12 June 2012

छ.शिवरायांबद्दल जगातील मान्यवरांचे गौरवोद्गार

मार्शल बुल्गानिन (मा.पंतप्रधान- रशीया) - "साम्राज्यशाहीविरुद्ध बंड उभारुन स्वराज्याची पहिली मुहुर्तमेढ छ.शिवाजी महाराजांनी रोवली."
प्रिंस ओफ़ वेल्स (इंग्लंड) - "छ.शिवाजी महाराज हे सर्वात मोठे योद्धे होते. त्यांच्या स्मारकाची कोनशिला बसविताना मला अत्यानंद होत आहे."
ब्यारन कादा (जपान) - "छ.शिवाजी महाराज सत्पुरुष होते. त्यांनी अखिल मानव जातीचे हित केले."
मि.एनोल्ड टायबर्न (जगविख्यात इतिहासकार) - "छ.शिवाजी महाराजांसारखे राजे आमच्या देशात जन्माला आले असते तर त्यांच्या स्म्रुतीचा अक्षय ठेवा आमच्या डोक्यावर घेऊन आम्ही आनंदाने नाचलो असतो."
डॉ.डेलोन (शिवकालीन युरोपीयन प्रवासी) - " छ.शिवाजी राजे अत्यंत हुशार आणि जाणकार असून सर्व धर्माशी ते सहिष्णुतेने वागतात"

वॉरन हेस्टिंग (व्हाईसराय जनरल) - "सर्व भारतात केवळ शिवरायांचे अनुयायी जाग्रुत व जिवंत आहेत, हा छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाचा  परिणाम आहे."
प्रबोधनकार ठाकरे - "शिवाजीराजे इतके महान आहेत की त्यांच्या पुढे ३३ कोटी देवांची फ़लटण बाद होते."
स्वातंत्र्यवीर नेताजी सुभाषचंद्र बोस, क्रांतीसिंह नाना पाटील, भगतसिंग, उमाजी नाईक - " स्वातंत्र्य आंदोलनाची प्रेरणा आम्हास छ.शिवरायांच्या चरित्रातून मिळाली " 
कर्मवीर भाऊराव पाटील  (शिक्षणमहर्षी ) -  "प्रसंग पडला तर जन्मदात्या बापाचे नाव बदलेन पण कोलेज  ला दिलेले शिवरायांचे नाव मी कधीच बदलणार नाही "
ग्रेंड  डफ (इंग्लंड ) - "राजे केवळ लढवय्ये नव्हते तर सामाजिक आणि अर्थकारण यांची उत्तम जाण असणारे राजकारणी पुरुष होते. त्यांच्या चानाक्ष योजकतेमुळेच हतबल झालेल्या बहुजनांना सत्ताधिश होता आले."
साहित्य रत्न आण्णाभाऊ साठे - "प्रथम मायभुमीच्या । छत्रपती शिवबा चरणा । स्मरोनी गातो कवना । "
नेताजी सुभाषचंद्र बोस - "हिंदुस्तानच्या इतिहासातील फ़क्त शिवाजी महाराजांचे तेजस्वी चरित्र माझ्या अंत:करणात मध्यान्हिच्या तळपत्या सुर्याप्रमाणे प्रकाशमान होऊन राहीलय.शिवाजी महाराजांइतके उज्वल चरित्र दुसर्या कुणाचे मला दिसले नाही सद्य:स्थितीत या महापुरुषाच्या वीर चरित्राचा आदर्शच आम्हाला मार्गदर्शक आहे.शिवाजी महाराजांचा हा आदर्शच  सगळ्या हिंदुस्तानासमोर ठेवला पाहिजे ." 
भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर - " छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि चरित्र उत्तम होते. त्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे पेशव्यांनी नुकसान केले " 
पो.व्हाईसराय आंतोनियू द मेलु - द काश्चू (१४ जानेवारी १६६४ ) - "शिवाजी राजा हा एक कष्टाळू आणि पराक्रमी राजा आहे."
ब्रिटीश इतिहासकार ग्रेंड डफ़ - "मराठा साम्राज्याच्या राजाची तुलनाच करावयाची झाली तर ती जगजेत्ता अलेक्झांडर व नेपोलियन बोनापार्ट  यांच्या बरोबर करावी लागेल"

12 प्रतिक्रिया :

  1. छान लेख आहे. खरोखर यावरून शिवप्रभुंची प्रतिमा दिसून येते.
    ॥ जय शिवराय। ॥जय जिजाऊ ।

    ReplyDelete
  2. अगदी उत्तम लेख आहे.छ.शिवराय हे जगातल्या आदर्श व्यक्तींचे आदर्श आहेत.
    धन्य ही माती ज्या मातीत शिवराय जन्माला आलेत.
    ॥ जय शिवराय ॥

    ReplyDelete
  3. क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधिश्वर राजा शिवछत्रपती आमचा कोटी कोटी मुजरा !! कोटी कोटी मुजरा…… !!जय जिजाऊ-जय शिवराय-जय शंभूराजे!!

    ReplyDelete
  4. विक्रम जोशीSaturday, 16 June, 2012

    ‎|| सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त || आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त ||

    ReplyDelete
  5. आपल्या गगनभेदी सिंहगर्जनेने मृत्युलाच ललकारनारा असा अद्वितीय सम्राट जगाच्या इतिहासाने
    या आधी कधी पाहिला नव्हता आणि या पुढे हि पाहणार नाही..


    जय जिजाऊ .. जय शिवराय.. जय शंभूराय..

    ReplyDelete
  6. प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद! ,मित्रांनॊ.

    ReplyDelete
  7. एक मराठी माणूसFriday, 22 June, 2012

    मराठ्याची पोरे आम्ही नाही भिनार
    मरणाला,
    सांगुन गेला कोणी शाहिर
    अवघ्या विश्वाला,
    तिच आमुचि जात मराठी मळवट
    भाळी भवानीचा,
    पोत दाखवूनी नाचतो दिमाख आहे
    जबानीचा"
    "जय जिजाऊमाता"
    "जय शिवराय"

    ReplyDelete
  8. ‎||लढ भगव्यासाठी मर भगव्यासाठी||

    जरीपटका ....................रायगडाचा !

    भगवा पेलायला मर्द मावळा लागतो..
    ... ... ज्याला जमत नाही तो पळून जातो ...
    शपथ भगव्याची
    कमान भगव्याची मोडू नको ..........!!!
    साथ भगव्याची सोडू नको ...........!!!.
    ||लढ भगव्यासाठी मर भगव्यासाठी||

    ''भगवा पाहिल्यावर मराठ्याच्या छाताडाचा भाता फुगल्या शिवाय राहत नाही''

    ReplyDelete
    Replies
    1. संदीप पाटीलFriday, 22 June, 2012

      नितिन गायकवाड
      नाद खुळा भावा ! जय शिवराय

      Delete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.