस्लिम सरदार, वतनदार व इतर चाकर होते आणि ते अगदी मोठमोठ्या हुद्द्यांवर जबाबदारीच्या जागांवर होते. शिवरायांच्या तोफ़खान्याचा प्रमुख इब्राहिमखान नावाचा एक मुस्लिम होता. तोफ़खाना म्हणजे लष्कराचे एक प्रमुख अंग. कदाचित सर्वात महत्वाचे. अशा महत्वाच्या तोफ़खान्याचा प्रमुख मुस्लिम होता.छत्रपती शिवरायांच्या दुरद्रुष्टीचं उदाहरण म्हणून सांगितल्या जाणार्या आरमार विभागाचा प्रमुखसुद्धा एक मुस्लिम सरदारच होता. त्याचे नाव दर्यासारंग दौलतखान. शिवरायांच्या खास अंगरक्षकांत व खाजगी नोकरांत अत्यंत विश्वासू म्हणून मदारी मेहतर यांचा समावेश होता. आग्र्याहुन सुटकेच्या प्रसंगात या विश्वासू मुस्लिम साथीदाराने काय म्हणून साथ दिली ? शिवराय मुस्लिमद्वेष्टे असते तर असे घडले असते का ?
       शिवरायांच्या पदरी अनेक मुसलमान चाकर होते. त्यात काजी हैदर हा एक होता. सालेरीच्या लढाईनंतर औरंगजेबाच्या दक्षिणेतील अधिकार्यांनी शिवाजीनं सख्य जोडावे म्हणून एक हिंदू ब्राह्मण वकील पाठवला. तेंव्हा शिवाजीनं उलट काजी हैदर यास मोघलांकडे पाठवलं. म्हणजे मुसलमानांचा वकील हिंदू आणि हिंदूंचा वकील मुस्लिम. त्या काळातील समाजाची फ़ाळणी हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी असती तर असे घडले नसते. सिद्धी हिलाल हा असाच आणखी एक मुस्लिम सरदार शिवरायांच्या पदरी होता. १६६० मध्ये रुस्तुमजमा व फ़ाजलखान यांचा शिवरायांनी रायबागेजवळ पराभव केला. त्या वेळी सिद्धी हिलाल शिवरायांच्या बाजुने लढला त्याप्रमाणेच १६६० मध्ये सिद्धी जौहरने पन्हाळगडास वेढा दिला होता तेंव्हा नेताजी पालकरनं त्यांच्या सैन्यावर छापा घालून वेढा उठवण्याचा प्रयत्न केला त्या वेळीसुद्धा हिलाल व त्याचा पुत्र वाहवाह हे नेताजीबरोबर होते. या चकमकीत सिद्धी हिलालचा पुत्र वाहवाह जखमी व कैदी झाला होता. शिवरायांच्या बाजूने मुस्लिम सिद्धी हिलाल आपल्या पुत्रासह मुस्लिमांच्या विरोधात लढता.
          त्या लढ्यांचे स्वरुप निव्वळ हिंदू विरुद्ध मुस्लिम असे असते तर असे घडले असते का ? सभासद बखरीत प्रुष्ठ क्र. ७६ वर शिवरायांच्या अशा एका शामाखान नावाच्या मुस्लिम शिलेदाराचा उल्लेख आहे. मराठ्यांच्या इतिहासाची साधने या ग्रंथाच्या खंड १७ मधील प्रुष्ठ क्र.१७ वर नूरखान बेग याचा "शिवाजीचा सरनोबत" म्हणून उल्लेख आहे.हे सरदार एकटे नव्हते हे स्पष्टच आहे. त्यांच्या हाताखालील मुस्लिम शिपायांसह ते शिवरायांच्या चाकरीत होते.
           या सर्वांहून एक महत्वाचा अस्सल पुरावा आहे. त्यावरून मुस्लिम धर्मिय शिपायांबद्दलचे शिवरायांचे धोरण स्पष्ट होते. सन १६४८ च्या सुमारास विजापुरच्या लष्करातले सातशे पठाण शिवरायांकडे नोकरीस आले.तेंव्हा गोमाजी नाईक पानसंबळ याने त्यांना सल्ला दिला, तो शिवरायांनी मान्य केला व तेच धोरण ठेवले. नाईक म्हणाले," तुमचा लौकिक ऐकून हे लोक आले आहेत त्यांस विन्मुख जाऊ देणे योग्य नाही. हिंदुंचाच संग्रह करू, इतरांची दरकार ठेवणार नाही अशी कल्पना धरीली तर राज्य प्राप्त होणार नाही, ज्यास राज्य कारणे त्याने अठरा जाती, चारी वर्ण यांस आपापले धर्माप्रमाणे चालवून त्यांचा संग्रह करून ठेवावे." ग्रॅंट डफ़ने सुद्धा त्याच्या शिवरायांवरील चरित्र ग्रंथात प्रुष्ठ १२९ वर गोमाजी नायकाच्या सल्याचा उल्लेख करून म्हंटले आहे की, "यानंतर शिवाजीने आपल्या सैन्यात मुसलमानांनासुद्धा सामावून घेतले आणि त्यांच्या स्थापनेत याचा फ़ार मोठा उपयोग झाला."
शिवरायांचे सरदार व सैन्य हे फ़क्त हिंदू धर्माचे नव्हते. त्यात मुस्लिम धर्मियांचासुद्धा भरणा होता. हे यावरून स्पष्ट व्हावे. शिवराय हे मुस्लिम धर्म नाहीसा करण्याचे कार्य करीत असते तर हे मुस्लिम शिवरायांच्या पदरी राहिले नसते. शिवराय राज्यकर्त्यांचे जुलमी राज्य नाहीसे करायला निघाला होता. धर्माचा प्रश्न मुख्य नव्हता, राज्याचा प्रश्न मुख्य़ होता. धर्म मुख्य़ नव्हता, राज्य मुख्य होते. धर्मनिष्ठा मुख्य नव्हती, राज्यनिष्ठा व स्वामिनिष्ठा मुख्य होती.
मुस्लिम राज्यकर्त्यांच्या पदरी हिंदू सैन्य
      ज्याप्रमाणे शिवरायांच्या पदरी मुस्लिम सरदार व सैन्य होतं त्याचप्रमाणे मुस्लिम राजांच्या-शहनशहांच्या - पदरी अगणित हिंदू सरदार होते. त्यांची यादी खुपच मोठी आहे. खुद्द शिवरायांचे वडील विजापूरच्या मुस्लिम आदिलशहाच्या पदरी मोठे सरदार होते. शहाजी महाराजांचे सासरे लखुजी जाधव निजामशाहीचे महाराष्ट्रातील एक मनसबदार होते. जावळीचे मोरे, फ़लटणचे निंबाळकर, सावंतवाडीचे खेमसावंत, श्रुंगारपुरचे सुर्यराव श्रुंगारपुरे हे सर्वजण आदिलशाहीचे मनसबदार होते.
        ज्याच्या सैन्यसामर्थ्यापुढे शिवरायांना माघार घ्यावी लागली होती व नामुष्कीचा तह करून आग्र्यास जाऊन संभाजीराजेंसह कैद होऊन पडावं लागलं, तो उत्तरेचा मातब्बर सरदार मिर्झाराजे जयसिंग तर अस्सल रजपूत हिंदूच होता आणि मुस्लिम शहेनशहाच्या पदरी मानाची असेल पण चाकरीच करत होता. मिर्झाराजे जयसिंग शिवरायांवर चाल करून आला तेंव्हा त्याच्या सैन्यात अनेक हिंदू सरदार होते, जाट होते, मराठा होते, रजपूत होते. राजा रायसिंग सिसोदिया, सुजनसिंग बुंदेला, हरीभान गौर, उदयभान गौर, शेरसिंग राठोड, चतुर्भुज चौहान, मित्रसेन, इंद्रभान बुंदेला, बाजी चंद्रराव, गोविंदराव इत्यादि..
          कोंडाणा किल्ला हस्तगत करताना तानाजी मालुसरे वीरमरण पावले आणि कोंडाण्याचा सिंहगड झाला.त्या लढाईतील कोंडाण्याचा किल्लेदार उदयभानू हा एक हिंदू रजपूतच होता आणि तो मुसलमान राजाचा किल्लेदार होता. अकबराच्या पदरी पाचशेहून आधिक मनसब असणारे जेवढे सरदार होते त्यात हिंदू सरदारांचे प्रमाण २२.५ टक्के होते. शहाजहानच्या राज्यात हे प्रमाण २२.४ टक्के होते. अगदी सर्व मुस्लिम राज्यकर्त्यांत अगदी कडवा म्हणून समजला जातो त्या औरंगजेबाच्या पदरी सुरुवातीला हिंदू मनसबदारांचे हे प्रमाण २१.६ टक्के होते. ते पुढे वाढले व ३१.६ टक्के झाले.
औरंगजेबानेच राजा जसवंतसिंग या हिंदू रजपूतला दक्षिणेचा सुभेदार नेमले होते. याच औरंगजेबाचा पहिला प्रधान रघुनाथदास नावाचा हिंदू होता. तो स्वत: रजपूत असून रजपुतांविरुद्ध लढला. पानिपतच्या लढाईत पेशव्यांच्या तोफ़खाण्याचा प्रमुख इब्राहिमखाण गारदी मुस्लिम होता. जे हिंदू मुस्लिम राज्याच्या पदरी चाकरी करत होते आणि इमान राखून प्रसंगी हिंदूविरुद्ध सुद्धा लढत होते त्यांना त्या काळी कुणी "धर्मबुडवे, किंवा धर्मद्वेष्टे किंवा मुस्लिमधार्जिणे" म्हणत नव्हते. धर्मनिष्ठेपेक्षा स्वामिनिष्ठेला जास्त मान्यता होती.
         भारतात धर्मामुळे व धर्मासाठी लढाया होत नव्हत्या, लढायांचे मुख्य कारण राज्य मिळवणे, राज्य बळकावणे वा टिकवणे हे होते. हे करायला उपयोगी ठरेल तेवढ्यापुरता धर्माचा वापर केला जाई पण ती मुख्य बाब नव्हती. शिवाजी महाराजांच्या पदरी मुस्लिम सरदार होते व मुस्लिम राजांच्या पदरी हिंदू सरदार हे जसे खरे आहे तसेच त्या काळात कोण कोणाविरुद्ध लढला ह्याची पाहणी केली तर त्या लढाया केवळ हिंदू विरुद्ध मुसलमान अशा झाल्या असे दिसत नाही. त्यामुळेच शिवकाळातील संघर्ष हा राजकीय संघर्ष होता धार्मिक संघर्ष नव्हे.
संदर्भ :
मराठ्यांच्या इतिहासाची साधने,खंड १७ प्रुष्ठ क्र.१७-[वि.का.राजवाडे].
शककर्ता शिवाजी (प्रुष्ठ क्र.४०-४१)-[गो.स.सरदेसाई].
शिवाजी कोण होता ? [कॉ.गोविंद पानसरे]
मराठ्यांचा इतिहास (खंड १,प्रुष्ठ क्र.१२९)-[ग्रॅंट डफ़] 
श्री.शिवछत्रपती [त्र्यं.शं.शेजवलकर].
शिवचरित्र - मिथक आणि वास्तव [श्यामसुंदर मिरजकर].

4 January 2016

मुस्लिम राज्यकर्ते आणि देवळांची लुट,मोडतोड

           आज समाजामध्ये अनेक संघटना उदयास आलेल्या आहेत. प्रत्येक संघटनेचा लोकांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी एक युक्तिवाद असतो. त्यामध्ये हिंदूत्ववादी संघटनेंचा सगळ्यात जुना युक्तिवाद म्हणजे मुसलमानांनी आपल्या धर्मावर अन्याय केला, देवळांची लुट केली म्हणून (निव्वळ) मुसलमांनांना विरोध करण्यासाठी हिंदुंनो एक व्हा !. (इथे यांना सामान्य हिंदूंशी काही देणंघेणं नसतं). यामध्ये हिंदू धर्मावर अन्याय करण्यापेक्षा देवळांची लुट केली यावर यांचा जास्त रोष असतो (कारण देशात कितीही मोठा दुष्काळ येवो पण भट-बामनांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाला देवळामुळे कसलाच चिमटा बसत नाही). पण सामान्य जनतेने या लुटालूट प्रकरणापासून दुरच रहावे (कारण सामान्य जनतेला लुटण्यात देवळांचा पहिला नंबर लागतो) आणि आजही परिस्थिती काही वेगळी नाही. आज जिवंत माणसाला एक वेळचे जेवण मिळो ना मिळो पण देवांना मात्र सकाळ - दुपार - संध्याकाळ पंचपक्वान्नांची न्याहारी आहेच, शिवाय काकडआरत्या, माकडआरत्या आहेतच की. कोट्यावधी गरीब (हिंदू) जनतेला थंडीच्या कडाक्यात साधे अंग झाकण्याइतके कपडे मिळो ना मिळो पण देवांना मात्र छपरीपलंग, मच्छरदाणी, गाद्यागिरद्यांची कमी नाही.
               आज हिंदुत्व, हिंदुराष्ट्र अशा घोषणा आणि भुमिकांच्या आधारावरचे राजकारण गेल्या काही वर्षात वाढू लागले आहे. हिंदुत्ववादी संघटनेंचा एक (त्यांचा) आवडता युक्तिवाद असतो व आहे, मुसलमान क्रुर होते,त्यांनी देवळे पाडली, देवळे भ्रष्ट केली,हिंदू धर्मावर अन्याय-अत्याचार केला, धर्म बुडाला म्हणून सर्व मुसलमान हिंदूविरुद्ध व हिंदू धर्माविरुद्ध असतातच  व आहेत आणि ज्या अर्थी ते हिंदूविरुद्ध आहेत त्याअर्थी सर्व हिंदूंनी त्यांच्याविरुद्ध असले पाहिजे.धर्माधारे हिंदुंना संघटित करणार्या संघटनांचा जसा युक्तिवाद असतो तसाच काहीसा मुसलमान संघटनेंचा असतो.
           आक्रमक मुस्लीम सैन्यानं सत्ता काबीज करताना व राज्यविस्तार करताना हिंदुंची देवळे फ़ोडली व लुटली हा हिंदुत्ववाद्यांच्या युक्तिवादाचा महत्वाचा भाग असतो. हे सत्य असले तरी पण हे पुर्ण सत्य नाही,अर्ध्य सत्य आहे. अरब, तुर्क, अफ़गाण इत्यादी आक्रमकांच्या टोळीवजा सैन्यांना नियमीत पगार दिला जात नसे, त्यांनी लुट करावी आणि लुटीतल्या हिश्श्यातून त्यांचा पगार घ्यावा अशी रीत असे. हिंदूंच्या मंदिरात खुप संपत्ती असे. आक्रमक सैन्य ही संपत्ती लुटत असे. लुटताना देवळे पाडत व संपत्ती वाटून घेत.
            आज दर्याकपारीत आणि डोंगरमाथ्यावरच्या ज्या देवळात संपत्ती नसे पण देव असत त्या देवळांच्या वाटेला हे आक्रमक सैन्य जात नसे. कारण काय ? देवळे पाडणे हे मुख्य नसून संपत्ती लुटणे हा मुख्य हेतु असे. जर हिंदू धर्मद्वेषातून देवळं पाडली म्हणायचे तर मग छोटी छोटी मंदिरे सहीसलामत कशी ? याचाच अर्थ की लुटीची संपत्ती मुख्य असत, तिथे धर्म दुय्यम होता. मुख्य हेतू साध्य करायला आवश्यक म्हणून देवळे पाडत. याच लुटीतील मोठा हिस्सा राजाकडे जाई. राजाचे उत्पन्नाचे ते एक साधन असे. देवळाभोवतील लोकांचे खच्चीकरण करणे, त्यांच्यात भय निर्माण करणे हा सुद्धा एक हेतू असे देवळे पाडण्यामागे. लोक श्रद्धाळू असतात, त्यांनी देव लुटला मग आम्हाला लुटायला काय वेळ लागणार आहे असे भय असे. त्यामुळे मुलुख जिंकणे सोपे जाई. त्याकाळातील देवळे केवळ धर्मकेंद्रे नव्हती तर संपत्तीची केंद्रे होती, मानाची केंद्रे होती आणि सत्तेचीही केंद्रे होती. हीच मुख्य कारणे ठरली देवळांच्या नाशाला.
            आजच्या हिंदुत्ववाद्यांच्या म्हणण्यानुसार मुस्लिमांनी धर्मद्वेषातून हिंदूंची देवळे पाडली. त्यामध्ये ते पंढरपूर, तुळजापूर या देवस्थानांची उदाहरणे देतात जी अफ़जलखानाने उध्वस्त केली असेही हिंदुत्ववाद्यांचं म्हणनं आहे. पण हेही विसरून चालणार नाही की, अफ़जलखान मराठा स्वराज्यावर चालून येत होता आणि हिंदुत्ववाद्यांच्या म्हणण्यानुसार वाटेतील देवळांची लुट व मोडतोड करत होता तर त्याच्याबरोबर अनेक हिंदू धर्मिय सरदार होते त्यांच्या भावना दुखावल्या नाहीत का ? तसेच तुळजाभवानीचे मंदिर अफ़जलखानाने तोडलं म्हणून हिंदुत्ववादी सांगतात, त्यावेळी अफ़जलखानाबरोबर पिलाजी मोहिते, शंकररावजी मोहिते, कल्याणराव यादव, नाईकजी सराटे, नागोजी पांढरे, प्रतापराव मोरे, झुंझारराव घाटगे, काटे, बाजी घोरपडे (रामदास स्वामींचा प्रिय शिष्य) आणि संभाजीराव भोसले हे उपस्थित होते हेही विचरून चालणार नाही. १७९१ मध्ये हिंदूंकडून लुटीत पतझड झालेलं देवी सारदेचं श्रुगेरीचं मंदिर मुसलमान टिपू सुलतानाने दुरुस्त केलं हे तर सर्वांना माहीत आहेच.
            अफ़जलखान तुळजापूर व पंढरपूर येथील हिंदूंची देवस्थाने फ़ोडत होता, त्यावेळी अफ़जलखानाचा ब्राह्मण वकील क्रुष्णा भास्कर कुलकर्णी हिंदू असून काय करत होता ? त्याला माहीत नव्हतं का ? की देवळावर आपलेच जातबंधू जगत आहेत, आणि मंदिरे फ़ोडली तर आमच्या जातीची रोजगार हमी योजना बंद होईल, म्हणुन मंदिरे पाडू नका. असे सांगून तरी किमान अफ़जलखानाचे मन परिवर्तन का केले नाही ? तीच गत सोमनाथ मंदिराची, गजनीच्या महंमदने थानेश्वरचा राजा आनंदपाल याच्याशी समझोता करून मग सोमनाथवर हल्ला केला, खरे तर आनंदपालने याची सुचना मंदिरामध्ये का दिली नाही ? महंमदाचे अनेक सेनाधिकारी व सैनिक हिंदू होते. मग तरीही त्या पापाचा वाटेकरी फ़क्त मुसलमान महंमद कसा ?
                शिवाय फ़क्त मुसलमानच देवळे पाडायचे असे म्हणने म्हणजे सुद्धा अडाणीपणाचे लक्षण आहे कारण फ़क्त मुसलमान राजेच देवळे लुटत होते हे सत्य नाही. हिंदू राजे सुद्धा संपत्तीसाठी हिंदूंची देवळे लुटीत असत.काश्मिरचा हिंदू राजा हर्षदेव याने बाराव्या शतकात हिंदूंचीसुद्धा मंदिरे लुटली आहेत. धातूसाठी मुर्ती वितळवी, वितळण्यापुर्वी त्यांच्यावर विष्ठा व मुत्र शिंपडून त्यांचा पवित्रभंग करी इत्यादिचे तपशीलवार वर्णन कल्हणाच्या "राजतरंगिणी" या ग्रंथात आहे. देवाच्या मुर्तीची विटंबना केली म्हणून त्या काळी दंगे झाल्याची नोंद मात्र नाही. मंदिरे तोडून ती लुटण्यासाठी राजा हर्षदेव ने खास देवोत्पतक नायक नावाने अधिकारी नेमला.(११९३ ते १२१०) कॅबी आणि दाभाई येथील जैन मंदिरे उध्वस्त केली. मंदिरातील उत्पनाची जी खाती होती त्यात त्याने "देवोत्पादन" हे खातेच उघडले होते. मंदिरातील लुटलेली संपत्ती या खात्यात जमा होत असत.म्हणजे देव-देवळे पाडण्यामध्ये हिंदू राजे पण काही मागे नव्हते तरीही देवंळाच्या लुटीचा इतिहास सांगताना केवळ मुस्लिमांचाच उल्लेख का केला जातो हे कोणता हिंदुत्वाचा ठेकेदार सांगेल का ?
              मुस्लिम राज्याला त्रासदायक ठरू लागले तर मुस्लिम राज्यकर्ते मुस्लिम धर्मगुरुंची, मुल्ला-मौलवींची सुद्धा पर्वा न करता त्यांनाही छळत. महंमद तुघलक याने मुल्ला व सय्यद यांच्या कत्तली केल्याचा आरोप बखरकारांनी नोंदवून ठेवलेला आहे. काही इतिहासकारांनी तर असे लिहिले आहे की, जहांगीर बादशहाला मुल्ला मंडळी एवढी घाबरत की तो आला की ते लपून बसत.म्हणजे देवळे पाडली व लुटली त्याला कारण राज्यच आणि देवळांना इनामे दिली किंवा देवळे दुरुस्त केली त्यालाही कारण राज्यच इथे धर्माचा काडीमात्र संबंध नाही. म्हणुनच मुस्लिमांनी जशी देवळे लुटली तशी हिंदू राजांनी सुद्धा हिंदूंची देवळे लुटल्याचे दाखले आहेत.
तात्पर्य काय ? त्या काळातल्या राज्यकर्त्यांच्या द्रुष्टीने राज्य महत्वाचे होते. धर्म महत्वाचा नव्हता. स्वत:चे राज्य स्थापायला आणि स्थिर करायला धर्माचा आधार घेतला पण धर्म मुख्य नव्हता, राज्य मुख्य होते आणि पूर्ण सत्य हे असे आहे.
संदर्भ :
देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे [प्रबोधनकार ठाकरे].
शिवाजी कोण होता ? [गोविंदराव पानसरे].
शिवचरित्र एक अभ्यास [सेतू माधव पगडी].
राजतरंगिणी [कल्हन पंडीत (अनुवाद डॉ.माधव व्यंकटेश लेले)].
छ.शिवाजी महाराज यांचे चरित्र [क्रुष्णराव अर्जुन केळूसकर].

30 December 2015

छ.शिवराय गोब्राह्मणप्रतिपालक की रयतेचे राजे ?

       विश्ववंद्य छ.शिवरायांच्या नावामागे अनेक बिरुदावल्या लावल्या जातात त्यात "गोब्राह्मणप्रतिपालक" ही बिरुदावली जास्त प्रसिद्ध आहे.[की जाणुनबुजुन प्रसिद्ध केली गेली ?]. हिंदुत्ववादी मंडळींना तर शिवराय छत्रपती असण्यापेक्षा गोब्राह्मणप्रतिपालक होते यातच जास्त भुषण वाटते. यासाठी ते ना तर्हेच्या क्लुप्त्या शोधत असतात. ब्राह्मण सुद्धा एवढे कष्ट घेत नसतील असो. ब्राह्मणांनी आजपर्यंत पवित्र म्हणून सांगितलेल्या गोष्टीपैकी दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे गाय आणि ब्राह्मण."गायींचा" आणि "ब्राह्मणांचा" प्रतिपाळ करणारा अशी बिरुदावली सारखी प्रसिद्ध केली जाते.मग प्रश्न असा आहे की शिवराय याच दोहोंच्या रक्षणासाठी आयुष्यभर लढले काय ? गाय पवित्र आहे कारण तिच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव आहेत म्हणे! पण गायींना कोण मानतात पवित्र ? ब्राह्मण मानतात का पवित्र ? गाय पवित्र आहे असे म्हणण्यापेक्षा उपयुक्त आहे असे म्हणणे योग्य ठरेल.पण आज गायींना पवित्र बनवण्याआधी गायींसंदर्भात आदराने,प्रेमाने कोण वागले आहे हे एकदा तपासून बघितले पाहिजे.गाय समस्त शेतकर्याला पुजनीय आहे. त्यामुळे प्राचिन काळापासून शेतकरी सामान्य रयतेने गायी पाळल्या आहेत. गायींची पुजा केली आहे; गायींचे रक्षण केले आहे.
          ब्राह्मणांनी आयुष्यात कधीही शेती केली नाही,न नांगरलेली जमीन जिथे राहतो ब्राह्मण तिथे, असे ओळखावे असे म्रुच्छकटिक नाटकात म्हंटले आहे. ब्राह्मणांच्या धर्मशास्त्राने सांगितलेले काम शिक्षण घेणे व देणे; पुजा-यज्ञविधी करणे, दक्षिणा घेणे हे आहे. प्राचिन काळी ब्राह्मणांची यज्ञसंस्क्रुती होती. यज्ञाचे एक विषेश असे आहे की पशूचा बळी दिल्याशिवाय यज्ञ पुर्णच होऊ शकत नव्हता. प्राचीन काळी गोमेध नावाचा एक यज्ञही होता. .जुण्या पौराणिक कथेत ब्राह्मणांना शेकडॊ गायी दान दिल्याचा उल्लेख आढळतो.ब्राह्मण या गायींचे काय करायचे, याचा असा सहज उलघडा होतो. (आजही ब्राह्मण मुंजीसारख्या काही विधीत कणकेची गाय करून कापतात म्हणे !).
        या उलट गायींचे रक्षण केल्याचे अनेक पुरावे आजही गावागावात आढळतात. (केवळ) मुसलमान गायी कापून खातात म्हणूण छत्रपती शिवरायांनी गायींचे रक्षण करण्याचे ऐतिहासिक कार्य केले असे ब्राह्मणवादी म्हणतात. मात्र मुसलमान भारतात येण्यापुर्वी गायींचे रक्षण करण्यासाठी अनेकांना हुतात्मा व्हावे लागले. त्या काळी गायचोर कोण होते, असा प्रश्न सहज निर्माण होतो. मग बौद्धांच्या नंतर अहिंसाच्या मागे लोक लागतील आणि सामान्य लोक तिकडे लागलेले आहेत मागे त्याला ओढायचे असेल तर आपल्या कडे अहिंसा घ्यायची आणि गायीला पवित्र मानायची ही नवीन प्रथा निर्माण करायची. तीर्थकर आणि बुद्धांच्या अहिंसा तत्वाने ब्राह्मणी संस्क्रुतीची पिछेहट झाली. तेंव्हा ब्राह्मणांनी गायींमध्ये तेहतीस कोटी देव असल्याचे घोषीत केले. या सर्व गोष्टींचा अर्थ इतकाच की आज जे ब्राह्मण गोहत्या संदर्भात व गायीच्या पावित्र्या संदर्भात ज्या दंगली घडवून आणत आहेत, त्यामागचा त्यांचा हेतू वेगळाच आहे. "चोर तो चोर, वर शिरजोर" म्हणतात तो प्रकार हाच!
छ.शिवराय ब्राह्मणप्रतिपालक होते का ?
          छत्रपती शिवराय हे कुळवाडी शेतकरी परंपरेतील असल्यामुळे त्यांनी गायींच्या रक्षणाचे आदेश दिले, हे योग्यच आहे. पण त्यांनी कधीही ब्राह्मणांच्या रक्षणाचे आदेश दिलेले नाहीत. छ. शिवरायांची अस्सल म्हणून मान्यता पावलेली अनेक पत्रे उपलब्ध आहेत. यातील एकाही पत्रात शिवरायांनी स्वत:स ’गोब्राह्मणप्रतिपालक’ म्हणवून घेतलेले नाही. छ.शिवरायांच्या समकालीनांनी शिवरायांना लिहिलेली पत्र आहेत. त्या पत्रांपैकी एकाही पत्रात कुणीसुद्धा शिवरायांना ’गोब्राह्मणप्रतिपालक’ म्हणत नाहीत. उलट छ.शिवरायांची राज्याभिषेक शक असलेली २९ पत्रे उपलब्ध आहेत.या सर्व पत्रांत ते स्वत:स "क्षत्रियकुलवतंस श्रीराजाशिवछत्रपती" असे म्हणवून घेतात,ते कधीही स्वत:स गोब्राह्मणप्रतिपालक म्हणवून घेत नाहीत. मग हे गोब्राह्मण प्रकरण आले कोठून ?. इथे असा प्रश्न निर्माण होतो की, शिवराय गोब्राह्मणप्रतिपालक होते असा गैरसमज कोणी व का पसरविला ?.
        छत्रपती शिवराय हे गोब्राह्मणप्रतिपालक होते असे छत्रपती शिवरायांच्या चरित्रावर कमाई करणार्या बाबासाहेब पुरंदरेने म्हंटले आहे. त्यासाठी शिवचरित्र साधने खंड ५,क्र.५३४ व ५३७ असा आधार देतात. या सर्व पत्रांची व आधारांची छाननी करून श्री शेजवलकर निर्वाळा देतात की, "५३४ क्रमांकाच्या लेखात शिवाजी स्वत:स गोब्राह्मणप्रतिपालक म्हणवून घेत नाहीत तर त्या पत्रात ज्याचा उल्लेख आहे तो बाह्मण त्यास तशी पदवी देतो. ५३७ क्रमांकाच्या लेखात तर "गोब्राह्मणप्रतिपालक" असा शब्दच आलेला नाही. म्हणजे सगळे "भटी गौडबंगाल". शिवाजी राजांनी स्वत:स गोब्राह्मणप्रतिपालक म्हणवून घेणे आणि ब्राह्मणांनी तसे म्हणणे यातले अंतर स्पष्ट आहे. काम करवून घ्यायला आलेला किंवा याचना करायला गेलेला कुणीही राजास तु आमचा प्रतिपाल करणारा आहेस असे म्हणणारच त्यात विषेश काय आहे ? ब्राह्मण तर शहाजान बादशहाला "जगदिश्वरो वा दिल्लीश्वरो" म्हणायचे फ़ायद्यासाठी ब्राह्मण स्तुती करतात हे इतिहासप्रसिद्ध आहेच.
       मग शिवरायांना लावलेली किंवा बळेच चिकटवलेली "गोब्राह्मणप्रतिपालक" बिरुदावली कुणी लावली असेल ? गायीने  लावणे शक्यच नाही त्यामुळे उत्तर स्वच्छच आहे. ग्रॅंड डफ़ आपल्या ग्रंथात "गायी, रयत व स्त्रिया यांना लुटण्यास शिवाजीने आपल्या शिपायांस बंदी केली होती." असे नमूद केले आहे.त्याला इतरही आधार आहेत.पण मग गायी, रयत आणि स्त्रिया यांचा प्रतिपालक असलेले शिवराय गोब्राह्मणप्रतिपालक कसे केले गेले ? रयत आणि स्त्रिया यांना बाजुला सारून त्याठिकाणी ब्राह्मण कधी व कुणी आणले याचा अंदाज करणे कठीण जाणार नाही.
        छ.शिवरायांच्या राज्यात ब्राह्मणांस खास सवलतीसुद्धा कोठे दिसत नाहीत. उलट एका पत्रात आगळीक केलेल्या ब्राह्मणांसबंधी शिवराय लिहितात, "ब्राह्मण म्हणूण कोण मुलाहिजा करू पाहतो" असे बजावून धमकावतात की, "जे गनिमांचे गनीम ते तसाच नतीजा पावणार".काही ब्राह्मण शिवरायांच्या बरोबर होते तसे काही ब्राह्मण शिवरायांच्या विरोधातही होते त्यामुळे शिवराय ब्राह्मणप्रतिपालक अशी बिरुदावली घॆणे शक्य नव्हते व तशी त्यांनी घेतलेली नाही.
           काही महाभाग छत्रपती संभाजी राजांच्या बुधभूषण ग्रंथाचा दाखला देताना म्हणतात की संभाजी राजांनी शिवरायांचा उल्लेख गोब्राह्मणप्रतिपालक असा केला आहे. पहिली गोष्ट म्हणजे बुधभूषण ची मुळ प्रत सध्या उपलब्ध नाही असे अनेक इतिहासकारांचे मत आहे तरीही सध्याची प्रत मुळची संभाजी राजेंनी लिहिलेलीच आहे असे मानले तरीही काही गोष्टी जाणुन घेणं गरजेचे आहे. संभाजी राजांनी पुराण ग्रंथांचे विवेचन करून, त्यातील अर्थपूर्ण भाग निवडून ग्रंथ रचला आहे, हे त्यांनीच नमुद केले आहे. पुराणं असो वा इतर धार्मिक साहित्य या सगळ्याचाच तत्कालीन समाजावर प्रभाव होता. असे साहित्य ब्राह्मण वर्चस्वाने ग्रासलेले होते , त्यामध्ये क्षत्रियांचे कार्य गायी आणि ब्राह्मणांचे रक्षण करणे असे सांगितली आहेत. याच साहित्याचा प्रभाव संभाजी राजांच्या लिखानावर पडला असला तर नवल नाही, कारण शिवरायांना गोब्राह्मण प्रतिपालक म्हणवताना त्यांनी एकही प्रमाण दिलेले नाही तथा या काळात संभाजी राजेंनी हा ग्रंथ लिहिला त्या काळात व त्याच्या आधी आणि नंतरच्या काळात कधीही शिवरायांनी ब्राह्मणप्रतिपालन केल्याचे एकही प्रमाण, तथा पुरावा नाही. त्यामुळे एखाद्या मिथ्या बिरुदावलीपेक्षा प्रत्यक्ष कार्यच महत्वाचे असते हेच सत्य आहे.
        छ.शिवरायांना कुळवाडीभुषण रयतेचा राजा म्हणणे आधिक गौरवास्पद आहे. छ.शिवराय फ़क्त गायी आणि ब्राह्मणांच्या रक्षणाकडे  विशेष लक्ष देत होते, असे गोब्राह्मणप्रतिपालक शब्दावरून वाटू शकते. पण खरे पाहता छ.शिवरायांनी आपल्या अठरा पगड जातींच्या प्रजेसह, प्रजेची शेती, प्रजेने वाढवलेली झाडे यांचेही रक्षण केले. त्याचबरोबर मुस्लिम व इतर धर्मियांना त्यांच्या धर्माप्रमाणे वागवले. म्हणूनच शिवराय "गोब्राह्मणप्रतिपालक" नव्हते तर "कुळवाडीभुषण रयतेचे राजे" होते.
संदर्भ:
श्री.शिवछत्रपती [त्र्यं.शं.शेजवलकर].
शिवचरित्र - मिथक आणि वास्तव [श्यामसुंदर मिरजकर].
मनुस्म्रुती-अध्याय१,श्लोक ८८.
भारद्वाज श्रौतसूत्र ६.१३.१०.
छत्रपती संभाजी महाराज(प्रुष्ठ क्र.८५) - [वा.सी.बेंद्रे].
शिवाजी आणि शिवकाळ (प्रुष्ठ क्र.२०५-२०६,२११-२१३) - [जदुनाथ सरकार].
छ.शिवाजी महाराजांची पत्रे(प्रुष्ठ क्र.१६७)- [प्र.न.देशपांडे].
व्याख्यान(धर्म : बहुजनांचा आणि ब्राह्मणांचा) - [प्राध्यापक राजेंद्र कुंभार] 

3 May 2013

इतिहासाच्या फ़ेरलिखाणाची गरज

            काही दिवसांपुर्वी सांगली मध्ये विद्रोही साहित्य आणि सांस्क्रुतीक संमेलन झाले.या साहित्य आणि सांस्क्रुतीक संमेलनात "इतिहासाचे विक्रुतीकरण आणि बहुजनांचे उद्ध्वस्तीकरण" या विषयावर तडाखेबंद परीसंवाद झाला.लेखणी हातात असलेल्या आणी वर्णवर्चस्ववादाच्या भुताने झपाटलेल्या ब्राह्मणी इतिहासकारांनी बहुजनांच्या इतिहासाची,त्यांच्या नायकांची चुकीची मांडणी करून बहुजनांच्या अस्मितेचे जाणीवपुर्वक विक्रुतीकरण केल्याचा सुर विद्रोही साहित्य संमेलनात एका विशेष परीसंवादात उमटला.लोकसाहित्याचा अभ्यास करून इतिहासाच्या फ़ेरमांडणीची गरज व्यक्त करण्यात आली.
बहुजनांच्या इतिहासाचे चुकीचे चित्रण केले जात असल्याची चर्चा होत असलेल्या पार्श्वभुमीवर हा परिसंवाद हा संमेलनाचे एक प्रमुख आकर्षण ठरला होता.ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.अशोक राणा,डॉ. नारायण भोसले, डॉ.राजेंद्र कुंभार यांनी कमालीच्या परखडपणाने आपली मते मांडली.
डॉ.राणा तर म्हणाले ब्राह्मणी वर्णवर्चस्ववादाच्या इतिहास संशोधन लेखनांवर आता केवळ टिका करून चालणार नाही, तर आता अभ्यास करून त्यांनी बहुजनांच्या चुकीच्या मांडलेल्या या इतिहासाची दुरुस्ती करावी लागेल.केवळ ब्राह्मणांना शिव्या घालून चालणार नाही, तर त्यांना रोखणे गरजेचे बनले आहे.भटांच्या ओंजळीतील तीर्थ प्यावेच लागते.त्यांनीच लिहिलेल्या इतिहासातील संदर्भ देऊन आता चालणार नाही.या प्रस्थापितांनी जाणीवपुर्वक संस्क्रुती कोशाची चुकिची रचना करून बहुजनांवर अन्याय केला आहे.मात्र आता नविन कोश तयार करण्याची गरज आहे.रामायण,महाभारत यांची रचना यांनी केली नसल्याचा दावा यावेळी केला.बहुजनांच्या सम्रुद्ध संस्क्रुतीला मोडण्याचा हा डाव मोडून काढण्यासाठी आता बहुजनातील अभ्यासकांनी पुढे येण्याची गरज आहे.
              खोटा इतिहास माथी घेऊनच बहुजनांची वाटचाल सुरु आहे.महाराजा शिवछत्रपतींनी तळागाळातल्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्याची उभारणी केली, पण त्याला लबाड इतिहासकारांनी दोन धर्मातील संघर्षाचे स्वरुप दिले.ब्रिटिश काळापासून विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी इतिहास आणि धर्माचा वापर केला जात आहे.आता देखील तेच सुरु आहे.जातीयवादाच्या इतिहासाला आता महत्व दिले जात आहे, हे चुकीचे आहे.चमचेगिरी करणार्या बखरकारांमुळेच चुकीचा इतिहास मांडला गेला.शिवरायांची सर्वाधिक बदनामी करणार्या बाबासाहेब पुरंदरे यालाच शासन आणि शिवरायांचे वारसदेखील पायघड्या घालून मदत करतात, हे खेदाचे आहे.भाजपचे सरकार मुळेच याला वेग आला आहे.नवीन इतिहासकारांनी बहुजनांचा खरा इतिहास समोर येण्यासाठी प्रचंड अभ्यास करण्याची गरज आहे.
सगळ्यात मोठी खंत म्हणजे बहुजनांचे शत्रु असलेल्यांच्या ताब्यात इतिहास आणि त्याचे पुरावे आहेत.डॉ. नारायण भोसले म्हणाले, लेखणी हातात असणार्यांनीच इतिहासाची चुकिच्या रितीने मांडणी केली आहे. वि.का.राजवाडे यांनी ब्राह्मणी व्यक्तिमत्वांना अडचणीत आणणार्या पुराव्यांना  जाळून टाकले आहे. त्यांनी केवळ  ब्राह्मणांचा गौरव करणारा निवडक इतिहासच निवडला.मुस्लिम राज्यकर्त्यांचे चुकीचे चित्रण करून वर्णवर्चस्ववाद्यांनी समाजात भांडणे लावल्याचा त्यांनी शेवटी आरोप केला.
इतिहासाच्या विक्रुत मांडणीने बहुजन समाजाचे मोठे नुकसान केले गेले आहे.वेदपुराणात ब्राह्मणांनी स्वत:ला देव तर बहुजनांना राक्षस मानल्याची  टीका इतिहास संशोधकांनी केली.आर्य चाणक्य,परशुराम यांचा चुकीचा इतिहास मांडला गेला आहे.महंमद ,अकबर आदी राजांचे चुकीचे चित्रण केले आहे.मुजुमदार,सावरकर यांनी मुघल काळ हिंदुसाठी वाईट ठरवलेला आहे.कुळवाडीभुषण बहुजनप्रतिपालक असलेल्या शिवरायांना सर्वाधिक त्रास देनार्या ब्राह्मणांनीच त्यांना आता गोब्राह्मण प्रतिपालक केले आहे.अफ़जलखान वधाच्या पोस्टरमागे केवळ राजकारण असल्याचा आरोप संशोधकांनी केला.मानवतेच्या सभ्यतेला कलंक असणार्या पेशवाईत विक्रुत सत्ताकारणांचा कळस गाठलेला असताना त्यांचे इतिहासात का चित्रण आले नाही.असाही सवाल बर्याच इतिहास संशोधकांनी केला.
आद्य नाटककार महात्मा फ़ुलेच !
आज विष्णूदास भावे यांची आद्य नाटककार म्हणून करून दिली जात असलेली ओळख हाच सर्वात मोठा बहुजनांच्या इतिहासाचा गळा घोटल्याचा पुरावा आहे.भावे यांनी फ़क्त नाटकातील पदांची रचना केली.महात्मा फ़ुले यांनीच सर्वप्रथम "त्रुतीय रत्न" हे मराठीतील पहिले नाटक लिहिले.पण तसा त्यांचा उल्लेख केला जात नाही, नव्हे तो वर्णवर्चस्ववाद्यांनी करून दिला नाही.राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फ़ुले हेच आद्य नाटककार आहेत.
वक्ते काय बोलले !!
* पेशव्यांचा पराक्रम लिहिणार्या इतिहासकारांनी नानासाहेब पेसव्याने क्षुद्रांना मंदिर प्रवेशाची केलेली बंदी इतिहासात का लिहिली नाही.
* नाना फ़डणीसांच्या भानगडींच्या माहितीचा कागद वि.का.राजवाडे यांनी का जाळून टाकला.
* दुसर्या बाजीरावाच्या काळात विवस्त्र महिलांच्या चालण्याच्या स्पर्धा होत होत्या पण त्यांचा इतिहासात कोठे उल्लेख नाही.
* झाशीच्या राणी लक्ष्मीबाईचा दत्तक मुलगा अठरा वर्षाचा असताना पोटाशी लहान मुल बांधुन घोडा चालविणार्या लक्ष्मीबाईची थोरवी गायली जाते.
* ज्यांना ब्राह्मणांकडून सर्वाधिक त्रास सहन करावा लागला, त्या धर्मनिरपेक्ष शिवरायांना गोब्राह्मण प्रतिपालक का व कोणी केले ?
* मानवतेवरील कलंक असणारी पेशवाई येण्यासाठीच रानडे आणि टिळक यांचे लेखन.
* बाबासाहेब पुरंदर्याकडून शिवरायांच्या इतिहासाची विक्रुत मांडणी, तरी देखील सरकार त्यांनाच लाखॊ रुपयांची मदत देते.
* जेम्स लेन ला वर्णवर्चस्ववाद्यांनीच मदत करून शिवछत्रपतींची बदनामी करण्याचा प्रयत्न केला.
* रा.चि.ढेरे सर्वाधिक बदमाश असल्याची घाणाघाती टीका यावेळी डॉ.राणा यांनी केली.
[ पण धाकलं पाटील सहमत नाहीत या टीकेला, कारण बाबा पुरंदरेसारखा बदमाश जगात कोठेच सापडायचा नाही ]

5 March 2013

सत्य इतिहास जाणुन घ्या

तुषार शिंदे
संपर्क : ७६२००६०९२२
           छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फ़ेब्रुवारी १६३० रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. रयतेला राजा मिळाला. ब्राह्मणांच्या हजारो वर्षापासूनच्या व्यवस्थेला पायदळी तुडविणारे व भारतातील बहुजन महापुरुष कुळवाडीभुषण छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या जयंती निमित्त फ़क्त ढोल - ताश्यांच्या तालात नाचण्या ऐवजी त्यांच्या विचारधारेचा प्रसार- प्रचार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सर्वांनीच वेगवेगळ्या माध्यमातून करायला पाहिजे.कुळवाडीभुषण छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घ्यायला पाहिजेत. तरच त्यांच्या विचारांचा जय होईल.कारण महापुरुषांचा जय त्यांनी आपल्या हयातीतच बघितलेला असतो.पण आजचा समाज जय-जय करण्यातच धन्य मानतो.जय शिवाजी आणी जय भवानी अशा घोषणा तोंड फ़ाटेस्तोवर देऊन स्वत:ची फ़सगत करून घेतो.
भारत देशामध्ये अनेक क्रांत्या व प्रतिक्रांत्या झाल्यात तसेच काही होऊ घातल्या आहेत.भारत देशावर विदेशी लोकांनी आक्रमन करून कब्जा केला व भारत देशाला गुलाम बनवले.येथील व्यवस्था त्यांच्या ताब्यात घेतली.हजारो वर्षापासून ही व्यवस्था परकियांच्या हाती होती.त्याविरोधात आपल्या भारतातील महापुरुष गौतम बुद्ध,सम्राट अशोका,संत कबीर,छत्रपती शिवाजी महाराज, जगदगुरु संत तुकाराम महाराज, राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फ़ुले,राजर्षी छत्रपती शाहू महाराज,विश्वभुषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,संत गाडगेबाबा,साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे या महापुरुषांनी लढा दिला.आपल्या या महापुरुषांचे आंदोलन आपल्याला पुढे न्यायचे आहे आणि यशस्वी करायचे आहे म्हणून या विचाराची प्रेरणा आपण घेतली पाहिजे.यातच आपला उद्धार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी या व्यवस्थेच्या विरोधात खुप मोठा संघर्ष केला.येथील भुमिपुत्रांना स्वातंत्र्याच्या आस्तित्वाची जाणीव करून दिली.१६३० ते १६८० या अर्धशतकाच्या कालावधीत त्यांनी इतिहास घडविला.शिवरायांना त्यांच्या आई जिजाऊमाता यांची प्रेरणा मिळाली होती तसेच वडील शहाजीराजांनी त्यांना सर्व युद्धाची सर्व तंत्रे शिकवली होती.छत्रपती शिवाजी राजे संत तुकारामांना गुरु मानत.छत्रपती शिवरायांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत जात-पात, धर्म न मानता भुमिपुत्रांसाठी लढा दिला.थोडक्यात सांगायचे म्हणजे शिवरायांनी समता,बंधुता व न्यायाची शिकवण भुमिपुत्रांना दिली.खरच छत्रपती शिवरायांचे कार्य महान होते.
आज या भटाळलेल्या देशात आणि विशेषत: महाराष्ट्रात अशा या थोर महापुरुषाचा वापर आपले लोक,नेते,पुढारी जनतेला भावनिक बनवून स्वार्थसाठी फ़ायदा करून घेत आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन महाराष्ट्रात अनेक संघटना व पक्ष पुढे आले आहेत.पण त्यांना छत्रपतींच्या कार्याबद्दल तसेच त्यांच्या बदनामीच्या विरोधात बंड करणे याविषयी काहीही गंभीरता वाटत नाही.
"शिवाजी - हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया" हे पुस्तक जेम्स लेनकडून लिहुन घेणार्या १४ भांडारकरी ब्राह्मणांना धडा शिकवण्यासाठी सर्वांचीच पाठफ़िरवणी झाल्याची दिसून येते.हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊमाता यांच्या बदनामीचे ब्राह्मणी षडयंत्र होय.या विरोधात आपण आवाज उठविला पाहिजे.छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास आपण जाणुन घ्यावा कारण शिवरायांचा खोटा इतिहास या षडयंत्रकारी ब्राह्मणांच्या सांगण्यावरून सांगण्यावरून जेम्स लेनने लिहिला आहे.शिवरायांचे गुरु त्यांची आई,वडील आणि जगदगुरु संत तुकाराम महाराज असतानांही दादू कोंडदेव आणि रामदास यांसारखी माणसं त्यांचे गुरु म्हणुन लादले गेले.कुठे आहे आमचा शिवप्रेमी समाज ? शिवरायांची बदनामी करणारे साहित्य लिहिले जात आहे.त्यांचा खोटा इतिहास सांगितला जात आहे.आजही आंतरजालावर अशा संघटना कार्यरत आहेत ज्या कायम खोटा प्रसार करत असतात व इतिहासाचे विक्रुतीकरण करत असतात.शिवरायांच्या नावाचा दुरुपयोग केला जात आहे.तेंव्हा छत्रपतींच्या मावळ्यांनी आता जाग्रुत व्हायला पाहिजे.
छत्रपती शिवरायांच्या बदनामी विरोधात लढणार्या व त्यांचे कार्य व खरा इतिहास सांगणार्या संघटनांमुळे शिवरायांची खरी चळवळ जीवंत आहे.ही चळवळ वाढविण्याची जबाबदारी आम्हा मावळ्यांची आहे.म्हणून एवढे सांगावेसे वाटते की छत्रपती शिवराय कोणत्या जाती - धर्मासाठी लढले नव्हते, ते खर्या अर्थाने आपल्या रयतेच्या हितासाठी लढणारे राजे होते.पुर्वी शिवरायांनी खुप संघर्ष केला आहे मग तो वैदिक ब्राह्मणांच्या विरुद्ध असो नाहीतर मुस्लिमांच्या विरुद्ध असो.पण शिवरायांना मुस्लिम विरोधी दर्शवण्याचे काम ब्राह्मण इतिहास लिहिणार्यांनी केले आहे.शिवराय हे विखुरलेल्या देशबांधवांसाठी व त्यांच्या ऐक्यासाठी झगडले होते.तेंव्हा जाती-धर्म विसरून एकिने लढून शत्रुंना धडा शिकवण्यास सज्ज झाले पाहिजे.आपला इतिहास आपला वारसा आहे.इतिहास जाणुन घ्या व मुक्तीचा मार्ग स्विकारा .या व्यवस्थेच्या मुळावर घाव घातल्याशिवाय आपला देश या गुलामगिरीतून मुक्त होणार नाही.हा देश छत्रपती शिवरायांचा आहे तेंव्हा इथे त्यांचीच व्यवस्था आम्हाला पाहिजे.
जय जिजाऊ । जय शिवराय

3 January 2013

लेखणीची करामत...

         डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की "एका लेखणीत हजार तलवारीची ताकद असते" ते आजच्या काळात अगदी सत्यच ठरत आहे कारण हजार तलवारीने जरी पराक्रम केला आणि लेखणी कुचकामी निघाली तर त्या हजार तलवारीचे कर्त्रुत्व नाहिशे होते शुन्य होते.
लेखणीचा एक फ़टका काय करू शकतो हे बघायचे असेल तर भारतीय इतिहासाकडे बघावे लागेल.ज्यांच्या हाती लेखणी होती त्यांनी किती " हिरोंचे झिरो आणि झिरोंचे हिरो" केले ते भारतीय इतिहासाचे पान अन पान आक्रंदुन सांगेल.
तुम्हाला एक कथा सांगतो तुम्ही ती ऐकली असेलच की एक माणुस एकदा जंगलात गेला आणि वाघाला म्हणाला की सांग "माणुस श्रेष्ट की वाघ"वाघ म्हणाला अर्थातच वाघ.तेंव्हा माणुस म्हणाला चुक माणुसच श्रेष्ट ,ते कसं काय ? माणुस म्हणाला चल माझ्याबरोबर तुला पुराव्यासहीत दाखवतो. वाघ त्याच्या बरोबर घराकडे  जातो त्या माणसाने वाघाला भले मोठे एक चित्र दाखवले  त्या चित्रामध्ये माणुस वाघाच्या डोक्यावर पाय ठेऊन उभा होता आणि म्हणाला आता सांग कोण श्रेष्ट ? तु की मी ? वाघ थोडा विचार करून उद्गारला " हे चित्र तु काढलंस म्हणून असं आहे ,जर मी चित्र काढलं असतं तर परिस्थिती काही वेगळीच असती.
मराठा समाजाची परिस्थिती वरच्या कथेतील वाघासारखीच आहे.लेखणीच्या ठेकेदारांनी लेखण्यांचा पुरेपुर वापर करून आपल्या पुर्वजांचा उदो उदो केला.त्यातूनच टिळक "लोकमान्य" झाले,,बळीराजाला मारणारा वामन " पाचवा अवतार" झाला,इंग्रजांना घाबरलेला शिपाई "साईबाबा" झाला,दुसरा क्रांतिकारक आद्य झाला अशी ही लेखणीची करामत आहे.ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे,वाचलं पाहिजे, चिंतन-मनन-मंथन केलं पाहिजे.तरच भारतीय इतिहासाचा भटाळलेला ’मुखवटा’ ओरबडला जाऊन अस्सल मराठमोळा चेहरा समोर येईल.अर्थात हे कार्य कित्येकांनी सुरु केलं आहे.त्यांचं मनापासून अभिनंदन.
अशाच तर्हेने आमच्या सार्या दैदिप्यमान इतिहासाचा विचका करून टाकला त्यातच जगातील सर्वश्रेष्ट राजांपैकी एक असलेला राजा लुटारू, बंडखोर करण्यात आला, ज्या राज्याच्या शौर्याला जगामध्ये तोड नाही त्या राजाला बदफ़ैली, स्त्रीलंपट करून टाकले,एका सामान्य चाकराला गुरु पदावरती बसवले,शिवरायांचा आणि शाहू महाराजांचा अपमान करणार्यांना लोकमान्य बनविले एवढेच नाही तर अमच्या प्रत्येक महामानवाच्या डोक्यावर एक वामन आणुस बसवला, "रामांच्या डोक्यावर वसिष्ठ बसवला, क्रुष्णाच्या डोक्यावर सांदीपनी बसवला, चंद्रगुप्त मौर्याच्या डोक्यावर चाणक्य बसवला, नामदेवांच्या डोक्यावर विसोबा खेचर बसवला, रामचंद्रराय यादवांच्या डोक्यावर हेमाद्री पंडीत बसवला,तुकोबांच्या डोक्यावर बाबाजी चैतन्य बसवला आणि यांचा कळस म्हणजे शिवरायांच्या डोक्यावर दादू कोंडदेव बसवला.
                लेखणीचा फ़टका काय असतो हे बघाचे असेल तर हे जाणीवपुर्वक शब्दप्रयोग कसे असतात पहा..
"आर्यांचे आगमन - मुस्लिमांचे आक्रमण",पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले - मराठ्यांचं पानिपत झालं", "क्रुष्णाजी भास्कर यांनी शिवरायांवर वार केला - जिवा महालाने सय्यद बंडास मारले".सावरकरांची संडासातली उडी म्हणजे मार्सेलिसची ऐतिहासिक उडी,क्रांतीसिंह नाना पाटलांनी क्रुष्णा नदीत १५० फ़ुट उंचीवरून रेल्वेतून मारलेल्या उडीचा उल्लेख नाही.विशेष ही बाब की सावरकर पकडले गेले पण क्रांतीसिंह यशस्वीरित्या निसटले.मराठ्यांचे नेत्रुत्व करून औरंगजेबाची कबर इथेच खोदणार्या ताराराणींवर इतिहासामध्ये काही ओळीच पण गोषातून कधी बाहेर न पडलेल्या (तलवार चालविणे तर लांबच)आणि आपली अंगरक्षिका झलकारीदेवीस आपल्या वेशात लडावयास लावणार्या दुप्लिकेट झाशीच्या लक्ष्मिबाई वर चित्रपट काय अन मालिका काय! तिचे जागोजागी पुतळे.खरं तर गीत असं होतं की " खुब लढी मर्दानी वो तो झाशी की झलकारी थी" ते बदलून "खुब लढी मर्दानी वो तो झाशी वाली राणी थी" असं करण्यात आलं.
वर लिहिलेली तथ्ये ही मोजकीच उदाहरणे आहेत.लेखणी काय करू शकते,तर लेखणी अशा करामती करू शकते."जिसकी लाठी उसकी भैंस" अशी एक म्हण आहे,त्याच अर्थाने "ज्याच्या हाती लेखणी तोच इतिहासाचा धनी" असेही म्हणता येईल.याच लेखणी मुळे आमचे हिरॊ झिरो झाले आणि भटी वरवंटे हिरो ठरलेत.

1 January 2013

पानिपत, मराठा संज्ञा आणि परिभाषा

            पानिपत येथे १५ जानेवारी १७६१ रोजी झाली होती.या लढाईमध्ये पेशव्यांचा पराभव झाला होता.परंतू आजही या पराभवाचे खापर मराठ्यांच्या डोक्यावर फ़ोडले जाते.या लढाई संदर्भात मुलभुत प्रश्न असा की "पानिपतच्या लढाईसोबत मराठ्यांचे नाव का जोडले जाते ? " ही लढाई शिवशाहीची नसून पेशवाईची होती.
         संपुर्ण पेशवाईच्या इतिहासापैकी फ़क्त पानिपतच्या लढाईच्या पराभवाची जबाबदारी घेण्याची वेळ जेंव्हा येते तेंव्हाच फ़क्त "मराठा" शब्दाचा आधार घेतला जातो.याशिवाय उरलेला इतिहास हा मराठ्यांचा नसतोच.तो फ़क्त पेशवाईचा असतो.
      आमच्याच समाजातील लोक जेंव्हा पानिपतच्या लढाईबाबत बोलू किंवा लिहु लागतात,तेंव्हा ते गळा काढून रडतात की ,"मराठ्यांचा पानिपत मध्ये पराभव झाला, मराठे पानिपतमध्ये हरले" तर काही महाभाग असेही म्हणतात की "पानिपत मध्ये मराठ्यांचा पराभव झाला नाही ते हुतात्मे झाले ".या दोन्हीही प्रकारे रडणे म्हणजे यांचा हेतू एकच असतो तो म्हणजे पानिपतच्या लढाईचा संबंध मराठा या शब्दाशी जोडणे! या लढाईच्या वेळी सत्ता आणि नेत्रुत्व हे दोन्हीही पेशव्यांचे होते.पण पराभवाची व्याख्या मात्र "मराठा" या शब्दाच्या आधारे करायची, आहे की नाही चालूबाजी.स्वत:च्या नाकर्तेपणाचे खापर मराठ्यांच्या नावावर फ़ोडायचे! यालाच म्हणतात इतिहासाचे विक्रुतीकरण!. दोषी आहेत पेशवे पण आरोपी मात्र मराठ्यांना केले जाते.हा किती अत्याचार आहे! ब्राह्मणी व्यवस्था बहुजनांना आरोपीत करते हे एक वेळ ठीक आहे पण  आपणच आपल्याला न केलेल्या गुन्ह्याबद्दल अरोपीत करून घेण्यात काय अर्थ आहे.? आणि काय शहाणपणा आहे ? यालाच महात्मा फ़ुले यांनी गुलामगिरी असे म्हंटले आहे.तर डॉ.बाबासाहेब म्हणतात की "गुलाम लोकांमध्ये जन्माला येणे गुन्हा नसून ,गुलामी सहन करणे हा खरा गुन्हा आहे!.
मराठा या शब्दामुळे नक्की काय घडते ?
१] पेशव्यांना लपण्याची संधी मिळते! जे पेशवे या पराभवाचे खरे सुत्रधार आहेत.
२] पेशव्यांच्या ऐवजी मराठ्यांचा संबंध लढाईशी जोडता येतो.
३] एकदा का पराभवाची व्याख्या मराठा शब्दाच्या आधारे गेली पराभवाचे धनी मराठेच आपोआप होतात.
४] मराठ्यांना ऐतिहासिक द्रुष्ट्या बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो.
५] व्यवस्था मराठ्यांमध्ये पराभवाचा न्युनगंड निर्माण करण्याचा प्रयत्न करते.
६] पानिपतच्या संपुर्ण घटनेचे विक्रुतीकरण करणे शक्य होते.
पानिपतच्या सर्व लढायांचा संक्षिप्त इतिहास
               पानिपत मध्ये एक नाही तर तीन मोठ्या लढाया लढल्या गेल्या आहेत.या तिन्ही लढायांना पानिपतची लढाई याच नावाने संबोधित केले जाते.
१] पहिली पानिपतची लढाई - २१ एप्रिल १५२६ , मोघल सेना विरुद्ध लोधी सुलतान सेना
नेत्रुत्व - बाबर विरुद्ध सुलतान ईब्राहिम लोधी, विजयी - मोघल सेना
२] दुसरी पानिपतची लढाई - ५ नोव्हेंबर १५५६ , मोघल सेना विरुद्ध सम्राट हेमचंद्र सेना
नेत्रुत्व - इटांगा खान विरुद्ध सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य, विजयी - मोघल सेना
३] तिसरी पानिपतची लढाई - १४ जानेवारी १७६१ , दुररानी सेना विरुद्ध पेशवे(ब्राह्मण)
नेत्रुत्व - अहमदशहा अब्दाली विरुद्ध सदाशिव भाऊ, विजयी - दुररानी सेना 
मराठ्यांना पानिपतच्या सर्व लढायांची किमान माहीती असणे गरजेचे आहे.यापैकी तिसर्या लढाईत पेशवाई व्यवस्था गळा काढून रडत असते आणि ते स्वाभाविक आहे कारण पानिपतच्या तिसर्या लढाईत पेशव्यांचा पराभव झाला आहे.
मराठ्यांनी जस्टीफ़िकेशन (Justification)का म्हणून द्यावे
         युद्धातील पराभव असो किंवा कब्बडी या खेळतील पराभव असो,या पराभवाची जबाबदारी ही घ्यावी लागते आणि त्यानंतर पराभवाच्या कारणांचा विचार करावा लागतो.पानिपतच्या लढाईमध्ये पराभव हा पेशव्यांचा झालेला आहे.त्यामुळे पर्यायाने या पराभवाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडते.पेशव्यांचे वारस मात्र या पराभवाची जबाबदारी स्वत:च्या अंगावर घेऊ इच्छित नाही.याउलट ब्राह्मणी व्यवस्था या पराभवाला ’जस्टिफ़ाय’(Justify) करण्याचा बेगडी प्रयत्न करत असते आणि तो सुद्धा मराठ्यांना बदनाम करूनच.!
         पेशव्यांचे वारस म्हणतात की "पानिपत मध्ये मराठ्यांचा पराभव झाला नाही, मराठे पानिपत मध्ये हुतात्मे झाले" हा या पराभवाला जस्टीफ़ाय करण्याचा केवीलवाना प्रयत्न आहे.इथे पेशव्यांचे वारस सफ़ाई देण्याचा प्रयत्न करत असतात.पानिपत मध्ये पेशव्यांचा पराभव झाला होता हे जगजाहीर आहेच त्यामुळे काय जस्टिफ़िकेशन द्यायचे ते त्यांनी द्यावे त्यासाठी मराठ्यांना बदनाम करण्याची गरज नाही.पेशवाई व्यवस्था असे का म्हणत नाही की "पानिपत मध्ये पेशव्यांचा पराभव झाला नाही तर पेशवेहुतात्मे झाले ! असे म्हंटले तर संपुर्ण भारतामध्ये कोणालाही वाईट वाटणार नाही. याउलट पेशवाई व्यवस्थेचे हसू येईल! हे पेशवाई व्यवस्था जाणुन आहे.म्हनुन ही व्यवस्था या पराभवाला "मराठा" शब्दाशी जोडण्याचा प्रयत्न करते.यामुळे या व्यवस्थेला पराभवातून लपण्याची संधी मिळते.
        हे दुसर्या उदाहरणाद्वारे सांगावयाचे झाल्यास असे सांगता येईल की पेशवाईव्यवस्था मोठ मोठ्याने गळा काढून म्हणते की "गर्व से कहो हम हिंदू है !" जर आम्ही हिंदू आहोत तर सांगायची गरज काय आहे ? याचप्रमाणे पानिपत मध्ये मराठ्यांचा पराभव झाला असता सांगायची गरज नसते,पण पराभव मराठ्यांचा झालेलाच नाही तर सांगावयाची गरजच काय आहे ? यामुळे मराठ्यांना या लढाईबाबत कोणतेही जस्टीफ़िकेशन देण्याची गरजच नाही.

24 December 2012

इतिहास म्हणजे चोपड्या नव्हेच !

          "इतिहास" हा व्यक्तींभोवती फ़िरतो, व्यक्तिपरत्वे गुणदोष आलेच.इतिहास लेखणाची पुर्नछाननी व मुल्य तपासले जावे.त्यातील बारकावे आणि तपशील देताना शास्त्रशुद्ध ओघवते विवेचन दिसले पाहिजे. सत्याचा अपलाप न करता काल्पनिक, पुर्णत: कादंबरीमय घटना आणि व्यक्तिचित्रणे असता कामा नयेत.तटस्थ व्रुत्तीने आणि निष्पक्षपणे लेखण व्हावे लागते.मराठ्यांच्या इतिहासात अनेक समज, गैरसमज आणि अपसमज आढळून येतात.इतिहासलेखण देखील व्यक्तिच करतात.छत्रपती संभाजी महाराज, महादजी शिंदे, होळकर, दुसरे बाजीराव, आनंदीबाई, सोयराबाई शिर्के, टिळक, शाहू एवढेच काय पण विश्ववंद्य छत्रपती शिवाजी राजे यांच्याबाबतीतही आपल्या काही इतिहासकारांनी अवास्तव, अवाजवी गोष्टी लिहुन ठेवल्या आहेत. तसेच काही काल्पनिक पात्र इतिहासात घुसडली आहेत.विशेषत: बखरकारांना गोंधळ व भडक, रंजक चित्रणे तर विचारायला नकोच , म्हणूनच त्यातील सत्य शोधणे आवश्यक आहे. 
आता याला इतिहास तरी कसे म्हणावे ? कारण इतिहास शास्त्रशुद्ध पद्धतीने लिहिलेला असतो.ती पद्धत या इतिहासात जास्त दिसून येत नाही.इतिहास लेखण हे ब्राह्मण इतिहासकारांना लिहिता येते का ? कारण इतिहास लेखणात प्रामाणिकपणा असावा लागतो, पण तो यांच्यात दिसून येत नाही.इतिहासकार हुशार असू शकतात पण प्रामाणिक असू शकत नाहीत.त्यांनी जो इतिहास लिहिला तो इतिहास नसून काल्पनिक गोष्टी आहेत.असे त्यांच्या लिहिलेल्या इतिहासाची चिकित्सा केल्यावर दिसून येते.म्हणून असा इतिहास म्हणजे "चोपड्या" आहेत असे हमखास मानावं लागेल आणि या चोपड्यांना जे बिनडोक इतिहास समजतात ते भटांचे "पिट्टू" आहेत असे समजावे.अर्थात वर्णवर्चस्ववादी इतिहासकर नसून इतिहासविध्वंसक आहेत.हा इतिहास केवळ बहुजनांवर वर्चस्व लादण्यासाठी लिहिलेला आहे.पण आता त्यांची चांगलीच चिकित्सा होत चालली आहे.जाग्रुतीचा वनवा पसरला आहे.या वणव्यात त्यांना खाक व्हावे लागेल अन्यथा सुधरावे लागेल.काय करायचे ते त्त्यांनीच ठरवायचे आहे.दादू कोंडदेवचा पुतळा काढून इतिहास शुद्धीकरणाला सुरुवात झाली आहे असे म्हणायला काही हरकत नसावी.अजुन अशी बरीच घाण साफ़ करायची आहे.त्यांनी जे लिहिले ते त्यांचे वर्चस्व रहावे म्हणून  लिहिले तो इतिहास होऊ शकत नाही.जातीयपुर्वाग्रहातून जे लेखण केले जाते त्याला इतिहास म्हणता येत नाही. मुळात इतिहास म्हणजे काय ? ते समजुन घेतले पाहिजे.
फ़्रॉंन्सिस बेकन यांचे मत इतिहास म्हणजे "मानवाला शहाणे बनविणारी विद्याशाखा म्हणजे इतिहास होय", तर हेन्री जॉन्सन म्हणतात इतिहास म्हणजे " जे घडले ते जसेच्या तसे सांगणे होय" आणि" ज्या घटनांनी मानवी मनावर खोल ठसा उमटतो , अशा घटना म्हणजे इतिहास होय".इतिहासाची व्याख्या करताना प्रो.लेस्की म्हणतात, "इतिहास म्हणजे नैतिक कल्पनांचा संग्रह व स्पष्टीकरण होय".तर इतिहास लेखणाबाबत डॉ.भिमराव आंबेडकर म्हणतात "प्राचीन भारताच्या इतिहासाचा बहुतेक हिस्सा हा इतिहास नाही, असे नाही की प्राचीन भारत इतिहासविना आहे.प्राचीन भारताला फ़ार इतिहास आहे परंतू तो आपले स्वरून गमावून बसलेला आहे.स्रियांचे व मुलांचे मनोरंजन करण्यासाठी त्याला जाणीवपुर्वक पौराणिक  स्वरूप दिले आहे" ,"पुढे ते म्हणतात की ,प्राचीन भारताच्या इतिहासावरील पडदा हटविला जावा याशिवाय प्राचीन भारत इतिहासविहीन राहील.आनंदाची गोष्ट अशी की बौद्ध साहित्याच्या मदतीने प्राचीन इतिहासाला त्या मलब्यातून खोदून काढता येवू शकते. ज्या मलब्याखाली इतिहासकारांनी पागलपणात त्याला लपवून ठेवले आहे "
           या द्रुष्टिने विचार करता ब्रह्मव्रुंदांचे लिखाण इतिहास लेखनाच्या कसोटीवर खरे उतरत नाही.जर ते इतिहासाच्या नावाने आमच्यावर गुलामी लादत असतील तर ती आम्ही ठोकारून लावणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे.जो इतिहास त्यांनी रचला आहे तो साफ़ चुकीचा व दिशाभुल करणारा आहे.त्यांनी जो इतिहास लिहिला तो स्वत:चे हित बघुनच.ब्रह्मव्रुंद इतिहासकारांनी लिहिलेल्या इतिहासात शेंबड्याला राष्ट्रिय नेता बनविले जाते व आमच्या महापुरुषाला हे एवढे लहान करून ठेवतात की आम्हाला आमचा महापुरुष आमचा वाटत नाही. तेली,तांबोळी, कुणबी यांचा जाहीर अपमान करणारे टिळक राष्ट्रिय पुरुष ठरतातच कसे ? महात्मा फ़ुले यांचे कार्य राष्ट्रीय स्वरुपाचे असताना त्यांना महाराष्ट्रापुरतेच मर्यादित करण्याचे महापातक याच वर्णवस्चस्ववादी इतिहासकारांनी केले.उमाजी नाईक हे पहिले क्रांतीकारक असताना कोणा दुसर्याला आद्य क्रांतीकारक म्हणने हा इतिहास आहे ? ज्या राजाच्या शौर्याला जगामध्ये तोड नाही अशा राजाला स्त्रीलंपट म्ह्णून अपमानित केले हा इतिहास आहे ? शिवरायांच्या आकाशाला गवसणी घालणार्या कार्याचे श्रेय स्वजातीय किड्यांना देणे हा इतिहास होऊ शकतो ? एका  चाकराला गुरुपदी बसवले जाते हा इतिहास आहे ? इतिहास लिहिताना स्वार्थाचा लवलेशही नसावा. मग याला आपण इतिहास म्हणायचे ?.
काय हा खरा इतिहास होऊ शकतो ? वर्णवस्चस्ववादी पुरुषांचा इतिहास (गोष्टी) रंगवून सांगितल्या जातात. खलनायकांना नायक बनविणे हा इतिहास होऊ शकतो काय? अशा इतिहासातून राष्ट्रिय भावना कशी काय निर्माण होऊ शकते ?. म्हणूण अशा इतिहासातील घाण साफ़ करणे आवश्यक आहे.पण ती घाण ब्राह्मण साफ़ करणार नाहीत.ते बहुजन इतिहासकारांनाच करावी लागेल.कारण यांचा इतिहास अर्थात चोपड्या रद्दीत फ़ेकण्यालायकच असतात.म्हणून बहुजन इतिहासकार निर्माण होणं आवश्यक आहे.आत्ता पर्यंत बराच इतिहास स्वच्छ झालेलाच आहे त्याबद्दल त्या इतिहासकारांचे आभार आणि अभिनंदन.
  आज बरेच साहित्यिक ,इतिहासकार सत्य इतिहास लेखण करीत आहेत.अर्थात त्याची आवश्यकता आहेच.खरा इतिहास जाणुन घ्यायचा असेल तर हे होणे नक्कीच गरजेचे आहे."ध" चा "मा" करण्यात वर्णवस्चस्ववादी इतिहासकार पटाईट असतात.संभाजी महाराजांचे चरित्र बदनाम करण्याचे काम या वर्णवस्चस्ववादी तथाकथित विद्वानांनीच केले.जिजामातेची बदनामी याच तथाकथित विद्वानांनीच केली.त्यामुळे बहुजन इतिहासकार व साहित्यिकाने या गोष्टीकडे विशेष लक्ष देऊन त्यांचे मनसुबे नेस्तनाबूत करावेत आणि या पिढीला स्वच्छ आणि खरा इतिहास द्यावा हिच विनंती.
जय शिवराय ॥ जय महाराष्ट्र 

6 November 2012

जेंव्हा इतिहास लिहिला जाईल.........

            एक कथा आहे चिमणी आणि कावळ्याची की एक जंगल होते त्या जंगलात विविध प्राणी राहत होते.एक दिवस जंगलाला आग लागली सर्व प्राणी,पक्षी इकडे तिकडे पळू लागले.त्यावेळी चिमणीने विचार केला ही आग कशी विझवायची.त्यावेळी चिमणी चोचीमध्ये पाणी भरून ती त्या आग आगीवर आणुन टाकू लागली. तिची ती धडपड बराच वेळ चालली. तिथेच असलेला कावळा त्या चिमणीला पाहुन हसत होता.तेंव्हा त्या कावळ्याने चिमणीला प्रश्न केला."चिऊताई चिऊताई तुझ्या इवल्याशा चोचीमधील पाण्याने जंगलाला लागलेली आग विझेल का ?" असे म्हणून तो कावळा हसला.चिमणीने त्याच्या हसण्याकडे लक्ष न देता पुन्हा आपल्या कामात ती गर्क राहीली.चिमणीने धडपड करून चोचीत जेवढे मावेल तेवढे पाणी आणुन त्या घरट्यावर ओतत होती.ती आग वाढतच चालली होती.पण चिमणीची धडपड कमालीची होती.चिमणीची ती धडपड बघून कावळा आणखी मोठ्याने हसू लागला.त्याचे ते हास्य कुत्सित होते.पुन्हा तो कावळा चिमणीला म्हणाला-"चिऊताई चिऊताई तु वेडी आहेस का ? तुझ्या चोचीतल्या पाण्याने आग विझेल का ? ". आता मात्र चिमणीला रहावले नाही.चिमणी त्याला म्हणाली- " अहो कावळेदादा, या जंगलाला आग लागली आणि या जंगलाच्या आगीला विझविण्याचा जेंव्हा इतिहास लिहिला जाईल तेंव्हा त्यात माझे नाव नक्कीच आग विझवणार्यांच्या यादीत असेल, आग लावणार्यांच्या किंवा त्याच्या समर्थकांच्या यादीत माझे नाव नसेल".
         ही कथा सांगण्याचे कारण हे आहे की आज सर्वत्र जातीयवाद,वर्चस्ववाद, ब्राह्मणवाद वाढला आहे. कोणत्याही  अडाणी लोकांना हाताशी धरून महापुरुषांचा अपमान करणे ,इतिहासाचे विक्रुतीकरण करणे याचे प्रमाण वाढले आहे.इतिहासाचे विक्रुतीकरण करणे हे काही लोकांचे धंदेच बनले आहेत.त्यातील एक वाद म्हणजे जेम्स लेन आणि दादू कोंडदेव  प्रकरण.आता ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहे की जेंव्हा जेम्स लेन ला हाताशी धरून काही वर्णवर्चस्ववादी ब्राह्मणांनी शिवरायांचा अपमान केला तेंव्हा फ़क्त संभाजी ब्रिगेड सारख्या शिवप्रेमी संघटनाच पुढे सरसावल्या निषेद नोंदवायला.संभाजी ब्रिगेड ने जेंव्हा दादू कोंडदेव यांचा पुतळा काढला तेंव्हा ते शुभ क्रुत्य सर्व जाणव्यांना झोंबले.कुणीही असो ते क्रुत्य त्यांना झोंबण्याचे कारण देखील होते.कारण हे इतिहास शुद्धीकरणाचे संकेत होते.याचे कारण म्हणजे दादू कोंडदेव यांच्या प्रती असलेले प्रेम.पण जे कार्य संभाजी ब्रिगेड ने केले त्याबद्दल समाजामध्ये मोठी चर्चा सुरु झाली.संभाजी ब्रिगेड ही एक शिवप्रेमी संघटना आहे हे विचार रुजू लागले.संभाजी ब्रिगेड गावोगावी पसरली.समाजामध्ये चित्र स्पष्ठ झाले की छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी ही प्राच्यविद्या संस्थेतील त्या १४ भटांनीच केली आहे.
आज पर्यंत इतिहासाला वाचविण्याचे आणि शुद्ध करण्याचे काम संभाजी ब्रिगेड ने केले.खरे तर समाज काय आहे किंवा जातीपाती काय आहेत? सगळ्या जाती-धर्मा मधले लोक आपले बांधव आहेत हे विचार समाजात संभाजी ब्रिगेड मुळेच पसरले.आपले खरे शत्रु कोण आहेत आणि मित्र कोण आहेत हे संभाजी ब्रिगेड मुळेच समजले. नाहीतरी वर्णवर्चस्ववादी लोकांनी सगळ्यांना अंधारात ठेवून जाती - धर्मात फ़ुट पडण्याचे काम केले होते.शिवप्रेमी कोण आणि शिवद्रोही कोण हे सर्व बहुजनांना संभाजी ब्रिगेड मुळेच कळले.आज अशा बर्याच गोष्टी होत्या त्यामुळे महापुरुष बदनाम होत होते,इतिहास विक्रुत होत होता पण संभाजी ब्रिगेड ने त्यावर गदा आणली.आपल्या इतिहासाला वाचविण्याचे महत्वाचे काम संभाजी ब्रिगेड ने केले आहे.संभाजी ब्रिगेड नसते तर काय अवस्था झाली असती इतिहासाची, कल्पना ही करवत नाही.उदा.दादू कोंडदेव हा शिवरायांचा गुरु म्हणूनच बोंबाबोंब झाली असती आणि पावलो-पावली शिवराय दादू कोंडदेव मुळे कर्त्रुत्ववान झाले, नाही तर कुठ्ले ! हे ऐकावे लागले असते.इथेच हे थांबले नसते तर यापुढे जेम्स लेन च्या पुस्तकाच्या माध्यमातून अतिशय अपमान कारक इतिहास आपल्या माथ्यावर मारला गेला असता जर संभाजी ब्रिगेड नसते तर. हे तर संभाजी ब्रिगेडचे आभार मानले पाहिजेत.
संभाजी ब्रिगेड हा बहुजन महापुरुषांच्या स्वाभिमानाचा त्यांच्या चळवळीचा मुद्दा आहे.त्यामुळे वरील बोधकथा येथे सुद्धा लागू होते.छत्रपती शिवरायांचा आणि जिजामातेचा अपमान झाला त्या इतिहासामध्ये बदनामी करणार्यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड लढले असा इतिहास होईल ना की समर्थकांच्या यादीत त्यांचे नाव असेल.भांडारकर प्राच्यविद्या संस्था ही संशोधनाचे किंवा ज्ञानाचे केंद्र राहीले नसून ते मनुवाद्यांच्या नालायकपणाचा आणि षडयंत्राचा अड्डा बनले आहे.ही बाब तेंव्हा  नोंदविली जाईल.ज्याप्रमाणे चिमणीने आपल्या क्षमते प्रमाणे आग विझवण्यासाठी धडपड केली म्हणूण तीचे नाव आग विझवण्यार्यांच्या इतिहासात अव्वल राहील.तसेच आज ज्या भांडारकर नावाच्या बौद्धिक वेश्यागिरी केंद्राने जी घाण किंवा जे षडयंत्र केले त्याच्या विरोधात संभाजी ब्रिगेड लढले हा इतिहास लिहिला जाईल.त्या इतिहासात संभाजी ब्रिगेड चे नाव अमर होईल यात तीळमात्र शंका नाही.छत्रपती शिवरायांचा आणि जिजामातेचा अपमान करणार्या मनुवाद्यांना संभाजी ब्रिगेड चांगलाच धडा शिकवेल अशी अपेक्षा करुया.मराठ्यांनो आपला तेजस्वी इतिहास जीवंत ठेवायचा असेल तर संभाजी ब्रिगेडला पर्याय नाही हे लक्षात घ्या. तो इतिहास त्याचा पुरावा राहील.हे होणार आहे ते निश्चित होणारच आहे.      

8 October 2012

उल्लेखनीय प्रतिक्रिया !

[ विश्व मराठी ब्लॉग लिहिल्या पासून आतापर्यंत १५०० च्या आसपास प्रतिक्रिया कट्ट्यावर धडकल्या.प्रतिक्रिया या महत्वाच्या असतात कारण त्या लिहायला उत्सुक करतात, प्रेरणा देतात अशीच एक प्रेरणादायक प्रतिक्रिया कट्ट्यावर येवून धडकली ती प्रतिक्रिया एक मोठे लेखक आहे ते म्हणजे "मराठ्यांनॊ षंड झालात का ? " या पुस्तकाचे लेखक डॉ.बालाजी जाधव साहेब यांची.त्यांची प्रतिक्रिया खाली देत आहे. ]
"आपला ब्लोग अतिशय आवडला. अत्यंत सुंदर आणि प्रभावी रीतीने आपण आपल्या ब्लॉगची मांडणी केली आहे. खरेच आहे जिथे आयुष्याला कलाटणी देणारे शिव विचार वाचायला मिळतात ते स्थानही तेवढेच शिवमय असू नये काय? तंत्रज्ञानाचा फार चांगला फायदा आपण करून घेतला आहे. समाजाला लागणारे वैचारिक खाद्य आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून पुरवित आहात. आजपर्यंत एवढा नीटनेटका ब्लोग माझ्या तरी पाहण्यात आला नाही. हा ब्लोग खरोखरच लोकप्रियतेच्या कळसावर आहे हे त्याच्या सभासद संखे वरूनच लक्षात येते. यापुढेही आपण समाजाला योग्य दिशा देणारे साहित्य निर्माण करावे आणि आम्हा वाचकांची भूक भागवावी. आपले कार्य हे पुस्तक पेक्षाही अत्यंत प्रभावी आहे कारण पुस्तक निर्मिती प्रक्रियेत बराच वेळ जातो आणि नजर चुकीने जर काही चूक झाली तर ती चूक पुस्तकांच्या प्रती संपे पर्यंत काढता येत नाही, हे मी एक प्रकाशक या नात्याने चांगलेच जाणतो. हा धोका आपल्याला नाही. लेख लिहिला की वाचकांच्या मनाचा वेध घ्यायला तो तयार होतो. चूक असेल तर लगेच दूरोस्त करता येते आणि वाचकही आपल्या विचारांचा आस्वाद घेऊन लगेचच आपली कडू गोड प्रतिक्रिया देऊ शकतो. आपल्या पुढील कार्यास शिवेछ्या. हा ब्लोग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा. विशेष गोस्त म्हणजे आपण आपल्या प्रोफिले मध्ये माझ्या "मराठ्यांनो षंढ झालात काय?" या पुस्तकातील "मराठा लढवय्यी जात ,एकेकाळची राज्यकर्ती जात ,जगातल्या १३ लढवय्या जातीपैकी प्रथम क्रमांक पटकावणारी जात, "पंजाब, सिंध , गुजरात, मराठा "या राष्ट्रगीतात महाराष्ट्राचा उल्लेख "मराठा" असा करायला भाग पडणारी जात , स्वतःच्या शौर्य, धैर्य, त्याग आणि उदारपणा या गुणांमुळे महाराष्ट्राची ओळख बनलेली जात". या ओळी टाकल्या. याचे मला फार बरे वाटले. आई जिजाऊ आपल्याला प्रचंड यश देओ हीच शिव कामना."
जय जिजाऊ!

डॉ.बालाजी जाधव
लेखक : "मराठ्यांनो षंड झालात काय ?"
धन्यवाद ! डॉ. जाधव साहेब आपल्यासारख्या लेखकांमुळेच आणि वाचकांमुळेच आम्हाला लिहायला प्रेरणा मिळते.आपण आमचा मराठी कट्टा ब्लोग वाचत रहा आणि आपलेविचार कळवत रहा.
धन्यवाद पुन्हा एकदा ..
जय जिजाऊ । जय शिवराय  ।

1 July 2012

पानिपत : मराठ्यांचे कि पेशव्यांचे ?

राज्य पेशव्यांचे आणि पानिपत मराठ्यांचे कसे ? 
         पानिपत कोणाचे झाले ? असा प्रश्न विचारला की, पहिलीच्या मुलांपासून ते पदवीधर तरुणांपर्यंत सर्वजन एकच उत्तर देतात की, मराठ्यांचे पानिपत झाले.परंतू यामध्ये आपल्या मुलांचा किंवा त्या तरुणांचा दोष नाही.कारण त्यासाठी जबाबदार आहे ती  शिक्षण व्यवस्था आणि इतिहासकार वि.का.राजवाडे, अ.रा.कुलकर्णी, सेतु माधवराव पगडी, पांडुरंग सदाशिव पिसूरलेकर,व्ही.टी.गुन्हे, के.एन.चिटणीस, शं.ना.जोशी, वा.क्रु.भावे, सरदेसाई इत्यादी इतिहासकारांनी मराठ्यांचा इतिहास लिहित असताना मराठ्यांचे पानिपत झाले हा विचार इतिहासामध्ये जाणिवपुर्वक रुजवला.परंतू इतिहासाचा एक चिकीत्सक अभ्यासक या नात्याने विचार केल्यास आपणास ही गोष्ट सिद्ध करता येईल की, पानिपत हे मराठ्यांचे झाले नसून पेशव्यांचे  झाले आहे.
               इतिहासामध्ये पानिपतच्या एकुण तीन लढाया झाल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे - 
१) पहिली पानिपतची लढाई - २० एप्रिल इ.स.१५२६(इब्राहिम लोबी द बाबर)
२) दुसरी  पानिपतची लढाई - ५ नोव्हेंबर इ.स.१५५६(अकबर द हेमू)
३) तिसरी पानिपतची लढाई - १४ जानेवारी इ.स.१७६१(पेशवे द अहमदशाह अब्दाली)
            यापैकी तिसर्या पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांचे नव्हे तर पेशव्यांचे पानिपत झाले, ते कसे आपण पाहू.
 मराठ्यांच्या सत्तेचा कालखंड - इ.स.१६३० ते इ.स.१७१३.
पेशव्यांचा म्हणजेच ब्राह्मणांचा कालखंड - इ.स. १७१३ ते इ.स. १८१८.
              इ.स. १७१३ मध्ये बाळाजी विश्वनाथ हा मुख्य पेशवा झाला आणि तेंव्हा पासुनच मराठा छत्रपतींच्या हाती नाममात्र सत्ता राहुन सर्व राजकीय सत्ता पेशव्यांनी आपल्या ताब्यात घेतली.त्याच मराठा राज्याची राजधानी सातारा बदलून ती पुण्यास करण्यात आली.याच बाळाजी विश्वनाथला इतिहासकार मराठा सत्तेचा दुसरा संस्थापक असे म्हणतात.
          बाळाजी विश्वनाथ नंतर पहिला बाजीराव (इ.स.१७३०-४०) हा पेशवेपदी आला. या पहिल्या बाजीरावाच्या शौर्याबद्दल तर इतिहासकार फ़ारच उदो उदो करतात.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर शौर्य आणि धाडस यासाठी पहिल्या बाजीरावाचाच क्रम लागतो, असे इतिहासकार लिहितात.कदाचित असे लिहुन छत्रपती शिवाजी महाराजांइतकी लोकप्रियता पहिल्या बाजीरावालाही मिळेल असे त्यांना वाटत असावे.पण आपण एक गोष्ट समजून घ्यायला हवी ती म्हणजे पहिल्या बाजीराव पर्यंतच मराठा स्वराज्य होते नंतर त्याचे रुपांतर पेशवाईत झाले 
          पहिल्या बाजीरावाच्या म्रुत्यूनंतर त्याचा मोठा मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ़ नानासाहेब (इ.स.१७४०-६१) हा  पेशवेपदी असता याच दरम्यान म्हणजे इ.स.१७४८ मध्ये छत्रपती शाहूंचा म्रुत्यू झाला.त्यामुळे संपुर्ण मराठ्यांची सत्ता ही नानासाहेब पेशव्यांच्या हाती आली.(याचा अर्थ असा होतो की, पेशवे ठरवतील तीच पुर्व दिशा, मराठे ठरवतील ती नव्हे !).नानासाहेब पेशव्यांच्याच कालखंडात दोन महत्वाच्या घटना घडल्या 
१) अटक येथील प्रदेशावर विजय (१७५८) 
२) पानिपत लढाईमध्ये पराजय (१७६१)
            या दोन घटनांच्या विशेषणा वरून इतिहासकारांचा पक्षपातपणा लक्षात येतो. कारण इ.स.१७५८ मध्ये नानासाहेब पेशव्यांचा कनिष्ट भाऊ रघुनाथरावाने इंदुरच्या मल्हारराव होळकरांच्या मदतीने अटक किल्यावर जरीपटका फ़डकावून विजय मिळवला.या विजयाचे वर्णन करण्यासाठी इतिहासकारांनी इतिहासामध्ये एक म्हण प्रचलित केली :-
" पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले."
             काही हरकत नाही रघुनाथरावाच्या नेत्रुत्वाखाली विजय मिळवला म्हणुन इतिहासकारांनी अगदी सत्य इतिहास समाजासमोर आणण्यासाठी या म्हणीचा उपयोग केला असेल.
             परंतू अवघ्या ३ वर्षानंतर म्हणजेच इ.स.१७६१ मध्ये नानासाहेब पेशव्याचाच चुलत भाऊ सदाशिवराव याच्या नेत्रुत्वाखाली पानिपतचे युद्ध झाले.या पानिपतच्या युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या "गनिमीकावा" या युद्ध तंत्राचा सदाशिवरावांनी वापर केला नाही, म्हणुनच पानिपतच्या लढाईत पेशव्यांना पराभव पत्कारावा लागला. हा पराभव आपला नसून मराठ्यांचा आहे, हे सांगण्यासाठी ढोंगी इतिहासकरांनी आणखी एक म्हण प्रचलित केली :-
" मराठ्यांचे पानिपत झाले"
           अशा प्रकारे या दोन घटनांचे विश्लेषण त्यांच्या पद्धतीने केले आहे.विजयाचे श्रेय स्वत:च्या नावावरती घेतले आणि पराजय मात्र मराठ्यांच्या नावावर खपवला.आमचे एवढेच म्हणने आहे की, पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले असतील तर पानिपतही पेशव्यांचेच झाले आणि मराठ्यांचे पानिपत झाले असेल तर अटकेपार झेंडे ही मराठ्यांनीच लावले, याला म्हणतात वस्तुनिष्ठ इतिहास लेखन करणे. परंतू वस्तुनिष्ठ इतिहास लेखन न करता त्यांना अनुकूल असा इतिहास लिहिला.
            परंतू छत्रपतींचा मावळा आता पुस्तक वाचनातून जाग्रुत होत आहे.तो आता कोणत्याही षडयंत्राला बळी पडनार नाही.कारण आता  इतिहासाच्या पुनर्लेखनास सुरुवार झाली आहे.

6 June 2012

इतिहास संशोधनानेच बदलतो

             पेशवाईच्या उत्तर काळात इ.स.१८०० च्या आसपास (याच वेळी पेशव्यांच्या गादीवर इतिहासात चैनखोर व पळपुटा म्हणुन प्रसिद्ध असलेला बाजीराव दुसरा स्थानापन्न झालेला होता) स्वराज्य स्थापनेचे श्रेय जातीनिशी लाटण्यासाठी दादोजी कोंडदेव कुलकर्णीला शिवरायांच्या गुरुपदावर आरुढ करण्याचं कार्य सुरु झालं. त्याला साजेसा असा इतिहास बखरीच्या रुपाने पुढे आणण्यास ब्रह्मव्रुंदांनी सुरवात केली.याच काळात लिहिल्या गेलेल्या शिवदिग्विजय,चिटणीस बखर,शेडगावकर भोसल्याची बखर यांसारख्या बखरीमधुन दादोजी कोंडदेव कुलकर्णी हा शिवरायांचा गुरु असल्याचा खोटा इतिहास रचण्यात आला. दादोजी कोंडदेव ची प्रामाणिकता आणि महानता द्रुढ करणार्या भाकडकथा त्यावेळी रचण्यात आल्या.असत्य ठासुन वारंवार सांगितलं की ते सत्य भासू लागतं या तत्वाने दादोजी कोंडदेव कुलकर्णी शिवरायांचा गुरु होता,त्याने शिवरायांना घडविले,स्वराज्य उभारण्यामागे त्याची प्रेरणा होती.त्यांनी शिवरायांना स:शास्त्र चालविण्यास शिकवले, दादोजी कोंडदेव ने मावळ्यांची सैन्याची उभारणी केली.दादोजी कोंडदेव ने शिवरायांच्या आंब्याच्या बागेतील आंबा धापला (चोरला) नंतर पश्चाताप होऊन त्याने आपल्या हाताची बाही लांडी करून आयुष्यभर तशा एक बाहीचा अंगरखा वापरला अशा अनेक फ़ालतु ऐनतिहासिक कथांचा सुळसुळाट या बखरीतून झालेला आहे.
                 अशा बखरीचा आणि त्या बरहुकुम लिहिलेल्या लेखकांच्या पुस्तकाचा आधार दादोजी कोंडदेव चे समर्थक कायम घेत असतात हे इतिहासलेखनशास्त्राच्या विरुद्ध आहे.या दादोजी कोंडदेव समर्थकांनी दादोजी कोंडदेवला शिवरायांचा गुरु करण्यासाठी लबाडीच्या सीमांचं अनेक वेळा  उल्लघंन केलं आहे.
                    त्याचं एक उदाहरण द्यायचं झाल्यास तर जेष्ट इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी ३० वर्षापुर्वी "मराठी सत्तेचा उदय" आणि "शिवाजी व शिवकाल" हे ग्रंथ उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी लिहिले होते.त्यावेळी म्हणजे ३० वर्षापुर्वी त्यांनीही दादोजी कोंडदेव हा शिवरायांचा शिक्षक होता(गुरु नव्हे) अशी मांडणी केली होती.पण वादग्रस्त जेम्स लेन प्रकरणानंतर या विषयाचा त्यांनी सखोल अभ्यास केला.त्यानंतर त्यांनीही दादोजी कोंडदेव हा शिवरायांचा शिक्षक नव्हता हे सप्रमाण सिद्ध करणारं संशोधन जगासमोर आणलं.त्यावेळी त्यांनी आपलं ३० वर्षापुर्वीचं दादोजी कोंडदेव संबंधाबाबत मत कसं चुकीच्या संदर्भावर आधारलेले होते याचीही मांडणी केली आणि त्यांचं नवंसंशोधन त्यांनी २००६ साली पुण्यात या विषयावर झालेल्या परिसंवादामध्ये मांडलं. त्यानंतरही त्यांनी अनेक व्रुत्तपत्रे,पुस्तक,साप्ताहीक व व्याख्यानामधुन वारंवार दादोजी कोंडदेव हा शिवरायांचा गुरु नव्हता असं लिहिलं- बोललं आहे.असं असुनही दादोजी कोंडदेव च्या गुरुपदाचं समर्थन करणारे भटी महाभाग त्यांच्या जुन्या ३० वर्षापुर्वीच्या पुस्तकातील वाक्य आपल्या मुद्द्याच्या समर्थनात पून:पून्हा सांगत लिहित असतात.
             पांडुरंग बलकवडे यांनी ७ जानेवारी २०११ च्या लोकप्रभा या साप्ताहीकात (याच साप्ताहीकात ४ महीन्यापुर्वी म्हणजेच ओक्टोंबर २०१० मध्ये डॉ.जयसिंगराव पवार यांनी प्रदीर्घ लेखातून आपलं म्हणनं मांडलं होतं)३० वर्षापुर्वीचं डॉ.पवारांचं मत पुन्हा एकदा आपल्या समर्थनासाठी मांडलेलं आहे.
              एखादा संशोधक माझं पुर्वीचं मत चुकीचं होतं आत ते मी बदलत आहे असं सांगितलं असुनही त्यांचं जुनं मत वापरनं हा शुद्ध मुर्खपणा आहे यात दुमत नाही.