26 July 2013

॥ फ़ुले-शाहू-आंबेडकर ॥

सामाजिक क्रांतीचे वादळ महात्मा फ़ुले :-
राष्ट्रपिता महात्मा फ़ुले हे जसे अभ्यासक होते तसेच ते प्रबोधनकारही होते.ते भारतीय सामाजिक सुधारणेचे आंदोलन छेडणारे पहिले क्रांतीकारक होते.त्यांचे आंदोलन खर्या अर्थाने मानव मुक्तीचे आंदोलन होते. सामाजिक परीवर्तनासाठी प्रबोधनाची गरज ओळखून त्यांनी आपले लिखाण केले सामान्य जनास सहज समजेल अशा सोप्या व सरळ भाषेत केले म्हणुन महात्मा फ़ुले सामाजिक क्रांतीचे जनक मानले जातात.
धर्मग्रंथातील रुढी,सामाजिम अन्याय,अंधश्रद्धा आणि उच्चनिचतेच्या भेदभावांनी शुद्रातिशुद्रांना व स्त्रियांना गुलाम बनविले म्हणून महात्मा फ़ुलेंनी लेखणीचा आसूड बनवून धर्मग्रंथ आणि चातुर्वण्य व्यवस्थेवर प्रखर प्रहार केले आणि सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
क्रांतीकारी राजपुरुषाचा उदय :-
जोतिराव फ़ुलेंच्या लेखणीच्या फ़टकार्यांनी निर्माण केलेलं वादळ अजुन शमले नाही.कारण दि.२१-११-१८९० रोजी क्रांतीसुर्य मावळल्यानंतर उदयास आलेले करवीर रियासतीचे राजे छत्रपती शाहू महाराजांनी महात्मा फ़ुलेंनी सुरु केलेली "सत्य शोधक समाज" ही क्रांतीकारी चळवळ पुढे चालू ठेवली.राजर्षी शाहू महाराज हे छत्रपती घराण्याचे वंशज होते.ते एक सुंदर  आणि वैभवशाली संस्थानाचे राजे होते.त्यांच्याजवळ सत्तासंपत्ती होती.त्यांना ऐशारामात जीवन जगता आले असते.तरीसुद्धा ते एक क्रांतीकारक कसे बनले ? हे जाणुन घेणे गरजेचे आहे.राष्ट्रपिता महात्मा फ़ुले यांच्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे समाजातील जातीव्यवस्था,अस्प्रुष्यता,उच्चनिचता,शुद्रादिशुद्र आणि स्त्रीयांवर लादलेली गुलामगिरी नाकारणारे क्रांतीकारी राज पुरुष होते.त्यांनी आपले सारे आयुष्य प्रजेच्या हितरक्षणासाठी व्यथीत केले.
अस्प्रुष्याच्या पंगतीत बसून जेवणारे शाहू :-
शाहू महाराज हे केवळ मराठाच नव्हे तर सात्या बहुजन समाजात मिळून मिसळून राहत असे. अस्प्रुष्याच्या पंगतीत बसूण जेवन घॆत.त्यांच्या घरचे ,त्यांच्या हातचे पाणी पीत असत.शाहू महाराजांनी त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करून नोकर्यांमध्ये आरक्षण दिले.ते एवढ्यावरही थांबले नाहीत तर महाराजांनी दुर्गम डोंगराळ भागात राहणार्या आदिवासी लोकांची सक्षम गाठीभेटी घॆतल्या व त्यांच्या अडीअडणींचे निवारणही केले.
महारोग्यांची काळजी घेणारे शाहू :-
        महारोग्यांची परिस्थिती पाहून राजांना दुख: होत असे.म्हणुन त्यांनी महारोग्यांसाठी दवाखाना सुरु केला. ते महारोग्याच्या जवळ बसून त्यांच्या प्रक्रुतीची, त्यांना मिळत असलेल्या औषदाची चौकशी करत असत. एवढेच नव्हे तर रोगमुक्त होणार्या रोग्यांना पोटापाण्याची व्यवस्था देखील करीत होते.
राजर्षी शाहू महाराज लोकराजा या नावाने प्रसिद्ध झाले,त्यांना आपल्या रयतेची विशेष करून अस्प्रुष्य समाजाची जास्त काळजी वाटत असे,कारण अस्प्रुष्य समाजात त्यांची काळजी घॆणारा,त्यांच्या वेदना जाणणारा,त्यांना बरोबर घेऊन जाणारा कोणी दमदार पुढारी दिसून येत नसे.
शाहू-आंबेडकर प्रथम भेट :-
एके दिवशी मुंबईमध्ये शाहू महाराजांनी वर्तमान पत्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव वाचुन मन प्रसन्न झाले. महाराजांनी तात्काळ डॉ.बाबासाहेबांच्या निवास्थानी सौहार्दपुर्ण भेट दिली.करवीर संस्थानाचे राजे यांच्याशी अचानक भेट झाल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे उर आनंदाने भरून आले.
शाहू महाराजांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या निवास्थानी जाऊन त्यांची भेट घॆऊन सांगितले की मी आता काळजीमुक्त झालो.अश्प्रुश्यांना त्यांची काळजी घेणारा पुढारी मिळाला.या भेटीला आंबेडकर चळवळीमधील मैलाचा दगड संबोधले तरी वावगे ठरू नये.
फ़ुले-शाहूंचे वारसदार भिमराव :
महात्मा फ़ुले यांनी पेटविलेली सामाजिक क्रांतीची मशाल तेवत ठेवून दि.६/५/१९२२ रोजी छत्रपती शाहूंची प्राणज्योत मावळली.शाहू छत्रपतींच्या नंतर ती क्रांतीज्योत प्रज्वलित ठेवण्याची शक्ती केवळ बाबासाहेबांमध्येच होती आणि फ़ुलेंचा आणि शाहूंचा वारसा भिमरावांनी यशस्वीरित्या पुढे चालू ठेवला.
म्रुत पावलेल्या स्वाभिमानाला जाग्रुत केले:-
डॉ.बाबासाहेब हे एक असे क्रांतीकारक होऊन गेले की ज्यांनी गुलामीच्या विरुद्ध बंड करावे म्हणून गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली.अस्प्रुश्य समाजातील म्रुत पावलेल्या स्वभिमानाला जग्रुत केले आणि वर्णवर्चस्ववादी लोकांच्या डोळ्यात डोळा घालून त्यांच्याशी बोलण्याची शक्ती निर्माण करुन चातुर्वण्य व्यवस्थेच्या चिंढड्या चिंढड्या केल्या.
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा :-
बहुजन समाजाला या देशाची शासनकर्ती जमात होण्यासाठी "शिका-संघटित व्हा-संघर्ष करा" बाबासाहेबांनी करून दिलेली ही शिकवण विसरून त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर बहुजन समाज दिशाहिन झाला.अशा परिस्थितीत बहुजन चळवळीच्या क्रुतीशील नेत्रुत्वाची जबाबदारी मा.म. देशमुख ते आ.ह.साळूंखे व इतर बहुजन संघटनांनी संभाळली.
भारत हा अनेक जाती,धर्म,भाषा आणि रीतिरिवाजांचा देश आहे.संपुर्ण बहुजन समाज संघटित करणे अशक्य आहे असेच सर्वांना वाटत असे.परंतू संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनांनी मात्र हा समज चुकीचा ठरविला.त्यांनी सर्व बहुजन समाजास संघटित करून आपल्या कामाची सुरुवात केली.बहुजन समाजासाठी त्यांनी अविश्रांत काम केले.अशा संघटनांची आज गरज आहे.त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा !.

15 प्रतिक्रिया :

  1. आज आपला बहुजन समाज प्रगती करत आहे त्याचे संपुर्ण श्रेय हे आपल्या या तीन महामानवांना दिले पाहिजे.यांच्यामुळेच आपण आज सुरक्षीत आहोत नाही तर आमच्यापर्य़ंत शिक्षणाची गंगा आलीच नसती म्हणून या तीन महामानवांना कधीही विसरू नये.
    बहजनां ताराया.......अवतरला फ़ुले बाबा आणि शाहू राजा.

    ReplyDelete
  2. पाटील साहेब अगदी छान लेख जमलाय आजच्या निव्वळ शिव्या बरळायच्या काळामध्ये आपल्या धर्माचे आणि जातीचे गोडवे गात दुसर्यांना शिव्या देताना आपण प्रबोधनकारक लिहिणारे आपण आहात आपले कार्य खरच उत्तम आहे.आपल्या पुढच्या कार्यास लाख लाख शुभेच्छा.

    ReplyDelete
    Replies
    1. खरच आहे विकास पाटीलांच्या लेखणीला अजुन ब्रेक लागला नाही आणि ही लेखणी कधी न थांबो हिच अपेक्षा..

      Delete
  3. फ़ुले शाहू आंबेडकर हे आपल्या उन्नतीचे सुत्र आहे.हे बहुजनांचे महानायक आहेत
    कोटी कोटी प्रणाम

    ReplyDelete
  4. महात्मा फ़ुले यांनी बहुजन समाजातील मुलांसाठी पहिली शाळा काढली...

    ReplyDelete
  5. जबरदस्त लेख! झकास जमला आहे! असेच लिहित रहा!
    मनापासून तुमच्या लेखनाला शुभेच्छा!!!!!!!!!!!!!!!

    ReplyDelete
  6. "डॉ आंबेडकर यांनी "शिका, संघटीत व्हा आणि लढा द्या" असा कार्यक्रम आपल्या अनुयायांना दिला. शिक्षणक्षेत्रातील आजचा भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणावर डॉ आंबेडकर यांच्या लढ्याच्या आदेशातील त्रुटींमुळे तयार झाला नसेल न , हि शक्यता तपासून पाहावे लागेल. त्यामुळे शिकले शिकले म्हणजे नोकरी आणि नोकरी म्हणजे पैसा हि सर्व समीकरणे समाजवाद बरोबर उध्वस्त झाली. डॉ आंबेडकर यांनी पुस्तकी शिक्षणापेक्षा बलुतेदारांच्या व्यावसायिक शिक्षणावर भर दिला असता तर जाती नष्ट करण्याचे त्यांचे उद्दिष्टहि साधले गेले असते आणि देशाचेही भले झाले असते"

    ReplyDelete
  7. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून महामानवाने अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र इत्यादी विषयाचे अध्ययन केले, त्यात प्राविण्य मिळवले. १९१५ मध्ये "प्राचीन भारताचा व्यापार" या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून एम. ए. हि पदवी संपादन केली. तसेच १९१६ मध्ये त्यांनी "National Divident of India: A historical and analytical study" या प्रबंधाबद्दल त्यांना कोलंबिया विद्यापीठाने Ph. D. हि पदवी प्रदान केली या प्रबंधाची मांडणी, संशोधन आणि चिकित्सक दृष्टीची अर्थशास्त्रातील विद्वानांनी मुक्तकंठाने स्तुती केली. संपूर्ण अमेरिकेत त्यांचे नाव गाजले.

    ReplyDelete
  8. ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलीतांच्या, शोषितांच्या, कामगारांच्या तळहातावर तरली आहे.

    ReplyDelete
  9. मुंबईत उंचावरी । मलबार हिल इंद्रपुरी ।
    कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती ।।
    परळात राहणारे । रातदिवस राबणारे ।
    मिळेत ते खाउनी घाम गाळती ।।१।।
    ग्रॅंट रोड, गोखले रोड । संडास रोड, विन्सेंट रोड ।
    असे किती रोड इथं नाही गणती ।।
    गल्ली बोळ किती आत । नाक्यांचा नाही अंत ।
    अरबी सागराचा वेढा हिच्या भोवती ।।२।।
    आगीनगाडी मोटारगाडी । विमान घेतं उंच उडी ।
    टांग्यांची घोडी मरती रस्त्यावरती ।।
    हातगाडी हमालांची | भारी गडबड खटा-यांची ।
    धडपड इथं वाहतुकीची रीघ लागती ||३||

    ReplyDelete
  10. छत्रपती राजश्री शाहू महाराज हे अतिशय उत्कृष्ट दर्जाचे मल्ल(पहेलवान) होते... महाराज आपल्या प्रतिस्पर्धी मल्लाला कुस्तीच्या रीगणांबाहेर उचलून फेकत असत... बुद्धिचातुर्य आणि शरीराने बलवान असेलेला हा रयतेचा राजा. महाराज मुजरा तुम्हांला !!

    ReplyDelete
  11. आधुनिक भारताच्या सर्वांगिण उभारणीमध्ये ज्या नेत्यांचे महत्वपुर्ण योगदान आहे त्यात डा‘.बाबासाहेब आंबेडकर अग्रस्थानी आहेत.स्त्री-पुरुष समता, जातीनिर्मुलन, संसाधनांचे फेरवाटप,सर्वांना शिक्षण,धर्मचिकित्सा ही मुलभुत विषयपत्रिका घेवून त्यांनी लढे उभारले. संवैधानिक हक्क, समाज प्रबोधन, संघटन, संघर्ष याद्वारे बाबासाहेबांनी राजसत्ता,अर्थसत्ता,धर्मसत्ता, प्रशासन, न्यायव्यवस्था, ज्ञानसत्ता, सांस्कृतिक सत्ता, माध्यमसत्ता या सगळ्यात स्त्रिया आणि अनुसुचित जाती,जमाती, भटके विमुक्त, इतर मागास वर्गिय, अल्पसंख्याक यांना प्रतिनिधित्त्व मिळाले पाहिजे यासाठी ते झुंजले. स्वत: आयुष्यभर लेखन,वाचन,चिंतन आणि ज्ञाननिर्मितीच्या कामात बाबासाहेब समर्पित राहिले. त्यांनी सर्व वंचित,दुबळे, पिडीत यांना अस्तित्त्व,उर्जा, अस्मिता आणि प्रकाश दिला.

    ReplyDelete
  12. आज शाहू महाराजांचे काम बहुतांशी लोकांपर्यंत पोहचले आहे. शाहुराजांच्या या अद्वितीय कामगिरीमुळे सर्वसामान्य बहुजनांच्या हृदयात शाहूंना आदराचे स्थान आहे. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुषांच्या जोडीला शाहू राजांचे नाव घेतले जाते. पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यात फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा फार मोठा वाटा आहे.
    आज शाहू महाराजांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या सर्वत्र साजऱ्या केल्या जातात. परंतु फक्त एवढे करून त्यांच्या विचार-कार्याचे चीज होणार नाही. शाहूंचा लढा हा समतेसाठी होता. आत्मसन्मानासाठी होता. वर्णवर्चस्वाच्या अहंकारी प्रवृत्तीविरुद्ध होता. आज शाहू राजांच्या पश्चात त्यांचाच जयजयकार करणारे, त्यांच्या नावाने सत्ता भोगणारे राज्यकर्ते गरीब प्रजेला छळत आहेत. भ्रष्टाचार, गुंडगिरी या प्रवृत्ती फोफावल्या आहेत. शाहूराजे फक्त पुजण्यापुरतेच राहिले आहेत. त्यांचा वारसा, त्यांचे विचार, कार्य आपण विसरलो आहोत. राजर्षी शाहूंनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या संस्थानात जनहितार्थ अनेक कायदे केले. प्रसंगी टीका, अपमान, बदनामी यांची पर्वा केली नाही. पण आजच्या राज्यकर्त्यांना ‘जादूटोणा व अघोरी प्रथाविरुद्ध कायदा’ करता येत नाही. राज्यकर्ते शाहूंच्या नावाने राजकारण करतात मात्र त्यांचा विचार जपताना कुणीच दिसत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.

    शाहूंच्या कार्याचे खरे चीज व्हावे असे वाटत असेल तर शिक्षण घेवून उच्च पदे हस्तगत केली पाहिजेत. आपल्या अधिकाराचा, पदाचा वापर सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाकरता केला पाहिजे. उपेक्षित, वंचितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, जातीभेद नष्ट करणे, सामाजिक समता प्रस्थापित करणे ही शाहू राजांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करुया, हीच शाहुराजांना आदरांजली ठरेल.

    ReplyDelete
  13. सध्याचा काळ कठिण आहे जातीत जातीत वाद सुरु झालेले आहेत.पण फ़ुले-शाहू-आंबेडकर चळवळीच्या लोकांची जबाबदारी वाढलेली आहे.खास करून आंबेडकरी चळवळीतील लोकांची जबाबदारी वाढलेली आहे.त्यांनी जातीय सलोखा ठेवला पाहिजे.

    ReplyDelete
    Replies
    1. जातीव्यवस्था संपवणे हे कार्य आंबेडकरी चळवळीला अशक्य आहे जे स्वत:ची जात सोडायला तयार नाहीत ते इतरांना काय जातमुक्त करणार ? बाकी फ़ुले-शाहू-आंबेडकर चळवळ थॊडाफ़ार बदल घडवु शकते.यात शंकाच नाही.कारण त्यांचे विचार फ़ुले-शाहुंप्रमाणे वैश्विक आहेत.

      Delete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.